Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Yogesh Nikam

Horror

2  

Yogesh Nikam

Horror

नाकातील नथ..!!

नाकातील नथ..!!

3 mins
1.1K


संध्याकाळचे सात वाजले होते तसा पांडुरंग पाटी पावडे सायकलला अडकवून निघाला,तितक्यात बायको म्हणाली आज नका जाऊ कामावर अमावस्या आहे पण पांडुरंग तीच्यावर जोराने खेकसला व पोरांबारासाठी करतोय ना हे सर्व म्हणून मनांत राग धरुन नदीच्या दिशेने निघाला..!!


अर्ध्या वाटेत गेल्यावर रस्त्यालगत घर असलेला त्त्याचा जोडीदार गणपतला आवाज दिला पण गणपत म्हणाला तु चाल पुढे मी आलोच तसा पांडुरंग निघाला,अंधार पडला होता रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते गावची शिव ओलांडली,रस्ता दिसेनासा झाला बॅटरी काढण्यास खिशात हात घातला पण बायकोने घातलेल्या कटकटीने तो घाईत निघाला व बॅटरी विसरला होता,मागे गणपतला बघतो तर काळाकुट्ट अंधार म्हणून तसाच पुढे निघाला,पुढे निघताच पायातील घुगंराचा छमछम आवाज येत होता,तो थांबला तसा आवाजही बंद झाला परत पुढे निघाला पुन्हा छमछम,रस्त्यालगतची झाडे पांडुरंगला सैतानासारखी दिसत होती,जसा जसा पांडुरंग पुढे जात होता तशी झाडे त्याच्याबरोबर पळत होती असं त्याला भासत होत तसा तो घाबरला,बाजूच्याच शेतातील ऊसांच्या पात्यांची सळसळ कुणीतरी त्याच्या मागावर आहे व पाठलाग करत अाहे असं त्याला जाणवले,हे सर्व चालू असताना तो थबकला व माघारी जाण्यास ठरवले तितक्यात गणपत आला तसा त्याच्या जीवात जीव आला...!!


पांडुरंगने गणपतला घडलेला प्रकार सांगितला तसा गणपत खदखदुन हसला भास झाला तुला असं समजावून पुढे निघाला,दोघेही नदिवर पोहचले व जाळलेले प्रेत शोधून कामावर लागले,स्मशानातील सोनं किंवा चांदी शोधणे हे त्यांचे काम,गावात काम नसल्याने व उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने झटपट पैसा कमवण्याचा हा मार्ग त्यांनी स्वीकारला होता..!!


दोघेही मेलेल्या माणसांची सोनं शोधण्यात दंग झाली,रातकिड्यांची किर्रकिर्र चालूच होती,काळाकुट्ट अंधार पडला होता,तेवढ्यात कुत्रे भु्ंकण्याचा आवाज आला तसा गणपत म्हणाला हाकलून लाव त्यांना तिकड,पांडुरंग त्यांच्या मागे धावला व हाकलू लागला पण कुत्रे माघार घेईना तसा तो त्यांना हाकलत बराच पुढे आला,बघतो तर काय कुत्र्यांनी प्रेत उकरुन काढलं होत,अंधारात प्रेताच्या गळ्यातील मणी चमकले,दोन तासापासुन काहीच हाती लागले नव्हते म्हणून पांडुरंग खुश झाला पण वाटेकरी नको म्हणून गणपतला आवाज दिला नाही व घाईघाईने त्या महिलेच्या अंगावरील सोनं काढू लागला,पायातील जोडवे,गळ्यातील मंगळसूत्र,कानातील झुबके,हातातील बांगड्या काढल्या व निघाला तितक्यात त्याचा हात पाठीमागून कुणीतरी धरला पण त्याला वाटले की गणपत आला मागे वळून बघतो तर त्या प्रेताने त्याचा हात धरला होता व नाकातली नथ राहिली काढायची ती काढून घे असे म्हणत होती..!!!


पांडूरंग खुप घाबरला,घामाने पुर्ण भिजला व कसाबसा हात झटकून व सर्व सोनं टाकून पळाला,पुढे येतो तर गणपत तिथे नव्हता,टिटवी पांडुरंगच्या डोक्यावरुन फिरत होती,कुत्रे त्याच्या मागे लागली होती,तो धडपडत अंधारात पाऊल टाकत होता,काटे टोचून तो रक्तभंभाळ झाला होता,मेलेली माणसे त्याच्या मागे धावत होती,मधूनच त्याचा पाय ओढत होती,कींचाळण्याचा आवाज कानात गुंगत होता,कसाबसा तो नदीकाठी पोहचला पण कुणीतरी त्याचा पाय धरला होता व सुटतच नव्हता त्याने मागे वळून बघितले तर गणपत होता व सगळी प्रेते त्याला खात होती व गणपत त्याला म्हणत होता मला सोडून जाऊ नकोस..!!


पांडुरंग पाय झटकत होता,व मला जाऊ द्या म्हणत होता,तितक्यात नथीवाली बाई आली व म्हणाली ईतके दिवस तुम्ही सर्वांना लुटून खाल्ले आता आम्ही खाणार तुम्हाला,जायचे असेल तर जा पण हे सोनं घेऊन जा आणि नथ काढून दे नाकातली. ????


Rate this content
Log in

More marathi story from Yogesh Nikam

Similar marathi story from Horror