Rohan Dhage (RB)

Drama

3  

Rohan Dhage (RB)

Drama

लग्नाच्या दिवशी...

लग्नाच्या दिवशी...

5 mins
260


सकाळचे सुमारे दहा- साडे दहा वाजले असावे माझा उपवास होता, मी उपवासाचा नाश्ता करत होते. माझ्या लग्नाला सहा ते सात वर्षे ओलांडून गेली होती. तसं सांगायचे झाले तर मी उपवास लग्नाच्या आगोदर पासूनच करत होते, पन काही अपघातामुळे मी उपवास करणे बंद केले. कारण ज्याच्या साठी मी उपवास करत होते तोच व्यक्ती माझ्या सोबत नसल्यामुळे मला उपवास करण्यात काहीही योग्य वाटले नाही. कारण माझं लग्न मला मान्य नसतांना माझ्या घरच्यांनी केले, तेंव्हा पासून माझा आणि देवाचा छत्तीस चा आकडा सुरु झाला, कारण ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं त्या व्यक्तीपासून दूर राहायचं म्हणजे जिवंत पणी मरण पत्काराणे होय ना.म्हणून मी माझ्या लग्नाच्या नंतर कधीच देवघरात गेले नाही. नंतर मला बऱ्याच वर्षांनी माझ्या प्रियकराची आठवण आली आणि मला त्याला पाहण्याची इच्छा झाली.कारण कि तो एवढा प्रामाणिक होता कि, त्याचं नाव जरी कानावर पडलं तरी असं वाटत होतं त्याला लगेच समोर पाहावं पण माझं तेवढं भाग्य कुठं होतं.


तो कुठं राहतो, काय करतो, मला तर काहीच नव्हते, नंतर ज्याचा मी तिरस्कार करत होते,त्याचाच मला सहारा घ्यावा लागला. मी परत देवाच्या आहारी गेले, आणि देवाला नतमस्तक होऊन एकच माघितलं कि, हे देवा तू माझं आगोदरच सर्वच हिरावून घेतलंस ज्याच्या सोबत आयुष्य कटायचं होतं त्याच्या पासून दूर केलंस, मला माहित आहे तू सर्वांसाठी बरंचसं करतोस ,सर्वांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतोस आणि ज्यावेळेस माझा नंबर येतो त्याळेस का तुला झोप येते?का त्या दिवशी तू सुट्टीवर असतोस मला आजपर्यंत समजले नाही.तरी पण आज तुझ्यावर परत एकदा विश्वास करत आहे तुला माझी एवढीच विनंती आहे कि,मला माझ्या प्रियकराला पाहण्याचा एकदा योग येऊ दे.तो मला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी तुझे उपवास करीन. केवळ माझ्या प्रियकराला पाहण्यासाठी मी परत उपवास सुरु केले.आठवड्यातून एक दिवस देवाला फक्त एकच माघायचे मला फक्त माझ्या प्रियकराला पाहण्याचा योग येऊ दे.


मला असं वाटतंय मी जगातली पहिली मुलगी आसेल कि, लग्नानंतर आपल्या प्रियकराला पाहण्यासाठी उपवास करीत असेल. कारण लग्नाला बरीच वर्षे झाले होते, एखादी मुलगी हे प्रेमाचं भरलेलं आंगतील भूत विसरून गेली असती ,आपल्या मुला-बाळात सुखी राहिली आसती.मला एकाद्या दिवशी काय होतंय ते मलाच समजत नव्हते,त्याची मला एकाद्या दिवशी एवढी आठवण येते कि माझं मन काशामध्येच रमत नव्हतं काय माहित त्याला माझी आठवण येते कि नाही. मला तर असं वाटतंय तो पण लग्न करून संसारात खुश असेल, पण कधी-कधी वाटतं त्याला माझी पण खूप आठवण येत असेल, कारण आम्ही दोघे जण जेंव्हा एकत्र होतो तेंव्हा एकमेकांना थोडही दूर होऊ देत नव्हतो.


माझा नाश्ता तयार करून झाल्यानंतर मला माझ्या आईचा फोन आला, समोरून आई बोलली, कशी आहेस बाळा तुझी सनम कशी आहे.नंतर मी बोलले, बरी आहे गं आई तू कशी आहेस पप्पा कशे आहेत, आई परत म्हणाली आगं तुला काही सांगायचं होतं सकाळी तीन-चार मुले आपल्या घरी आली होती. विचारत होते वर्षा चं घर हेच आहे का?मी हो बोलले आणि त्या मुलांनी माझ्या हातात एक लग्न पत्रिका दिली आणि म्हणाले वर्षा ला द्या असं म्हणून लगेच निघून गेले. मी आईला विचारले कोणाची पत्रिका आहे ती, आणि कोण आपल्या घरी आलं होतं बरं आई ते जाऊदे ती लग्न पत्रिका आधी मला वाट्सअप ला पाठव असं म्हणून मी फोन ठेवला. 


आईने मला ती लग्न पत्रिका पाठवली ती लग्न पत्रिका पाहून मला आश्चर्यच वाटले कारण ती पत्रिका पाहून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. आणि नंतर मी स्वतःलाच बोलायला लागले,कसं वाटतंय गं आता तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं लग्न दुसऱ्या बरोबर होतंय तर सहन होत नाही ना,त्याला पण किती त्रास झाला असेल तुझं लग्न दुसऱ्या बरोबर झाल्यावर नंतर डोळे पुसत ती लग्न पत्रिका मी संपूर्ण वाचली. त्याचे लग्न कधी आहे कुठं आहे समजून घेऊन त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याच्या समोर जाऊन उभी राहिले. कारण मला माहित होतं त्याला पाहण्याचा हा मला शेवटचा क्षण आहे.


काय माहित माझे उपवास करण्याचे फळ हेच होते असे मला वाटत होते,लग्न मंडपात त्याचे सर्व मित्र माझ्याकडे पाहत होते.त्याला पाहून तर मला खूप आनंद झाला, कारण आमची भेटच हि बऱ्याच वर्षांनी झाली होती.त्याला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारलं कसा आहेस ,तो बोलला बघ ना तुझ्या समोर उभा आहे,तू कशी आहेस,एकटीच आलीस का?त्याचं हे असं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मी त्याला बोलले मुलगी आली ना सोबत,एवढं बोलून मी लग्न मंडपात जाऊन बसले.नवरी मुलगी स्टेज वर आली,ती मुलगी माझ्या पेक्षा दिसायला एवढी सुंदर होती पण,मला वाटत होतं त्याचा सोबत फक्त मी शोभले असते.


त्या नवरी मुली कडे पाहुन मला त्रास हि होत होता आणि खूप बरही वाटत होतं. बरं याकरिता वाटत होतं की,तो माझ्यापासून दूर झाल्यावर त्याला किती वेदना झाल्या असतील हे मला समजत होतं. आणि त्याला झालेला त्रास दूर करण्यासाठी हि मुलगी माझी जागा घेऊन त्याला परत सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीन.आणि त्रास या गोष्टीचा होत होता कि,माझ्या काळजाचा तुकडा आता कोण्यातरी दुसऱ्या व्यक्तीचा होत आहे म्हणून. नंतर लग्न समारंभ संपत आला मी त्याला देण्यासाठी एक भेटवस्तू आणली होती,त्याला ती भेट वस्तू देऊन त्याच्या गळ्याला मिठी मारून येते म्हणून निघाले. तेवढ्यात तो म्हणाला आगं थांब ना जेवण करून जा मी पण जेवण नाही केलं आपण सगळे सोबत जेवण करू मग तू जा ठीक आहे ना. मी त्याला बोलले आरे माझा उपवास आहे तुम्ही जेवण करा मी येते मला बराच उशीर झाला आहे. त्याची बायको आमचे भाषांतर ऐकत होती ,पण ती आम्हाला काहीच बोलत नव्हती.

नंतर त्याच्या बायकोने मला आवाज दिला आहो ताई जेवण करून जा ना असं का जातंय.पन माझ्या मनात काय चालू होतं ते मलाच होतं. ती मुलगी त्याच्या सोबत पाहून मला खूप त्रास होत होता.मी रागाच्या भरात माझ्या मुलीचा हात धरून येते रे रोहन म्हणून निघाले.पन माझी मुलगी सनम मम्मा थांब ना मला खूप भूक लागली आहे आपण जेवण करून जाऊ ना अशी म्हणत होती.पण मी तिच्या हाताला धरून ओढत बोलले सनम आपण घरी जाऊन जेवण करु.तरी पण माझी सनम माझं ऐकत नव्हती, शेवटी ती पण रोहन सारखीच खडूस आणि जिद्दी तिला जे पाहिजे ते द्यावाच लागतं पण मला त्या ठिकाणी उभे राहणे शक्य नव्हते. माझ्या काळजात जणू काय आग लागत होती असं मला वाटत होतं. मी सनम च्या हाताला घट्ट धरून तिला लग्न मंडपातून बाहेर आणत होते,पन तरी सनम मला म्हणत होती मम्मा मला जेवण करायचंय थांब ना थोडं एवढी घाई का करतेस ,मी सनम कडे रागात पाहून सनम मार खाऊ नकोस चल घरी आपण घरी जेवण करू असे बोलले.नंतर लग्न मंडपातून निघून घरी आले.नंतर मला समजले कि,ज्या व्यक्तीवर आपण खरं प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्या बरोबर पाहिल्यावर किती त्रास होतो ते मला समजलं. आणि मला खऱ्या प्रेमाची जाणीव झाली. या मधून मला एवढाच संदेश द्यायचा आहे कि,कृपया करून कोणाला फसवू नका. 

 लेखक:- रोहन बुद्धम ढगे(RB)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama