kanchan chabukswar

Tragedy Thriller

4.0  

kanchan chabukswar

Tragedy Thriller

म्हातारगाव................

म्हातारगाव................

9 mins
355


कलेक्टर म्हणून औरंगाबादला माझी नेमणूक झाली होती. औरंगाबाद तसं ऐतिहासिक गाव त्यामुळे दर रविवारी कुठे ना कुठेतरी सहलीला जायचा असा माझ्या कुटुंबाचा कायमच कार्यक्रम झाला. सगळ्या विभागाचा दौरा करावा म्हणून मी निघालो, स्वतः देशपांडे साहेब[ म्हणजे मी] दौऱ्यावर जाणार म्हटल्यावर बराच फौजफाटा जमा झाला. मराठवाडा हा तसा दुष्काळी विभाग पण एका गावापाशी, म्हातारगावापाशी आल्यावर मी आश्चर्यचकीत झालो. काळजीने किंवा अजून काहीशा कल्पनेने मनामध्ये कळ उठली.

हिरामोती पाझर तलाववर्ती चक्कर मारताना पाझर तलावाच्या भिंतीच्या एका बाजूला एक मोठा दगड ज्याला भरपूर शेंदूर फासला होता, आजूबाजूला तेलकट काळे डाग पडलेले ज्याच्या वरून तिथे कायम दिवाबत्ती होत असणार. देव तर कुठेच दिसला नाही, खेडूत लोक पण भाबडे असतात, कदाचित तलावाची पूजा करत असतील, असे वाटून मी तो मनातून विचार झटकून टाकला. गावाचं नाव पण विचित्र, म्हातारगाव, पण वही पुस्तकामध्ये त्याची नोंद तर आईनापुर होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे संध्याकाळी पोलीस पाटील गावचे सरपंच माझ्या भेटीला आले. गावामध्ये तरुण कोणीच दिसत नव्हतं. सगळेजण पन्नाशी किंवा साठीच्या वरचे. तसं पाहिलं तर पाझर तलाव तुडुंब भरलेला, शेतीवाडी चांगलीच पिकत होती मग गावाचं नाव म्हातारगाव का बरं?


     त्या रात्री पौर्णिमा होती, माझे असिस्टंट जळगावकर म्हणाले," साहेब, तलाव च्या बाजूला तुमची व्यवस्था करू का? पूर्णिमा चे सुंदर चांदणे पडले आहे बघा मजा येईल."

गेल्या पंधरा दिवसाच्या दौऱ्यावरती असल्यामुळे मी पण जाम दमलो होतो," ठीक आहे जसं सगळ्यांना सोयीस्कर होईल तसं करा" मी उत्तर दिले. पाजर तलाव यापासून पाचशे मीटरवर डोंगरावरती सरकारी रेस्ट हाऊस होते, तिथेच माझी व्यवस्था आणि बाकीच्या सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली. रात्र तिथेच घालवायची होती.


अचानक मध्यरात्री कुठून तरी कासावीस होऊन रडण्याचा आवाज आला, कुठल्यातरी अगम्य भाषेमध्ये कोणीतरी आई आणि बाप "मुलांना नेऊ नका" असं काहीसं म्हणत होती. त्यांच्या जोर जोरात चाललेल्या आक्रोशIला ढोलकी मंजिरी असा नाद झाकून टाकत होता. तरी पण कुठल्या तरी आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आकांत कानावर येत होता.

कोणीतरी आजारी असेल किंवा काहीतरी गावांमध्ये झालं असेल असं समजून मी बंगल्याच्या गच्चीमध्ये येऊन उभा राहिलो. माझ्या मुळे शेजारच्या खोलीत झोपलेले जळगावकर देखील जागे झाले. दूरवर तलावाचे पाणी चांदीसारखे चमकत होते, चंद्र आता माथ्यावर आला होता, स्वच्छ शितल चंद्रप्रकाश खूपच आल्हाददायी वाटत होता. सुंदर मजेशीर अशी गार हवा तलावाच्या पाण्यावरुन वाहत होती. खरं म्हणजे तो भाग अतिशय सुजलाम-सुफलाम असा दिसत होता.

अचानक तलावाच्या दिशेने काही मंडळी हातामध्ये कंदील डोक्यावरती पेट्रोमॅक्स घेऊन वाजत-गाजत चाललेली दिसली. काही मंडळी पुढे मध्ये लाल साडी नेसलेली एक तरुणी आणि तिच्या बाजूला गुलाबी फेटा घातलेला एक तरुण हातामध्ये कट्यार, लिंबू दोघांच्याही गळ्यामध्ये हार , बहुतेक लग्नाची वरात चालली असावी. लोकांमधे उत्साह पण दिसत होता आणि मरगळ पण दिसत होती, 

मागून एक कसंतरी लुगडं नेसलेली बाई ओरडत धावत होती," सोडा तिला सोडा, माफी द्या, पोरांना जगू द्या." असा काहीसा जोरजोरात आवाज येत होता.

बाईच्या मागे एक पुरुष पण धावत होता दोघांचाही आक्रोश ढोल आणि ताशा च्या आवाजात दाबला जात होता.


हळूहळू सगळी वरात पाझर तलावापाशी च्या भिंती कडे गेली. ज्या मोठ्या दगडाला सकाळी आम्ही शेंदूर लावलेले पाहिले होते तो दगड बाजूला सरकवून ठेवलेला होता, दगडाच्या मागे तलावाच्या भिंती मध्ये एक खोली दिसत होती, खोलीमध्ये सजवलेला पलंग सोडलेल्या चमचमणाऱ्या कलाबतू च्या माळा, लावलेल्या मेणबत्त्या असं काहीसं धूसर दिसत होतं. आता गावच्या मोठ्या माणसांनी सगळ्यांनी त्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या पायावरती डोकं ठेवलं. मुलीच्या कपाळावर सवाष्णींनी येऊन भलामोठा मळवट भरला. काही सवाष्णींनी पुढे होऊन दोघांनाही या खोलीच्या दरवाजाशी उभे केले आणि त्यांचे मोठ्या ताटातल्या निरंजना नेऔक्षण केले, परत एकदा गळ्यात हार घातला, डोक्यावरती फुले वाहिले, त्या तरुण मुलीच्या कपाळाचे कुंकू, सगळ्यांनी आपल्या डोक्यावर लावून घेतले, पुढे होऊन परत परत तिच्या पाया पडल्या, नवऱ्या मुलाच्या हातामध्ये कसलातरी बॉक्स ठेवण्यात आला, फळाची करंडी, मिठाईचा ताट दोन दुधाचे पेले असं सगळं सामान त्या खोलीमध्ये ठेवण्यात आलं. आता वाद्यांचा गजर वाढायला लागला होता. अचानक ती मुलगी धावत बाहेर आली, त्या आक्रोश करणार्‍या आईने तिला घट्ट मिठी मारली, अजूनही आई गयावया करत होती, अचानक वाद्यांचा गजर अजूनच वाढला. बऱ्याच जणांनी त्या आई आणि मुलीला घेराव घालून मुलीला ओढून घेतले.

 आता मुलगा आणि मुलगी यांना फुलांच्या माळांनी घट्ट बांधण्यात आले, दोन-तीन दांडग्या त्या दोघांनाही तसेच उचलले आणि त्या खोली मधल्या पलंगावर ती नेऊन झोपवले. ुठून तरी वार्‍याचा झोत आला आणि आत मधल्या सगळ्या मेणबत्त्या विझल्या. 

"नैवेद्य कबूल कर रे महाराजा,"

" तलावाला पाणी लागू दे रे महाराजा,"

" गावात सुख शांती राहू दे रे महाराजा"

" नैवेद्य कबूल कर रे महाराजा"

जोरात ढोल ताशे आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी म्हटलेले वाक्य कानावरती घेऊ लागले.

काही पेहलवान माणसांनी बाजूला सरकलेला दगड त्या खोलीच्या दरवाज्यावर लावून टाकला. चारी बाजूनी फटाफट मातीने लिंपून टाकला. कोणीतरी येऊन त्याच्यावरती भसाभसा शेंदूर फासला. फुलांच्या माळा लावल्या. दगडाच्या चारी बाजूला दिवे लावले. नारळ फोडून त्याची शकले दोन्ही बाजूला टाकले. ढोल-ताशांच्या गजरा मध्ये वरात परत फिर फिरली. चार माणसं पहारेकरी म्हणून तिथेच बसून राहिले. कोल्हे, कुत्री अजून काही प्राणी येऊ नयेत म्हणून. ती बाई आणि तिच्या बाजूला एक पुरुष माना खाली घालून जमिनीवर ती गडाबडा लोळत तिथेच थांबले. त्या दोघांना धरून वराती बरोबर लावून देण्यात आले.

गाव पूर्ण शांत होतं. कुठल्याही घरामध्ये दिवा लागलेला दिसत नव्हता. दूरवर कोल्हेकुई ऐकू येत होती. एवढा तमाशा झालेला पण गावामधला कोणीही बाहेर आला नव्हता. ना कुठला दरवाजा उघडला ना बंद झाला. जळगावकर अजूनही माझा हात घट्ट धरुन उभे होते, पोलिसाचे पण हात पाय थरथरायला लागले. हे काहीतरी अघटित अस होत होतं. सगळे लोक हल्ल्यानंतर हनुमान चाळीसा म्हणत आम्ही तिघेजण परत आलो. त्या रात्री मला झोपच आली नाही.

गाव पूर्ण शांत होतं. कुठल्याही घरामध्ये दिवा लागलेला दिसत नव्हता. दूरवर कोल्हेकुई ऐकू येत होती. एवढा तमाशा झालेला पण गावामधला कोणीही बाहेर आला नव्हता. ना कुठला दरवाजा उघडला ना बंद झाला.


दुसऱ्या दिवशी उशिरात जाग आली. जळगावकर तापाने फणफणत होता. खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी गाव सभा बोलावून तक्रार निवारणाचा दिवस होता. तो विचार रद्द करून मी त्यांना मी रहात असलेल्या बंगल्याच्या आवारातच बोलावले.

" तक्रार असेल तर त्याचं कागद घेऊन ये म्हातारे दुसऱ्या कुणाला तरी घेऊन ये रे ," पोलिसाचा जोर जोरातला आवाज ऐकू आला.


त्या दिवशी मला समजलं की गावांमध्ये बहुतेक सगळे म्हातारे उरले आहेत. एवढा हिरवकंच रान शिवार असूनही, तिथे तरुण मुलं काम करताना दिसत नव्हती. म्हातारी माणसच शेतीवाडी गुरंढोर सांभाळत होती.

" हॅलो, सुभाष, मी बोलते आहे मावशी. म्हातारगावापर्यंत आला आहेस तर वाट वाकडी काढून माझ्या पण गावाला ये. दुपारी जेवायला ये. बरेच वर्ष झाले तुला , तुझ्या आईला, कोणाला पाहिले नाही. जरूर ये मी वाट बघते." सुमा मावशीचा नेहमीच्या सारखा दटावणी चा फोन. आईची मोठी बहीण सुमा मावशी. गेलेच पाहिजे. नाहीतर घरी गेल्यावरती आई नाराज होईल. म्हातार गावातलं काम आटोपलं होतं, जाताजाता बाजारात गाडी वळवली, मिठाई आणि भारीपैकी नऊवारी साडी अशी खरेदी करून सुमा मावशीच्या घरचा रस्ता धरला. जेवताना सुमा मावशी म्हणाली," काल पौर्णिमा होती, इतकी वर्ष झाली पण अजूनही झालेला प्रसंग नजरेसमोरून हलत नाही."

मला आश्चर्यच वाटले. इकडच्या तिकडच्या गप्पा होतच नव्हत्या, वळून वळून मावशी काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होती, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी मीच सुरुवात केली. चहा पिताना काल रात्री घडलेल्या प्रसंग तिला जशाच्या तसा सांगितला. आणि प्रश्न पण विचारले," म्हातार गावातले तरुण मुलं गेली कुठे? सगळी म्हातारीच का? गाव समृद्ध आहे, कुठे तंटा नाही बखेडा नाही, मग गावातली तरुणाई गेली कुठे?"


" काल नेमकी भाद्रपदात मधली पौर्णिमा होती. गावाच्या पंचक्रोशी मध्ये नेहमीप्रमाणेच दुष्काळ पडलेला होता. पाझर तलावाचे बांधकाम कितीही वेळा केलं तरी टिकत नव्हतं. बाजूच्या गावांमध्ये कोणीतरी पोहोचलेला संन्यासी आला होता. त्याने तलावाची जागा योग्य नसल्याचे सांगितले. सरकारने दिलेले पैसे संपत आले होते आणि पाटील तलाठी सरपंच सगळ्यांचेच हात त्याच्यामध्ये बुडलेले होते. गावामध्ये एक वैदू पण बस्तान मांडून होता. मंत्र-तंत्र अघोरी विद्या जाणणारा. सहसा कोणी त्याच्या वाटेला जात नसे, पण पाटील तलाठी आणि सरपंच तिघांचेही नुकसान होत होते, आणि सरकार दरबारी हिशोब द्यायला त्यांच्यापाशी काही नव्हतं. पाच-सहा वेळा पाझर तलावाची भिंत उभी राहत नव्हती.

वैदू ने उपाय सांगितला," पौर्णिमेच्या रात्री, नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या बळी द्या." सर्व विधिविधान समजावून सांगितले. वेताळाची शांती करण्यात आली, नवीन लग्न झालेले जोडपे कुठून शोधायचे?

साला वर मजुरी कारण काम करणाऱ्या विधवा शांतीची कोवळी मुलगी हिरा आणि तिच्या भावाचा मुलगा मोती वधू- वर म्हणून निश्चित करण्यात आले. मोबदला म्हणून दोघांना मिळून पाटलाने दोन गुंठे जमीन द्यायचं कबूल केलं त्याप्रमाणे कागदपत्र पण झाली.

शांतीला आणि तिच्या भावाला सांगितलंच नाही की लग्न झाल्यावर काय होणार आहे ते. सगळ्या गावाने एकत्र येऊन दोघांचं लग्न लावलं आणि पौर्णिमेच्या रात्री वाजत-गाजत त्यांना पाझर तलावाच्या भिंतीपाशी आणून उभं केलं. त्याच्यानंतर शांतीच्या लक्षात आलं की नक्की काय चाललं आहे ते. तिचा भाऊ तर बोलुन चालून एक मजूर, हातावर पोट असणारा, एक मुलगा गेला तर त्याचं जास्त काही बिघडणार नव्हतं. उलट दोन गुंठे शेतीमुळे तो सुखावला होता. शांती विधवा होती. तिला भविष्य असं काही नव्हतंच. तिचा मुलगा असाच कुठेतरी रोजंदारीवर ती काम करत होता नाहीतर शहराचे चकरा मारत होता. पण तिचा पोरीवर हिरा वर अतिशय जीव. हिरा अतिशय देखणी होती, कामसू, स्वभावाने गरीब, आज्ञाधारक हिरा सगळ्यांनाच आवडत असे. त्याच्यामुळे पोरीचा बळी द्यायला शांती अजिबातच तयार नव्हती. तिच्या आकांतIला, आक्रोश करण्याला गावकऱ्यांनी अजिबातच दाद दिली नाही.


जे तुला दिसलं ना, ते दृश्य दर वर्षाच्या भाद्रपद पौर्णिमेला सगळ्यांनाच दिसतं. ज्या रात्री त्या दोघांना तलावाच्या भिंती खाली पुरून दगड लावून टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशी तलावामध्ये भरपूर पाणी यायला लागलं.

शांती अतिशय दुःखी झाली, काम संपल्यावर रोज संध्याकाळी ती तलावापाशी येऊन दिवा लावून जात असे. दुःख अनावर झाल्यावर ती एके दिवशी तिने गावच्या मारुतीच्या देवळासमोर तमाशा मांडला. छाती बडवून घेत जोरजोरात आक्रोश करत तिने गावाला शाप दिला," इथे कोणाचीही लग्न होणार नाहीत. लग्न झालेली जोडपी टिकणार नाहीत. माझ्या मुलीचा जसा बळी गेला तर तुमच्या मुलींचा पण जाईल." छाती बडवून घेत मारुतीच्या समोरच्या दगडावरती डोके आपटून आपटून शांती ने तिने जीव दिला. " मावशीच्या डोळ्यामध्ये पाणी तरळत होतं.


" मग काय झालं?" माझा प्रश्न.

" तरीपण पाटील अतिशय गर्वी, उन्मत्त झालेला. पाझर तलावाच्या पाणी आल्यानंतर तर सगळ्यांची चंगळ झाली. पुढच्याच वर्षी त्यांनी आपल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न करायचे ठरवले. गावामध्ये येणाऱ्या सुबत्ता, संपत्ती ने सगळेजण शांती आणि तिच्या पोरीला जणू काही विसरूनच गेले होते. पाटलीन बाई अर्ज करत होती, दुसऱ्या गावाला जाऊन लगीन करू म्हणून. पण पाटील म्हणाला," शांतीचा शाप म्हणजे कावळ्याचा शाप त्याला काय एवढे किंमत द्यायची." झालं. धुमधडाक्यात लग्न झालं. पाटलानी भरपूर पैसा खर्च केला. तीन दिवस गाव जेवण घातलं. सोन्याने पोरीला मढवली होती. तिथेच कुठे तरी चुकलं. लग्नाच्या रात्री गावावर दरोडा पडला. पाटलाचे पोरी ला उचलून नेण्यात आलं. दुसर्या दिवशी तिचे प्रेत पाझर तलावात तरंगताना दिसू लागलं.

दरोडा कोणी घातला, कसा घातला, पोलिसांना काहीही तपास लागला नाही. तेव्हापासून गावांमध्ये जबरदस्त भीती पसरली.

तरुण मुलांची लग्न होईनाशी झाली. लग्न करायची तर दुसऱ्या गावाला जाऊन. त्यामुळे सगळी तरुण मंडळी हळूहळू गाव सोडून निघून गेली." मावशी ची कथा संपली होती आणि माझ्या मनामध्ये विचार चक्र चालू झाले.


    गावाला चुकीचं प्रायश्चित्त मिळालं होतं, चुकीची शिक्षा देखील झाली होती, आता हे कुठे तरी थांबायला पाहिजे होता. बऱ्याच विचारविनिमय करून शेवटी शहरातल्या एका कॉन्ट्रॅक्टरला घेऊन मी परत म्हातारगाव गाठला.

पाझर तलावाच्या भिंतीला, व्यवस्थितरीत्या सिमेंटच्या पिलर चे टेकू देऊन तिथला दगड बाजूला करण्यात आला.

दगडाच्या आतमध्ये डोकावून बघताच भयानक उग्र वास नाकात शिरला. लोबणारी कलाबतू, सडलेल्या फुलांचे, सडलेल्या मानव देहाचे अवशेष हाडाचे दोन सांगाडे पलंगावर ती बांधलेल्या अवस्थेत पडले होते. मजुरांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले, ती जागा संपूर्ण काँक्रीट नि भरण्यात आली. त्या दोन मृतदेहांना हिंदू संस्कृती परत प्रमाणे अंत्यसंस्कार देण्यात आले. सगळ्या गावकऱ्यांनी हिरा आणि मोती यांची क्षमा मागितली, काही म्हातारे गावकरी नाक घासून घासून क्षमा मागत होते. सगळे सोपस्कार पार पडल्यावरती, प्रमाणे तेराव्या दिवशी गोड जेवण करून मी गावाला संबोधन केलं.


"तुम्ही आपल्या मुलांना परत बोलवा ,

आता इथे कुठलाही शाप उरलेला नाही , प्रयत्न करून बघा,

 हिरामोती चा बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, त्यांची आई रागवली ते योग्यच आहे पण आता जवळजवळ 60 वर्षे लोटली आहेत.  शापाची भयानकता कमी व्हायला लागली आहे मुलांना गावाकडे बोलावून घ्या."


म्हाताऱ्या पाटलाने आपली थरथरणारी मान हलवली.  दिवाळीनंतर चांगला मुहूर्त काढून त्याने आपल्या नातीचे [ हिराचे] लग्न गावातच लावून दिले.  हो, झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त पाटलांनी घेतले होते, आणि आपल्या गोड नातीचे[ नाव देखील हिरा ठेवले होते.


हिरा ची वरात तशीच तलावापर्यंत नेण्यात आली, तिथल्या समाधीला वंदन करून हिरा आपल्या नियोजित वरा बरोबर सासरी रवाना झाली. कार्य निर्विघ्न पार पडलं ,

 मी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy