Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Meena Kilawat

Inspirational Others


4.5  

Meena Kilawat

Inspirational Others


मनाच्या आरशात

मनाच्या आरशात

2 mins 2.7K 2 mins 2.7K

  कधी माझ मन मला आरश्या सारख चमकणार स्वच्छ,नितळ,पारदर्शक दिसतं. कधी माझ मन वैतागलेल,उद्दीग्न,उदास भासतं.मी स्वताशीच संवाद साधते.आणि प्रश्नांची उत्तर पन मिच देते काही घटना आपल्यासमोर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घडतात पण आपण काही करु शकत नसल्यामुळे मनाची सतत घालमेल होत असते.माझ्या मनाची व्यथा मी कुणाला न सांगता आरश्यालाच सांगत असते.आपल्या आयुष्यात अनेक घटना होवून जातात. कधी सुख: तर कधी दुख: दाखवत असतं.या सर्व आंतरीक आणि बाह्य घटनेमुळे मन सुखावत असतं तर कधी मन कळवळतं.

    नुकतीच घडलेली गोष्ट माझ्या जिव्हारी लागली होती.त्या दिवशी मी बाहेर गेले होते.परत आले तेंव्हा काहीतरी अघटित घडल असाव,असे मला जानवले.पन मी तिकडे दुर्लक्ष करुन आपल्या कार्यात दंग झाले. आमच्या समोरच्या मैदानातं एक मोकाट गाय हंबरताना दिसली.म्हणुन मी बाहेर विचारपुस केली असता काही महिलांनी मला सांगितले. ही गाय दिवसभर हंबरत होती, खुपदा हंबरताना सर्वांनी ऐकले होते पन कुणी तिच्याकडे लक्ष दिले नाही.

                       गाय सारखी येरझारा करीत होती.गाईला काय झाले होते, म्हणुन मी विचारले त्या गाईच्या डोळ्यातून सारखे अश्रृ वाहतांना मला दिसले होते.गाय अशी का वागत आहे म्हणुन माझी विचारपुस सुरु होती,माझी तळमळ शिगेला पोहोचली होती.मी मनातल्या मनात कासाविस झाले होते.शंका कुशंका स्वस्थ बसु देईना. अस करता संध्याकाळ झाली, काही महिला बाहेर आल्या होत्या, मी सारखी विचारपुस करीत असता त्या महिलांनी मला सांगितले की गाय गाभण होती, आमचे गाव तालुका प्लेस असल्यामुळे महिला ही सर्व स्थरातील होत्या.काही शिकलेल्या तर कही अशिक्षित होत्या. त्या मला गाई बद्दल माहिती सांगु लागल्या. आज ही गाय व्याली होती अन् ती जनत असतांना तिचे वासरू डुकरांनी ओढून नेलं. मी आवाक होउन ऐकत होते. मी सारखे प्रश्न त्यांना विचारत होते. मग गाय कशी चुपचाप राहिली ? जनत असता तिला असह्य वेदणा होत असल्यामुळे ती प्रतिकार करु शकली नाही.

        मी प्रश्नांकित नजरेने बघत होते. तिच्या गर्भातून वासरु बाहेर पडण्याच्या आत डुकरांनी वासरु ओढून घेवून पळुन गेले होते,आणि म्हणुन ती गाय आज सारखी धावत होती. तिची ममता,माया मानवांच्या परे दिसत होती.वासरु जेंव्हा डुकरांनी ओढलं तेंव्हा त्या वासराचे नाळ सुटले नव्हते ,गाईला आधिच्या प्रसव वेदणा नंतर जखमेच्या वेदना किती असह्य असेल तो कालावधी त्या व्यालेल्या गाईचे दु:ख ऐकून मी तर काही क्षण आवाकच होते.त्या गाईच्या हंबरण्याने पुर्ण परीसर गुंजवला होता.पण कुणीच कशी तीची मदत केली नाही,काय करत होते सर्व लोक,मी गलबलुन म्हणाले, माहिती पुरे होती. सर्व पुरुषवर्ग बाहेर कामाला गेले होते,व महिला काय त्या डुकरांच्या मागे धावणार होत्या,पन आजच्या महिला तर खुप पुढे गेलेल्या आहेत सर्वस्वी पणे क्षितीज गाठते आहे.

      मी विचारलं की त्या गाईची मदत करायला कुणीच कसं समोर आलेल नाही मानवाचं असं झाले असते तर ? मी थरारले!

       मला माझ्या मनातला आरसा विचारतो,आरसा म्हणतो तु त्या ठीकानी असती तर तू काय केल असत ? मी हमखास गाईची मदत केली असती.       


Rate this content
Log in

More marathi story from Meena Kilawat

Similar marathi story from Inspirational