Shreyas Gawde

Fantasy Others

2  

Shreyas Gawde

Fantasy Others

मोबाईलवरच्या गप्पा. . .

मोबाईलवरच्या गप्पा. . .

3 mins
98


         मला ना नेहमी एका गोष्टीचं अप्रूप वाटायचं... ते म्हणजे मोबाईल आल्यापासून काही लोकं त्यावर मारत असलेल्या गप्पा... खरंच सांगतोय. मला ना काळायचंच नाही की ही लोकं तासन तास मोबाईल वर कशा काय गप्पा मारू शकतात. माझ्याकडे फोन आल्यावर मी हार्डली २ मिनिटांच्या आत माझं संभाषण संपवायचो.. अगदीच काम असेल तर १० मिनिटे माझ्यासाठी पुरेशी होती...


                 यातला काही गमतीदार क्षण किस्से तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे... याआधी मला वाटायचं जे लोकं याचा कामासाठी वापर करतायत त्यांचं ठीक आहे. पण, त्यांचं काय जे दिवसाढवळ्या आणि रात्री सुद्धा फोन सतत कानाला लावून त्यांच्या गर्ल फ्रेंड शी गप्पा मारत बसतात.. अतिशयोक्ती म्हणा, नाहीतर हद्द म्हणा, ही हद्द तर तेव्हा व्हायची, ज्या काळी कॉल चार्जेस हे खूप महाग होते.. आणि यांची गर्ल फ्रेंड समोरून PCO वरून १ - १ रुपया कॉइन बॉक्स मध्ये टाकून कॉल करायची... हे जेव्हा आम्हाला कळायचं तेव्हा आम्ही काही मित्र लोट-पोट हसायचो... कधी, कधी समोर भेटल्यावर चिडवायचो... येता जाता अश्यांची सतत खेचायचो... पण ,या सगळ्या गोष्टींचा त्या प्रेमी युगलांवर काही परिणाम व्हायचा नाही... कधी कधी त्यांचा सुद्धा हेवा वाटायचा... मनातल्या मनात वाटायचं.. " अरे यार ! यांनाच कशी भेटते अशी गर्ल फ्रेंड ? "

माझ्याच एका मित्राने एकदा आमच्या अश्याच मित्राला खूप भारी सल्ला दिला होता..

तो म्हणाला, " दादा मी काय म्हणतो तू कानाच्या इथे मोबाईल स्टँड का नाही बनवून घेत ? म्हणजे तुला मोबाईल पकडायचे टेन्शन पण नसेल... "


या एका वाक्याकर तिथेच ते ऐकत असणाऱ्या आमचा एकंच हशा फुटला...

काही वर्षानंतर माझ्या एका मित्राचं लग्न ठरलं.. तोही अगदी याच्या सारखा वागू लागला... तेव्हा पर्यंत मोबाईल बऱ्यापैकी सक्रिय झाला होता... पण, गमतीचा भाग म्हणजे त्या मित्राचं अरेंज मॅरेज ठरलेलं.. आणि तो जरा इतरांपेक्षा वेगळा होता.. म्हणजे जे जरा एथिक्स ला पकडून चालतात. म्हणून त्याच्या बाबतीत ही असं घडू शकतं... यात आमचा विश्वास बसत नव्हता... हा माणूस ही असा वागू शकतो.. तासंतास फोनवर बोलू शकतो.. ?


             नंतर बराच काळ गेला. सगळे सवंगडी आपआपल्या कामात व्यस्त झाले.. जेव्हा कधी जुने मित्र भेटायचो अगदी मोबाईल चा विषय निघालाच तर जुने दिवस आठवून खूप हसायचो. त्यात आमच्या ऑफिस मधला अमका फोनवर असा बोलतो. तमका तसा बोलतो. म्हणजे काहींची विशिष्ट शैली असते. समोर वेगळे आणि फोनवर आवाज वेगळा, काहींची तर भयानक शैली. अशा बातम्यांची सरबत्ती असायची... तेही एक एक जण मस्त अभिनय करून दाखवायचे. त्यात एक वेगळीच मज्जा होती. तुमच्या सोबतही झालं असेल ना ?

                त्या दरम्यान एक असाही काळ आला म्हणजे माझंही अफेअर झालं. आणि जास्तीत जास्त १० मिनिटे बोलणारा मी, तासंतास मोबाईल वर माझ्या गर्ल फ्रेंड सोबत गप्पा मारू लागलो...

बोलतात ना वेळ स्वतःवर येते ना तेव्हाच कळतं... अगदी तसंच झालं... मी केलेली मस्करी, आरोप सगळे एका क्षणात माझ्या मनातून धुवून गेले.. प्रेम काय असतं हे तेव्हा कळलं. पण त्याहूनही मोबाईल वरचं प्रेम किंचित अधिक पटीने वाढलं होतं... हे सगळं आठवून मानातल्यामनात स्वतःशीच हसू येत होतं.

हा आता मोबाईल चे फायदे तसेच दुष्परिणाम आहेतच... पण , बाकी सगळं तुमच्या हातात आहे...

खरं आहे ना ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy