#हॅशटॅग-ट्रेंड
#हॅशटॅग-ट्रेंड


न्यू ट्रेंड येतात, जातात, काळाप्रमाणे आपआपल्या सोयीप्रमाणे खरचं ना...? आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनरेशन न्यू, ट्रेंड न्यू. बदलत असतं सगळचं. सध्याची नातीचं घ्याना ती ही तशीच आहेत. प्रत्यक्षात भेटल्यावर न बोलणारी; सोशल साईडवर मात्र तासनतास गप्पा मारतात. जी नाती पूर्वी उलघडण्यात मजा होती ना... ती आता, नं भेटतातच उलघडतात. अर्थात ह्याचे जितके तोटे आहेत तितके फायदे सुद्धा आहेत आणि या वरचा उपाय यातून पळ काढणे असा होत नाही. सांगायचं इतकंच कि, दोन्हीचं महत्व तितकंच आहे. थोडक्यात सांगायचं तर ह्या दोन्ही मधला बॅलंस साधता आला पाहिजे. तेव्हाच खऱ्या आयुष्यातला फरक जाणवेल. त्यामुळे हा ट्रेंड जपा, पुढे न्या आणि त्या सोबत नातीही जपा. सोशल पेक्षा प्रत्यक्षात...नाहीतर उपेक्षा जाणवेल...
तुमच्याच भाषेत सांगायचं तर हे असं...
IsBetterToValueThePersonThanObject.