URMILA DEVEN

Others

3  

URMILA DEVEN

Others

बायको, माझ्या घराचा आत्मा आहे.

बायको, माझ्या घराचा आत्मा आहे.

4 mins
1.5K


"हा, बोल मित्रा, कधी ? आज भेटायचं का? तुझ्याकडे, अरे यार मस्तच, अरे... एक मित्रच मित्राला समजू शकतो मित्रा.. डन.. माझी एंट्री पक्की कर, चल अगदी वेळेवर पोहचतो"

विशाल ने हसतच फोन ठेवला, आणि रागिणी लगेच बोलली," झालं ... जा पार्टी करायला .. काय मज्जा येते या पुरुषांना कोण जाणे ? बायको घरी नसली कि असल्या ओव्हर नाईट पार्ट्या करण्यात फालतूचे शौक." आणि ती नाक तोंड मुरळत, चपात्या लाटायला लागली, त्यावर विशाल तिला चिडवत म्हणाला, "त्याला फ्री होणं म्हणतात राणी सरकार.... तुला नाही कळायचं, आणि आपल्या नशिबात कुठे असली पार्टी, तू तर पिल्लू च्या जन्मानंतर चार वर्ष झालीत, काही माहेरी गेली नाहीस !"

रागिणी गुणगुणायला लागली "झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो.... "

विशाल, "हो हो जातेस.... पण, लगेच तिसऱ्या दिवशी परत येतेस ना"

रागिणी, "मैं मायके नही जाऊंगी तुम देखते रहियो .. "...........आणि रागिणीचा मोबाईल वाजला,

"हा, बोल आई"

आई, "अगं, जरा, बाबांना बरं नाही, तू येतेस का इकडे काही दिवसांसाठी, आणि बाळा जरा हप्त्याभरासाठी ये ना ग, आल्यासारखं तरी वाटू दे आम्हाला, हवं तर मी बोलते जावईबुवाशी," आईच्या आवाजात मंदपणा होता.

विशाल ने रागिणींकडून फोन घेतला.

"हो, हो मी जावईच बोलतो आई, काही काळजी करू नका, मी आजच तिला बस मध्ये बसवून सांगतो तुम्हाला कि ती कधी पोहचेल, तसं मग तुम्ही आमच्या मेहुण्यांना पाठवा स्टेशन वर"

रागिणी लगेच बोलली, "एका माणसाच्या मनात लड्डू फुटत आहेत वाटतं, मग काय येणाऱ्या शनिवारची पार्टी इकडे असणार .... ". नाही ग वेडे, असं म्हणत, 'आज मैं ऊपर, आसमाँ नीचे', च्या तालात विशालरावांचं जेवण सुरु झालं. रागिणीला तयार होऊन रहा, मी हाफ डे घेऊन येतो आणि तुला सोडून देतो बस स्टोपवर असं म्हणत तो ऑफिस साठी निघाला.

रागिणीला बस मध्ये बसवून विशाल घरी आला तेव्हा तो काहीसा असा होता "पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में

आज मैं आज़ाद हूँ दुनिया की चमन में" रावांनी तासभर आंघोळ केली आणि मित्राकडे रवाना झाले.

फोन करुन बायको त्रास देणार नव्हती. म्हणून रात्र मित्राकडे काढली. आणि येत्या शनिवारी पार्टीसाठी स्वतःकडे आमंत्रणही दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला तेव्हा घरात भयाण शांतता होती. पण विशालरावांनी स्वतःची सर्वच काम मोट्या आनंदाने केलीत. सारखं हे करू नको, ते करू नको असं म्हणणार घरात कुणीच नव्हत. रात्री परत येताना बाहेरून मस्त हॉटेलचं जेवून आला आणि निवांत क्रिकेटची मॅच बघत दिवाणखान्यात सोफ्यावरच झोपला. सकाळी उठल्या उठल्या रागिणी माझा चहा आण आणि आज जरा लवकर जायचंय गं, अशी हाक मारत कडा पलटली तर बदकन सोफ्यावरच खाली पडले यजमान आणि भानावर आले. कसं बसं स्वतःला आवरत शेव्हिन्ग केली आणि लवकर तयार होऊन ऑफिस गाठलं. सोफ्यावरच झोपल्याने पाठ लागली होती, धड बसताही येईना.

शनिवार उद्याच होता मग पार्टीची तयारीही पटापट केली, बिर्याणी, पिझ्झा... ड्राय फ्रुटस आणि ड्रिंक्स सगळं तयार ... महाशय कागदी प्लेट्स आणि ग्लास आणायला विसरले आणि घरी असतील पण रागिणीला कोण फोन करून विचारणार? मग घरातलेच डिनर सेट्स आणि नवीन सर्वच सेट्स बाहेर काढले. सकाळ पर्यंत सर्वच मित्र परतले होते. काहींनी मदतही केली, पण घरात जो पसारा होता तो तर निस्तरायचा होताच मग लागले कामाला.. हँगओव्हर एवढा होता कि उलट्या सुरु झाल्या. स्वतःचा इलाज करत बायकोच्या आठवणीत सोमवार गाठला आणि तिला सहज फोन केला, "हॅलो, रागिणी, मग मज्जा सुरु आहे का तुझी, आमचं पिल्लू कस आहे." रागिणीला आवाजावरून कळलं होत पण तिनेही म्हटलं, "मस्त मज्जा आहे, अजून एक हप्ता थांबावं म्हणते..."

विशाल निराशेतच ऑफिससाठी निघून गेला. आता त्याला कॅन्टींगच आणि हॉटेलचं जेवण बोर झालं होत. घरी पाऊल टाकताच रागिणीचं प्रेमळ बोलणं ऐकायला येत नव्हत. चहाचा घोट घेत पिल्लूचा लाड करणं मिस करत होता तो. घरच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याला रागिणीच्या बांगड्याचा तर कधी तिच्या चाळीचा आवाज येत होता. आता तिच्या बिछाण्यावरच्या तुटून पडलेल्या केसांवरही प्रेम येत होतं. तर कधी तिच्या पडलेल्या वस्तूही नीट ठेवत होता. पिल्लू रडत नव्हतं आणि रागिणी त्याला पकड म्हणून ओरडत नव्हती. रागिणीने काळजीपोटी बनवून ठेवलेला चिवडा आणि शंकरपाळे त्याने आत्ता स्वयंपाक घरात शोधले. घरात कुचकट वास येत होता. त्याची कुठलीच वस्तू त्याला सापडत नव्हती. विशालरावांची हप्त्याभऱ्यात वाट लागली होती. आणि अजून रागिणी येणारच नाही म्हूणन वैतागला होता तो. तिला फोन करून म्हणू हि शकत नव्हता कारण हि त्याचीच डिमांड होती. आता त्याची नजर प्रत्येक वेळेस फोन वर होती कि केव्हा रागिणी फोन करून म्हणेल कि मी येतेय ...

इकडे, रागिणीच्या वडिलांना आत्ता बर वाटत होत पण त्याना नातवांसोबत अजून थोडं राहायचं होत मग ते राहण्याचा आग्रह करत होते. आणि रागिणीलाही तिच्या जिवलग मैत्रिणीच्या लग्नात मज्जा करायची होती.

पण विशालचा जीव मात्र टांगणीला लागला होता. त्याला घर खायला उठलं होत. रागिणीशिवाय त्याला काहीच सुचत नव्हतं. ऑफिस मध्ये मन लागत नव्हतं. घरी रागिणी नाही म्हणून घरी येण्याची इच्छा होत नव्हती. आता त्याला तिच्याशिवाय एकही दिवस काढायचा नव्हता पण रागिणीला बोलणार कस? रोज तिला बऱ्याचदा फोन करायचा पण ...

शेवटी खूप हिम्मत करून त्याने रागिणीला मॅसेज लिहिला...

प्राण प्रिये,

हा मॅसेज पाठवून आता दोन तास झाले होते पण पाठवलेल्या मॅसेज चा सीन असा स्टेटस चेंज झाला नव्हता म्हणून विशाल काळजीतच होता. तर दारावरची बेल वाजली ... आणि पप्पा .. पप्पा असा आवाज आला .. दार उघडलं तर रागिणी म्हणाली, "सरप्राईझ .. मी आले ... "

घरात आल्या आल्या तीच लक्ष बेसिन जवळ ठेवलेल्या तिच्या आवडत्या डिनर सेट वर गेलं. त्यातल्या काही प्लेटस फुटल्या होत्या ... आणि रागिणीची बडबड सुरु झाली .. तिकडे विशाल गप्प एका कोपऱ्यात सोफ्यावर बसून बाळाचा लाड करत होता. रागिणी ने घरात पाय ठेवताच त्या घराचा आत्मा परत आला होता .. घर आनंदाने हसत होत ..

धन्यवाद!!


Rate this content
Log in