Shreyas Gawde

Inspirational Others

3  

Shreyas Gawde

Inspirational Others

"मनातील वादळ . . ."

"मनातील वादळ . . ."

12 mins
357


                     सुटलेला सोसाट्याचा वारा , थैमान उतू घातलेला समुद्र, नेमकं भरतीच्या वेळी समुद्राला आलेलं उधाण, झाडांची पडझड, त्यात नेमका सुरू झालेला पाऊस, संपूर्ण शहरी भागावर सावटलेले काळे ढग, विजांचा कडकडाट, लोकांची पळा-पळ, त्यात काही लोकांची आपलं स्वतःच सामान आवरण्याची, वाचवण्याची सुरू असलेली मजेशीर, भयभीत अशी तयारी, गडबड, गोंधळ. . . आणि मग, सुरू झालेल्या एका भयाण पर्वाची सुरुवात. जो तो आपआपला जीव वाचवून स्वतःच्या घरी बसून किंवा जे घरी नसतील ते स्वतःला एखाद्या आडोश्याला उभं राहून, कोणी कोणाच्या घरच्यांना घरी कॉल करून खुशाली कळवत आहे; तर कोणी मला पोचायला लेट होईल असं सांगतोय. म्हणजे नुसतं विस्कळीत झालेलं तरीही सावरू पाहणारं आयुष्य मी पाहत होतो. . आणि ही विस्कट स्थिती अधिकाधिक वाढत्या पाऊसागणिक वाढण्याची चिन्हे दिसतं होती. कारण प्रत्येकाला ते भयाण रूप पाहून स्वतःच्या मनात एक अंदाज बांधलेला असतो.. जो मला प्रत्येक क्षण-क्षण मला डोळ्यासमोर येत होता...


         तेव्हाच तिथे चहाच्या टपरीवर लटकलेल्या रेडिओ वर खरखरीत आवाजात काही शब्द कानावर पडले. 'हॅलो मी तुमची लाडकी आर.जे. (RJ) नैना ( नयना बिती जाये..) थोड्याश्या गप्पा, मस्ती आणि गाणी.. पण त्याआधी मौसम का हाल.. लोकांचे हाल कारण आज सगळेच रोड जाम झाले आहेत.. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय.. येत्या २४ तासात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल.. तर तुम्ही ऐकलत ना.. पावसाचा कहर.. सो जिकडे आहात तिकडेच राहा .. तुमची काळजी घ्या.. सोबत हे पावसाच्या मोसमातील सुंदर गाणं ऐका.. '


"रिमझिम गिरे सावन , सुलझ-सुलझ जाये मन.."         


                         मी रेडिओ कडून लक्ष हटवले. मी तिथला जवळचाचं रहिवाशी आणि एक तरुण नेतृत्व म्हणून मी ज्याला जमेल तशी पाण्यातून मार्ग काढण्यासाठी, तसेच कोणाचं सामान आवरण्यासाठी माझ्या परीने मदत करत होतो. या सगळ्या लगबगीत माझं लक्ष दूरवर एका मोकळ्या जागी उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे गेलं. जास्त पावसामुळे थोडं अस्पष्टचं दिसत होतं. मी मनातल्या मनात विचार केला की ही व्यक्ती आनंद तर लुटत नसावी ? म्हणजे काही हौशी कार्टी असतात ना, की कोणी कितीही सांगो. पण आम्ही काही कोणाचं ऐकणार नाही. . मग एका क्षणाला वाटलं; या व्यक्तीला त्याच आयुष्य तर संपवायचं नाही ना ? कारण, थोडावेळ पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की ती एकटक शांतपणे उभी आहे.. हा आता असेही असतातच की जे आतून अनुभवत असतात.. पण का कोण जाणे मला तिथे जावंसं वाटलं.. या एका मनाच्या विचारावर मी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली... जवळ-जवळ जसं पोहोचलो तसा माझा वेग कमी झाला. कारण, मला कळून चुकलं होतं ती व्यक्ती एक परकी 'स्त्री' होती. . मी थोडं अंतर उभा राहून आधी मनाशीच विचार केला... का बरं उभी असेल ही ? ते जाऊदेत. आपण मदत करण्याचा हेतूने आलो आहोत; सो विचारूयात इथे का उभी आहे म्हणून... ?


मी : "हॅलो एक्सक्यूज मी मॅडम ...?" ( मी मोठ्याने ओरडत जोरात म्हणत होतो.. )

" हॅलो . . . काही प्रॉब्लेम आहे का ? "


समोरून काहीच उत्तर येत नव्हतं. . मनात विचार केला भैरी असेल का ही ? यानंतर विचार आला की काहीही विचार करतोय मी.. अजून एकदा विचारून बघुयात. .


मी : " हॅलो . .?? मॅडम तुम्ही इथे का उभ्या आहात...?

खूप रिस्क आहे इकडे ... हॅलो ? तुम्ही ऐकताय ना ? "


ती : समोरून उत्तर आलं . . " हो.. "


इतक्या सगळ्या प्रश्नावर फक्त शेवटच्या प्रश्नावर आलेलं 'हो' उत्तर ऐकून समोरचा माणूस विचित्र मानसिक स्तिथीतून जातोय याचा अंदाज मला एव्हाना आलाच होता.. तरी थोडं सावरत, मी उत्तर मिळणार नाही; या अपेक्षेतच म्हणालो...


मी : " अच्छा ठीक आहे.. मग इथून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी जाऊन उभ्या राहा. . "


ती : " काय गॅरंटी की मी तिकडेही सुरक्षित असेंन याची ?"


तडकाफडकी उत्तर मिळालं... मला अपेक्षित नव्हतं तसं..

मग, पुढचा मागचा विचार न करता मी मोठ्या मोठ्याने ओरडून बोलू लागलो. कारण, वाऱ्याचा वेगचं इतका होता की विचारू नका.


मी : " नाही म्हणजे खूप मोठ्याने वादळ येण्याची शक्यता आहे... इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला आहे. . शिवाय 'हाय-टाईड' सुद्धा आहे.. म्हणून काळजीपोटी सांगतोय. . . एक समाजाचा सुजाण नागरिक म्हणून सांगतोय. . . हवं तर असं समजा की विनवणी करतोय. . पण, प्लिज! सुरक्षित ठिकाणी चला वादळ केव्हाही धडकू शकतं . . . "


तिथून काही वेळ शांत थांबून उत्तर आलं. जसं वादळं पूर्वीची शांतता असते. अगदी नेमकं तसंच. . .


ती : " हे वादळ थांबेल ही .. (येणाऱ्या वादळाचा वेध घेत..)

(माझ्याकडे वळून म्हणाली,) पण मनात चालू असलेल्या वादळाचं काय ? ते थांबेल का कधी ? "


असं उत्तर आल्यावर आपण काय बोलायचं ना.. थोडासा वेळ घेतला.. शांत विचार करून मी पुढे बोलू लागलो..


मी : " हे बघा ते सगळं ठिक आहे. . . पण सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे... त्यामुळे प्लिज ! माजं ऐका... प्लिज ! सेफ प्लेस वर चला... वन मोर टाईम हंबल रिक्वेस्ट टू यु मॅडम.. निदान माझा नाही तर घर...चा"


हे बोलणार इतक्यात मला माडचे उंच झाडांमधून एक पत्रा आमच्या दिशेने खाली पडत दिसताना मला दिसला. मी क्षणाचाही विलंब न करता तिच्या दंडाला पकडून मागे खेचलं तिच्यासोबत मी ही मागे झालो.. आणि पत्रा आमच्या पुढ्यात पडला.

"थाड........sssss.........."

असा जोरात आवाज आला की जसा कानामधून 'सुई....' असा आवाज यायला लागला... अगदी पुढचा काही वेळ कळलं सुद्धा नाही. काही झालं ते... अगदी थोडक्यात वाचलो... आणि त्या जोरात आवाजामुळे कदाचित ती ही भानावर आली होती... तरीही मी कसलाच विचार न करता तिला ओढत ती हिसका देत असताना सुद्धा, एका ठीकठाक मोठ्या पत्राच्या आडोशाखाली घेऊन आलो... मी मनातल्या मनात म्हणलो, " साला ! मरण समोर दिसत असताना सुद्धा यांना इतका माज कुठून येतो..." आणि मग तिचा हात सोडून तिला म्हणालो..


मी : ( थोड्याश्या दम देतंच.) " इथे उभ्या राहा. इथे आपण थोडेफार सेफ आहोत.. " आणि परत मनातल्या मनात बोललो, " बघा आता वादळ शांत होतंय का ?"


( ती रागारागात माझ्याकडे पाहत होती. त्या रागातच मला म्हणाली , )

ती : "तुम्ही काही म्हणालात का ? "


मी : " तुम्ही काही ऐकलत का ? "


ती : " नाही ... "


मी : "मग ठीक आहे ... "


ती : " काय ?"


मी : " काही नाही म्हणालो ... एक कुसकीत स्माईल देत.. "


( थोड्या वेळ स्मशान शांतता आणि ती पुन्हा उत्तरली,)

ती : " मला का नाही मरू दिलं ? निदान जीव सुटला तरी असता माझा... आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या अंगाला हात लावण्याचा... आणि एकाएकी रडायला लागली.. आणि परत सुरू झाली... हे बघा मला जर तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या मार्गानी जा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ द्यात.. " आणि परत जायला निघाली...


आपण स्वतःच्या समोर एखाद्याला मरायला कसं बरं पाठवायचं ? म्हणून मी परत तिच्या दंडाला पकडलं. ती सोडवायचा कमजोर प्रयत्न करत होती. मी मात्र तटस्थ होऊन तिच्याकडे पाहत होतो... त्याचं वेळी मला असं वाटलं अगदी हिंदी सिनेमात होतं तसं हिच्या कानाखाली मारावी. म्हणजे ही शांत बसेल.. पण, हा तर हिंदी सिनेमा नव्हता. आणि कायदा पण मुलीच्या बाजूने आहे. उगाच हिंदी सिनेमाच्या भंपक उपायामुळे शायनिंग मारायच्या नादात मी उगाच लटकायचो... आणि तो प्लॅन मी ड्रॉप केला... आणि विचार केला आपले शब्द हेच आपले अस्त्र आहेत. ते कधी कामाला येणार ? आणि मग बोललो,


मी : " मॅडम.. मी तुम्हाला सोडायला तयार आहे."


ती : सोडवण्याच्या त्याच प्रयत्नांत, " मग , सोड डुकरा... मला का पकडून ठेवलंय.. नाही तर मी ओरडेन "


मी : "आता मॅडम तुम्ही 'दुहेरी' वरून 'एकेरी' वर आलात जिथे आपण तुमच्या सोडण्याबद्दल बोलत आहोत. आणि सद्य स्थितीत तुमचा पक्ष थोडा अधिक जास्तच कमजोर आहे असं मला वाटतं...


ती : "सॉरी ! पण, मला सोडा नाही तर मी खरंच जोर जोरात ओरडेन... "


मी : " मला माहितेय तुम्ही नाही ओरडणार..."


ती : " तुम्हाला कसं काय माहिती की मी नाही ओरडणार ते ?" ( रागारागात )


मी : " ते मी तुम्हाला नंतर सांगतो..

हो पण त्याआधी एक प्रॉमिस करा. मी विचारेंन त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची... "


ती : ( थोडीशी हालचाल कमी करत ) " कसली उत्तरं ? मी तुम्हाला बांधील नाही.."


मी : " मी असं कधी म्हणालो की तुम्ही मला बांधील आहात म्हणून ? "


ती : " मग कसली उत्तर हवी आहेत तुम्हाला ? "


मी : " अशीच अगदी जनरल.. फार काही विशेष नाही. पण, आधी प्रॉमिस करा मला की तुम्ही ओरडणार नाही. माझी एवढीच माफक अपेक्षा आहे. असं पण, जोराचा वादळी पाऊस सुरू झालाय कुठे जाणार... आपण ? सो थोडा वेळ बोला तेवढाच माझा टाईमपास.."


ती : "मी सगळ्यांसाठी 'टाईमपास' ची वस्तू नाहीय.."


मी : " मी असं कधी म्हणालो ? मी माझा 'टाईमपास' असं म्हणालो..."


ती : (रागाने बघत) " ठीक आहे प्रॉमिस... आता तरी सोडा..." ( तिची हालचाल पूर्णपणे थांबवत..)


मी : "हुश्शह ! वाचलो बाबा..."


( मी तिला सोडणारच इतक्यात ती बोलली... )


ती : " एक मिनीट.. मी का तुम्हाला प्रॉमिस करू...? तुम्ही माझे कोण लागता..? "


मी : मी शब्द फिरवत... " छे..! छे..! माझी नाही... माझी नकोचं.. अगदी, तुमच्या खास माणसाचे नाव घेऊन प्रॉमिस द्या.." तिला हे कळलं नाही की मी दुसऱ्याच प्रॉमिस घेऊन तिला पॅरावृत्त करतो आहे ते...

"Dammm ! I'm too good.. yes !" ( मनातल्या मनात )


ती : " मुळात कोण कोणाचं नसतं... आणि माझं तर कोणीच नाही आहे..."

( माझी हुशारी फसली होती. तरी मी हार नव्हती मानली नव्हती.)


मी : " कोणी म्हणजे ? तुंम्हाला 'आई-बाबा' नाहीत का ? (असतील याचा अंदाज होता. तरी उगाच आव आणत मी म्हणालो..) ईश्वर त्यांच्या आत्म्यास..."


ती : "अरे ए ! असं काही नाहीय... ते जिवंत आहेत... 'बावळट' आहेस का ? काहीही काय बोलतोयस.."


मी : "म्हणजे सॉरी मला वाटलं कोणी नाही. म्हणजे तुमचं या जगात कोणीच नाही आहे... म्हणून असं पाऊल तुम्ही उचललं... माझं तुमच्या आई वडिलांना मारण्याचा तसा काही प्लॅन"


ती : माझं वाक्य काटत ती पटकन बोलली, "ठीक आहे... " ( पण थोडं रागातचं.. )


मी : " मग आता तुम्ही आई वडिलांच तर प्रॉमिस देऊ शकतात ना...? "


ती : हळूच आवाजात. " हो... ठीक आहे..."


मी : " ये हुई ना बात... द्या टाळी..."

आणि मी गायला लागलो;


' घे टाळी, दे टाळी..

घे टाळी, दे टाळी घे... '

आयुष्याच्या वाटेवरती....

घे टाळी ... दे टाळी घे ।। '


टाळी न मिळाल्याने स्वतःचा हात मागे घेत मी म्हणालो... " असो. वाईट गाणं होतं. काही हरकत नाही... असं होतं असतं आयुष्यात. कम टू दि पॉईंट ! हे बघा , तुम्ही मला तुमचा 'वेलविशर', 'फिलॉसॉफर' किंवा 'मार्गदर्शक' किंवा जमत असेल तर 'मित्र' म्हणून सांगू शकता... म्हणजे बघा फोर्स नाही आहे... पण, सांगून बघा. कदाचित मी तुम्हाला त्यातून बाहेर पडायचा 'रस्ता' म्हणा, 'पथ' म्हणा, किंवा अजून काही म्हणा... मी मार्ग तर दाखवून देईन.."


ती : "माझं ब्रेक अप झालं आहे... आता बोला "


मी : यावर मी जोरजोरात हसू लागलो... इतका की विचारू नका.. म्हणजे मला वातावरण हलकं करायचं होतं आणि सांगायचं होतं की,

' It's just part of life! '

आणि तिच्या 'लाल-बुंद' चेहऱ्याकडे पाहून हसायचा एकदाचा थांबलो...


ती : समोर वादळाकडे पाहून, " जेव्हा तुम्ही त्याला आपलं सर्वस्व दिलं असतं ना ? आणि त्यावर तो तुम्हाला अगदी सहज सोडतो. तेव्हा तुमचं 'आयुष्य' हे वादळात घडी विस्कटलेल्या शहराप्रमाणे झालेलं असतं. ज्याची काही ठिकाणी परत सारखी घडी बसू शकत नाही."


मी : " खरं आहे.." ( माझ्या कानाजवळ जवळ-जवळ चिमण्यांचा आवाज ऐकू येत होता.. जणू तिने बोलून एक माझ्या हसण्यावार एक चपराक मारली आहे... )


मी : "सॉरी ! म्हणजे तुमच्या वर हसत नव्हतो.. मी.."


ती : माझं वाक्य तोडत ती म्हणाली, " तुम्ही माझ्या परिस्थितीवर हसत होता... हसा ... मगास सारखं जोरजोरात हसा.. जगाला पण कळूद्यात की, मी कित्ती 'मूर्ख', 'बेअक्कल' होते ते. तशी यात तुमची काहीच चुकी नाही. पण, एक सांगते माणसाच्या मनोरंजनासाठी केलेल्या करतुदी वर हसा... पण कोणाच्या कुठल्याही वाईट परिस्थिती वर हसू नका.. तुम्हाला नाही माहीत तो माणूस कुठल्या परिस्थितीतून चालला आहे ते.. त्याच आयुष्य हे दारापाशी काढलेल्या 'सफेद-रांगोळी' सारखं 'बेरंग'  असतं. जिथे कोणीही येऊन आपला पाय देऊन विस्कटून जावं. अशी त्याची गत झाली असते... "


( परत एक जबरदस्त चपराक! आता मात्र माझ्या कानाखाली चिमण्यांचा आवाज जास्तच वाढला होता.. होय.. पण, तुम्ही हसण्यावारी नेऊ नका... )


मी : " एकटक नुसता तिच्याकडे पाहत... "


ती : " माझ्याकडे रागाने बघत..."


मी : " खरंच मला माफ करा... मला तसं नव्हतं बोलायचं. आणि मी हसलो कारण, हे जड झालेलं आपल्या संभाषणाचं वातावरण मला हलकं करायचं होतं. अगदी सुरुवाती पासून... म्हणजे तुम्ही माझ्यापुढे निसंकोच तुमचं मन मोकळं करू शकता.."


ती : " मला एक रागीट लूक देत.. सगळी मुलं असेच असतात का हो ? "


मी: "सगळ्यांच माहीत नाही. पण, मी असाच आहे.. थोडा 'फन-लव्हिंग', 'हसरा', 'मनमोकळा', 'दर्दी', 'निसर्गप्रेमी' !"


ती : "पुरे झालं तुमचं कौतुक ! तुमच्या तोंडाने.. कळलं, मला निसर्ग-प्रेमी ! ... ( थोडीशी हासत... )


मी : " तुम्हाला माझ्या थोड्याश्या स्वभावात तुमचा 'तो' जाणवला का ? "

ती : माझ्याकडे बघत.. "हो ."


मी : " हरकत नाही. काही का असेना त्या निमित्ताने तुम्ही थोड्या का होईना हसलात.. मोकळ्या झालात. नाही तर.. "


ती : " नाहीतर काय ? "


मी : " नाही म्हणजे, आधीच माफी मागतो.. मला वाटलं तुम्ही फारच ते काय असतं ते मला आता नेमका 'शब्द' नाही सापडत आहे...


ती : (त्यावर ती अजून हसली...)


मी : '(मी तिच्याकडे पहिलं.. आणि उजव्या हाताने तिच्या मागच्या बाजूला वरच्या बाजूवर बोटाने ईशारा केला.. तिथे एक चिमणी आपल्या पिलासाठी घरटं बांधत होती..)'


आणि परत उत्तरलो, " हिचं सुद्धा एखाद्या झाडावरच घर उध्वस्त झालं असेल... पण, ती हरली नाही.. तिने सगळ्या पिलांना इथे सुरक्षित आणलं. कसं आणलं ते माहीत नाही. पण, आयुष्याची नवीन सुरुवात केली. "


(मला मधेच का कोण जाणे त्या 'चिऊताई' ला पाहून 'कवियत्री बहिणाबाई चौधरीं' ची एक 'ओवी' आठवली. आणि मी परत सुरेल गायला लागलो... )


'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !'


'पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !'


'सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर

तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर'


'खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!'


'तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ

तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???'


फरक फक्त इतकाच आहे की, 'झाडाच्या' ठिकाणी 'पत्र्याची-शेड' आहे.. कारण, तिचं अख्ख विश्व म्हणजे ते 'झाड' च वादळात 'उडून' , 'वाहून' गेलं.. पण, ती हरली नाही... ती हरली नाही... ती जिंकली !


ती : ( ती स्तब्ध होती.. डोळ्यातून पाणी वाहत होतं..)


मी : " मगाशी तुफान वादळात आणि पावसात तुमच्या डोळ्यात एक पाण्याचा थेम्ब नव्हता. अगदी, तुमचं सर्वस्व पणाला लागलं होतं. तरी, त्याचं कारण तुम्हाला सुद्धा माहीत होतं की, गेलेलं परत कधीच येणार नाही... हा निसर्गाचा नियम आहे. जो सगळ्यांना लागू होतो. पण, आता तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. कारण, त्या चिमणीने तुम्हाला जगायची नवी दिशा दाखवली आहे... जिद्द दिली आहे. ज्यात तिने तीच अख्ख विश्व हरवलं, गमावलं होतं... निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो... नुसता जगायला शिकवत नाही तर संकटावर मात करून नवी प्रेरणा देतो..."


ती : " खरं आहे... ( शांतता ) थँक्स ! एक विचारू ? "


मी : "हा .. विचार ना..? इतक्या वेळ मीच तुला विचारतोय.. प्लिज विचार ? "


ती : " तू कोण आहेस ? "


मी : " परत 'एकेरी' ? 'तुम्ही' वरना 'तू'... अरे, मला तो 'शब्द' आठवला तू पक्की ''चिडचिडी' आहेस.

(दोघेही जोरजोरात हसायला लागलो..)


मी : " पण त्यासोबत 'जिद्दी' सुद्धा आहेस.. आणि हो खरंच आता मस्करी करतोय... कारण, तू मनमोकळी आणि एकेरी वर आली आहेस. कारण, आता आणि मगाशी सुद्धा असाच कुठलाच शब्द माझ्याकडे नव्हता. मला फक्त तुझ्याशी 'सवांद' वाढवायचा होता. कारण त्याची तुला नितांत गरज होती."


" बोलल्याने मन मोकळं होत आणि संवादाने नवीन नाती जन्माला येतात.."


ती : ( एकटक माझ्याकडे बघत..) " आता हक्काने 'एकेरी' विचारतेय ... सांग ना ? 'तू' कोण आहेस ? "


मी : " तुला काय वाटतं...? "


ती : ती थोडा विचार करून , " निसर्ग! ..........प्रेमी ! "


( आता दोघे मोठ्या-मोठयाने हसायला लागतो... )


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational