STORYMIRROR

Madhuri Sharma

Inspirational

3  

Madhuri Sharma

Inspirational

मनु

मनु

4 mins
158

मनु...

मनु

हो आले आले..

काय गं भवाने कुठे होतीस इतका वेळ?

काय गं माई जरा थोडं गच्चीवर गेले की अशी का हाक मारून बोलवुन घेतेस तू मला प्रत्येकवेळी?

आणि मला चांगलं नाव ठेवलंय ना मानसी मग भवाने काय म्हणते गं...

तू ना हल्ली जरा जास्तच उध्दट झाली आहेस.

नाव जसं चांगलंय ना तसं चांगलं वागायचही असतं..

पूरे मला अजुन वाद नकोयेत काय काम होतं तुझं?

म्हणजे काम असेल तरच बोलायचं का आता मी तुझ्याशी?

माई उगाच का वाकड्यात शिरतेय गं सहज विचारलं मी आणि तसं ही कामाच्या पलीकडे काय बोलतेस तू माझ्याशी.

गप्प हं आता मनु पूरे झालं शब्दाला शब्द दिलं की वाद वाढतो एवढं शिक्षण घेतेयं ना मग एवढं साधं कळत नाही तुला ..

माई काय काम होतं सांगशिल

काही काम नव्हतं हे असं सारखं सारखं गच्चीवर काय असतं गं?

तुला आज सांगुन देते ईथुन पुढे गच्चीवर जायचं नाही.

पण का गं?

का नाही जायचं मी?

नाही सांगितलं ना म्हणजे नाही....

तुम्ही आजकालची मुलं ऐकतच नाही असं बडबडत माई निघून गेली......

मनू मात्र विचार करत होती आता गच्चीवर गेल्याने माई ला का त्रास होतो?

असं काय वाईट आहे की माईला आवडत नाही? तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे फक्त माईकडेच होती आणि माईने ते तिला कधी दिले नसते.

म्हणून मग मनू मुद्दामच गच्चीवर सारखी जाऊ लागली. 

हे १६ वर्ष वय म्हणजे मुलं विद्रोहीपणे वागतात, नाही सांगितलं ते आधी करणार..

माईला मात्र कळत नव्हतं की मनूला नेमकं कोणत्या भाषेत सांगितलं म्हणजे समजेल?

मनूचं मात्र सारखं गच्चीवर गेल्याने चार घरं सोडून राहणारा अजय तिच्या प्रेमात पडला. मनूला या विषयी काही ही माहिती नव्हतं.

ती फक्त माई आपल्याला योग्य कारण देत नाही तोवर गच्चीवर जायचं या हेतुने जायची.

माई ही अगदी मनू सारखी भोळी भाबडी मुलगी होती. मनूच्या वयाची असतांना ती ही अशीच गच्चीवर जायची, सारखं गच्चीवर गेल्याने माई ही त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या महेश नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. त्या दोघांनी पळून जायचं ठरवलं. रात्री सर्वजण झोपल्या नंतर माई हळुच दरवाजा उघडणार तेवढ्यात माईच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला माई बघते तर मागे अक्का उभी होती, माई फार घाबरली, पण अक्का काही न बोलता माईला झोपायला घेऊन गेली. सकाळी उठल्यावर अक्काने माईला अगदी प्रेमात विचारलं काय बाळा कुठे जात होतीस एवढ्या रात्रीत माई मात्र नुसती रडत होती तिला काय बोलू तेच कळत नव्हतं......

अक्काने तरीही फार प्रेमात माईला जवळ केलं आणि विचारलं

घाबरत घाबरत माईने सर्वकाही अक्काला खरं खरं सांगुन टाकले....

सर्व ऐकल्यावर अक्काने जास्त विचार नाही केला त्या माईला म्हणायला बास्स एवढंच ना की अजून काही आहे जे तू अजूनही मला सांगत नाहीस

नाही अक्का अजून काही नाही..‌‌

बरं, कोण तुझा तो मित्र त्याला सांग आपल्या घरी येऊन माझ्याशी बोलायला 

मी लाऊन देते तुमचं लग्नं........

माईला विश्वासच बसेना एवढी कडक आपली आई आपल्या प्रेम प्रकरणाला इतकं सहज कसं काय घेते?

पण तरीही योग्य वेळ साधुन माईने महेशला अक्काने बोलवलं आहे म्हणून सांगितले.

एक दिवस गेला दोन दिवस झाले

दहा दिवस उलटुन गेले पण महेश काही आला नाही.....

माईला फारच धक्का बसला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा महेश लग्नाचं बोलायला आलाच नाही...‌.....

नंतर कळलं की तो पुढच्या गल्लीतल्या प्रभा सोबत पळून गेला....

माईला आपल्या बालीश पणाचा प्रचंड राग येत होता....

ते ऐकल्यावर अक्काने माईला बोलावलं काय मग माई

काय......

काय नाही गं अक्के, बरं झालं तू योग्य वेळी मला वाचवून घेतलं ते....‌

अगं माई मी आई आहे तुझी आम्हां आयांना ठाऊक असतंच गं कुठे आपली मुलं चुकू शकतात ते म्हणुनच तर आम्ही तुमच्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो...‌

हे सोळावं वरीस म्हणजे अनेक नैसर्गिक बदल आपल्यात होत असतात..‌

त्यात आकर्षणाला तुम्ही प्रेम समजून घेतात आणि चूका करतात आणि मग या चूकांचा पश्चात्ताप आयुष्यभर होतो.

खरंय गं अक्के तुझं मला माफ कर माझंच चुकलं.....

आपले जुने दिवस आठवत माईला भीती वाटत होती की मनूने ही असं काही चूकीचे केले तर......

आणि आपण जे काही केलं ते कुठल्या तोंडाने आपल्या मुलीला सांगायचं?

माईला या परिस्थितीशी जुळवून घेता येत नव्हते.....

नवऱ्याला सांगायचं धाडस माईला होत नव्हतं....

फार विचारपूर्वक माईने ठरवलं आपण भूतकाळात जे काही चुकलो ते आपल्या मुलीला सांगायचं आणि तिला ती चूक करण्यापासून वाचवायचं....‌‌

माईने मनूचा योग्य मूड बघून तिला त्यांच्या मनातील भीती सांगुन टाकली.....

सर्व ऐकून आपल्या आईला चूकीची न समजता तिला आश्वासन दिलं की ती अशी चूक करणार नाही आणि जर तिला पुढच्या आयुष्यात कोणी आवडलंच तर ती माईला त्या बाबतीत सर्व सांगेल..‌‌....

आता माईला कसलीही काळजी नव्हती.....

मनूला ही आपल्या आईने आपल्या सोबत सर्व काही शेअर केलं याचा आनंद होता..‌‌

नंतर काही दिवसांनी मनूला जेव्हा कळलं की समोरच्या अजयची आपल्यावर वाईट नजर होती तेव्हा माईचं न ऐकल्याचे मनूला वाईट वाटले.‌...

म्हणून आपले आई-वडिल आपल्याला एखादी गोष्ट समजावुन सांगत असतील तर त्यामागे निश्चितपणे काही कारण असते..‌‌



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational