Rohan Dhage (RB)

Drama

3  

Rohan Dhage (RB)

Drama

मी आत्महत्या करणार होतो...

मी आत्महत्या करणार होतो...

4 mins
266


मी पुण्यात जॉबला होतो,आणि माझं एका मुलीवर खूप प्रेम होतं आणि ती पण माझ्यावर ही खूप प्रेम करायची.

काही दिवस आमच्या मध्ये सगळं ठीक चालू होतं, नंतर तिच्या वागण्यात थोडा बदल झाला.

जि मुलगी मला रोज चार चार तास बोलायची तीच मुलगी मला एक मिनिट सुद्धा व्यवस्थित बोलत नव्हती.

शेवटी तिने मला खरं खरं सांगितलंच तिने मला फोन केला आणि बोलली,ती म्हणाली रोहन माझं लग्न ठरलंय, आणि मी खूप प्रयत्न करून सुद्धा मम्मी आणि पप्पा लग्न तोडत नाहीत.ना इलाजने मला ते लग्न करावंच लागत आहे.तिनं एवढं बोलून फोन ठेवला.

तिचं बोलणं संपल्यावर जणू मला शॉकच बसला.मी त्याच जागी बसलो.मला काहीच समजत नव्हतं काय करावं माझ्या डोळ्यातून आश्रू वाहत होतो.त्या वेळी मी कंपनीत होतो.माझ्या बाजूला असलेले माझे सहकारी मित्र मला माझ्या जवळ येऊन मला विचारत होते.रोहन काय झालं सांग ना ,मी गप्पच होतो माझ्या डोळ्यातून वर्षानुवर्षे साठलेले आश्रू आज बाहेर पडत होते.

नंतर मी शांत झालो माझ्या मित्रांनी मला पिण्यासाठी पाणी दिले,आणि मला परत विचारू लागले हं रोहन आता बोल काय झालं,का रडत आहेस, मी हलक्या स्वरात बोललो,काही नाही परत माझ्या एका मित्राने विचारले मी तुझ्या मोठ्या भावा सारखा आहे,जे आहे ते सांग घाबरू नको.मी त्याच्या पुठे बोललो,

माझा खूप जिवलग मित्र अपघातात मरण पावला म्हणून मला रडू आवरलं नाही.काही वेगळं नाही म्हणून त्या ठिकाणा वरून निघून गेलो.

हे शब्द मी फक्त माझ्या मित्राच्या सांत्वनासाठी बोललो होतो,माझा कोणी मित्र मरण पावला नव्हता,माझी वर्षा माझ्या पासून दूर झाली होती याचं दुःख मला झालं होतं.

मला माझ्या मैत्रीनिने फोन करून सांगितले रोहन भैय्या वर्षा चे लग्न झाले.तिचे हे वाक्य ऐकून मला धक्का मुळीच बसला नाही,मी पक्का निर्णय घेतला आता आपण जगुण काहीच अर्थ नाही. आता आपण आत्महत्या करायची.

मी तीन चार दिवस जेवण न करता कसे तरी दिवस काढले.एका दिवशी मी कंपनीत आसता माझी ओळख एका मुलीशी झाली.तीचं नाव वृशाली होतं, ती माझ्या शेजारीच काम करायची.ती माझ्याशी कधी कधी बोलायची,नंतर काही दिवसात आमची मैत्री झाली. आम्ही सोबत जेवण करायला जायचो.अगदी फोन वर तास तास गप्पा देखील मारायचो.

एका दिवशी तिच्या फोन मध्ये बँलन्स नसल्या मुळे तिने मला एक नंबर कॉन्फरन्स वर घ्यायला सांगितला.तो नंबर तिच्या चुलत बहिणीचा होता.त्या दोघी बराच वेळ बोलल्या आणि नंतर मी फोन कट केला.नंतर दुसऱ्या दिवशी वृषाली ने मला सांगितलं रोहन त्या दिवशी जो फोन केला होतास ना,तो माझ्या चुलत बहिणीचा आहे.आणि त्या नंबर वर परत कॉल करू नकोस ती फार स्र्टीक्ट आहे.मी वृषालीला होकार देऊन त्या नंबर वर कधीच कॉल केला नाही.

एका दिवशी तिनेच मला फोन केला आणि समोरून म्हणाली हॅलो मी म्हणालो बोला कोण आहे? ती परत म्हणाली कोण बोलतंय, मी म्हणालो रोहन आपण कोण? ती म्हणाली माझं नाव धनश्री आहे मी वृषाली ची बहीण आहे.तिचा फोन लागत नाही म्हणून तुमच्या फोनवर केला.नंतर आम्ही चार पाच मिनिटं बोललो असावं. आम्ही नंतर बऱ्याच वेळा एकमेकांना फोन करायचो तिची आणि माझी खूप चांगली मैत्री झाली.

आम्ही आमच्या वयक्तिक गोष्टी पण एकमेकांना सांगू लागलो.एका दिवशी मला वर्षा ची खूप आठवण यायला लागली त्या दिवशी थोडं स्पेशल होतं, त्या दिवशी तिचा वाढदिवस होता,21/09/ मला तिला विश करायचं होतं, पण काही पर्यायच नव्हता ना,म्हणून मी खूप बैचेन होऊन बसलो होतो.आणि नंतर विचार केला आजचा दिवस माझ्या साठी खूप भाग्याचा होईल. आपण आजच्या दिवशी आत्महत्या करायची.आणि मग मी तैयारीला लागलो,तेवढ्यात मला धनश्री चा कॉल आला.मी तो फोन एकदा कट केला.धनश्रीने परत कॉल केला.पण मी या वेळेस फोन कट केला नाही,समोरून धनश्री रागात मला बोलली ये पागल तुला केंव्हा पासून मी फोन करते तू माझा फोन का उचलत नाहीस,मी गप्पच राहिलो.धनश्री नंतर नॉरमल झाली.रोहन काय झालं रे का बोलत नाहीस.

मी तरी पण शांतच होतो,धनश्री मला परत बोलली रोहन तुला माझी शप्पत आहे काय झालं मला सांग.

तिच्या शपतेच्या पुढं मी गेलो नाही.आणि तिला म्हणालो मला माफ कर धनू तुला आज नंतर माझा कधीच कॉल येणार नाही,आणि माझा फोन पण चालू आसनार नाही.

धनश्री थोडी घाबरली तिला वाटत होतं मी त्याला जोरात बोलल्या मूळे कदाचित राग आला असावा.म्हणून ती मला सॉरी बोलली,आणि म्हणाली माझं काही चुकलं का?

मी धनश्री ला म्हणालो तुझं काही नाही चुकलं गं माझं चुकलं ज्या मुलीवर प्रेम केलं त्याच मुलीनं मला सोडून दुसऱ्या बरोबर लग्न केलं.आणि तिचा आज b. Day आहे.

आणि याच दिवशी मी आत्महत्या करणार आहे,म्हणून काही चुकलं असेल तर मला माफ कर. तेवढ्यात धनश्री माझ्यावर चिडली आणि मला फार जोरात बोलायला लागली.ती मला म्हणाली किती वेडा आहेस रे रोहन मी तुला किती हुशार समजत होते.आणि तू तर किती मूर्ख निघालास.

जरा विचार कर ज्या आई वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं,त्यांना सोडून तू आत्महत्या करणार आहेस,आरे वेड्या त्या एका मुली पाई तू सर्व नाते संपवायला निघालास का? प्रेमाचं सर्वच नसतं प्रेमाच्या पुढे पण जग असतं.असं वेड्या वाणी करू नकोस.जर मला तू तुझी बेस्ट मैत्रीण समजत असशील तर माझं ऐक.

आणि हे आत्महत्या करनं एका कायराचं काम असतं आणि तू तर एक भावी कवी आहेस आणि तुझ्या सारख्या कवीची समाजाला गरज आहे.

तिचं बोलणं झाल्यावर मी माझा निर्णय बदलला.आणि धनश्री ला सॉरी गं नाही आत्महत्या करणार नाही मरणार म्हणून फोन ठेवला


 Part 2 coming soon


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama