Rohan Dhage (RB)

Drama

4  

Rohan Dhage (RB)

Drama

चोरून लपून

चोरून लपून

2 mins
413


काय करावं काय नाही समजून उमजत नाही. रोज रोज हे संसाराचं ओझं मला आता सहन होत नाही. असं वाटतंय या सगळ्या व्यापातुन कुठंतरी लांब निघून जावं. पण जाणार तरी कसं माझी सनम खूप लहान आहे,एखाद्या गोंडस फुलपाखरा सारखी,मी वैतागून निघून गेल्यावर तिचा कसं कोण सांभाळ करेन याची चिंता मनाला दररोज खात असते.


आणि त्यात नवरोबा तू अशीच वागतेस तू हेच कपडे घालतेस तू आता दोन मुलांची आई झालीस तुला थोडी पण अक्कल नाही. तुला समज कधी येणार देव जाणे.

त्याचं ते टोचून बोलणं मला एखाद्या जेलर सारखं वाटतंय पण काय करू कसा पळ काढू यातून काही समजत नाही.

मला ना या संसाराचा खूप वैताग आलाय,

आता असं वाटतंय मी खूप मोठी चूक केली त्याला गमवून.


थोडा त्रास झाला असता पळून जाऊन, घरच्यांच्या विरोधात जाऊन,पण काही दिवसांनी सगळं ठीक झालं असतं.

असा रोज रोज त्रास सहन करण्यापेक्षा एकदाचा त्रास झाला असता तर खूप पुरला असता.


तरी तो लग्नापूर्वी सांगत होता.ज्याच्या सोबत लग्न करतेस तो मुलगा तुझ्या योग्य आहे का?

ते खात्री पूर्वक तपासून बघ.त्याला उलटे सुलटे प्रश्न विचार.

पण मी काय त्याच एक ऐकलं नाही.त्यावेळी घरच्यांचा विचार केला.तेच आता माझ्या जीवावर बेतला.


वाटलं पळून जावू तर माझ्या घरच्यांना भाव-भावकित मान खाली घालावी लागेल,हा एवढाच विचार केला नसता तर या सर्व संकटांना असं मला रोज सामोरं लागलं नसतं.


तो मला एवढं समजावून घ्यायचा की, त्याच्या प्रेमाचे पुरावे देण्यासाठी एखादी कादंबरी कमी पडावी. मी चुकत असेल तर तो लगेच समजून सांगायचा त्यावर जेवढं बोलावं तेवढं कमीच,तो भलामोठा समुद्र होता आणि मी त्यातील छोटीशी न्हाव,तो एक परिपूर्ण खेळ आणि मी त्यातील एखादाच डाव.तो सर्वगुण संपन्न होता. त्याच्याच कुठलीही कमी नव्हती.


तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडत असेल मी केंव्हा पासून तो ते हा शब्द कोणासाठी वापरत असेल तर ते शब्द मी माझ्या जिवलगा साठी,माझ्या सख्यासाठी,माझ्या आत्म्यासाठी,माझ्या छबीसाठी,माझ्या प्रियकरासाठी वापरतेय.

तो एवढा जीव लावायचा मला जणू पाण्यातील माशापरी,पाण्यातून बाहेर काढला तर लगेच मरेन.


काय माहित तो आता कुठं आहे,कसा आहे, कोणाबरोबर आहे,त्याचं लग्न झालं असेल का? त्याचा तर संसार माझ्यासारखा नसेल ना.जे दुःख मी भोगतेय त्याच्या तर नशिबी माझ्या सारखं नसावं परमेशवरा.त्याला खूप पाहावं वाटतं, त्याला मणतोक्त बोलावं वाटतं, माझ्या मनातलं त्याच्या मनाला सांगावं वाटतं.

ईश्वराचे खूप खूप आभार,

बऱ्याच वर्षांनी आणि खूप प्रयत्न नंतर शेवटी आमची एकदा भेट झाली.

आमच्यात खूप गप्पा झाल्या,तेही मी तुमच्या पुढे लवकरच ठेवण्याचा प्रयत्न करीन...



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama