STORYMIRROR

Anuraag Pune

Horror Thriller

3  

Anuraag Pune

Horror Thriller

मगध

मगध

113 mins
218

बेरात्री एक टांगा येऊन राजवाड्याबाहेर येऊन थांबला. " कोण आहे ? " दोन द्वारपाल एकदम सचेत झाले. पडदा बाजूला झाला. " आम्ही गंधारहुन आलो आहोत. महाराणींनी बोलावलं आहे." चेहरा न दाखवताच एक पुरुषी आवाज आतून आला. 

" बरं, टांगा पागेत लावा, तुम्ही उतरा इथेच. मशालीच्या उजेडात दोन पुरुष, एक स्त्री आणि द्वारपाल चालू लागले. महालात निरव शांतता होती. त्या स्त्रीच्या पैंजनाचे आवाज , द्वारपालाचे तोडे, भल्यांचा ठाक, एवढाच काय तो आवाज. " आपण इथेच थांबावं. मी वर्दी देऊन आलोच. ते तेथेच उभे राहिले. 

मगध. एखाद्या गंधर्वानेच वासवलेली नगरी ! नावाप्रमाणेच धार्मिक, प्रजापालक , शूर, दानी, मानी आणि प्रजेचा लाडका राजा धर्मसेंन. त्यांच्या सावली सारखी , आपल्या प्रजेला पोरासारखी जपणारी महाराणी यशोधरा. प्रजेला काही काही कमी नव्हती. यात आनंद म्हणून राजस नऊ वर्षानी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव चित्रसेन. स्वभावाने अगदी शांत, गोंडस असा हा राजकुमार. पुत्रकामेष्टीचेच वरदान ते ! साक्षात कर्माचे फळ. राज्यव्यवस्था आणि सेना, दोन्ही दृष्ट लागण्याजोगी. महाराजांचा भाऊ विरसेन, हा सेनाधीश होता. राज्याच्या सीमा आणि राज्यात न्याय या दोन्ही गोष्टी यथोचित होत्या. पाऊस मुबलक त्यामुळे शेतकरी ही सुखात. सारा आनंदाने भरीत असे. सारे राज्य सुखाच्या शिगेवर नांदत होते. 

" या." द्वारपाल निरोप घेऊन आला. आपल्या माहेरची माणसं बघताच महाराणींना भरून आले. त्या समोर च्या स्त्रीच्या गळ्यात पडून रडू लागल्या. 

" शांत हो, तुझा निरोप येताच मी बाबांचा निरोप घेतला आणि निघाले. " ती स्त्री महाराणींची बहीण वसुंधरा होती. 

" आम्हास काहीच कळत नाहीये वसुंधरा. हे इतके अचानक झाले, की आम्ही, महाराज, सारा राजप्रासाद एकदम हबकून गेलो. राजवैद्य गेली ६ दिवस जागचे हलले देखील नाहीये. दिवस रात्र नाना विधी, मुळ्या, औषधी, वनस्पती ! " 

वसुंधरेने शांत निजलेल्या चित्रसेंन कडे पाहिले. ८ वर्षाचे ते बालक निपचित पहुडले होते. शेजारी जाग आलेले महाराज आणि राजवैद्य देखील होते. 

" पण हे अचानक ?" वसुंधरेने महाराजांना विचारले. 

" सहा दिवसापूर्वी युवराजांचा जन्मदिवस झाला. दुपारी अन्न दान आणि कुळदेवतेची पूजा उरकली. युवराजांनी वन विहाराचा हट्ट धरला."

" युवराज, आज जन्म दिवस तुमचा, आज तुम्हाला भेटायला प्रजा येणार, आणि अश्यात वनविहार ? " महाराणींनी त्यांना टोकले. 

" आई, मला वाटतं की जन्मदिवस हा निसर्गाच्या सानिध्यात व्हावा. ज्या निसर्गाचा आपण एक भाग आहोत, त्याच्या कुशीत जाऊन त्याचे आभार मानावे. " 

" तुमचे बोलणे, आणि तुमचे वय, काही 

ताळमेळ नाहीच!" बऱ्याचदा युवराजांच्या अश्या बोलण्यावर महाराणी आणि इतर लोक स्तंभित होत. 

" वहिनी, युवराजांना जायचे असल्यास जाऊ द्यावे. आम्ही त्यांच्या जाण्याची व्यवस्था करतो. " काका विरसेन नी लगेच होकार भरला. " पण युवराज, सोबत अनंतास न्यावे."  अनंत हा राजघराण्याच्या अंगरक्षकांच्या वंशातील सगळ्यात शूर तरुण होता. त्यास भाला, तलवार, बरछी, पट्टा व इतर शस्त्रे अवगत होतीच. शब्दभेदी होता तो. अंधारात देखील त्याचे बाण कधीच चुकत नव्हते. 

" वनात जाऊन आले, आणि त्यादिवसापासून...!" महाराजांना पुढे बोलणे झाले नाही. 

गेले काही दिवस असेच सुरू होते. चित्रसेनास एका विचित्र ज्वराने ग्रासले होते. महालात प्रवेश करताच, त्यांचा चेहरा मलूल पडला. गेले ६ दिवस ते अर्ध-मूर्च्छित अवस्थेत होते. 

" महाराज, जंगलात अनेक प्राणी-पशु असतात, तसेच बरेच कीटक देखील असतात. एखादे कीटक अंगावर उभारले असेल असे मला वाटले, 

पण काही वण नाही, खुणा नाहीत." तिसऱ्या दिवशी राजवैद्यांनी आपलं मत मांडल. सह्याद्रीपासून ते बालाघाट पर्यंत, अगदी हिमशिखरावरूनही जडीबुटी, वनस्पती मागविल्या जात होत्या. काढे, लेप सगळे सगळे प्रयोग होत होते. 

राज्यात हळू-हळू बातमी पसरू लागली. या असाध्य तापाची कारणे कोणालाही माहीत नव्हती. 

वसुंधरा चित्रसेंना समोर बसली.  " महाराणी, यवराजांची कुंडली आपण पाहिलीत का ? " 

" नाही...!" 

वसुंधरेने त्यांच्या कपाळावर हात ठेवला. एखादे तांब्याचे भांडे तापावे तसे ते तापले होते. त्यांची नाडी ही साथ सोडत होती. तिने डोळे बंद केले, आणि ध्यान लावले. तिस काहीतरी दिसले. जे अत्यंत भयावह होते. विचाराच्या पलीकडे होते, कल्पनेच्या बाहेर होते. तिने घाबरून डोळे उघडले. आणि ती एकदम बाजूला सरकली. तिला घाम फुटला. 

" हे कसे शक्य आहे?" 

तीचे वागणे पाहून महाराज, महाराणी आणि राजवैद्य सुद्धा कोड्यात पडले. 

" काय झाले वसुंधरे ? तू अशी का घाबरलीस, काय दिसले तुला? " 

वसुंधरेने शेजारील मशाल चित्रसेनाचा चेहऱ्यावर नेली. उजेडात त्यांचा चेहरा लालसर दिसला. 

" महाराज...क्षमा असावी, पण..." 

" पण काय वसुंधरे, काय झालंय, सांग अभय आहे तुला. " महाराज म्हणाले. 

" महाराज, आपले राज्य , प्रजा, शासन हे सगळे- सगळे फार व्यवस्थित आहे असे आपल्यास दिसते. आणि ते आहे. पण..." आता सगळेच भयभीत झाले. 

" पण ते एका महाभयंकर अश्या शापाच्या ...!" 

" शाप..!" महाराणी एकदम कोलमडल्या. त्यांना सावरणं महाराज निट बसवु लागले. 

" होय, एक असाध्य शाप. " वसुंधरा अधिकच कोड्यात बोलू लागली. 

" कोणाचा ? कोणी दिला शाप ? " 

" महाराज, ते सांगण्याची ही वेळ नाही. उद्या सकाळी राजज्योतिष्याला बोलावून, त्यांच्या कडून युवराजांची कुंडली काढावी. बऱ्याचदा मागील पिढ्यांची एखादी चूक पुढच्या पिढीस सिहसनासोबत मिळते. तसाच एखादा शाप सुद्धा नकळत घ्यावा लागतो. " 

संपूर्ण महालातली शांतताही हे सारे ऐकत होती. वनातून युवराज काहीतरी घेऊन आले होते, की त्याना जन्मदिवशी त्यांच्या पूर्वजांनी काहीतरी अघटित दिले होते. वसुंधरेस बोलावून महाराणींनी काहीच चूक केली नव्हती. हे जे काही होते, ते मगध राज्याच्या भविष्याशी निगडित होते. 

सकाळ झाली. महालातून दासदासी, प्रजाजन, मंत्रीगण यांची ये जा सुरू झाली होती. राजपुरोहित पहाटेची कुलदेवतेची काकड आरती करून केव्हाच मुख्य महाली दाखल झाले होते. आरती झाली की तिची पहिली झळ युवराजांच्या माथी ठेवली जात. महालाच्या मुख्य मंदिराचे दार उघडेच राहत होते. महालात प्रजेला, आणि मंदिरात माणसांना प्रवेश नाकारणं हे सुशासन नव्हते, हे धर्मसेंन महाराजांना माहीत होते. 

सकाळची कोवळी किरणे चित्रसेंनच्या मुखवर पडावी अशीच त्यांच्या प्रासादाची बांधणी होती. सज्जातून राजमहालाचे मुख्य उद्यान ही त्यांना दिसत. पण गेले सहा -सात दिवस या सगळ्या पासून ते दूर होते. काल वसुंधरेने सांगितलं त्याप्रमाणे राजज्योतिषयांना पाचारण करण्यात आले होते. ते थोड्याच वेळात महालात येण्याची वर्दी आली होती. महाराणी चित्रसेंनच्या जवळून घटका भर देखील उठल्या नव्हत्या. महाराज देखील राज्यकारभार विरसेन च्या हाती तात्पुरता देऊन गंभीर झाले होते. महाराज रात्रभर वसुंधरेने सांगितलेल्या बाबीवर विचार करत बसले होते. पण त्यांना कोणीही काहीही सांगितलेले आठवत नव्हते. आपले वडील, आजोबा , पणजोबा, कोणी कोणी काही बोलले नव्हते. ही गोष्ट वाटत होती, तितकी सोपी नव्हती. आणि ती सत्य होती, कारण ती वसुंधरेने सांगितली होती. वसुंधरा यशोधरेची बहीण तर होतीच, पण ती महाज्ञानी आणि सिद्ध स्त्री होती. तीस बऱ्याच भाषा आणि बोली येत होत्या. बरेच ग्रंथ तिने वाचले होते. शास्त्र आणि शस्त्र यात ती पारंगत होतीच, पण तिने २ तप हिमालयात जाऊन शिवाची आराधना केली होती. तिला भूत-वर्तमान आणि भविष्य हे सगळे ज्ञात होते. तिला माहीत असलेल्या विद्या , ती फक्त लोककल्याणासाठी वापरत होती. तिच्या ज्ञानाची ख्याती पूर्ण देशात पसरली होती. राज्यावर येणारे संकट ती अचूक सांगत. गंधार राज्यावर ६ वर्षांपूर्वी होणारा हल्ला तिने अचूक सांगितला होता, त्यामुळे तिच्या भावांना पूर्ण तयारीस वेळ मिळाला, आणि मोठे अरिष्ट टळले होते. ती गंधार आणि मगध, या दोन राज्यांसाठी एक वरदान होती. तिला बोलावून महाराणींने काहीच भूल केली नव्हती. 

" महाराज, राजज्योतिशी दरबारात बसले आहेत. " द्वारपाल येऊन संकेत देऊन गेले. महाराज त्यांच्या खासगी दरबाराकडे जाण्यास निघाले. सोबत महाराणी, विरसेन आणि अनंत होते. वसुंधरा आधीच जाऊन बसली होती. 

अनेक ग्रंथ , पोथ्या यांच्या गराड्यात राजज्योतिष्य आणि त्यांचे शिष्य बसले होते. महाराजांनी अचानक पाठवलेले बोलावणे ,त्यांनाही अचंबित करणारे होते. पण विषय युवराजांचा होता,हे त्यांना माहीत होतं. महाराज आणि त्यांचा लवाजमा दाखल झाल्यावर सगळे उभे राहिले. 

" हे ज्ञानी लोकहो, महालातील स्थिती आपणांस ठाऊक आहेच. वसुंधरेच्या ज्ञान-चक्षु सांगतात की हा ज्वर शारीरिक नाही. युवराज कसल्याशा पिढीजात घटनेच्या आधीन आहेत. आमच्या माहिती प्रमाणे , असे काहीच आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितले नाहीये. आपण पिढीजात राजघराण्याचे ज्योतिष आहात. आमची, विरसेनची आणि यवराजांची कुंडली पहावी आणि सांगावे. " महाराजांनी हात जोडून त्यांना नम्रपणे विनंती केली.

" महाराज, आम्ही व्यक्तीच्या जन्म नक्षत्राच्या अनुसार त्याचे प्रारब्ध सांगतो. पण या विश्वाची निर्मिती करताना देवाने प्रत्येकाला कर्म आणि भोग आखून दिलेले आहेत. युवराजांचा दुर्धर आजार हे भोग असू शकतात. नेमके कशाचे, हे आम्हास सांगणे थोडे कठीण जाईल. तुमच्या, तुमच्या भावाच्या कुंडलित काहीच दोष नाहीये. पण..." 

" पण काय गुरुदेव ? " चिंतीत स्वरात महाराणींनी प्रश्न केला. 

" युवरांज्यांच्या कुंडलीत फक्त भोग लिहिला आहे. त्याचे कारण आपल्याला सांगता येणार नाही. कदाचीत गेल्या जन्माच्या एखाद्या कर्माचे देखील प्रायश्चित्त राहिले असेल. " 

" गुरुदेव, गत जन्मीचे असते, तर आम्हास ते कळले असते. आम्हास ते कळू शकते. मागच्या जन्मीचे भोग असते, तर या जन्मी त्यांच्या नशिबी राजयोग आला नसता. इथे प्रश्न फक्त एवढा आहे, की राजघराण्यातल्या कोणत्या पिढीत , असे काय घडले आहे, जे युवराजांच्या नशिबी भोगणे आले आहे ? " वसुंधरेच्या या प्रश्नाने सगळेच कोड्यात पडले. 

" माऊली, याचे उत्तर आम्हास ठाऊक नाही. पण एक सांगतो. युवराजांची आयु रेषा अत्यंत बिकट आहे. अनेक अडथळे, संकटे दिसतायत. त्यांचे आयुष्य दीर्घ आहे, राजयोग देखील आहे. पण ते सहजासहजी नाही. " 

सगळी सभा हतबल झाली. महाराज आणि महाराणीच्या चिंतेत अधिकच भर पडली. 

" महाराज, आपण हतबल होऊ नये, पांडवांच्या देखील आयुष्यात खडतर काळ आला. श्रीकृष्ण तर जन्मलेच होते कारागृहात ! वनवास श्रीरामाला देखील टळला नाही. युवराजांची कुंडली काहीशी अशीच आहे. आपण हतबल होऊ नये. " 


इकडे ही सभा सुरू होती. चित्रसेंनाच्या आजारपणाच्या मुळाशी कोणी पोहोचत नव्हते.  हा पितृदोष नव्हता, गत जन्मीचे ही काही बाकी नव्हते. वसुंधरा मात्र एका वेगळ्या भीतीची चाहूल लागल्या सारखी चिंतेत होती. बाजूला अनंत ही चिंताग्रस्त उभा होता. सभा सुरू होती. अचानक एक द्वारपाल आत आला. त्याला पाहून विरसेन चिडला. " काय आहे, कळत नाही का इथे काहीतरी महत्वाचं आणि गुप्त खलबत सूरु आहे. " 

" क्षमा असावी सेनापती महाराज, महालाच्या दाराशी एक वृद्ध येऊन उभा आहे. फार हट्टाला पेटला आहे. " 

" काय म्हणणे आहे त्याचे ?" विरसेन ने विचारले. 

" महाराज, त्याला राजघराण्याचे कोणाला तरी तातडीने भेटायचे आहे. " विरसेन ताबडतोब द्वारपाला सोबत बाहेर गेले. त्यांच्या मागेमाग वसुंधरा देखील गेली. पूर्ण पांढरे केस असलेले एक वयोवृद्ध गृहस्थ महालाच्या दारापाशी बसले होते. प्रचंड चालून आलेले वाटत होते. " कोणाला भेटायचं आहे तुम्हाला ? " 

" राजाच्या घरच्यांपैकी कोणाला तरी !" दमलेल्या त्या वृद्धाने उत्तर दिले. 

" आम्ही राजपरिवाराचे सदस्य आहोत. आपण मध्ये या, खूप दामलेले आहात ! " विरसेननी त्यांना आत येण्यास विनंती केली. 

" नाही, मला परत माझ्या घरी जायचे आहे. मी काय सांगतो, ते नीट ऐका. " त्या वृद्धाला सेवकाने पाणी आणून दिले. ते झाल्यावर तो सांगू लागला. 

" माझे नाव भद्रा, मी इथून दहा कोसावर असणाऱ्या संबलपूर हुन आलो आहे. युवराजांच्या आजारपणाच्या बाबतीत कळले, तसा निघालो. " विरसेन आणि वसुंधरा शांत होऊन ऐकू लागले. 

" युवराजांना झालेला आजार हा एका भयानक शापाची सुरवात आहे. कदाचित मी शेवटचा मानव असेल, ज्याला हे गूढ माहीत असेल. मला देखील माझ्या वडिलांनी , शेवटच्या दिवसांत हे रहस्य सांगितले. महाराज..." वृद्ध खाली बसले. " तुमचे पणजोबा, महाराज सुर्यसेन यांच्या पदरी एक क्रूर आणि कपटी प्रधान होता. त्याचे नाव शूर्प, हा शाप शूर्पच्या मृत्यूशी निगडित आहे. " श्वास लागल्याने तो वृद्ध बेशुद्ध झाला. विरसेन आणि वसुंधरा एकमेकांकडे भयभीत होऊन पाहू लागले. चार द्वारपालांनी त्या वृद्धास अंत:पुरात आणले. 

शूर्प महाराज सुर्यसेन यांच्या पदरी प्रधान म्हणून रुजू झाला. नगरीत तो आणि त्याची बहीण शुर्पा राहत असे. बुद्धीने अत्यंत तल्लख, तितकेच चलाख आणि गूढ असलेले दोघे बहीण भाऊ, काशीहून आले होते असे सगळ्याना सांगत. महाराज सुर्यसेनने प्रधानपदासाठी ठेवलेल्या सभेत , जिंकून त्याने प्रधानपद मिळवले होते. इतर प्रधान आणि दरबारी यांची मने जिंकण्यातही तो तितकासा यशस्वी झाला नव्हता. त्याचा एक नियम होता. सूर्यास्ता नंतर शूर्प ,कोणतेही कारण असो, दरबारात थांबत नसे. तो सूर्यास्तानंतर कोणासही दिसत नसे. इतकेच काय, तो कुठे जातो, कुठून येतो, त्याचा पत्ता काय ,हे सुद्धा कोणाला ठाऊक नसायचे. एकदाही त्याला दरबारात बोलवायची वेळ आली नाही. त्याचा विषय निघताच तो हजर होत असे. 


"महाराज, " महाराज सुर्यसेन यांच्याकडे राजपुरोहित म्हणून असलेलं दयानंद एकदा सकाळीच महाराजांच्या भेटीस आले. " बरेच दिवस झाले मनात एक शंका घर करून आहे." 

" बोला देव, आपण आमचे राजपुरोहित आहात." महाराज सुर्यसेन देखील चांगले शासक होते. 

" महाराज, प्रधान शूर्प यांच्याबद्दल माझ्या मनात काही किंतु नाही, काही वैरभाव , द्वेषही नाही, पण ..." 

" पण..?" 

" महाराज, नगरात आणि दरबारात जी चर्चा आहे, तीस अनुसरून सांगतो, शुर्पाचे लक्षण आणि हेतू काही बरा वाटत नाही. " राजपुरोहितानी टाळी वाजवली. त्यांच्या समोर एक दास येऊन उभा राहिला. 

" दास, बोल." दास थोडा चाचरला. 

" बोल दास, 

तुला अभय आहे. " 

 दोन्ही हात जोडून , मान वाकून दास बोलू लागला. " महाराज, राजपुरोहितांच्या आज्ञेने आम्ही प्रधान आणि त्यांच्या बहिणीवर पाळत ठेवायचे ठरवले. मी स्वतः ३ दिवस त्यांच्या मागावर होतो. प्रधान शूर्प दरबारातुन निघून, महालाच्या मुख्य रस्त्याने बाजाराकडे चालू लागले. त्यानंतर पागेकडून ते खास राजसेवकांसाठी बनवलेल्या सेवा बागेकडे वळले. मी त्यांच्या मागावर होतो. तिथून आपल्या महालाकडे ते जाऊ लागले. महालासमोर उभे रहाताच ते...!" 

" काय दास, लवकर बोला..!" 

" ते अचानक गायब झाले. क्षणभर मी देखील स्तब्ध झालो. एक सामान्य व्यक्ती आपल्या नजरेसमोर असताना, अचानक गायब कसा होतो ?" 

" दास, हा तुझा भ्रम देखील असू शकतो." 

" नाही महाराज, माझे डोळे सताड उघडे असताना हे झाले आहे. " दास आपल्या मतावर निश्चित होता. 

" महाराज, असू शकतो की दास क्षणभर विचलित झाला असेल. पण एक दुसरी घटना देखील घडली आहे. " राजपुरोहितानी पुन्हा टाळी वाजवली. " महाराज , हा आपल्या राज्यात काही खास आणि सुंदर पक्षी विकायला आला होता. याने बाजारात आपलं दुकान ठेवलं. "

" महाराज, एक स्त्री माझ्या दुकाना समोर येऊन उभी राहिली. तिला मी खास माझ्यासाठी राखून ठेवलेले दोन मोर आवडले. मी ते तिला देण्यास नकार दिला. तिला राग आला. रागाच्या भरात तिने त्या मोरांकडे वक्रदृष्टीने पाहिले आणि ती निघून गेली. क्षणात माझे दोन्ही मोर मरून पडले. मी आणि माझ्या साथीदारांने त्या स्त्रीस बाजारात शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तिचा काहीही पत्ता लागला नाही. बाजूच्या एक इसमाने सांगितले , की ती शुर्पा होती. " 

राजपुरोहितांनी जायला सांगताच दोघे बाहेर गेले. 

" महाराज, असे अनेक प्रसंग नगरीत घडले आणि घडत आहेत. आपण वेळीच शहानिशा करावी. आणि सूर्यास्ताचे नंतर आपणास माहितीच आहे, की शुर्प नगरीत कोणाच्याही 

दृष्टीस पडत नाही." राजपुरोहित महाराजांना आर्जव करू लागले. महाराज सुर्यसेन तडक तेथून बाहेर पडले. 

चौथ्या दिवशी दरबार भरला. ठरल्या प्रमाणे राजपुरोहितांनी कुलदेवीचे मळवट आणले होते. " आम्ही काल कुलदेवतेस अभिषेक केला, राज्याच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी हे महत्वाचे होते. हे मळवट आणि प्रसाद आम्ही खास आमच्या दरबारासाठी आणला आहे. आपण सगळ्यांनी येऊन हे पवित्र कुंकू आपल्या कपाळावर लावावे, प्रसाद घ्यावा. " राजाज्ञा झाली. रांगे प्रमाणे सगळे दरबारी, मंत्रीगण येऊन कुंकू लावू लागले. देवीच्या झालीस प्रणाम करून, प्रसाद घेऊन आपल्या जागी जाऊन बसू लागले. जशी जशी रांग पुढे सरकत होती, तसे शूर्पच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव राजपुरोहित, सेनापती आणि महाराज चोरून बघत होते. शेवटी शुर्पाची पाळी आली. तो जागेवर बसून राहिला. 

" मंत्री शूर्प, या, मळवट घ्या, प्रसाद घ्या. " सेनापती ने त्यास सांगितले. शूर्प जागेवरून उठला नाही. काही क्षण दरबारास ही नवल वाटले.

 "मंत्री शूर्प, उठून मळवट भरावे." राजाने आज्ञा केली. " नेहमीच काळ्या पोशाखात असलेल्या शुर्पास काय करावे ते समजेना. महाराजांनी इशारा केल्यावर, एक दास मळवटाचे तबक आणि प्रसाद घेऊन त्याच्याकडे चालू लागला. एक एक पाऊल पुढे सरकत असताना अचानक दासास भुरळ आली आणि तो तबकासकट दरबाराच्या मध्यावर कोसळला. सगळं तबक जमिनीवर सांडले. महाराज आणि इतर दरबारी जागेवर उभे राहिले. 

" अनर्थ, घोर अनर्थ..." राजपुरोहित उभे राहून ओरडू लागले. " महाराज, माणूस आहे, पडला असेल. " महाराज देखील अचंबित होऊन बघू लागले. त्या कालिनीवर पडलेलं मळवट शूर्पच्या पायावर देखील पडले. यांनी त्याची उघडी चामडी जळू लागली. पण तो अत्यंत सहनशील होता. महाराज दरबार सोडून निघून गेले. शुर्पाच्या पायाची जळलेली चामडी , राजपुरोहिताच्या नजरेतुन सुटली नाही. त्यांनी शुर्पाकडे जळजळीत कटाक्षाने पाहिले. शूर्पही त्यांच्याकडे पाहून दात-ओठ खाऊ लागला. दाणादाण करीत शूर्प दरबारातून चालता झाला. 


" शुर्पा, आज दरबारात जे घडले, हे तुला कळलेच असेल. " एका अंधारल्या महालात शूर्प आणि त्याची बहीण बोलत होते. 

" होय, पण त्याने इतके भयभीत होण्याचे 

कारण नाही. हे असे लहान मोठे प्रसंग घडतील." 

" शुर्पा, तो राजपुरोहित आपल्या मागे लागला आहे. आपले ध्येय मला इतके सोप्पे नाही वाटत ! तो राजाच्या खास मर्जीतील माणूस आहे. " तिथे एका बाजूला जळते निखारे पेटत होते. त्यावर लीलया हात ठेवत शुर्पा हसू लागली. 

" तो आणि तुमचे महाराज, हे मानव आहेत. आणि आपण अमानव. हा फरक तुम्ही विसरलात का ? " 

" नाही, पण सावध असणे गरजेचे आहे. " 

" या कामात घाई, भय याला थारा नाहीये." शुर्पाने आपली टोकदार नखे भिंतीवर टिकवली. " तुम्हाला दानवांचे , अधर्माचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी असंख्य वर्षे मी तप करून तुम्हाला तयार केले आहे. लक्षात असू द्या. एकदा तुम्ही महाराजांच्या सिहसनावर बसलात, की आपण दोघेही जन्म-मृत्यच्या मानवी फेऱ्यातून मुक्त होऊन इच्छा असे पर्यंत मानवावर राज्य करू. त्यासाठी खूप कष्ट, त्याग आणि कपट करावे लागेल. मगध हे एकमेव राज्य आहे, जे पृथ्वीचं मध्य आहे. आणि ते सिंहासन म्हणजे मानव आणि मायावी जग यातील एकमेव दुआ आहे. "

" मला कळतंय सगळं !" 

" आपल्याला भूक नाही, तहान नाही, झोप नाही, आपण मानव नाही ! आणि हेच आपले एकमेव वैशिष्ट्य आहे. त्या राजपुरोहिताचे काय करायचे ते मी पहाते. आपण रोज सारखेच दरबारात जावे, आणि महाराजांची मर्जी धरावी. एकदा महाराज तुमच्या भुलीत आले, की सगळेच राज्य यायला वेळ लागणार नाही. " एवढे बोलून शुर्पा आपल्या मूळ रूपात आली. शेकडो वर्षे वय असलेले एक चेटकीणि चे स्वरूप पाहून बऱ्याचदा शूर्प देखील भयभीत होत होता. अचानक वाढलेला नखांचा आकार, लालसर डोळे आणि त्यात त्याहून अधिक लाल बुबुळ. चेहऱ्यावर पसरलेले सुरकुत्यांचे पांढरे जाळे. एकाद्या जळक्या लाकडासारखे हात-पाय. हवेत उडणाऱ्या जटा. ती शेकडो वर्षे जिवंत असणारी एक मायावी चेटकीण होती. 

" माझे वय वाढते आहे, दिवसेंदिवस...! या राज्यातील त्या मुली मला चिरतरुण ठेवतील. माझ्यातल्या मायावी शक्तीला कोणी आडवु शकणार नाहीये. तू सिंहासनावर बसताच, या अमानवी शक्तीचा राजा होशील, पण लक्षात असू दे. तू आणि मी मानवी स्वरूपात असू, तेव्हा मृत्यूचे भय आपल्याला असेल. फक्त या महालात आपण मायावी आहोत. " असे म्हणून ती उडून गेली. 

आजही मगधच्या नगरपालाकडे अजून एक २०-२१ वर्षाची तरुणी अचानक गायब झाल्याची तक्रार आली. नगरपाल आणि त्याची सेना गेले वर्षभर अस्वस्थ होती. हरवलेल्या मुलींचे काहीच पत्ते लागत नव्हते. हे सुर्यसेनास माहीत नव्हते. 

महाराज सूर्यसेन आपल्या महालात अत्यंत चिंतेत येरझारा घालत होते. दरबारात घडलेला प्रकार त्यांनी याआधी कधीही पाहिलेला नव्हता. अल्पश्या काळात शूर्प त्यांच्या विश्वासू मंत्र्यांपैकी एक झाला होता. महाराजांनी द्वारपालास बोलावले. 

" सेनापतींना यायला सांगा, ताबडतोब." शस्त्रागारात असलेले सेनापती लगोलग दाखल झाले. त्यांनीही महाराजांना इतक्या चिंतेत पाहिले नव्हते. 

" महाराज, आपली चिंता मी समजू शकतो. झाला तो प्रकार अनिष्ट होता. पण त्यातून शूर्प हा अपराधी ठरत नाही. त्याने राज्याविरुद्ध असे काहीही कार्य केलेले दिसले नाही. न्यायय बाजू बघता, त्यास शिक्षा कोणत्या कारणाने करावी, हा देखील एक पेच आहे." सेनापतींनी आपली बाजू मांडली. 

" त्याचा काही ठावठिकाणाही नाही, त्याला कोणी सूर्यास्त झाल्यावर पाहिले ही नाहीये. त्याचा माग काढणे अवघड आहे महाराज." 


नगरी अंधाराच्या आधीन झाली. राजपुरोहित आपल्या घरी विचारात आकाशाकडे पहात पडले होते. त्यांची पत्नी तारका ही त्यांच्या शेजारी बसली होती. 

" होईल सगळे व्यवस्थतीत. आपण विचार करू नये जास्त." पतीस धीर देत तारका म्हणाली. " तारका, शत्रू दिसत असला, त्याची संख्या आणि बळ माहीत असलं म्हणजे आपल्याला ही तशी तयारी करता येते. इथे आपल्याला त्याचे ध्येय, शक्ती , नीती, काही काही माहीत. अशे शत्रू एखादा मोठा घात करण्याची संधी सोडत नाहीत. तू झोप. माझाही डोळा लागेल." 

मध्यरात्र झाली. सगळी नगरी शांत झोपली होती. रस्त्यांवर कुत्री उगीच केकाटत होती. राजपुरोहित दयानंद आपल्या अंगणात पहुडले होते. अचानक मुख्य दरवाजाची कडी निखळून पडली. रात्रीच्या त्या शांततेत दरवाजा आपोआप उघडला. एक काळी भयानक सावली चंद्राच्या प्रकाशात अंगणात उमटली. अंगणात खाटेवर झोपलेल्या त्या देवाच्या सेवकास काही कळले नाही. हळू-हळू ती पुढे सरकू लागली. गार वारे अडखळले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने दयानंद चे डोळे उघडले. आपल्या भावतलीचा प्राण वायूच नाहीसा झाला असे त्यांना वाटले. त्यांचे डोळे मोठे झाले, आणि त्यांना घाम फुटू लागला. कंठातून आवाज देखील निघत नव्हता. मस्तिष्कात झिणझिण्या येवू लागल्या. सगळे अंग कापराने थरथरू लागले. ती सावली त्यांच्या डोक्याच्या बाजूला असल्याने त्यांना दिसली नाही. पण कोणीतरी आपल्या श्वासावर आणि शरीराच्या इतर संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे त्यांना कळू लागले. तडफडत ते खाली कोसळले. प्राणवायूचा कण देखील शरीरात जात नव्हता. त्यांना प्रचंड घाम फुटला. मेंदूची कोणतीतरी नस अचानक तुटली आणि त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यांच्या हाता-पायाला मुंग्या येऊ लागल्या. ती काळी सावली लांब उभं राहून आपला निर्दयी पाश आवळून , दयानंदच्या शरीराचे हालहाल करीत होती. आता दयानंदच्याही लक्षात आले, की हे सगळे कोण करीत होते. पण त्यांना काहीच करता येत नव्हते. 

" बघ, एकदा शेवटचे आपल्या घराकडे बघ!" त्यांच्या मागून एक भेसूर आवाज आला. " तू एक साधारण मानव आहेस, आणि मी...अपरिमित मायावी शक्तीची धनी. तू माझ्या मार्गात आलास, त्याची फळे तुला भोगावीच लागतील."

जमिनीवर तडफडत दयानंद हे सगळे ऐकत होता. "दयानंद, तुझा जीव जातोय, म्हणून तुला हे कळणे गरजेचे आहे. मी आणि शूर्प हे पातळातुन आलो आहोत. मगध च्या सिंहासनावर शुर्पास बसवून, या भूमीवर अधर्माचे राज्य पसरवणे, हाच आमचा हेतू ! मानवाच्या आयुष्यातून देव, धर्म हे सगळे-सगळे नष्ट होतील. प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्या मनुष्याच्या रक्ताचा अधीर होईल. त्याच्या आयुष्यात क्रोध, लोभ, मत्सर आणि वासना, इतकी पराकाष्ठेस जाईल, की त्यापुढे त्याला नाती, माणुसकी याचा विसर पडेल. या भूमीवर अधर्म वाढेल, आणि तो वाढला की आम्हास अमरत्व प्राप्त होईल." 

देवाचा धावा करीत दयानंद तसेच तडफडत राहिले. आकाशात चंद्राभावती लाल-काळ्या सावल्या सैतानी फेर धरून नाचू लागल्या. दयानंदच्या पूर्ण चेहरा रक्ताने माखला. धारा जमिनीवर वाहू लागल्या. आणि अचानक त्यांच्या मेंदूच्या सगळ्या नसा तुटल्या. डोळ्यातुन, कानातून, नाकातून रक्त वाहू लागले. हाता-पायाची तडफड थांबली, आणि त्यांचे प्राण मुखातून निघून गेले. 


सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह पाहून सेनापतींची बोबडीच वळली. महाराज सुर्यसेन आणि इतर दरबारी देखील दयानंदच्या अंगणात जमले होते. तारकाचा आक्रोश बघून एकएक काळीज थरथरत होते. दयानंद चा देह , देह राहिलाच नव्हता. पार काळा पडला होता. सगळेच रक्त शोषून , तो अगदी हलका झाला होता. देहाची अशी दशा तिथे जमलेल्या कोणीही या आधी पहिली नव्हती.

स्मशानात सगळेच दरबारी जमले होते. आपल्या नेहमीच्या काळ्या पोशाखात शूर्प देखील आला होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. मृत्यू जसा त्याच्यासाठी एक खेळ असावा.  बरेच दरबारी त्याच्यापासून थोडे लांबच होते. 

मगध वर पसरलेल्या या अज्ञात संकटाला काही तरी तोड असेल. या विचाराने महाराज सुर्यसेन महालात परतले. आपल्या मंदिरात त्यांनी आज दिवा लावला नाही. राज्यात शुराची कमी नव्हती. पण शत्रू शरीरात होता, आणि एक एक भाग पोखरत होता. महाराज सुर्यसेन नी स्वतः याचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यांनी द्वारपालास बोलावले. 

" नर्मदेच्या तिरा वरून भद्रास बोलावणे पाठवा. त्यास म्हणावं, असशील तसा मगध कडे निघ."

साधारण २४-२५ वर्षाचा भद्रा , मगध च्या त्या घरापैकी होता, जे राजाचे अंगरक्षक होते. त्याचे पिता सुर्यसेनचे प्राण वाचवताना एका युद्धात धारातीर्थी पडले होते. मगध शांत होते, म्हणून भद्रा नर्मदेच्या तीरावर जाऊन तिथे धर्म सेवा करीत असे. सकाळी लाकडं फोडताना त्याला एक सेवक येताना दिसला, आणि त्याला समजले की मगध संकटात आहे. 

नगरीत आल्यावत महाराज सुर्यसेनानी भद्रास सगळे सांगितले. 

" महाराज , आपण निश्चित असा. संकट कितीही गहिरे आणि घातक असले, तरी निश्चयापुढे त्याला गतप्राण व्हावे लागेल. " महाराजांना प्रणाम करून भद्रा निघून गेला. 


चार दिवसानंतर शुर्पा आपल्या बेगडी रूपात बाजारात आली. तिला ओळ्खणार्यांनी आपल्या दुकानांच्या कानाती ओढल्या. एक दृष्टी तिच्यावर पळत ठेऊन होती. पण तिला हे कळले नाही. ती चालताना रस्त्यावर तिच्या पाऊल खुणा उमटत नव्हत्या. मुख्य बाजारातून ती स्मशानकडे जाऊ लागली. तिच्या मागावर असलेली पाऊले , काही अंतरावर चालत होती. त्यांच्या कामरेभावती नुकत्याच भट्टीतुन निघालेल्या तळपत्या तलवारी होत्या. भद्रा आपल्या घरात ध्यान लावून बसला होता. त्यास गूढ सिद्धी प्राप्त होती. एक आवाज त्याच्या कानी आला. 

" हिला मारणे इतके सोप्पे नाही. हिला कळायला नको, आणि दिसायला नको, की वार कोणी केलाय. जर हिला कळले तर, ती मारणार नाही. हिच्या बेगडी रूपातच हिला मारणे शक्य आहे. कारण खऱ्या रूपात ही एक वहशी दानव आहे. हे रूप तिचे उसने घेतले आहे. " गुरुस वंदन करून भद्राने आपल्या पेटीतून आपली तलवार बाहेर काढली. काशी विश्वेश्वराच्या सावलीत वाईट शक्तीशी लढा देण्यात आयुष्य घालवलेल्या तपस्वी साधूंनी घडवलेली तलवार होती ती. त्रिशूलाच्या लोहाचे अंश त्यात होते. ती तलवार मस्तकास लावून, कुलदेवतेचे स्मरण करून भद्राने आपले वस्त्र चढवले आणि तलवार कमरेस लावली. 


महाराज सूर्यसेन आपल्या महालात अत्यंत चिंतेत येरझारा घालत होते. दरबारात घडलेला प्रकार त्यांनी याआधी कधीही पाहिलेला नव्हता. अल्पश्या काळात शूर्प त्यांच्या विश्वासू मंत्र्यांपैकी एक झाला होता. महाराजांनी द्वारपालास बोलावले. 

" सेनापतींना यायला सांगा, ताबडतोब." शस्त्रागारात असलेले सेनापती लगोलग दाखल झाले. त्यांनीही महाराजांना इतक्या चिंतेत पाहिले नव्हते. 

" महाराज, आपली चिंता मी समजू शकतो. झाला तो प्रकार अनिष्ट होता. पण त्यातून शूर्प हा अपराधी ठरत नाही. त्याने राज्याविरुद्ध असे काहीही कार्य केलेले दिसले नाही. न्यायय बाजू बघता, त्यास शिक्षा कोणत्या कारणाने करावी, हा देखील एक पेच आहे." सेनापतींनी आपली बाजू मांडली. 

" त्याचा काही ठावठिकाणाही नाही, त्याला कोणी सूर्यास्त झाल्यावर पाहिले ही नाहीये. त्याचा माग काढणे अवघड आहे महाराज." 


नगरी अंधाराच्या आधीन झाली. राजपुरोहित आपल्या घरी विचारात आकाशाकडे पहात पडले होते. त्यांची पत्नी तारका ही त्यांच्या शेजारी बसली होती. 

" होईल सगळे व्यवस्थतीत. आपण विचार करू नये जास्त." पतीस धीर देत तारका म्हणाली. " तारका, शत्रू दिसत असला, त्याची संख्या आणि बळ माहीत असलं म्हणजे आपल्याला ही तशी तयारी करता येते. इथे आपल्याला त्याचे ध्येय, शक्ती , नीती, काही काही माहीत. अशे शत्रू एखादा मोठा घात करण्याची संधी सोडत नाहीत. तू झोप. माझाही डोळा लागेल." 

मध्यरात्र झाली. सगळी नगरी शांत झोपली होती. रस्त्यांवर कुत्री उगीच केकाटत होती. राजपुरोहित दयानंद आपल्या अंगणात पहुडले होते. अचानक मुख्य दरवाजाची कडी निखळून पडली. रात्रीच्या त्या शांततेत दरवाजा आपोआप उघडला. एक काळी भयानक सावली चंद्राच्या प्रकाशात अंगणात उमटली. अंगणात खाटेवर झोपलेल्या त्या देवाच्या सेवकास काही कळले नाही. हळू-हळू ती पुढे सरकू लागली. गार वारे अडखळले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने दयानंद चे डोळे उघडले. आपल्या भावतलीचा प्राण वायूच नाहीसा झाला असे त्यांना वाटले. त्यांचे डोळे मोठे झाले, आणि त्यांना घाम फुटू लागला. कंठातून आवाज देखील निघत नव्हता. मस्तिष्कात झिणझिण्या येवू लागल्या. सगळे अंग कापराने थरथरू लागले. ती सावली त्यांच्या डोक्याच्या बाजूला असल्याने त्यांना दिसली नाही. पण कोणीतरी आपल्या श्वासावर आणि शरीराच्या इतर संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे त्यांना कळू लागले. तडफडत ते खाली कोसळले. प्राणवायूचा कण देखील शरीरात जात नव्हता. त्यांना प्रचंड घाम फुटला. मेंदूची कोणतीतरी नस अचानक तुटली आणि त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यांच्या हाता-पायाला मुंग्या येऊ लागल्या. ती काळी सावली लांब उभं राहून आपला निर्दयी पाश आवळून , दयानंदच्या शरीराचे हालहाल करीत होती. आता दयानंदच्याही लक्षात आले, की हे सगळे कोण करीत होते. पण त्यांना काहीच करता येत नव्हते. 

" बघ, एकदा शेवटचे आपल्या घराकडे बघ!" त्यांच्या मागून एक भेसूर आवाज आला. " तू एक साधारण मानव आहेस, आणि मी...अपरिमित मायावी शक्तीची धनी. तू माझ्या मार्गात आलास, त्याची फळे तुला भोगावीच लागतील."

जमिनीवर तडफडत दयानंद हे सगळे ऐकत होता. "दयानंद, तुझा जीव जातोय, म्हणून तुला हे कळणे गरजेचे आहे. मी आणि शूर्प हे पातळातुन आलो आहोत. मगध च्या सिंहासनावर शुर्पास बसवून, या भूमीवर अधर्माचे राज्य पसरवणे, हाच आमचा हेतू ! मानवाच्या आयुष्यातून देव, धर्म हे सगळे-सगळे नष्ट होतील. प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्या मनुष्याच्या रक्ताचा अधीर होईल. त्याच्या आयुष्यात क्रोध, लोभ, मत्सर आणि वासना, इतकी पराकाष्ठेस जाईल, की त्यापुढे त्याला नाती, माणुसकी याचा विसर पडेल. या भूमीवर अधर्म वाढेल, आणि तो वाढला की आम्हास अमरत्व प्राप्त होईल." 

देवाचा धावा करीत दयानंद तसेच तडफडत राहिले. आकाशात चंद्राभावती लाल-काळ्या सावल्या सैतानी फेर धरून नाचू लागल्या. दयानंदच्या पूर्ण चेहरा रक्ताने माखला. धारा जमिनीवर वाहू लागल्या. आणि अचानक त्यांच्या मेंदूच्या सगळ्या नसा तुटल्या. डोळ्यातुन, कानातून, नाकातून रक्त वाहू लागले. हाता-पायाची तडफड थांबली, आणि त्यांचे प्राण मुखातून निघून गेले. 


सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह पाहून सेनापतींची बोबडीच वळली. महाराज सुर्यसेन आणि इतर दरबारी देखील दयानंदच्या अंगणात जमले होते. तारकाचा आक्रोश बघून एकएक काळीज थरथरत होते. दयानंद चा देह , देह राहिलाच नव्हता. पार काळा पडला होता. सगळेच रक्त शोषून , तो अगदी हलका झाला होता. देहाची अशी दशा तिथे जमलेल्या कोणीही या आधी पहिली नव्हती.

स्मशानात सगळेच दरबारी जमले होते. आपल्या नेहमीच्या काळ्या पोशाखात शूर्प देखील आला होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. मृत्यू जसा त्याच्यासाठी एक खेळ असावा.  बरेच दरबारी त्याच्यापासून थोडे लांबच होते. 

मगध वर पसरलेल्या या अज्ञात संकटाला काही तरी तोड असेल. या विचाराने महाराज सुर्यसेन महालात परतले. आपल्या मंदिरात त्यांनी आज दिवा लावला नाही. राज्यात शुराची कमी नव्हती. पण शत्रू शरीरात होता, आणि एक एक भाग पोखरत होता. महाराज सुर्यसेन नी स्वतः याचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यांनी द्वारपालास बोलावले. 

" नर्मदेच्या तिरा वरून भद्रास बोलावणे पाठवा. त्यास म्हणावं, असशील तसा मगध कडे निघ."

साधारण २४-२५ वर्षाचा भद्रा , मगध च्या त्या घरापैकी होता, जे राजाचे अंगरक्षक होते. त्याचे पिता सुर्यसेनचे प्राण वाचवताना एका युद्धात धारातीर्थी पडले होते. मगध शांत होते, म्हणून भद्रा नर्मदेच्या तीरावर जाऊन तिथे धर्म सेवा करीत असे. सकाळी लाकडं फोडताना त्याला एक सेवक येताना दिसला, आणि त्याला समजले की मगध संकटात आहे. 

नगरीत आल्यावत महाराज सुर्यसेनानी भद्रास सगळे सांगितले. 

" महाराज , आपण निश्चित असा. संकट कितीही गहिरे आणि घातक असले, तरी निश्चयापुढे त्याला गतप्राण व्हावे लागेल. " महाराजांना प्रणाम करून भद्रा निघून गेला. 


चार दिवसानंतर शुर्पा आपल्या बेगडी रूपात बाजारात आली. तिला ओळ्खणार्यांनी आपल्या दुकानांच्या कानाती ओढल्या. एक दृष्टी तिच्यावर पळत ठेऊन होती. पण तिला हे कळले नाही. ती चालताना रस्त्यावर तिच्या पाऊल खुणा उमटत नव्हत्या. मुख्य बाजारातून ती स्मशानकडे जाऊ लागली. तिच्या मागावर असलेली पाऊले , काही अंतरावर चालत होती. त्यांच्या कामरेभावती नुकत्याच भट्टीतुन निघालेल्या तळपत्या तलवारी होत्या. भद्रा आपल्या घरात ध्यान लावून बसला होता. त्यास गूढ सिद्धी प्राप्त होती. एक आवाज त्याच्या कानी आला. 

" हिला मारणे इतके सोप्पे नाही. हिला कळायला नको, आणि दिसायला नको, की वार कोणी केलाय. जर हिला कळले तर, ती मारणार नाही. हिच्या बेगडी रूपातच हिला मारणे शक्य आहे. कारण खऱ्या रूपात ही एक वहशी दानव आहे. हे रूप तिचे उसने घेतले आहे. " गुरुस वंदन करून भद्राने आपल्या पेटीतून आपली तलवार बाहेर काढली. काशी विश्वेश्वराच्या सावलीत वाईट शक्तीशी लढा देण्यात आयुष्य घालवलेल्या तपस्वी साधूंनी घडवलेली तलवार होती ती. त्रिशूलाच्या लोहाचे अंश त्यात होते. ती तलवार मस्तकास लावून, कुलदेवतेचे स्मरण करून भद्राने आपले वस्त्र चढवले आणि तलवार कमरेस लावली. 


स्मशानात पोहोचल्यावर तिने नदीत स्नान केले. अनेक निरपराध तरुण मुलींचा बळी घेऊन प्राप्त केलेली तिची बेगडी चर्या नदीच्या पाण्याने तेजोमय नव्हती होत. याची तिला खंत वाटे. कित्येक वर्षे ती अशीच 'जिवंत' होती. स्नान करून ती तिच्या ठरलेल्या जागी येऊन बसली. तिच्या पाळतीवर असलेला भद्राचा धारकरी अत्यंत सावधपणे तिच्या हालचाली टिपत होता. 

बसल्यावर तिने ध्यान लावले. एक कावळा तिच्याजवळ येऊन घुटमळू लागला. हळू-हळू दोन, चार, दहा असे अनेक कावळे पिंडा भवती गोळा व्हावेत, तसे तिच्या भवती जमले. 

" तुमच्या साठी एक आदेश आहे. मगध च्या घरा-घरावर जाऊन बसा. घराघरात अपशकूनाचे बीज रुजले पाहिजे. नगरीत हाहाकार झाला पाहिजे. यांना कळू देत, भीती काय असते, आणि तिची सुरवात कशी होते ! " 

तो शिपाई सगळे बघत होता. अंतर खूप होते. तिला कळले नसेल का ? अशीच हिची मान उडवावी का ? नाही, राजाज्ञा तशी नाही. पुरावे हवेत. आणि हिला मारले, म्हणजे शूर्प जागा होईल. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपल्या सारख्या सामान्य माणसाकडून ही मारेल का ? तो शिपाई तसाच दबा धरून बसला. ती पुन्हा ध्यानस्थ झाली. तिच्या आजूबाजूला एक काळी सावली फेर धरू लागली. 

" शुर्पा, तुझे इस्पित आता जास्त लांब नाही. पण सावध रहा, तुझ्या या वाईट शक्तीला आव्हान देता येऊ शकते. " ती सावली तिला सांगू लागली. 

" माझ्या शक्तीस आव्हान देता येईल, पण मला हरवू शकणारे कोणीच नाही. " आणि ती जोरजोरात हसू लागली. 

" तुला मृत्यूचे भय नाहीये, पण तूझा विनाश शक्य आहे. तुझी काया, सामर्थ्य हे संजीवन नाहीये. " एवढे बोलून ती सावली नाहीशी झाली. 


" हा तिचा रोजचा दिनक्रम आहे. कदाचित वाहत्या पाण्यात स्नान नाही केले, तर तिची काया मलूल होत असावी. " त्या शिपायानि घडलेले सगळे महाराज आणि भद्रास सांगितले. 

" असू शकते.महाराज, तिला संपवणे शक्य आहे. ती संपली की शूर्प सुद्धा क्षीण होईल. त्यास माया आणि शक्ती मिळणार नाही. " 

" भद्रा, मला कळत नाहीये, की ही विनाशाची सुरवात आहे, की शेवट. पण हे थांबले पाहिजे. नाहीतर पूर्ण राज्य नाश पावेल. लहान मुले, स्त्रिया, माणसं सगळे दानव होतील. !" 

महाराज निघून गेले.


बरोबर तिसऱ्या दिवशी. अचानक नगरात बरेचशे कावळे वाढू लागले. घरा घरावर कावळे अत्यंत गूढ रित्या बसून विक्षिप्त आवाज काढू लागले. कोलाहल वाढू लागला. लहान मुले, स्त्रिया घाबरू लागल्या. माणसं काठ्या लाठ्या घेऊन कावळे हकलू लागले. पण याची कल्पना आधीच महाराजाना आणि भद्राला होती. काही घोडे आणि एक टांगा नगरीच्या मुख्य रस्त्यावर निघाले. हजारो धूप , उदबत्त्या यांचा धूर फिरू लागला. त्या टांग्याचा वेग खूप होता. एक एक कावळा गुदमरून पडू लागला. अगणांमध्ये कावळ्यांची प्रेते पडू लागली. प्रत्येक कावळ्याचे डोळे लाल होते. पूर्ण नगरी ठिकठिकाणी धूप आणि धुराने धुवून निघत होती. 

शुर्पाच्या मागावर असलेले भद्रा आणि त्याचे पाच साथीदार अत्यंत सावध रीत्या पावले टाकत होते. तिच्या रोजच्या प्रकट होण्याच्या जागेवर ताळपलेल्या तलवारी तेवत होत्या. महाराज आपल्या महालातील मंदिरात परिवारासह यज्ञात बसले होते. लाल जर्द लढाऊ पोशाखात भद्रा आणि त्याची सेना साऱ्या नगरीत पसरली होती.प्रधान शूर्पच्या मागावर देखील एक तुकडी होती. 

सूर्य मावळत्या कलेस झुकला आणि शुर्पा प्रकट झाली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. कदाचित पहिल्यांदा तिला कोणीतरी कडवे आव्हान दिले असावे. तिचे तांबडे केस वाऱ्यावर भेसूरपणे उडत होते. तिची काया सुद्धा लालसर झाली होती. दारोदारी मरून पडलेले कावळे, तिच्या फसलेल्या डावाची साक्ष देत होते. 

" ही पाखरं म्हणजे माझ्या कपटाचा अंश होते." ती जोरजोरात ओरडू लागली. " प्रत्येक घरावर मी छळ, कपट, मत्सर, वासना, घृणा बसवून ठेवणार होते. प्रत्येक घरात माझा एक दास तयार झाला असता, आणि त्याने वंश चे वंश खाल्ले असते." लोक बंद दारातून सगळं ऐकत होते. 

" अधर्माचे माझे बस्तान या नगरीने उधळून लावले." संतापाच्या भरात तिने वाटेवर येईल ते हवेत उडवायला सुरवात केली. रस्त्यावर असलेल्या कनाती, दुकानाचे सामान सगळं हवेत उडू लागले. ती रस्त्याने चालत होती. भद्राची सेना तिच्या मागावर होती. घरांच्या कौलावरून, गल्ल्यांच्या आडून दबा धरून बसलेले सैनिक शुर्पाचा हा भयंकर खेळ बघत होते. आधीच सांगितल्या प्रमाणे नगरीच्या लोकांनी घरे बंद करून ठेवली होती. संहार करण्यास शुर्पाला कोणी मानव सापडले नव्हते आणि त्यामुळे ती जास्त चेकळली. 


एका चौकात शूर्प या सैन्याच्या ताब्यात सापडला. मानेवर तलवार लागली. त्याच्या गळ्यात असलेला मायावी कंठा भद्राच्या सांगण्यावरून हिसकावून काढण्यात आला. 

" तू पराधीन आहेस." अचानक समोर भद्रास पाहून शूर्प चपापला. " या मायावी कंठयात तुझी सगळी दुष्ट शक्ती सामावली आहे ना ? " त्याला हिसकावलेला कंठा दाखवत भद्रा म्हणाला. 

" हे तुला कसे कळले?" त्यालाही आश्चार्य वाटले. 

" शूर्प, नीट विचार कर, रोज संध्याकाळी या कंठयाचे तेज कमी होते, आणि म्हणून तुला सूर्यास्त झाल्यावर बाहेर निघता येत नाही. आणि आता तर तू निःशस्त्र झाला आहेस." 

" याची किंमत तुला मोजावी लागेल भद्रा, साऱ्या राज्याला मोजावी लागेल." 

" नाही, तुझ्या दुष्ट ध्येयाची सगळी गाथा आम्हास ठाऊक आहे. तू अधर्माचे, तर मी धर्माचे पालन करतो." शुर्पाला साखळ-दंडात बांधून मुख्य चौकात आणले गेले. त्याला तसेच बांधून घालत, भद्रा त्याच्या बहिणीस शोधायला गेला. 


शुर्पा वेड्यासारखी नगरभर हिंडत होती. तिची काया अत्यंत भयभीत झाली होती. 

" माझा अंत होणार नाही. तेवढी शक्ती नाही मानवात." 

भद्राच्या भत्यातून सुवर्ण टोक असलेला एक विशिष्ट बाण बाहेर आला. त्याने आपल्या गुरुचे ध्यान केले. शुर्पा आणि तिच्या भावाची सगळी कुंडली आणि त्यांना संपवण्याचे तंत्र त्याला गुरूने आधीच सांगून ठेवले होते. त्याने बाण प्रत्यांचीत केला आणि ताण दिला. बरोबर शुर्पाच्या हृदयाचा वेध त्याला घ्यायचा होता. एकच संधी आणि एकच बाण. 

बाण सुटला आणि अक्राळ-विक्राळ पणे सुटलेल्या शुर्पाच्या हृदयात घुसला. ती धाडकन जमिनीवर कोसळली. 

" माझा अंत नाही. मी आणि शूर्प परत येऊ. आम्ही परत येऊ. सूर्यसेन, तुझ्या पासून चौथ्या पिढीत जन्मलेल्या राजपुत्राला आम्ही घेऊन जाऊ. आम्ही परत येऊ. " अत्यंत वेगळ्या आवाजात किंचाळत शुर्पा आपल्या मूळ रूपात येऊ लागली. तिची काया गळून पडू लागली. हाताचे , चेहऱ्याचे गौर मास जळू लागले. तिचे केस पांढरे पडू लागले. थोडासा जीव तिच्यात होता. डोळे खोल जाऊ लागले आणि पांढरे पडू लागले. अंगावरचे रश्मी तलम ही भुसभुस करत जळू लागले. तिची ते किळसवाणी अवस्था पाहून भद्रास ही तिची दया आली. तो तिच्या जवळ आला. 

" अधर्माची आयु खूप कमी असते शुर्पा. तु सामान्य माणसासारखे जगणे टाळून दानवी शक्तीच्या आहारी जाऊन सगळ्या जगावर अधिराज्य करू पहात होतीस. पण आम्ही देवाची माणसं आज तुला पराभूत करीत आहोत. " 

" मूर्ख मानवा, हा माझा मृत्यू नाहीये ! फक्त माझ्या एका अध्यायाचा अंत आहे. माझा खरा कहर तर सुर्यसेनाच्या चौथ्या पिढीवर बरसेल. या पेक्षा जास्त पटीने. त्यावेळी तुही नसशील त्याला वाचवायला." असे म्हणून शुर्पाचा अपवित्र आत्मा ते गचाळ शरीर सोडून एका काळ्या सावलीच्या रूपात आकाशात निघून गेले. भद्रास विजय तर मिळाला, पण तो किती काळा साठी होता, हे कळणे अवघड होते. 


शुर्पाचे प्रेत तसेच रस्त्यावर पडून होते. तिला तसेच सोडून भद्रा शूर्प कडे निघाला. जीव सोडताना शुर्पाने दिलेल्या शापाचा विचार करत तो अस्वस्थ होऊ लागला. त्या रिकाम्या रस्त्यावर अजूनही भय अदृश्य रूपात वावरत असल्याचे त्याला जाणवले. पण तूर्तास बला टळली होती. त्याचे लपलेले एक एक शिपाई त्याच्या मागोमाग चालू लागले. तलवारी अजून म्यान नव्हत्या झाल्या. 

प्रधान शुर्पास बांधून ठेवले होते त्या चौकात सगळे आले. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप होता. तो अधू झाला होता. त्याची शक्ती, त्याची बहीण शुर्पा काळाच्या आधीन झाली होती. तो आता त्याच वाटेने जाणार होता. 

" अधर्माचे वारे फार काळ टिकत नाही शूर्प. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये, धर्म आणि देव टाळून अधर्माचे राज्य आणणं." भद्रा त्यास सांगू लागला. आपला कंठा त्याच्या कमरेला बघून तो जास्त चिडला. 

" भद्रा, एवढासा विजय तुझा ! मूर्ख मानवा, जन्म मृत्यू हे आमच्या साठी नाहीये ! तिने सांगितले ते लक्षात असू दे. आम्ही परत येऊ, आणि या पेक्षा जास्त भयानक परिणाम भोगावे लागतील, तुझ्या या राजाला आणि त्याच्या या राज्याला. " 

भद्राने सापकान त्याची मान धडा वेगळी केली. 

महाराज सुर्यसेन आणि सेनापती तिथे आले. काही सैनिकांनी शुर्पाचे प्रेत ही तिथे आणले. एक मोठी चिता त्यांनी रचली. घरातून एक एक 

नगरजन बाहेर येऊ लागले. दोन्ही प्रेत आणि प्रधान शुर्पाचे मस्तक त्या चिते वर ठेवले गेले. शत्रू , कपटी आणि अमानवी जरी असले तरी राजाज्ञे प्रमाणे त्यांना मंत्राअग्नि देण्यात आला. भय धुराच्या रूपाने कायमचे मगध नगरी तुन आकाशात नाहीसे झाले. 


विरसेन आणि वसुंधरा हे सगळं शांत चित्ताने ऐकत होते. तो वृद्ध हे सांगत असताना, समोर घडल्यासारखे सांगत होता. 

" बाबा, ही सगळी कर्म कहाणी तुम्हाला कशी ठाऊक?"

" राजपुरोहित दयानंद च्या घरी आमचे आजोबा चाकरी करत. तारकाने त्यांचा मृत्य प्रत्येक पिढीला कळावा म्हणून माझ्या आजोबांना सांगितला, आणि माझ्या वडिलांनी मला. इतके वर्ष मलाही ते सत्य नव्हते वाटत, पण युवराजांच्या आजारपणाची खबर वाऱ्यासारखी राज्यात पसरली आणि मी इथवर आलो." 

विरसेनाने त्या वृद्धास महालात राहण्याची विनंती केली. 

" यांना अतिथी गृहात न्या, यांच्या तब्येतीची काळजी घ्या." 

संध्याकाळ झाली. महालात दिवे लागले. वृद्धाने सांगितलेली गाथा विरसेनाने महाराज धर्मसेंन आणि महाराणी यशोधरेस सांगितली. चिंतेत अजून भर पडली. 

रात्रीचा पहारा आणि गस्त वाढू लागली. नगरीत कोणीही नवीन , संशयास्पद दिसले की विरसेना समोर त्यास हजर करण्याची आज्ञा झाली. चित्रसेनाच्या महालाभावती ही सैनिक वाढले. 


नगर शांत निजले होते. वेशीवरचे पहारेकरी ही पेंगत होते. एक टांग्याचा आवाज त्यांना येऊ लागला. एकमेकास सचेत करीत ते उठले. काळे घोडे, आणि बंद टांगा जवळ येऊ लागले. एक पहारेकरी पुढे गेला. 

" कोण आहे ? सूर्यास्त झाल्यावर नगरीत प्रवेश बंद झाला आहे. " 

टांग्याला कोणी चालक नव्हता. पहारेकरी थोडा चक्रावला. त्याने दुसऱ्यास हाक मारली. 

" खाली या, नाहीतर आज्ञेनुसार तुम्हाला अटक करावी लागेल."

टांग्याचे दार उघडले. 

"तुम्ही कराल अटक ?" एक भेसूर आवाज आतून आला. पहारेकऱ्याचा काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी तलवारी उपसल्या. पण ते तिथेच थिजले. 

" मूर्ख मानव...! " 

असे म्हणून एक पाय बाहेर आला. आतून एक भयानक आकृती बाहेर आली. त्याचे डोळे माणसाचे नव्हते. पांढरे, आणि आत रक्त उतरल्या सारखे लाल. चेहऱ्यावर वयही अमानवी असल्याचे वण. एक जागी गोठलेले शिपाई त्याच्या रूपाकडे बघून अधिकच भयभीत झाले. सामान्य माणसाच्या उंची पेक्षा फूट दोन फूट मोठी आकृती त्यांच्या समोर उभी होती. त्याने एका पहारेकऱ्याकडे नजर रोखून पाहिले. त्याने तलवार उपसली आणि दुसऱ्याचे मुंडके क्षणात उडवले. पुन्हा नजर त्या आकृतीकडे वळवली. दुसऱ्या क्षणी तोही गतप्राण झाला. टांगा वेशीत शिरला तेव्हा ६ पहारेकरी अत्यंत क्रूर रित्या मरून पडले होते.

टांगा नगरात दाखल झाला, तेव्हाच राजमहालात ठिक-ठिकाणी काही खुणा उमटल्या. एका गोलाकारात एक मानवी आकृती. एक दासी काळ्या शाईने या आकृत्या काढत होती. जशी ती एखाद्याला वाट दाखवते आहे. तीस कोणीही पाहिले नाही. साधारण तिने अश्या ३०-३५ आकृत्या काढल्या. मशाली पाशी, कोनाड्यात, खांबावर, दारावर, देवघर सोडले तर बऱ्याच ठिकाणी या आकृत्या होत्या. महालात आतापर्यंत फक्त एक विवंचना होती. आता एका जीवघेण्या पापाने, एक अमानवी शक्तीने प्रवेश केला होता. नकळत, सहजगत्या झालेला हा प्रवेश कोणाचा बळी घेणार, हे मात्र गूढ होते. 


वसुंधरा आपल्या प्रासादात सकाळी पूजा करीत बसली होती. एक दासी अचानक घाई-घाईने आली. " सरकार, तुम्हाला ताबडतोब यावं लागेल." वसुंधरा तशीच पूजा सोडून निघाली. दासीने तिला महालात ठिकठिकाणी केलेल्या खुणा दाखवल्या. त्या खुणा पाहून बासुंधरेच्या पाचावर धारण बसली. " यवराज कुठायत?" ," आपल्या कक्षात."  वसुंधरा चित्रसेंन च्या कक्षाकडे वळली. सुदैवाने त्या कक्षाच्या रस्त्याला काहीच खुणा नव्हत्या. युवराज झोपलेले पाहून तिला हायसे वाटले. 

"त्या खुणा कसल्या आहेत वसुंधरे? " महाराणी सकाळ पासून अस्वस्थ होत्या. " आपण निर्धास्त असा, त्या खुणा म्हणजे ....!" वसुंधरा एकदम थांबली. " म्हणजे...?" 

वसुंधरेने टाळी वाजवली. " सगळे दास-दासी यांना माझ्या कक्षात बोलवा, आत्ता. " दास निघून गेला. महाराणी, आपण ही चला. काहीतरी दाखवायचं आहे. 

जवळ-जवळ वीस दास-दासी समोर उभे होते. वसुंधरा एक मोठे पात्र घेऊन आली. प्रत्येकाने आपला चेहरा त्यात पहायचा होता. एक एक दास येऊन आपला चेहरा पाहू लागला. एक दासी आली. तिने आपला चेहरा त्यात पहिला. त्या पाण्यात एक अतिशय असुरी चेहरा तिला दिसला. ती जोरात किंचाळली. वसुंधरा, महाराणी आणि एक शिपाई तिच्या कडे धावले. तिला पकडण्यात आले. " हे बघ, यात तुझी चूक नाहीये. आम्हाला फक्त एक सांग, तू कोणाला भेटलीस आणि काय झाले?" वसुंधरेने खूप मायेने तिला प्रश्न केला. "आणि हो, सांगताना कानात सांग." त्या दासीने थोडे आठवून वसुंधरेच्या कानात काहीतरी सांगितले. " ठिकय, जा तुम्ही सगळे. आणि आज पासून राज-परिवाराचे खास दास-दासी महालाच्या बाहेर कोणासही भेटणार नाही." 

"हे सगळं काय आहे वसुंधरा?" महाराणी सगळं काही बघत होत्या. " महाराणी, ती दासी संमोहित झाली होती. कोणीतरी तिच्या कडून हे काम करवून घेतले. त्या खुणा म्हणजे काळ्या विद्येची पहिली पायरी आहेत. एखाद्या अदृश्य नकारात्मक शक्तीस आपल्या सावजापर्यंत वाट दाखवण्यासाठी तयार केलेले एक मायाजाल...एक वाट." हे ऐकून महाराणी जागीच बसल्या. " रंगाऱ्यास बोलावून त्या खुणा पूर्वरत करून घेऊया. त्याची थोडी सुद्धा खूण मागे उरायला नको." 


विरसेनास रात्री पहारेकरी मारले गेल्याची सूचना मिळाली होती. नगरात कडेकोट पहारे आणि चौक्या लागल्या. दोन-तीन दिवस काहीच हालचाल नगरात आणि महालात झाली नाही. यज्ञकुंड शांत होत नव्हते. मंत्रघोष अखंड होत होते. युवराजांची नाडी आणि श्वास सुरू होते. पण ते निपचित पडून होते.


 नगरच्या एका कोपऱ्यात एक विहीर होती. एक कुंभार पाणी भरण्यास त्या विहिरीवर आला. त्याने राहट खाली सोडले. बादली वर आली. पाहिले तर पूर्ण पाणी काळे. बादली खराब असेल म्हणून त्याने माती आणि पाण्याने ती धुतली आणि पुन्हा सोडली. पुन्हा बादलीत काळेच पाणी आले. असे तीन-चारदा झाले. बादली तशीच ठेऊन तो कोणाला तरी बोलवायला गेला. 

"बंधू, जरा येता का ? नगराच्या विहिरीत काहीतरी दोष वाटतोय. " तो इसम आणि कुंभार विहिरीवर आले. बादलीत इतके काळे पाणी त्याने कधीच नव्हते पाहिले. " बंधू, हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय." असे म्हणून दोघे विहिरीत वाकून पाहू लागले. पूर्ण विहिरीचे पाणी काळे झाले होते. कठड्याला लागून, आत असलेली झाडे-वेली सुकून मेली होती. जिवंतपणाची एकही खूण विहिरीत उरली नव्हती. हा प्रकार पाहून दोघे घाबरले. हा हा म्हणता नगरातल्या त्या भागात ही बाब वाऱ्यासारखी पसरली. ज्यांनी कोणी पाणी भरले होते, त्यांनी आपली भांडी आणि माठ तपासले. ते स्वच्छ होते. बरेच लोक , त्या भागातले सैनिक विहिरीपाशी जमा झाले. 

" हा अघोर आहे, महाराजांना सांगितले पाहिजे." एक जण म्हणाला. 

" विहिरीवर काळी छाया पसरली आहे. जीव सृष्टी नष्ट झाली आहे. " अश्या अनेक वावड्या उठल्या." नगरात या आधी हा प्रकार कधीच घडला नव्हता. काल रात्री पहारेकर्यांना मारून नगरीत दाखल झालेल्या त्या अमानवी सावली ने नगरात भयाचा पहिला अध्याय लिहिला होता. 

नगरात बातमी पसरली. लहान थोर विहिरी जवळ येऊन शहानिशा करू लागले. विहीर काळी पडली होती. महालात देखील हा वणवा पसरला. वसुंधरेने पटकन घड्यावर मांड टाकली , कमरेला एक कट्यार गुंडाळली आणि निघाली. मनात असलेली शंका आता जोर धरू लागली होती. तिने विहिरीत वाकून पाहिलं. नगर वासी भयभीत झाले होते. वसुंधरा दोन पावलं मागे सरकली , काहीतरी विचार करून पुन्हा घोड्यावर बसली आणि आपल्या महाली परत आली. 

" महाराज, नगरात एक वाईट प्रवृत्तीने प्रवेश केलाय." वसुंधरा महाराजांना भेटून बोलली. " ती कुठून आली, कोणी तयार केली याचा काहीच कानोसा नाहीये आपल्याला." 

" विहीर बंद करण्यात आली आहे." महाराज खिन्न होऊन म्हणाले. "नगरवासीयांना ही सावध करण्यात आले आहे." 

काहीही न बोलता वसुंधरा तिथून निघून गेली. महाल अजूनही सुरक्षित होता. दुसऱ्या दिवशी वसुंधरा पहाटेच घोडा आणि काही हत्यारं घेऊन महालातून निघाली. वसुंधरा महालात नाही , याने राजपरिवारही चिंतेत होता. कोणालाही काहीच माहीत नव्हते. 

नगर शांत झाले. मशाली पेटल्या. रस्ते हळू-हळू निर्मनुष्य होत गेले. प्रत्येक घरात नगरातल्या भया बद्दल चर्चा होत होत्या. लोक अंधार झाल्यावर सहसा बाहेर येत नव्हते. लहान मुलांची दृष्ट न विसरता आया काढत होत्या. घरातील देवच रक्षणकर्ता होता. 

वसुंधरा अर्ध्या रात्री नगरात आली. तिच्या पाठीवर एक ओझे होते. पहारेकाऱ्यांना कोणास ही न सांगण्याची तंबी देऊन ती तडक विहिरीकडे गेली. ओझे खाली उतरवुन तिने त्यातून एक धारदार कट्यार काढली. जामिनावर मातीत एक चक्र काढले. त्यात एक काचेचे भांडे आणि त्यात पाणी टाकले. उठून तिने विहिरीच्या काठड्याची माती आणून भांड्यातील पाण्यात टाकली. ते पाणी सुद्धा विहिरीच्या पाण्यासारखे काळे झाले. आपल्या ओझ्यातून एक दुसरी पाण्याची बाटली काढून तिने त्यातील पाणी जमिनीवरच्या पाण्यात ओतले. हात जोडून तिने ध्यान धरले. भाड्यातले पाणी हळू-हळू शुद्ध होत गेले. काही वेळाने पूर्ण शुद्ध झाले. वसुंधरेने ते भांडे तसेच विहिरीत मोकळे केले. विहिरीतून एक काळी सावली आवाज करीत बाहेर येऊ लागली. पूर्ण पाण्यात खळबळ माजली. पाणी उकळ्यासारखे वाटू लागले. ती काळी सावली विहिरीच्या तटाशी आली. 

"किती वाचवशील तू, माझ्या शक्तीचे माप तुला माहीत नाहीये."

"तुझा जन्मच मुळात काळ्या विषा पासून झालाय. तू कितीही प्रयत्न केलेस, तरी इथे तुझे काहीच चालणार नाही. तुझी इच्छा तेव्हाही अपूर्ण होती, आणि आताही ती पूर्ण नाही होणार." वसुंधरेने त्याला बजावले. 

" वसुंधरे, त्याला खूप काळ लोटलाय. तुला काय वाटलं, हे सगळं सोप्प आहे. तुला माहीत सुद्धा नाहीये, की मी कोण, कुठून आलोय ! वसुंधरे, तुझ्या डोळ्यादेखत , या नगरातील लोक एकमेकाचा जीव घेतील. मना मनात अराजकता , वैर वाढेल. आणि तू आणि तुझा राजा, काहीच नाही करू शकणार." असुरी हास्य करीत ती काळी सावली रस्त्यावरून निघून गेली. वसुंधरेने वाकून पाहिले. विहिरीचे पाणी पुन्हा पूर्वरत झाले होते. समाधान व्यक्त करीत तिने सगळे आवरले आणि महालाकडे निघाली. 

युवराजांच्या आजारपणात थोडासा सुधार दिसला. अंग गार झाले होते. ही एक चांगली गोष्ट होती. महालाच्या भवती वसुंधरेने 'खडग कवच' लावले होते. त्यामुळे महाल सुरक्षित राहिला. पण या विषयी कोणास काहीच माहिती नव्हती. महाराज, महाराणी आणि विरसेनास ही नाही. 

इतके दिवस मलूल पडलेल्या महालात थोडासा आनंदाचा झरा दिसू लागला. 

अनंत सकाळी आपल्या घरी महालात जाण्यास तयार होत होता. बाहेर एकच हाहाकार माजला. काय झालं हे बघण्यास तो बाहेर आला. समोरचे दृश्य बघून तो हादरला. एक शिपाई सोट्याने एका इसमास मारत होता. काही लोक त्याला अडवायला पुढे जात होते. पण काही केल्या तो शिपाई थांबत नव्हता. अनंत समोर गेला, त्याने त्या शिपायास धरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या कडून तो हल्ला देखील नाही. उलट त्यानेच वाघाचे बळ असलेल्या अनंतला लीलया उचलून बाजूला फेकले. क्षणभर अनंतास कळलेच नाही, की हे झाले कसे. त्या इसमास मारून मारून शिपायाने रक्त बंबाळ करून सोडले. अनंत पुन्हा त्या शिपायास धरून अडवू लागला. शिपायाने त्याचा गळा धरला. त्यास पायाच्या जोरावर फरफटत काही अंतरावर नेले. 

" मूर्खां, कळत कसे नाही तुला ! तू क्षुद्र मानव आहेस. माझ्यासमोर एका वाळक्या पानाची देखील लायकी नाहीये तुझी." अनंत ने त्या शिपायाकडे पाहिले. त्याचे डोळे पांढरे झाले होते. आणि आवाज देखील सामान्य नव्हता. त्याच्या शरीराचा ताबा कोण दुसऱ्यास मिळाला होता. अनंत एकदम सावध झाला. उठून आपल्या घराकडे पळत सुटला. त्या इसमाच्या अंगात अगदी थोडा जीव राहिला होता. शिपायाने त्याचे हात जमिनीवर पायाने दाबून ठेवले होते. त्यावर त्याने तलवार उगारली. अनंत वाऱ्याच्या वेगाने आला आणि आपल्या तलवारीने त्याने शिपायाने उगरलेला हात धडावेगळा केला. मागे वळून दुसऱ्या हाताने तो अनंतास पकडणार , तेवढ्यात त्याचे धडही शरीरावेगळे झाले. तडफडणारे धड जमिनीवर कोसळले. त्या इसमास अनंत आणि जनांनी उचलले आणि बाजूला नेले. अजूनही त्या शिपायाचे डोळे पांढरे होते. त्याचा टोप काढून अनंताने त्याचे शीर हातात घेतले. तिथे धावत आलेल्या शिपायांनी धडावर तेल टाकून ते पेटवून दिले. अनंत शीर घेऊन राजवड्याकडे निघाला. 

ते शीर दरबारात मध्यभागी ठेवले. दरबारी, दास-दासी, विरसेन आणि महाराज देखील आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. कोणास काहीचं कळत नव्हते. 

"महाराज, ही एखाद्या वाईट संकटाची चाहूल असू शकते." अजूनही महाराजांनी 'त्या' शापाबद्दल कोणास काही सांगितले नव्हते. नगरात भीती पसरली तर कधीही न भरून निघणारे नुकसान होईल, याची जाणीव त्यांना होती. 

" नगर वासीयांना घाबरण्याचे कारण नाही. हे आम्ही मान्य करतो, की काही काळा पासून नगरात अश्या घटना घडल्या आहेत, ज्याने भय वाटू लागले आहे. पण याचा बंदोबस्त होईल. सूर्यास्तानंतर फक्त सैनिक बाहेर फिरतील." राजाज्ञा देऊन महाराज निघून गेले. ते शीर अग्निस दिले गेले. 

नगराची व्यवस्था गढूळ होत चालली होती. गेले दोन दिवस पुटकळ भांडणे, व्यवहारात खोट, मारामाऱ्या, भांडणे , वाढली होती. नगरपाल, न्यायव्यवस्था चिंतीत झाले. या आधी नगरात असा प्रकार नव्हता झाला. नगरातील जनांवर एकप्रकारची गूढ बुद्धी राज्य करीत असल्याचे जाणवले.

" विरसेन, याची दखल आपण आधीच घ्यायला हवी होती. हे जर वाढले, तर उद्या नगरातील सुख शांती उद्धवस्त होईल." महाराजही याने हवालदिल होत होते. " महाराज, हे सगळे कसे घडते आहे, हेच मुळात समजत नाहीये. लोकांमधले सामंजस्य लोप पावत चालले आहे. आणि प्रत्येक वादात सैन्यबळ वापरणे हे आम्हास योग्य वाटत नाही." 

विरसेन म्हणाला. 

"महाराज, जे काही घडते आहे, ते नियोजित आहे." महाराणींना सोबत घेऊन वसुंधरा दाखल झाली. 

"महाराज,ही नगराची कुंडली." एक मोठ्या मेजावर तिने एक मोठी कुंडली मांडली.  "नगराची ग्रह अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. कुठेही वक्र नाहीये. जे काही चालले आहे, ते कोणीतरी बाहेरची व्यक्ती करते आहे. आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांची मती संमोहित करून त्यांना आपल्या मतीप्रमाणे वागवून तसेच वर्तन करायला भाग पडतोय. याला आताच बांध घालणे गरजेचे आहे. अन्यथा, पूर्ण नगर दूषित होईल. 

चित्रसेंन अजूनही झोपेत होता. आज ८-१० दिवस झाले होते. पोटात अन्न नव्हते. फक्त काढे, मात्रा यांचाच आधार होता. दिलासा फक्त एवढाच होता, की अरिष्ट टळले होते. पण तेच अरिष्ट आता नगरातील लोकांच्या मतीवर बेतले होते. 


आज सकाळ पासून वातावरण दूषित होते. आकाशात काळे ढग गर्दी करीत होते. हा पावसाळा नव्हता. हवेतील शीतलता कमी झाली होती. महाराणी आपल्या सज्जेत उभ्या राहून महालाच्या बागेकडे बघत होत्या. महाराज आल्याची वर्दी झाली. महाराणी तश्याच उभ्या राहिल्या. 

" महाराणी!" महाराज मागे येऊन उभे राहिले. "मला कळते आहे की आपली स्थिती चांगली नाहीये. चिंतेचे कारण ही रास्त आहे. आपण सगळेच यातून मार्ग काढण्यासाठी धडपडतो आहोत. पण असे हवालदिल नका होऊ." 

"महाराज, संकट दिसले असते, तर त्यावर उपाय झाला असता. रोज नवीन काहीतरी कानावर येते." वळून महाराणी चित्रसेनाकडे आल्या. त्याच्या कपाळावर हात ठेवून रडू लागल्या. " यशोधरा, अशी खचून जाऊ नकोस. एकेकाळी याच नगराने असेच संकट पेलले आहे. त्यावेळी आपण नव्हतो. पण त्यावेळी दाखवलेला धीर आज आपल्याला ठेवावा लागेल." दास वसुंधरेची वर्दी घेऊन आला. तिने हातात एक जलपात्र धरून ठेवले होते. ती सगळीकडे ते शिंपडत होती. 

" महाराणी, आज अमावस्या आहे. आज आपल्याला सगळ्यांना अधिक सचेत राहणे गरजेचे आहे." दोघेही सावध झाले." नगरात अधिक सैन्य पाठवले आहे. अजून काही..." "महाराज, हे साधे जल नाही. या जलात महालात येणाऱ्या दुष्ट शक्तीचे पाय उमटतील. दृश्य, अदृश्य सगळ्याच." 

" पण आता तर युवराज बरे आहेत वसुंधरे !" महाराणी एकदम काळजीत पडल्या. 

" नाही...!" दोघेही तिच्याकडे पाहू लागले. तिने मूर्च्छित चित्रसेनास पालथे झोपवले. त्यांचे वस्त्र काढले. आपल्या जलपत्रातले पाणी तिने हातात घेऊन युवराजांच्या पाठीला लावले. 

अनेक दिवस मूर्च्छित असलेले चित्रसेंन एकदम अंगावर अंगार पडल्या सारखे ओरडले. महाराज, महाराणी कोणीतरी उचलून फेकल्यासारखे पलंगावरून फेकले गेले. युवराजांच्या पाठीवर लाल वण उमटले. त्यांचे डोळे पूर्ण पांढरे झाले. हात-पाय थरथरू लागले. " काय केलेस हे?" त्यांच्या आवाजात एक भेसूर आवाज मिसळला. "कैदशीण कुठली!" ते झोपल्या झोपल्या गुरगुरु लागले. वसुंधरेने त्यांच्या अंगावर पांघरूण घातले. त्यांचे डोळे बंद झाले. महाराज आणि महाराणी पूर्ण भेदरले होते. काय प्रकार झाला, तो त्यांना कळला पण नाही. युवराजांना वसुंधरेने सरळ केले. 

"महाराज, इतके दिवस मूर्च्छित असलेले युवराज स्वतः मध्येच एक दुष्ट शक्ती घेऊन निजले आहेत. वनातून ती आली आहे. ज्या दिवशी शूर्प आणि शुर्पाचा अंत झाला. त्याच दिवशी युवराज जन्माला आले." एवढे बोलून वसुंधरा महाराणी कडे आली. " युवराजांच्या आत मध्ये असलेली शक्ती खूप घातक आणि जहरी आहे. तीस बाहेर काढणे तूर्तास अशक्य आहे. हे त्यांच्या जीवावर बेतू शकते." 

महाराणींची वाचाच गेली. 

" हे काय बोलते आहेस वसुंधरा?" 

" होय महाराज, शापाप्रमाणे युवराज चौथ्या पिढीतले आहेत. युवराजांच्या मतीवर आणि त्यांच्या शरीरावर त्यांचा नाही, त्या शापाचा ताबा आहे."

" याचा उपाय ? वसुंधरे, चित्रसेंन या राज्याचे भविष्य आहेत. त्यांना काही झाले तर...!" त्यांची नजर महाराणींकडे वळली. "महाराज, हा शाप शुर्पाने तिच्यातल्या सगळ्या वेदना, निचता, वैमनस्य आणि शक्तीनिशी दिला होता. तो फळास येतोय. पण या शापास मूर्त स्वरूप देणारा कोणीतरी आसपास आहे. त्याला शोधणे गरजेचे आहे. तो नगरात आहे." 

हे सगळे ऐकून महाराज थक्क झाले. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनाही रडू कोसळले. ८-१० वर्षाचा चित्रसेंन, स्वतः मध्ये एक अमानवी पाश घेऊन निजला होता. मगध मध्ये कोणीतरी दुष्ट दाखल झाला होता. आणि त्याचा इलाज कोणाकडेच नव्हता. 

"महाराज, आपण तरी धीर धरावा. एका पित्याची वेदना मला ज्ञात आहे, पण आपण प्रजापालक आहात. आज अमावस्या, आज नगरातील तो नराधम नक्की त्या शक्तीस आव्हान करेल. कारण अमावस्या ही एकच रात्र असते, जेव्हा त्यांना आदेश मिळतो. मी रात्री स्वतः नगरात जाईन, आपण मात्र एक गोष्ट करावी. यवराजांच्या जवळ कोणीच जाता कामा नये. ओळखीचे किंवा अनोळखी, फक्त रक्ताची नाती सोबत असावीत." तिने आपल्या कामरेतून एक धागा बाहेर काढला. त्याचे तिने तीन भाग केले. महाराज आणि महाराणींना त्याचा एक भाग बांधला आणि उरलेला धागा तिने चित्रसेंनच्या पायाला बांधला. "हा धागा तुमची आणि चित्रसेंनची रक्ताची नाळ तुटू देणार नाही. पण फक्त याच कक्षात. जो कोणी या कक्षाच्या बाहेर जाईल, त्याची नाळ प्रभावा बाहेर जाईन." वसुंधरा जाऊ लागली. महाराणींने तिचा हात धरला. तिने महाराणींना मिठी मारली आणी दोघी रडू लागल्या. "महाराणी, विश्वास ठेवा, अंगात शेवटचा श्वास असेपर्यंत मी युवराजांना काहीही होऊ देणार नाही." एवढे आश्वासन देऊन वसुंधरा निघून गेली. 

तिच्या कक्षात जाऊन तिने स्नान केले. पूर्ण पांढरे कपडे घालून वरती चिलखत चढवले. कमरेस तलवार आणि पाठीवर भाता लावला. गुरूचे आणि देवाचे स्मरण करून, आपले ओझे घेऊन ती घोड्यावर बसली. वाऱ्याच्या वेगाने घोडा नगरी कडे निघाला. 

आज अमावस्या. मशाली आपल्या परीने उजेड पाडत होत्या. दोन मशालींच्या अंतरात अंधार जागा पाहून पाय पसरत होता. एखादी अंधारलेली बोळ उगाच घाबरवत होती. झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत, आणि मशाली त्यांचे ते हावभाव जिवंत करीत त्यांना त्या उजाड रस्त्यांवर नाचवत. कोणी-कोणी बाहेर नव्हतं. कुत्री सुद्धा , एखाद्या भयाचा सुगावा लागल्या सारखा कोपरा धरून बसली होती. आकाशात चंद्र नसल्याने आज सवल्याही नव्हत्या. नगरीचे प्रत्येक घर आतमधून बंद होते. लहान मुले तर निवांत निजली होती. पण मोठी माणसे, बायका, वृद्ध यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. एक आजण भीती त्यांच्या आजूबाजूला वावरत होती. विरसेन चे सैन्य नगरीत जागो-जागी भाले, तलवारी घेऊन तैनात होते. पण शत्रू न दिसत होता, न त्याच्या शक्तीचा अंदाज होता. वाऱ्याने पाने हलवली, की त्यांच्या नजरा त्या दिशेला भिरभिरत. कुठेतरी खट्ट आवाज झाला, की त्यांचे हात भाल्यावर घट्ट बसत. 

नगराच्या रस्त्यांवर शांतता ,भयाचा सावटाखाली वावरत होती. लहान मुलं निवांत निजली होती. पण बरीच मोठी माणसं, बाया, वृद्ध गादीवर पडून होती. सारखी नजर आपल्या परिवारावर जात होती. प्रत्येकाने आपल्या घरात पुरेसा आणि रात्रभर पुरणारा उजेड करून ठेवला होता. भय वाऱ्यासोबत नगरात मोकाट फिरतेय, असा ग्रह प्रत्येकाचा झाला होता. 

अश्यात वसुंधरा बाहेर निघाली होती. राजनीती, युद्धनीती, धर्म नीती, गूढ विद्या यात निपुण असलेली स्त्री. आपला शत्रू तो शाप आहे, जो शेकडो वर्ष जिवंत राहिला. आपला शत्रू तो यवराजांच्या आत वसलेला क्रूर आणि अज्ञात डाग आहे, जो केव्हाही त्यांच्यावर हावी होऊ शकतो. आपला शत्रू अमानवी आहे. मायावी आणि कपटी आहे. आपला शत्रू मागधीस दास बनवू इच्छितो. अधर्म, क्रूरता, वासना, अत्याचार, रक्तपात याने नगरीचे रस्ते माखवुन , अधर्माचे ,अमनावाचे राज्य आणू इच्छितो. तिची भेदक नजर अत्यंत सावधपणे , लहानसहान गोष्टींचा वेध घेत चहू बाजूंनी फिरत होती. कारण ती जे शोधत होती, ते अदृश्य होते. तिचे ज्ञान, विरसेनची सेना आणि अनंताचे शौर्य , हे नगरीत आज पहारा देत होतं. 

काहीच हालचाल नव्हती. वसुंधरेचा घोडा एका मोकळ्या जागी येऊन थांबला. त्या जागी हवा थोडी स्थिर होती. वारा झाडांवर जाऊन , उनाड रस्त्यावर पसरलेली शांतता बघत असावा. त्या जागी काहीतरी वेगळे होते. वसुंधरेने आजूबाजूस पाहिलं. एकही सजीव नव्हता. शिपाई मागेच राहिले होते. 

अचानक एक, दोन, तीन, असे काही कावळे आले, आणि त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तलवार बाहेर निघाली. सप-सप करत सगळे कावळे रस्त्यावर मरून पडले. ती सावध झाली. तिने नजर फिरवली. आजूबाजूची झाडे, घरं, इमले, रस्ता काहीतरी संकेत देत होते. ती उभी होती, तिथे दोनच सजीव होते. एक ती आणि एक तिचा घोडा. एक धागा बाहेर आला. तिने तो घोड्याच्या माने ला गुंडाळून, दुसऱ्या टोकाने स्वतःला सुरक्षित केले. " घाबरू नकोस, त्याच्यात इतकी शक्ती नाहीये, की आपला प्राण घेईल. असती तर समोर आला असता." 

अचानक एक क्रूर हास्य उदयास आले. 

" मूर्ख आहेस तू. तुला काय वाटले, तु शूर आहेस ,आणि शस्त्र आहेत म्हणून तू नगरात या भयानक रात्री अशी फिरते आहेस ?" वसुंधरा अधिक सावध झाली. आवाज चहू बाजूनी येत होता. वेध कोणाचा घ्यावा ? अचानक घोडा डोलू लागला. गोल गोल फिरू लागला. कोणतरी त्यावरून उचलून फेकावे, अशी वसुंधरा उसळली आणि जमिनीवर कोसळली. त्यात तिची तळवारही बाजूला पडली. 

"नीट बघ, फक्त तू आणि हा घोडा श्वास घेतायत. बाकी सगळं माझ्या ताब्यात आहे." त्याने वसुंधरेस उचलले आणि हवेत तरंगत ठेवले. भितीचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. पण तिला जखमा मात्र झाल्या होत्या. ती पुन्हा जमिनीवर पडली. या वेळेस तोंडावर पडली. वाऱ्याची एक भोवरी गरगर फिरत त्यांच्या भवती घोंगवू लागली. घोडा तसाच उभा होता. धुळीने माखलेली घोड्याच्या समोर आली. तो पिसाळला. धुळीचे कण त्याच्या डोळ्यात जाऊ लागले. कशीबशी वसुंधरा उठली. कामरेभावती असलेली थैली तिने काढली आणि त्यातून मुठीत हळद घेतली आणि फुंकली. हळद पसरत गेली. घोड्याला स्पर्श झाल्यावर तो स्थिर झाला. आणि एक काळी सावली समोर आली. 

"दुर्बल मी नाही, तू आहेस!" वसुंधरा ओरडली. त्या रात्री पहारेकर्यांना मारून नगरात आलेला तो , समोर दिसू लागला. लाल भडक डोळे, चेहऱ्याची कातडी जळलेली. हातही पिशाच्चासारखे काळे आणि मोठी नखे. नरपशु समान त्याचा अवतार. अहंकार , घृणास्पद जहरी नजर. उंची वसुंधरेपेक्षा बरीच जास्त. पाय एकाद्या पशु सारखेच. अंगभर सूज. हळदीने त्याला प्रकट केले. 

"कोण आहेस तू?" तिने आता आपली तळवारही ताब्यात घेतली. तो राक्षसी हसू लागला.  त्याने हात समोर धारताच वसुंधरेच्या गळ्याभवती एक पाश आवळला गेला. ती हवेत हातभार उचलली गेली. तिचे केस मोकळे झाले. तिने तलवारीची मूठ घट्ट केली. ती तडफडत होती. पाश अधिक घट्ट होत गेला. तिच्या चेहऱ्यावर वार होऊन त्यातून रक्त वाहू लागले. डोळे पांढरे होऊन तिला दिसेनासे झाले. तश्यात तिने स्वतःच्या गळ्या भवती आपला हात धरला. तिच्या हाताला काहीतरी लागले. खात्री झाली. तलवार सुटली. कामरेभावती असलेली कट्यार बाहेर आली, हवेत फिरली. दोन रक्तात माखलेले हात जमिनीवर पडले, आणि तीही. पटकन उठून तिने तलवार उचलली. तिचा श्वास पूर्वरत होत होता. तो संतापला. बेभान झाला. तिच्यावर धावून आला. ती चपळ होती. बाजूला झाली. त्याचा वार खाली गेला. त्याने एक गडगडाट केला. त्याच्या डोळ्यातून एक लाल तेज बाहेर पडले. ते वसुंधरेभवती गोळा झाले. तिच्या अंगाची आग होऊ लागली. अंगावर सपासप वार होऊ लागले. एकाच वेळेस हात, खांदा चेहऱ्यावर त्याची अदृश्य नखे फिरावी तशी तो तिला लांबून ओरबाडू लागला. त्याने तिला त्याच पाशात ओढून आपल्या पाशी आणले, आणि तिच्यावर स्वार होऊन तिचा पुन्हा गळा आवळला. आपले दात तिच्या गळ्यात रुतवण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याचा चेहरा अधिक भयानक दिसू लागला. डोळे आग ओकू लागले. त्याचे बळ वाढत होते. थोडीशी सावध असलेली वसुंधरा बळ एकवटू लागली. बाजूला पडलेली कट्यार तिच्या हाती लागली. आणि तिने त्याच्या गळ्यावर मागून ती कट्यार फिरवली. काचकन्न त्याचा गळा चिरला गेला. तो वसुंधरेवरून उठला. जसा उठला, तिने कट्यार त्याच्या हृदयात घातली. त्याने एकच आरोळी ठोकली. छातीत रुतलेली कट्यार साधी नव्हती. तिला काढण्यासाठी त्याने हात लावला तर त्याचे हात जळाले. तो उठला आणि तडफडू लागला. जोरजोराने ओरडू लागला. जे घडले ते अनपेक्षित होते. 

"सांग कोण आहेस, आणि कोणी पाठवले आहे. " जखमी वसुंधरा तोल सांभाळत उभी राहिली." त्याने मायेने निर्माण केलेला पाश होता तो, ज्यात वसुंधरा चालत आली. पण तो पाश त्याच्यावर उलटला होता. 

तो जमिनीवर कोसळला. 

" ही कट्यार तुझ्या छातीत आहे, तोवर तुझें शरीर नष्ट होणार नाही. आणि तू नाही काही बोललास, तर अश्याच स्थितीत तुला महालाच्या अंधार कोठडीत ठेवीन. मग पुढची शेकडो वर्षे आपल्या सैतानाची पूजा कर, आणि मरणाची भीक माग. 


तो जमिनीवर वेदनेने विव्हळत पडला होता. त्याच्यावर दया दाखवणे म्हणजे सापास दूध पाजणे होते. त्याने आपल्या दुष्ट वृत्तीने पूर्ण नागरास वेठीस धरले होते. पूर्ण नगरात भय शिरले होते. त्याच्या शरीरात त्राण उरलेच नव्हते. 

" वसुंधरे, असं किती वेळ ठेवशील मला. जाऊदे मला. " 

" ते तुझं तू ठरव. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे, आणि जा तुझ्या मार्गाने." 

"सांगतो, पण मला वचन दे, मला माझ्या मार्गाने जाऊ देशील." 

"दिले." 

" बरं मग ऐक..! या नगरास शुर्पाने दिलेल्या शापाचे शेवटचे पर्व आहे. यात राजपरिवार, त्यांचे रक्षक, ही पूर्ण नगरी, यांना सगळ्याना त्यांच्या शापाचा परिणाम भोगावा लागेल. मी एक मृतआत्मा आहे. जिवंत असताना मी अत्यंत व्यभिचारी, व्यसनी आणि स्वार्थी होतो. असे असंख्य पापी आत्मे आजही शूर्पच्या जाळ्यात आहेत. त्यांच्या मूळ स्वभावाचे सावट, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या मतीवर उमटते. आम्ही सरळ मानवाच्या चिचारावर हावी होतो. स्वतःच्या बुद्धिनुसार त्याला वागवतो."

वसुंधरा सगळं ऐकत होती. 

"आणि युवराज?" 

"वन विहारास गेल्यावर , युवराजांवरही असा प्रयोग झाला आहे. त्यांच्यात असलेल्या दुष्ट शक्तीबद्दल मला काहीच माहिती नाहीये. ते माझ्या अखत्यारीत नाही."

"पण शुर्पा आणि तिचा भाऊ तर ...!" 

"नाही, ते संपू शकत नाही, त्यांची वृत्ती त्यांना जिवंत ठेवते आहे.वसुंधरे, या जगात जसं चांगलं जगावं म्हणून त्याचे रक्षण होत असते, तसे वाईट जगावं म्हणूनही त्याचे रक्षण होत असते. हे रक्षण त्या प्रवृत्तीचे देव आणि गुरू करत असतात. शुर्पा आणि शूर्प शेकडो वर्षे याच वृत्तीच्या प्रभावामुळे जिवंत आहेत."

"मग, ते संपतील कसे?" वसुंधरेला आता काळजी वाटायला लागली. 

" धर्माने, धर्म, माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, शौर्य, आणि चांगल्या प्रवृत्तीचे वाईटवर असलेले प्राबल्य, यानेच त्यांच्यावर मात करता येईल. ज्या विचाराचे प्राबल्य वाढेल, तीच शक्ती जिंकेल. वसुंधरे, एक सांगतो. हे शस्त्राने जिंकण्यासारखे नाहीये. ही मनोराज्याची लढाई आहे. ते दोघे म्हणून तुमच्यावर हावी होतायत. तुमच्या आजूबाजूच्या लोकांत लालच, वासना, मत्सर भरला आहे, आणि त्यामुळे या वृत्तीस त्यांच्यावर विजय प्राप्त करून , त्यांना वश करणे सोप्पे जाते आहे."

" त्या दोघांचा आत्ता वास कुठाय." 

" विचारात, तुझ्या समोरची व्यक्ती ही तो असू शकेल. ते शोधणे आणि त्याचा पराभव करणे, हेच तू करू शकते."

यांच्याकडून आता काहीच मिळणार नाहीये हे वसुंधरेला कळले. ती त्याच्या जवळ बसली आणि तिची कट्यार त्याच्या छातीतून उपसून बाहेर काढली. काळा धूर त्याच्या तोंडातून बाहेर पडून अंधारात विरला. हीच ती प्रवृत्ती. 


त्याचं जाळायला लागलेलं प्रेत ठेऊन वसुंधरा घोडा घेऊन पायी चालायला लागली. झाडावर आत्ता पर्यंत बसलेली असंख्य वेताळ तिच्याकडे अत्यंत रागाने पाहू लागली. त्यांच्या सरदाराला तिने संपवले होते. झाडांची फडफड वाढत होती. एक वळणावर येऊन वसुंधरेच्या मागचं सगळं चित्र बदललं. हे मायाजाल त्याने निर्माण केलं होतं. त्यातून वसुंधरा बाहेर पडली. 

नगरात कोणाला काहीच कळलं नाही. पण या सगळ्या प्रकाराने राजमहालातल्या चिंतेत वाढ झाली. आज पर्यंत सर्वांसाठी खुला महाल , आता बंद झाला होता. अनंत, विरसेन जास्त सावध झाले होते. 

तिकडे दूर जंगलात मात्र निरव शांतता होती. घनदाट झाडीत एका दगडी , अर्ध्या मोडक्या जुनाट वाड्यात काहीतरी हालचाल होताना मगध च्या एका लाकूडतोड्याने पाहिलं. त्याने आपल्या साथीदारांना याची सूचना दिली. दबकत ते त्या वाड्याच्या थोडं लांब उभे राहिले. काहीतरी विचित्र मंत्रजाप सुरू होता. जसे जसे ते जवळ येत होते, तसा एक उग्र वास येऊ लागला. इतका उग्र की त्या टोळीला श्वास घेता येईना. पुढे सरकत त्यांनी वाड्याचे पडके दार गाठले. मधले दृश्य पाहून त्यांना धडकी भरली. चार प्रेतं ओळीत ठेवली होती. आवाज कोणाचा होता, काहीच समजलं नाही. पण ती प्रेतं होती, एवढं निश्चित. 

संध्याकाळी सगळे लाकूडतोडे परत घरी आले. कोणासही काही सांगितले नाही त्यांनी. ते जेवले आणि नगरात निजानीज झाली. महालात मशाली जास्त होत्या. मुख्य दरवाजावर असलेले पहारेकरी डोळ्यात तेल घालून उभे होते. अचानक एक सुरा एकाच्या मानेवर फिरला. तो जागीच गतप्राण झाला. काही कळायच्या आत दुसऱ्याचाही देह जमिनीवर पडला. दारे उघडली गेली. वाटेत येईल त्याचे प्राण धारदार शस्त्राने जात होते. आवाज मात्र काहीच येत नव्हता. पहारेकर्यांच्या प्रेताचे रक्त लगेच सुकत होते. महालात काय घडतंय, कोणास काहीच सुगावा लागत नव्हता. त्या दासीने काढलेल्या खुणा नव्याने उमटत होत्या. काही काळ्या सावल्या महालाच्या भिंतींवर पुढे सरकत होत्या. शांततेत कोणीतरी मृत्यूचे सावट घेऊन हिंडत होते. वाराही वहात नव्हता. यवराजांच्या कक्षबाहेर अनंत उभा होता. अचानक त्याच्या छातीवर कोणीतरी धारदार शास्त्र चालवल्याचे त्याला जाणवले. छातीतुन रक्त वाहू लागले, पण त्यास दिसले कोणीच नाही. दुसरा वार त्याच्या हातावर झाला. त्याला तलवार उपसणे अवघड झाले. त्याने आवाज उठवला, पण त्याच्या गळ्यातून ध्वनी बाहेर येत नव्हता. तिसरा वार त्याच्या दोन्ही पायांवर झाला आणि तो जामिनावर कोसळला. एक वार त्याच्या नकळत डोक्यावर झाला, आणि त्याने डोळे बंद केले. तो मूर्च्छित झाला. चित्रसेंन च्या कक्षाचे दारही आपोआप उघडले. महाराणी गाढ झोपेत होत्या. अचानक कसल्या तरी चाहुलीने वसुंधरा जागी झाली. पण जाग येताच तीचा श्वास कोंडला. ती तडफडू लागली. पण तिच्याही डोक्यावर घाव बसला आणि तीही कोसळली. समोर कोणीच दिसले नाही. चित्रसेंनने डोळे उघडले. लालबुंद ! त्यात स्पष्ट दिसत होते, की चित्रसेंन नाहीये. काहीही न झाल्यासारखे ते उठले. आणि पलंगावरून खाली उतरून चालू लागले. अर्धा महाल त्यांनी उलांडला. कोणासही काही कळले नाही. वारा, आवाज, पावलांचे आवाज, सगळं-सगळं शांत होतं. काळ्या रंगाच्या एका टांग्यात ते बसले. आणि तो टांगा नगरा बाहेर चालता झाला. 

पहाटे पहाटे त्या चार लाकूडतोडयांच्या घरातून आकांत ऐकू आला. छिन्न-विच्छिन्न झालेली त्यांची प्रेतं त्यांच्या अंगणात पडली होती. एकास ही डोळे नव्हते. 

महालात आणि नगरात हाहाकार झाला. महाराणी तर बेभान झाल्या. महाराज ही कासावीस होऊन येरझाऱ्या घालत होते. नगरातील घर अन घर तपासले जात होते. कित्येक सशस्त्र घोडेस्वार राज्याच्या चहूबाजूला खुर उधळत निघाले. त्या चार लकुडतोडयांच्या बद्दल नगरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. विशिष्ट जागी घुसमटत असलेले भय आता समोर येऊन थैमान घालत होते. आज पर्यंत झाकून ठेवलेले भय , वणवा म्हणून नगर जाळत फिरू लागले. जे नको होते घडायला, तेच घडत होते. जिथे भयाचे बीज पेरले जाते, तिथे संशयाला पालवी फुटते. जिथे संशयाला पालवी फुटते, तिथे सूक्ष्म शत्रुत्व जन्माला येऊन माणसां-माणसात दुफळी निर्माण करत. डोक्याला खोलवर जखमा झालेल्या वसुंधरेला हे सगळे कळले होते. ती अस्वस्थ होती. ज्या वृत्तीचा नाश करायचा होता, ती वृत्ती एखाद्या दर्पां सारखी तोंड वर करून पसरत होती. याचे परिणाम सरळ-सरळ नगरीच्या विनाशाच्या दिशेने जात होते. 

जे घडत होते, ते अंतरंगात घडत होते. न दिसणारा शत्रू आपले शत्रुत्व वाजवून सांगत नसतो. सुप्त कपटाने तो ते शाबीत करीत असतो. तो हळू-हळू जिंकत असतो. 

कोणासही काहीच सुचत नव्हते. 

एका भिंतीस टिकून बसलेल्या जखमी वसुंधरेस महाराज येण्याची वर्दी लागली. ती उठून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. 

" वसुंधरे, काय घडले , कसे घडले हे कोणास ठाऊक, पण मला या राज्याचा वारस, माझा मुलगा परत आणून दे." समोर हात जोडून उभे असलेले सम्राट होते, एक बाप आपल्या मुलासाठी तडफडत होता. त्यांचे रडणे ऐकून तिचेही काळीज फाटले. ती उठली. 

" जर युवराजांना परत नाही आणले, तर सुळावर द्या मला. " एवढे बोलून ती निघून गेली. 

त्या लाकूडतोडयांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विरसेन आणि अनंत कसून तपास करत होते. काहीच पत्ता लागत नव्हता. स्मशानात सगळं नगर जमा झाले होते. कधी नव्हे, ते महाराज, विरसेन , वसुंधरा ही आले होते. 

"झाला तो प्रकार दुर्दैवी होता. नगरजनांनी शांत आणि संयमी रहावे. आपला शत्रू हा आपल्या अंगात शिरून त्याचे बळ वाढवतो आहे. तो तुमच्या वृत्तीत विष कालवून आपले सामर्थ्य वाढवतो आहे." एवढे बोलून विरसेन मागें सरकले. 

वसुंधरा आपल्या कक्षात आली. स्नान करून ती कक्षाच्या मध्यावर बसली. तिने ध्यान लावले. गुरुस पाचारण केले. "गुरुदेव, माझ्या समोरचे मार्ग संपले आहेत. नगर अजराजकतेकडे वळते आहे. तो क्षणा-क्षणाने बलवान होतोय." वसुंधरेच्या शरीरातून एक तेज बाहेर पडले. महालाच्या सज्जातुन ते कोणालाही दिसणार नाही, कळणार नाही, असे आकाशामार्गे प्रवास करत वर गेले. 

जिथे ते विसावले, तिथे हिरवळ होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता. मनाला भावेल अशी शांतता होती. कानावर सतत ओम चा जाप ऐकू येत होता. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ आभाळ होते. झुळ-झुळ करत वाहणारे झरे, रानफुलांनी बहरलेल्या वेली होत्या. जगातील असा कोणताच रंग नव्हता, जो तिथे आपले रंग मोकळेपणाने उधळत नव्हता. एका मोकळ्या ठिकाणी ते तेज विसावले. त्यातून वसुंधरा प्रकट झाली. आणि तिच्या समोर, तिच्या पेक्षा कित्येक पटीने जास्त तेज असलेली एक स्त्री प्रकट झाली.

"वसुंधरा..." त्या स्त्री च्या आवाजातही दैवत्व होते. 

"अशी हतबल नकोस होऊ. तुझा जन्म निराश होण्यासाठी नाहीये."

"पण गुरुदेव, माझ्या समोर काहीच मार्ग उरला नाहीये. शत्रू वेगळा आहे. त्याच्या समोर माझी शक्ती क्षीण होत चाललीये."

"तो तुझ्या पेक्षा दुर्बल आहे बाळा, तो समोर नाही येऊ शकत, हेच त्याच्या दुर्बलतेचे प्रतीक आहे. समोर येऊन लढण्यापेक्षा, तो दुर्बल आणि सामान्य लोकांच्या मतिचा वापर करून ,त्याच्या त्या प्रवृत्तीस वाढ देतो आहे." त्या स्त्रीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. वसुंधरेस दिव्यदृष्टी मिळाली. गुरुस वंदन करून ती परत निघाली. 

युवराजांच्या शोधात निघालेली सेना, निराश होऊन परत येत होती. कोणीही विरसेनास सामोरे जाईना. वसुंधरा आपल्या घोड्यावर स्वार होऊन नगरात निघाली. तिच्या दिव्यदृष्टी ने तिला एका ठिकाणी थांबवले. तिने जामिनावर पाय ठेवताच तिला संशय आला. आपल्या थैलीतली हळद तिने हातात घेऊन जमिनीवर टाकली. हळद पसरू लागली. एवढ्यात तिथे विरसेन आणि अनंतही आले. हळदीने एक चौकट तयार झाली. "इथे...!" विरसेनानी सैनिकांना हुकूम दिला. कुदळ, पहार जमिनीवर उडू लागले. थोड्या वेळाने जमिनीत एक दार दिसले. 

" हे तर, महालात निघणाऱ्या भुयाराच दार आहे." विरसेनने लगेच ओळखलं. " पण हे उघडून काय मिळणार आहे?"

" माहीत नाही, ते उघडलं की कळेल."

दोन सैनिकांनी ते दार वर ओढले. चांगले मोठे लोखंडी, पण वजनाने हलके दार होते. आत प्रचंड अंधार होता. मशाली आणि मशाळजी आले. वसुंधरा, विरसेन, अनंत आणि काही सैनिक आत जाऊ लागले. गेले कित्येक वर्षे ते भुयार बंद होते. "महालतुंन राजपरिवारास सुखरूप नगराबाहेर जाता यावे,म्हणून हे भुयार आहे." विरसेन सांगू लागला. त्या जिन्यातून एकामागून एकच माणूस आत जाऊ शकत होता. वसुंधरा पुढे, आणि तिच्या पुढे एक मशाळजी होता. सुमारे २० पायऱ्या खाली अत्यंत थंड वातावरण होते. जाळी जलमटी मशालीत भासभास जळत होती. कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येत होता. सगळे सावध झाले. अंधार असल्यामुळे काही दिसत ही नव्हते. अचानक कुठूनतरी एक बाण सुं सुं करत आला आणि मशाळजीचया छातीत घुसला. मशाल खाली पडायच्या आत वसुंधरेने ती सावरली. मशाळजी गतप्राण झाला. सगळे सावध झाले. तलवारी बाहेर आल्या. अंधार सर्वत्र राज्य करत होता. निशाचर पाखरं कुचेष्टा करत इकडून तिकडे हिंडत होती. वसुंधरेने डोळे बंद केले. त्या अंधारात तिच्या दिव्य दृष्टीस अनेक हडळी आणि पिशच्चे छताला लटकलेला दिसली. मनुष्याच्या रक्ताला आसुसलेली. चेकळलेली. थोड्या अंतरावर एक मोठी पेटी ठेवलेली होती. मोठी लोखंडी पेटी. हे सगळे पिशाच्च त्याचेच रक्षण करत होते. त्या पेटीच्या आजूबाजूला तिने जे पाहिलं, त्याने तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. 

त्या नर पिशाच्चाने मारलेले पहारेकरी, तो अनंताने मारलेला शिपाई, त्या रात्री महालात मारले गेले ते दास-दासी आणि शिपाई, आणि ते चार लाकूडतोडे! असे सगळेच त्या पेटीभवती , तिची राखण करत उभे होते. हे फक्त वसुंधरेस दिसत होते. ते भयानक होते. 

एक एक पाऊलावर मृत्यू घात लावून बसला होता. प्रत्येकजण सावज होते. कारण सगळे दिसत होते. वसुंधरा वर येऊ लागली, तसा सगळा ताफा वर येऊ लागला. "काही धनुर्धर प्रत्येक पायरीवर ठेवावे लागतील." तिने हे सांगताच धनुर्धर नेम धरून पायर्यांवर बसले. 

" खाली एक मोठा कक्ष आहे, आणि छताला लटकलेले पिशाच्च आणि वेताळ. काही मेलेले शिपाई, ते लाकूडतोडे, त्यांच्या मती संमोहित केलेल्या आत्म्यांना एक मोठ्या लोखंडी पेटीच्या रक्षणासाठी ठेवलं आहे." सगळेच घाबरले. मृत्यूचे भय, मृत्यूपेक्षा ही भयानक होते. शस्त्र होते, पण कोणावर चालवावे कळत नव्हते आणि दिसतही नव्हते. पुन्हा वर जाऊन काहीच साध्य होणार नव्हते. तिथले वातावरण अत्यंत थंड होते. विरसेन खाली आला. त्याने एक सैनिकाकडून धनुष्यबाण घेतला. बाण मशालीला लावला आणि अंदाज घेऊन छताला लावला. क्षणात छताला आग लागली. आगीत अक्राळ-विक्राळ आकृत्या दिसू लागल्या. छताला उलटी लटकलेली ती पिशाच्च घाणेरडे आवाज करत या सगळ्यांकडे बघू लागली. एक एक पिशाच्च जसे आगीत होरपळू लागले. झालेल्या उजेडात खाली उतरणे शक्य होते. प्रत्येकाला पेटी दिसत होती. विरसेनच्या एक खुणेवर अनंत त्या भुयारातून बाहेर गेला. सगळ्यांनी होईल तितके समोरचे दृश्य डोळ्यात साठवले. ती प्रेताची लक्तरे छतावरून एक एक करून कोसळलत होती. स्मशानात अर्धवट जळलेली प्रेतं कोणीतरी ओरबाडून काढावी, अशीच दिसत होती. 

आग विझत चालली होती. वसुंधरा आता खाली उतरली होती. तिच्या सोबत विरसेन ही तलवार उपसून उभा होता. पण त्याला कोणीच दिसणार नव्हते.  एक एक करत ती अर्धमेला सैनिकांची सेना पुढे सरसावु लागली. वसुंधरा विरसेना साठी वाट मोकळी करून देत होती. ती लोखंडी पेटी प्राप्त करणे गरजेचे होते. वसुंधरेस तिच्या दिव्य दृष्टीने थोडेसे दिसत होते. आणि तिच्या मागोमाग विरसेन आणि काही धारधार सैनिक होते. जवळपास १०-१२ प्रेतं पडल्यावर मात्र वसुंधरेची दृष्टी कमी होऊ लागली. तिच्या लक्षात आलं, की आपली क्षमता इथे बाधित होते आहे. तिने विरसेन आणि सोबतच्या सैनिकांना खाली वाकण्यास सांगितले. 

सगळे वाकल्यावर एक इशाऱ्यावर पायऱ्यांवर बसलेल्या प्रत्येक धनुर्धराने बाण सोडले. ते बाण बरोबर शरीरात घुसावे तसे अंगात घुसले आणि उरलेल्या त्या मृत सैनिकांचा अंदाज विरसेनास आला. फक्त बाण जरी दिसत असले, तरी त्याच्या अंदाजाने त्याने त्यांची शिरे धडावेगळी केली. ती पेटी दिसत होती. पण तिच्या बाजूस असलेले ते लाकूडतोडे वसुंधरेने मागून पाहिले होते. ते पेटीच्या जवळ होते आणि त्यांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. आणि ते जास्त जहाल होते. 

एवढ्यात त्या पेटीच्या वरच्या भागात हालचाल झाली. वरून माती पडू लागली. विरसेन चा डाव यशस्वी झाला होता. छतास एक मोठे भगदाड पडले आणि धुळीच्या एक मोठ्या लोणासोबत अनंत खाली पडला. स्वच्छ सूर्यप्रकाश आत आल्याने लाकूडतोडयांचे मृतात्मे दिसू लागले. विरसेनाने त्यांना गाठून त्यांचे हात धडावेगळे केले आणि त्यांचेही शीर काढून घेतले. ऐन वेळी अनंत ने भुयाराचे दार दुसऱ्या बाजूने उघडले. ते महालातील एका तळघरात होते. 

ती पेटी धुळीने माखलेली होती. खूप जुनाट होती, आणि वर्षानुवर्षे न हलवलेल्या अवस्थेत होती. यात काय असेल, याचा अंदाज बांधणे खूप कठीण होते. वसुंधरा , विरसेन आणि अनंत पेटीच्या तीन बाजूंना उभे होते. पेटीच्या वर तिचे कुलूप होते. त्यालाच लटकलेली किल्ली बघून तिघांना आश्चर्य वाटले. अनंत आणि विरसेन तलवार उचलून तयार होते आणि वसुंधरेने ती भली मोठी किल्ली कुलपात लावली. चराचर आवाज करत कुलूप उघडू लागले. पेटीचे झाकण उघडले. त्यात एक जुनाट कागद होता. त्यावर काही आकृत्या होत्या. तो कागद बाजूला ठेवून वसुंधरेने पेटीच्या आतले दार उघडले आणि तिथे असलेल्या सगळ्यांनाच एक धक्का बसला. त्यात युवराज चित्रसेंन होते. विरसेन, अनंत आणि वसुंधरा , तिघेही त्याच्याकडे पाहू लागले. क्षणाचाही विलंब न लावता वसुंधरेने त्यांची नाडी तपासली आणि हृदयाचे ठोकेही. ते अजून जिवंत होते. श्वास सुरू होता. विरसेन आणि अनंतने त्यांना बाहेर काढले. अनंत त्यांना खांद्यावर टाकून एका दोराच्या सहाय्याने वर घेऊन जाऊ लागला. सगळे सैन्य सुरक्षित जागी आलेले पाहून विरसेनने संपुर्ण भुयारास आगीच्या हवाली केले. वर वाट पहात असलेल्या महाराजांनी आपल्या पुत्रास असं पाहून एकंच टाहो फोडला. सगळे वर आले. शेवटी विरसेन आले आणि त्यांनी ते भुयार कायमचे बंद करण्यासाठी हुकूम सोडला. 

"महाराज, वन-विहारास गेलेले आणि तिथून आलेले युवराज वेगवेगळे होते. ते एक कपट होते, एक माया होती, ज्यात आपण फसलो." वसुंधरेने महाराजांच्या हातातील तो दोरा पहिला. " महाराज, या दोऱ्याने खरंतर युवराज महालाच्या बाहेर जाणे शक्य नव्हते. ते तरीही बाहेर पडले. ते युवराजांचे एक मायावी रूप होते. त्यांच्यावर खरा प्रयोग खाली तळघरात सुरू होता." 

" कसला प्रयोग?" महाराजांच्या आता थोडेसे लक्षात येऊ लागले. "त्यांच्यात एक दुष्ट शक्ती टाकण्याचा प्रयोग. " हे ऐकून सगळेच अवाक झाले. " होय महाराज, शूर्प आणि शुर्पाच्या शापा चा खरा अर्थ आपल्याला उमगला नाहीच. ते युवराजांच्या शरीरावर ताबा मिळवून आपले प्रेत योनीतले आयुष्य जगू पहात होते. कदाचित, जर आपल्याला भुयार सापडलेच नसते, तर काही दिवसांनी समोर आलेले यवराज हे त्यांच्यात शुर्पाचे दुष्ट संस्कार, बऱ्याचशा अघोरी आणि वाईट प्रवृत्ती आणि कपट घेऊन आले असते. आणि युराजांचा निष्पाप आणि पवित्र आत्मा कायमचा त्यांच्या वाईट शक्तीचा गुलाम झाला असता." 

यवराजांना महाराणींसामोर नेण्यात आले. पुत्रवियोगाने तडफडत असलेल्या आईला जाग आली. मुलाला पहाताच तिच्या आनंदाला आणि अश्रूंना मर्यादा उरली नाही. युवराज अतिशय मलूल आणि क्षीण झाले होते. कित्येक दिवस फक्त मायावी शक्तीमुळे ते जिवंत होते. कारण त्यांना जिवंत ठेवणे भाग होते. त्यांचे प्राण गेले असते, तर त्यांचा आत्मा मृत्यूलोकांतून सरळ यमलोकात गेला असता. आणि त्यांच्या आत्म्यावर प्रयोग सुरू होता. 

राजवैद्य आले. मूर्च्छित युवराजांच्या नाडीस हात लावताच त्यांनी सांगितले की यांना आता बरे होण्यास फार काळ लागणार नाही. 

वसुंधरा आणि अनंत तिथून निघाले. त्यांना खूप श्रम झाले होते. 

"पण देवी, जे युवराज महालात होते, ते त्या रात्री गेले का? आणि कुठे?" 

" खऱ्या युवराजांवर प्रयोगाची सांगता झाल्यावर ते समोर आले असते. आपण युवराज मिळाले म्हणून त्यांना महाली आणले असते. महालातून त्या रात्री गेलेले युवराज एक कपट होते." 

"म्हणजे...!"

"हो, आपण सगळे युवराज महालात आजारी म्हणून गाफील राहिलो."

"पण आता संकट टाळले."

"नाही, आपण फक्त एक डाव उधळून लावलाय. आपल्याला मूळ नष्ट करणे गरजेचे आहे. कारण जर ते नष्ट झाले नाही, तर आपण सगळेच आजन्म त्याच्याशी लढत बसू. युवराजांवर खरे संकट तर आता सुरू झाले आहे."

युवराज परत आल्याने नगरात थोडा दिलासा होता. भुयारातून परत आलेल्या सैनिकांना कोणासही काहीही न सांगण्याचे बजावले होते. ते ही दिलेला शब्द पाळत. युवराजांचा इलाज सुरू झाला होता. गेले काही दिवस, काय घडले या बद्दल त्यांना कोणीही काहीही विचारत नसे. त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला होता, आणि ते तो पाळत होते. अनंत आता सावली सारखा त्यांच्या आजूबाजूलाच असे. महाराणी त्यांना पळभर सुद्धा सोडत नव्हत्या. एका मध्यरात्री अचानक ते घडबडून जागे झाले, आणि जोरजोरात रडू लागले. महाराणी तात्काळ उठल्या, शेजारच्या दिव्याची वात त्यांनी वाढवली. घामाघूम झालेले युवराज बघून त्यानाही भीती वाटली. 

"काय झाले युवराज? काही स्वप्न पडले का?"

"आई, मी कोण आहे?" ते प्रचंड घाबरले होते. " युवराज, मी आई आहे तुमची." महाराणींनी त्यांना जवळ घेतले. " मग तो कोण आहे...?" युवराज त्यांच्या पलंगावरून दिसणाऱ्या सज्जाकडे बोट दाखवत विचारू लागले. " कोण युवराज?" त्या ही सज्जेकडे पाहू लागल्या. "कोणी नाहीये तिथे, तुम्ही स्वप्न पाहिले आहे." महाराणींनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला."तो बघा ना, आम्हीच आहोत तो!" महाराणी एकदम घाबरल्या. त्यांनी टाळी वाजवून दासिस वसुंधरेला बोलावून आणण्यास सांगितले. वसुंधरा आली तेव्हा माय-लेक सज्जा कडे बघत होते. तिच्या लक्षात आलं. घडलेली कोणतीच गोष्ट महाराणी यशोधारेला माहीत नव्हती. वसुंधरा सज्जेकडे चालत गेली. तिलाही कोणी दिसले नाही. तशीच ती युवराजांच्या जवळ आली. त्यांच्या डोक्यावर तिने हात ठेवला आणि डोळे मिटले. ती युवराजांच्या स्वप्नात गेली. तिला तिथे प्रति युवराज दिसला. तो सज्जातून पहात हसत होता. त्याचा चेहरा जखमी आणि क्रूर होता. डोळे उघडताच ती स्वप्नातून बाहेर आली. सोबत आणलेली हळद तिनें युवराजांच्या कपाळाला लावली. ते गाढ झोपल्यावर सुद्धा ती त्यांच्या जवळ होती. 

ती सकाळ खूप छान होती. बरेच काही पूर्वपदावर आल्यासारखे वाटत होते. महाराज आज खूप दिवसांनी दरबारात आले होते. दरबारही पूर्ण भरला होता. युवराजांची दिनचर्या खूप सावधपणे सुरू झाली होती. दुपारी वसुंधरा बागेत असताना तिचे लक्ष एका झाडाकडे गेले. त्यावर खूप सारे कावळे एकत्र बसले होते. आणि एकटक महालाकडे बघत होते. वसुंधरेस काळजी वाटू लागली. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे तिलाही कळत होतं. शत्रू इतक्या सहजासहजी हरणार नव्हता. त्याच्या आत्तापर्यंतच्या भयानक हालचाली आठवल्या की जाणवत होतं की कुठेतरी पाणी मुरत आहे. महालात , नगरीत कुठेही काही कुप्रसंग घडला नव्हता. आज पाच दिवस झाले होते. तिने त्या कावळ्यांकडे नीट निरखून बघितले. थोडा वेळ पहिल्यावर तिचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. सगळे कावळे मृत होते. तिने आजूबाजूला पाहिले. एक शिपाई तिला दिसला, तिने त्याला बोलावले. त्याच्या हातातून धनुष्यबाण घेऊन तिने त्यातील एका कावळ्यावर नेम धरला. "देवी, आपण कोणावर नेम धरला, झाडावर काहीच नाहीये." त्याच्या हातात धनुष्यबाण देऊन त्याला तिने जायला सांगितले. ती महालात आली. ताबडतोब महाराज, विरसेन, सेनापती , अनंत , राजपुरोहित आणि राजज्योतिशी यांना बोलावले गेले. ते सगळे येई पर्यंत महालातल्या विश्रामगृहात असलेल्या वृद्धासही तिने आणले. सगळे जमले. " युवराजांची कुंडली आम्हास दाखवावी." ज्योतिषाने कुंडली बाहेर काढली. ती समोर ठेवली.  

वसुंधरेने त्याच्यावर हात ठेवला. तिच्या कपाळावर आठ्या येऊ लागल्या. जमलेले सगळेच गोंधळले. काही क्षण गेले. 

"बाबा, तुम्ही काहीतरी विसरला आहात." त्या वृद्धाकडे बघत ती म्हणाली. " नाही देवी, जेवढे माझ्या वडिलांनी मला सांगतीले, ते सगळे मी तुम्हाला बोललो." तो वृद्धही गोंधळला. " कदाचित तुमच्या वाडीलांनी तुम्हालाही सांगितले नसेल." "असे काही मला आठवत नाही." 

"तिथी!"

" वसुंधरे, काय घोळ आहे हा?" महाराजही अधीर झाले. " महाराज, एक तिथी जी या सगळ्यात खूप महत्त्वाची आहे." 

"कोणती तिथी!" 

वसुंधरेने एक शिपायाकडून भाला घेतला. " या माझ्या मागे!" सगळे सज्जेकडे गेले. तिने भाल्याचे टोक आपल्या कपाळाला लावले आणि त्या झाडास जोरात मारून फेकले. क्षणात ते झाड जळू लागले. त्यावर बसलेला एक एक कावळा जळून खाली पडू लागले. सगळे हे दृश्य पाहून अवाक झाले. बरेच कावळे जमिनीवर पडून मारू लागले. 

"महाराज, येणारी पौर्णिमा , सूर्यग्रहण. आज पासून काहीशे वर्षापूर्वी , याच तिथीला शुर्पा आणि तिच्या भावाचा विनाश झाला होता." हे ऐकून सगळेच चाट पडले. " हे सगळे त्याचे दूत आहेत, जे महालावर पाळत ठेऊन होते." 

येणारी पौर्णिमा ५ दिवसांवर होती. "महाराज, मी महायज्ञाच्या तयारीस लागतो." राजपुरोहित तिथून चालते झाले. विरसेन आणि अनंतही हात जोडून निघून गेले. येणारे भय आता जास्तच शक्तिशाली होऊन येणार होते, कारण रात्रच नाही, तर तो दिवस ही त्याचा होता. सूर्यग्रहण...!


महालाची छावणी झाली. सुरक्षा रक्षक जास्त दक्ष झाले. कोणासही सहजासहजी महालात प्रवेश मिळत नसे. ५ दिवस होते, पण क्षण-क्षण महत्वाचा होता. त्याच्या शक्तीचा अंदाज तर सगळ्यांना होताच. पण त्याच्यात असलेले कपट अत्यंत घातक होते. याची प्रचिती सगळ्या नगराला आली होती. हे समोरा-समोर होणारे युद्ध अजिबात नव्हते. हे मती, भय आणि कपटाचे युद्ध होते. जे संयम आणि प्रतिकपटानेच जिंकावे लागणार होते. 

महालाच्या बागेशेजारील पटांगणात होम सुरू झाले. त्यातून निघालेला धूर , वाटेत येणाऱ्या नकारात्मकतेला बाहेर काढू लागला. लोकांची ढासळत चाललेली दृढ शक्ती आणि विवेक परत येऊ लागला. तसेच होम नगरातील इतर भागात देखील पेटले. प्रत्येकाच्या श्वासात तो धूर भिनयला हवा होता. तीन रथ भरून विशिष्ट समिधा रात्रीत मागवली गेली होती. वायूपेक्षाही जास्त वेगाने धावणारे घोडे स्वतः अनंत हाकत घेऊन आला होता. सकाळी होम सुरू झाल्यावर विरसेन आणि वसुंधरा नगरातील तो बदल पहाण्यास निघाले. लोकांच्या चरहऱ्यावरचे भय आता कमी होऊ लागले होते. सकारात्मकता झळकू लागली होती. तरीही तिघांनी कमरेला तलवारी लावलाच होत्या. महालात अनंत होता. क्षणभर सुद्धा युवराजांवरून दृष्ट काढत नव्हता. 

नगराच्या वेशीबाहेर मात्र काहीतरी वेगळे घडत होते. नगराची सीमा संपत होती, तिथे रस्त्यावर कडेला असलेल्या त्या झाडांवर काही गिधाडं होती. नगरातून उठलेला धूर पहात होती. त्यातील दोन उडाली आणि उडता उडता गुप्त झाली. एक गूढ ठिकाणी ती प्रकट झाली. हे ठिकाण कोणते होते, ते कळत नव्हते. पण त्या ठिकाणी चांगले काही नव्हते. एक मोठा अग्निकुंड होता. जमिनीवर पालापाचोळा आणि भिंतीवर, छतावर अनेक वर्षे साचलेली जाळी होती. कोळश्याने बऱ्याच खुणा करून ठेवल्या होत्या. बाहेरून मोठ्या गुहेसारखं दिसणारे , आत मध्ये प्रचंड अंधार होता. सूर्यप्रकाश नावाला सुद्धा येत नव्हता. तो नकोच होता मुळी. अनेक वटवाघूळ, कावळे, गिधाडं मुक्तसंचार करत होते. इथे कधी मनुष्य आला असेल, अशी एकही खूण दिसत नव्हती. कोणाच्या पाऊलखुणा तर नाहीच, पण प्राणवायूचे प्रमाण सुद्धा कमी.एकही पाण्याचा स्रोत नाही. साधा झरा, तळ पण नाही. ते गिधाड आत गेलं. एका दगडावर बसलं. आणि आवाज करू लागलं. एक मोठा काळा आगडोंब तिथे आला. 

" सांग..!" आवाज आला. गिधाड पुन्हा चुं चुं करू लागले. " जा तू...!" गेल्या वाटेने ते गिधाड परत आले. तो काळा आगडोंब ही माघारी आला.एका पुतळ्या समोर येऊन थांबला. 

" आज पासून चौथा दिवस !" तो आगडोंब बोलू लागला. ज्या शक्तीच्या जोरावर तुला आजपर्यंत जिवंत ठेवले, ती शक्ती प्रबळ होईल. सूर्य असून नसल्यासारखा. काही काळा पूर्ती ग्राहणाचे आधीन झालेली सगळी सृष्टी आपली. त्या दिवशी नगरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या अधीन असेल, पण काही काळा साठीच. त्याच वेळी...!" आणि एक असुरी हास्याचा आवाज आला. 

ती अग्नी थोडीशी चाळवल्यासारखी झाली. 

नगरात वसुंधरा फिरत होती. तिच्या शेजारी एक वाऱ्याची छोटी भवरी तयार झाली. ती ताबडतोब घोड्याखाली उतरली आणि काही काळ स्तब्ध उभी राहिली. एकदम तिचे डोळे चमकले. ती भवरी वाऱ्यात विरली. 

"महाराज, हे सगळे कुठून चालते आहे याचा पत्ता लागला आहे." होमात गुंग असलेले महाराज ताबडतोब उठले. विरसेन, अनंत आधीच आले होते. "महाराज, नगराच्या बाहेर एका गुहेत माझे दूत सगळा प्रकार पाहून आलेत."

" दूत?" महाराज चक्रावले.

" हो महाराज, महालातील घडणारी प्रत्येक गोष्ट, आपले मनसुबे, सगळे सगळे बाहेर जात होते. मेलेली गिधाडं आणि कावळे हे काम करतात. पण होमाच्या धुरामुळे त्यांनी गावाबाहेर एका वृक्षावर आपला डेरा मांडला. मग मी ही माझे दूत तयार केले. वायूदूत. जे दिसत नाहीत, आणि त्यांना सगळीकडे जाताही येते."

"वायूदूत?" विरसेनला ही आश्चर्य वाटले." हो! मला वायू, अग्नी आणि जल, यांचीही भाषा कळते. नगराबाहेरील एक डोंगरात एक अदृश्य गुहा आहे. तीत हा सगळा प्रताप सुरू आहे. पण आपल्या पैकी कोणालाच ती दिसणार नाही. ती मायेने बनलेली आहे." आता सगळेच घाबरले. " शुर्पाच्या शापाचे पालन तीच करते आहे. तिचा देह नाहीये, कारण ती एक शक्ती आहे, आणि तिचा भाऊ हा मनुष्यरूपात त्या शक्तीच्या सहाय्याने अधर्म पसरवत होता. तिने त्याचा एक पुतळा करवला आहे, आणि कदाचित तो ग्रहणाच्या दिवशी सर्व शक्तीनिशी...!" 

" नाही नाही, वसुंधरा, त्याला अडवायला हवं, काहीतरी करायला हवंय."

"महाराज, जो पर्यंत होम सुरू आहे, तो पर्यंत तो नगरात नाही येऊ शकणार, पण तो आता खूप शक्तिशाली झाला आहे. शुर्पाने त्यास नकारात्मक शक्तींचे पुरवठे देऊन अजून क्रूर आणि अविचारी बनवले असेल." 

होमाचा पवित्र धूर नगरात सगळी कडे पसरत होता. तो जरी एक दिलासा असला, तरी एक जागा अशी होती, जिथे हा धूर पोहोचत नव्हता. आजचा दिवस संपत आला होता. होम दिवसरात्र जळत राहायला हवे होते. समिधा मुबलक होत्या. 

ग्रहणाची तंतोतंत वेळ काढण्याचा प्रयत्न होत होता. त्यास संपवणे गरजेचे होते. नाहीतर हा शाप अख्या नागरिस पिढ्यांपिढ्या भोगावा लागणार होता. 

सत, द्वापार आणि त्रेतायुगात सुध्दा या प्रवृत्ती होत्या. पण त्यावेळेस भगवंत स्वतः भूतलावर होते. तेव्हा माणसाच्या हातून धर्म आणि चांगले कर्म होत होते. या युगात माणसाचे कर्मच त्याची गती ठरवणारे होते. माणुसकी लोपास जाऊन अधर्म वाढू लागला, म्हणजे माणसाचा राक्षस होतो. ही प्रवृत्ती वाढली की धर्म एक मिथ्य होत जाते. वृत्ती-प्रवृत्तीची ही लढाई

 युगांयुगे अशीच सुरू राहील. या कामी शक्ती म्हणून काम करतो तो माणसातला चांगुलपणावर आणि देवावर असलेला विश्वास. तो विश्वास वसुंधरेत, विरसेन मध्ये आणि अनंत मध्ये होता. 

सूर्यास्त झाला. महालात सोडली तर इतरत्र शांतता झाली होती. होमकुंड पूर्ण सुरक्षित होता. त्यात अग्नी उदंड राहील, अशी समिधा भरली होती. सुरक्षा रक्षक पहारा देत होते. नगर विसावले होते. 

दूर डोंगरांमधून एक पाण्याचा झरा झुळ-झुळ न्हात नगरातून वहात येई. त्याचे पाणी नगराला वापरायला होत असे. पण पुढे विहिरी झाल्या आणि तो ओढा ओस पडला. त्यात पाणी होतेच, पण सहसा कोणी ते घेत नव्हते. पुढे वसलेल्या लहान खेड्यात ते सगळे पाणी जात असे. रात्री त्या पाण्यात थोडीशी खळखळ जाणवली. अचानक त्याचा स्तर वाढू लागला. एक धार वाट काढत नगरातील एका रस्त्यात वाहू लागली. ती धार अतिशय संथ गतीने वहात होती. घरांच्या कोपऱ्यातुन ती वाट काढत सरकू लागली. वाटेत येणारी रोपटी , सरपटणारे किडे, जो कोणी त्या धारेच्या वाटेत येई, त्याचा जीव जात होता. अत्यंत शांत आणि संथ गतीने हा कारभार सुरू होता. ती धार स्वतः आपली दिशा ठरवत होती. होमाच्या धुराचा काहीच परिणाम तिच्यावर नव्हता. कारण ते पाणी होते. पसरत चालले होते. त्याला वेग होता. एका ठिकाणी ती धार स्थिर झाली. समोर काही शिपाई निवांत बसले होते. त्या पैकी एकाचे लक्ष त्या धारे कडे गेले. मशालीच्या उजेडात त्याला ती स्पष्ट दिसली. तो चालत आला आणि वाकून पाहू लागला. त्याच्या पायातील चामडी जोडे त्या धारेस लागले. आणि त्या धारेने त्याचे दोन्ही पाय धरले. कोणीतरी जखडून ठेवावे असेच. काही बोलायच्या आत, त्याचे पूर्ण शरीर काळे पडले. नाकात-तोंडात ती धार शिरू लागली. त्या शिपायाला बाधा झाली. बराच वेळ झाला, आपला जोडीदार वाकून काय बघतो आहे, हे पाहण्यासाठी दुसरा गडी उठला. त्याच्या मागे येऊन उभा राहून त्याच विचारू लागला. या शिपायाने फक्त धारेकडे बोट केले. दुसऱ्या शिपायाने वाकून त्या धारेस पाण्याची साधी धार म्हणून स्पर्श केला आणि त्याचीही गत तीच झाली. दोघेही बाधित झाले. पूर्ण काळे पडलेले शरीर, रोगट हातपाय, डोळ्यातली नाहीशी झालेली बुबुळ, आणि आत त्या दुष्ट शक्तीने केलेला प्रवेश. होमाच्या धुराचा प्रभाव बाहेरच्या बाहेर राहिला. आतला ताबा सुटला. पाऊले टाकीत ते दोघे वेगवेगळ्या वाटेला निघाली. वाटेत त्यांना बघणारी जनावरे वेड्यासारखी बिथरू लागली. पिशी होऊ लागली. त्यांचे ते बीभत्स रूप त्यांनी कधीच पाहिले नव्हते. एकास काही अंतरावर दोन शिपाई दिसले. तो थांबला. मशाल लांब होती. कोण आहे बघण्यासाठी ते शिपाई सावध होऊन जवळ येऊ लागले. त्याच्या तोंडावर उजेड पडताच ते प्रचंड घाबरले. पण त्यांना ओरडायलाही याने वेळ दिला नाही. त्यांचे गळे धरून त्याने त्यांच्या मानेचा कडकडून चावा घेतला. ते जमिनीवर कोसळले. दुसऱ्याने ही तीन शिपायांना असेल चावे घेतले. खाली पडलेल्या शिपायांनी काही क्षणाने डोळे उघडले. त्यांचीही तीच गत झाली. काहीही झाले नाही असे उठून, ते ही दोन वेगळ्या दिशेला निघून गेले. 

आपल्या कक्षात वसुंधरा एक आसनावर बसली होती. खिडकीपाशी एक भांड्यात गुलाबजल भरून ठेवले होते. ते हळूहळू गरम होऊ लागले. उकळू लागल्यावर त्यातून खळखळ आवाज येऊ लागला. वसुंधरेने डोळे उघडले. त्या पाण्याकडे पाहिल्यावर तिच्या कपाळावर आठ्या आल्या. धाडकन आवाज होत ते भांडे जमिनीवर पडले. गुलाब जल काळे झाले होते. सुगावा लागावा, म्हणून तिनेच ते जल असे ठेवले होते. सुगावा लागला होता. ती सचेत झाली. शत्रूने नगरात पाऊल टाकले होते. पण कसे शक्य आहे. कुठून ? केव्हा ? कोणत्या मार्गाने ? घाईघाईने तिने पडदा बाजूला केला. होम पेटला होता. तिने सुटकेचा नि:श्वास टाकला खरा, पण तिची विद्या खोटं बोलणारी नव्हती.

तिने सगळीकडे नजर टाकली. सगळे काही जागेवर होते. शिपाई, दासदासी, होम. कोणतीच अशी संशयास्पद हालचाल नव्हती. 

पायऱ्या उतरून ती खाली आली. 

नगरातील एका भागात तीन चार कुत्री अचानक कावरी-बावरी होऊन पळत आली. एका चौकातील शिपाई सावध झाले. कुत्र्यांच्या मागे काही क्षण काहीच हालचाल झाली नाही. आणि त्यानंतर ४-५ शिपायांची प्रेते त्यांना चालत येताना दिसली. जळून काळे झालेले चेहरे, हातात रक्ताने माखलेले भाले, पूर्ण पांढरे झालेले डोळे. समोरचे दृश्य बघून ते शिपाई प्रचंड घाबरले. पण लगेच सावध झाले. त्यापैकी ३ तिथे थांबले आणि बाकीचे दोन महालाकडे पळत निघाले. मृत शिपायांना यातले काहीच कळले नाही. काही वेळाने त्यांची संख्या तीन ने वाढली. 

विरसेन हे सगळे ऐकून थक्क झाले. ताबडतोब शिपायांना घेऊन निघाले. साधारण १०-१५ शिपाई हत्यारं घेऊन निघाले. त्यांना महालातून बाहेर जाताना पाहून वसुंधरेस कल्पना आली की काहीतरी घडले आहे. तीही खाली आली. एक शिपायाने तिला जमेल तसे सांगितले. " तुम्ही जा, त्यांना आडवा, नाहीतर घोर अनर्थ होईल. " एवढे बोलून ती आयुधे घेण्यास पुन्हा आपल्या कक्षात आली. दोन दस्यांना तिने बोलवले. " महालातून कोणीच बाहेर नाही जायचे, आणि बाहेरून कुणीच मध्ये नाही यायचे. " हे सांगून ती निघाली. 

मशाली फार लांब पर्यंत जात नव्हत्या. विरसेन आणि त्यांचे सैनिक अगदी बारकाईने सगळे बघत होते. ते दोन सैनिक सुद्धा त्यांच्यासोबत होते. रस्ता आणि चौक मोकळे होते. काही जागांवर झटापट झाल्याच्या खुणा होत्या. विरसेन त्याकडे वाकून पाहू लागले. रक्त सुकलेले होते. 

वसुंधरा घोड्यावर एकटीच त्यांना शोधायला निघाली होती. त्यांची चुकामुक झाली होती. अनंत सोबत होता. कारण धुराचे कवच मोडून काहीच महालात शिरणार नव्हतं.

" ते नक्कीच दक्षिण टोकाकडे असतील." अनंतने अंदाज लावला. " सांगता येत नाही. काही खूण देखील सापडत नाहीये. रात्रीस विचारावे तरी कुणाला.?" एकदम तिचे डोळे चमकले. 

खाली वाकलेल्या विरसेन कडे कोणीतरी पहात होतं. कुठूनतरी एक भाला हवेत उंच उडाला आणि त्यांच्या मानेच्या दिशेने येऊ लागला. एक शिपाई जोरात ओरडल्यामुळे ते सावध झाले आणि तो भाला त्यांनी वरचेवर झेलला. सगळे हत्यारं उपसून आपापल्या दिशेला सावध झाले. चार मृत शरीरं त्यांच्याकडे चालत येताना दिसले. सैन्याने विरसेनला घेरून कडे केले आणि तलवारी चालू लागल्या. जिथे वार होईल, तिथली अवयवे गळून पडू लागली. पण ते थांबत नव्हते. त्यांचा चावा भयानक होता. ज्याची माणसाला, प्राण्याला चावतील, त्यांना आपल्यासारखा करतील, असेच ते होते. त्या ओढ्यात वहात आलेलं विष अतिशय जहाल होतं. होमाच्या धुराचा परिणाम होऊ नये, म्हणून ते पाण्यातून प्रवास करत आलं. 

चार शिपाई जमिनीवर कोसळले होते. हे काहीतरी वेगळं आहे, हे विरसेन समजून चुकले होते. त्यांची तलवार त्यांनी उगारली, आणि सपासप चालवू लागले. त्या प्रेत-मानवांना आपण संपवू शकत नाही, हे त्यांना महिती होते. पण काहीतरी मदत येई पर्यंत आपल्याला तग धरून राहावे लागणार आहे, हे ही त्यांना ठाऊक होते. एका शिपायास त्याने इशारा करून महालाकडे मदतीसाठी पाठवले. आता नुकतीच मेलेली प्रेतं ही उठून लढू लागली. विरसेन आणि शिपाई संख्येने आणि बळाने कमी व्हायला लागले. 

हवेत एकामागून एक असे दहा-बारा अग्निबाण सुटले. सगळी कडे एकच अग्नीतांडव झाले. अनंत आणि अजून आलेल्या काही घोडेस्वारांनी विरसेन आणि जिवंत असलेल्या शिपायांना घोड्यांवर वरचेवर उचलले आणि वाऱ्याच्या वेगाने तिथून निघाले. वसुंधरा बाणांचा वर्षाव थांबवत नव्हती. ती प्रेत-मानवे अर्धवट जळू लागली खरी. पण त्यांच्या समोर आपला जास्त टिकाव लागणार नाही,हे ही वसुंधरेने ओळखले. घोड्याला टाच देत तीही तिथून निघाली. जाताना आपल्या भाल्याने त्या प्रेत-मानवांच्या भवती एक रिंगण आखून गेली. 

महालाची दारे उघडली गेली. सहा-सात शिपाई आणि विरसेन आत आले. वसुंधरा देखील आली. एवढा मोठा प्रकार झाला, तरी नगरात कोणाला काहीच कळले नव्हते. सगळे काही मायेच्या अधीन होते. महाराज घाई-घाईने बाहेर आले. ते शिपाई आणि विरसेनला बघून ते जास्त गोंधळले. 

"महाराज, या न त्या मार्गाने तो नगरात येऊ पहातो आहे. त्याचा 'हा' प्रवेश खूप घातक होता. ना ना विद्या त्याला येतात. आणि त्याला अधिक बलवान बनवतात ते प्रवृत्तीचे , अधर्माचे देव." 

रात्र तणावात गेली. महाराणी आणि युवराजांच्या दालनाकडे कोणी फिरकले नाही.त्यांना कल्पना पण नव्हती. 

सकाळी राजज्योतिषाने सगळ्यांना बोलावले. 

" येणारे सूर्यग्रहण हे अत्यंत वेगळे आहे. चंद्राचा आकार नियमित ,अमावस्येच्या चंद्रापेक्षा मोठा आहे. या योग युगांत येतो. सूर्य असून देखील त्याची शक्ती काही काळापुरती क्षीण झालेली असेल, आणि दिवसा सुद्धा रात्र असल्याचं जाणवेल. त्या काळात देवसमोरून उठू नये. कारण दुष्ट शक्ती अश्या किरणोत्सर्गी ऊर्जेची वर्षानुवर्षे वाट पहात असतात. त्यासाठी त्या बाहेर येतील. त्यांच्या वाटेत येणारा साधारण मनुष्य टिकू नाही शकत. आणि त्या काळात बळी जाणाऱ्याची मुक्ती अवघड आहे. शक्यतो घराबाहेर पडू नये. गरोदर, आजारी, मनाने कमकुवत, लहान मुले, यांनी तर नाहीच नाही. "

महाराजानी नगरात तशी दवंडी द्यायला लावली. 

"कालचा प्रकार ही अंधारातच घडला. सूर्यप्रकाशात काल जन्माला आलेली सगळी प्रेत-सेना जाळून राख झाली. आपलेच सैन्य होते. " वसुंधरेने जमेलेल्यांना सांगितले. नगरात जागोजाग उमटलेल्या खुणा कोणाच्या लक्षात नाही आल्या. 

अजून दोन दिवस उरले होते. युवराज आपल्या कक्षात होते. वसुंधरा त्यांना जाऊन एकदा पाहून आली. 

त्यानंतर ती आपल्या कक्षात आली. थकवा आला होता. ती पलंगावर पडली. तिचा डोळा लागला आणि क्षणात ती स्वप्नात गेली. एका निर्जन स्थानावर ती एकटीच उभी होती. एक पडका किल्ला असावा तो. रात्रीचा किरर्र अंधार. पौर्णिमा असल्याने तो उजेड होता तेवढाच. काही काळ्या सावल्या तिच्या आजूबाजूला हळूहळू तयार होत होत्या. त्या शांत होत्या. पण चांगल्या नव्हत्या. त्यात एक सावली मोठी होती. ती वसुंधरेच्या खूप जवळ आली. 

"वसुंधरे, जिवाची पर्वा न करता, तू लढतेस, जिंकतेस, कोणासाठी हे सगळं?" ती सावली बोलू लागली. " ते तुला नाही कळणार. हे फक्त मानवास कळू शकेल." वसुंधरा ही तितक्याच कणखरपणे म्हणाली. " मनुष्य...!" ती सावली हसू लागली. " तुला सांगतो, ते ऐक माझं. ही माझी सुरवात आहे. पुढे शेकडो वर्षांनी प्रत्येक मनावर माझेच राज्य असणार आहे. अनीती, अधर्म , कपट, छळ, लोभ, मत्सर, वासना, हे सगळे माझे दूत बनून प्रत्येक माणसात थोड्याफार प्रमाणात रहातील. त्यातून अक्षम्य अपराध घडतील. माणूस म्हणून घेताना माणसाला लाज वाटेल. तू उगाच आपली शक्ती वाया घालवते आहेस. मगध चे पतन म्हणजे माझ्या अधिपत्याची सुरवात आहे." 

" असेल, पण एक लक्षात ठेव. तुझे आयुष्य खूप कमी आहे. कारण तू कपटी आहेस. 

समोरासमोर तुला धर्माशी युद्ध नाही करता येणार."

" असे युद्ध मुळात आयुधांनी नसते लढता येत." एवढे बोलून त्याने तिच्या समोर एक वलय तयार केले. त्यात तिला स्मशानात जळणाऱ्या चिता दिसल्या, बाजूला आक्रोश करणारे नगरजन दिसले. नंतर तिला एका घरात स्त्रीस मारहाण करणारा एक इसम दिसला. ती स्त्री अत्यंत दयनीय अवस्थेत होती. लहान मुले भीक मागताना नगरात दारोदार फिरत होती. त्यांना प्रत्येक दारात अपमान, अवहेलना मिळत होती. रात्री अंधारात काही टवाळ एका स्त्रीच्या अब्रूच्या मागे लांडग्यांसारखे लागले होते. एक सावकार एक गरीब माणसास चाबकाने बडवित होता. जागो जागी व्यभिचार, अत्याचार फोफावत होता. एका मंदिरात देव बंदिस्त होता. मंदिरास कळा आली होती. न झाडलोट, न दिवा. संपूर्ण नगरावर काळे ढग जमा झाले होते. महालाच्या बाहेरची बाग पूर्ण सुकून कोमेजली होती. शिपाई आळशी, आजारी झाले होते.

"हे चित्रसेंचे राज्य आहे. नीट बघ. तुझा बळी गेल्यावर हे सगळे सत्य होईल."

" तुझे हे स्वप्न ,जो पर्यंत देव आणि धर्म आहेत, तो पर्यंत शक्य नाही. तू माणसाच्या मतीवर राज्य करतोस, पण ही श्रुष्टी ज्याने बनवली आहे, त्याचे अधिपत्य सवश्रुत आहे. प्रत्येक युगात त्याचे पूर्ण अवतार, त्याचे अंश असतात. आणी तेच तुझ्यासारख्याला रोखतात , निःपात करतात."

"वसुंधरा, तुझ्यात दैवी शक्ती आहे, पण तू मनुष्य आहेस. तुला सीमा आहेत. वयाच्या, शक्तीच्या. मला नाहीयेत. तू इहलोकी काही काळासाठी आलीयेस. आणि मी रोज नव्याने जन्माला येतो, एका माणसाच्या मतीत. माझे आयुष्य नाहीये. मी अमर आहे." जोर-जोरात हसत तो लुप्त झाला. वसुंधरा खाडकन स्वप्नातून बाहेर आली. जो जे सांगत होता, तेही खरंच होतं. 

रात्र आणि दिवस. भय मोकाट होते. कोणावर कोव्हाही हावी होत होते. प्रत्येकाच्या डोळ्याला काजळी आली होती. त्या रात्री घोड्यांवरून आलेले शिपाई आणि विरसेन यामुळे महालातून बऱ्याच गोष्टी नगरात गेल्या होत्या. चुलीपाशी चर्चा होत होती. आणि नेमकं हेच घातक होतं. ज्या गोष्टीचा सारखा सारखा विचार आणि चर्चा होत होती, त्या गोष्टीचे अस्तित्व तितकेच दृढ होत होते. मनात आणि डोक्यात त्या विचारांची जागा पक्की होत होती. 

काळवंडले. होम जसाच्या तसा सुरू होता. विरसेनच्या कक्षाबाहेर उभा असलेला पहारेकरी ,त्यांनी बोलावलं म्हणून आत गेला. आत मंद प्रकाश होता. पलंगावर विरसेन नव्हते. त्याने एकदा-दोनदा आवाज दिले. काहीच उत्तर आले नाही. त्याला संशय आला. सावध होऊन त्यांने पाऊल पुढे टाकले आणि त्याला धडकीच भरली. समोर विरसेन तर होते, पण प्रेत-मानवाच्या रूपात. तो ओरडून दुसऱ्याला बोलावणार , इतक्यात त्याची मान धडावेगळी झाली. अनंत विरसेनच्या प्रेत-मानवास सरळ महालात घेऊन आला होता. फक्त विरसेन होते ,की अन्य शिपाई सुद्धा ? आत्ता पर्यंत शत्रू फक्त रस्त्यावर काळ बनून मिरवत होता. आता तो महालात, अगदी जवळ येऊन ठेपला होता. 'त्याला' हेच हवे होते. मध्ये गेलेला शिपाई आजून बाहेर आला नाही म्हणून दुसरा शिपाई मध्ये गेला. त्याने पाहिलं. विरसेन आपल्या पलंगावर पहुडले होते. तो बाहेर आला. वसुंधरा चाणाक्ष होती. ज्या हळदीची रेष तिने मैदानातील त्या प्रेत-मानवांच्या भवती ओढली होती. तीच रेष तिने कोणाला कळणार नाही अशी विरसेनच्या कक्षाबाहेर ओढली होती. तिला संशय होता. आणि तो खरा झाला होता. महालात प्रत्येक कोपरा तिने असाच सुरक्षित करून ठेवला होता. होमात समिधा पडत होती तो पर्यंत त्याच्या धुराने सगळे आसमंत पवित्र होत होते. पण जिथे माणसाच्या आतले रक्त दूषित झाले, तिथे बाह्य प्रयोग उपयोगी पडत नव्हते. वसुंधरेस हे माहीत होते. आपल्या परीने ती तिचे कडे पक्के करीत होती. 

विरसेन जागे झाले होते. पण पलंगावर पडून होते. एक सारखे त्यांचे लक्ष उंबऱ्याकडे जात होते. ते कडे साधे नव्हते. ते तोडून बाहेर येणे, केवळ अशक्य होते. चकमकीतून परत आलेले सैनिक महालात जागो जागी असेच अडकून पडले होते. कोणी पागेत, तर कोणी सैनिकांच्या विश्रामगृहात. त्यांना त्यांची टोळी वाढवणे गरजेचे होते. 

पागेत एक घोडा पिसाळला. दावे तोडून सरळ मैदानातून पळू लागला. त्याला रोखणे अशक्य झाले. मशाली पडल्या, वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट तो तोडत बाहेर पडला आणि होमापासून काही अंतरावर येऊन थांबला. होमकडे वाकरदृष्टीने पाहू लागला. त्याचे खुर जमिनीवर त्याला टिकू देत नव्हते. कशाचीही पर्वा न करता तो एकदम धावू लागला. पण तेवढ्यात समोर अनंत आला. एवढ्या जोरात धावणाऱ्या घोड्याला त्याने बरोब्बर लगमाने खेचले. घोडा नेहमीपेक्षा जास्त बलवान वाटला. अनंतने त्याला ताब्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. या प्रयत्नात अनंत जमिनीवर पडला. घोड्याने आपले दोन्ही पाय उचलले आणि आनंतच्या छातीवर ते मारणार इतक्यात हवेतून एक भाला आनंतच्या हाती लागला, आणि त्याने तो कचकन घोड्याच्या मानेत टाकला. तडफड करत तो अजस्त्र देह जमिनीवर कोसळला. अनंत उठला. घोड्याची रक्तबंबाळ मान आपल्या हातात घेतली आणि धाय मोकलून रडू लागला. वसुंधरा आणि महाराज ही तिथे आले. 'वायू' असा निपचित पडलेला पाहून दोघांनाही भरून आले. अनंत चा घोडा वायू, लहानपणी महाराजांनी तो आनंतला दिला होता. थकल्यामुळे तो आता पागेत होता. 

"वसुंधरा, या गोष्टी आता काळजात हात घालून ते छिन्न करू लागल्या आहेत. सहन नाही होत हे. हे सगळे संपायला हवे, नाहीतर आम्ही तरी संपलो पाहिजे. !" वायू च्या जाण्याने पूर्ण महाल शोकात बुडाला. तिथेच अंगणात त्याला सन्मानाने अग्निडाग दिला गेला. पहाटे पहाटे अनंतने त्याच्या चितेला साक्षी मानून एक प्रण केला. सूड तर त्याला घ्यायचाच होता. कोणावर, हे अजून ठरायचे होते. 

वायू चा महालाच्या आवारात झालेला दाहसंस्कार खूप काही सांगून गेला. तैनात सेना घाबरू लागली. मनोधैर्य खचले की, ते बांधणे अवघड असते. एक राजा म्हणून महाराज प्रथमच एवढे हतबल झाले. अनंत आणि वसुंधरा सक्षम होते, पण त्यांना मार्ग सुचत नव्हता. वसुंधरेने अश्या वेळेस महालाबाहेर पडणे योग्य नव्हते, पण तिला जावे लागणार होते. 

"मला यायला काही काळ लागेल. पण मी येईन ती पूर्ण तयारी करूनच." तिच्या कक्षात अनंत आणि महाराज दोन्ही होते. 

"महाराज !" तिला एकदम गहिवरून आले आणि तिची नजर खाली गेली. महाराजांनी ओळखले की काहीतरी मोठे आव्हान समोर आहे. 

" विरसेन आता आपले राहिले नाहीयेत." हे ऐकून महाराज जागीच कोसळले. त्यांना आनंतनी सावरले. 

"हे सत्य आहे महाराज, नगरात झालेल्या चकमकीत विरसेन काही जखमा घेऊन आलेत."

" देता आलं, तर याचे प्रमाण दे वसुंधरा...!" कष्टी होऊन महाराज म्हणू लागले. 

तिघे विरसेन च्या कक्षाकडे निघाले. कक्षाच्या बाहेर तिने ओढलेली हळद तिने महाराजांना दाखवली.

"महाराज, त्यांना आवाज द्या !"

" विरसेन.." त्यांनी आवाज दिला. विरसेन निश्चल पडून राहिले. महाराजांनी प्रश्नार्थी वसुंधरेकडे पाहिले. 

तिने आपल्या कमरेची थोडी हळद बाहेरून कक्षात उधळली. 

अंगावर वीज पडल्यासारखे विरसेन ओरडले. दुसऱ्यांदा उधाण झाले तेव्हा ते उठून बसले.

त्यांचे ते नेहमीपेक्षा मोठे डोळे, जळल्यासारखे हात आणि वाढलेली नखे, बुबुळ नसलेले डोळे. सगळेच प्रचंड भयावह होते. महाराज त्यांच्या या रूपा कडे पाहून बेहद्द घाबरले. त्यांचा विश्वास नाही बसला स्वतःच्याच डोळ्यावर. 

" काहीही होणार नाही तुमच्याकडून. राजन, तुझी पुढची पिढी मी अशीच गिळून टाकेल. तू आणि ही वसुंधरा, असेच बघत रहाल."

" संपत आला आहे अध्याय तुझा ! "

" मूर्ख मुली. असाच प्रयत्न केला होता, या राजाच्या पूर्वजांनी. आणि आता फळं भोगतायेत. हा विरसेन, शूर वीर, पराक्रमी ! हा तर असा जाईलच. पण या राजाचा मुलगाही त्या शापाला बळी जाईल. सर्वत्र माझे राज्य येईल. अधर्म राज्य करेल." राक्षसी हसत ते पुन्हा झोपले. 

" सगळे संपले, आपण हरलो! " असे म्हणत महाराज मागे सरकुन चालू लागले. 

" महाराज, विरसेन जो पर्यंत महालात आहेत, तो पर्यंत ते वाचू शकतात. अजूनही...!" 

" वसुंधरे, तुला अजूनही वाटतं, की आपण या सगळ्यांशी लढू आणि जिंकू शकतो ? तू बघते आहेस ना हे ? याचे बळ, सामर्थ्य, याची शक्ती. "

" महाराज, हा फक्त आपल्या मनाशी खेळतोय. घाबरवतोय." 

पण महाराजांचे समाधान नाही झाले. तिने अनंत कडे पाहिले.

" महाराज, याला बळ मिळते आहे ते आपल्या भीतीने. आपल्या मनात भीतीने निर्माण झालेल्या पोकळीत हा स्वतःला भरत जातोय."

" होय महाराज, मैदानातल्या प्रेत-मानवा कडे पाहून विरसेन घाबरले आणि तो यांच्यांवर हावी झाला. वेळीच आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांना वाचवून आणले. त्यांच्यात अजूनही विरसेन चे बळ आहे. "

महाराज थांबले.

"काहीही करा...पण हे राज्य वाचवा. मी ही तुमच्या सोबत लढेन. प्राणांची बाजी लावा. एकतर त्याच्या विरुद्ध जिंकू, नाहीतर सगळेच या अग्निकुंडात स्वतःची आहुती देऊ. पण आता माघार घेणे नाही. श्वासात श्वास असे पर्यंत मगध या नराधमास घेऊ देणार नाही. " 

महाराज निघून गेले. त्यांचा निश्चय दोघांमध्ये बळ भरून गेला. महाराजांनी महालाच्या बाहेर येऊन सगळ्या शिपायांना बोलावले. होमाची रक्षा बागेतल्या तीन तलावांमध्ये टाकण्यात आली. प्रत्येक शिपायाला त्यात हात आणि तोंड धुवायला लावले. एका शिपायाने महाराजांना कानात येऊन काहीतरी सांगितले. त्यांच्या मागेमाग शिपायांची एक तुकडी गेली. आत्ता पर्यंत मुद्पाकखान्यात, पागेत, विश्रामगृहात ,सूर्यप्रकाशापासून स्वतःला वाचवत दडलेले ते प्रेत-मानव सैन्याने अक्षरशः बाहेर ओढत आणले. त्यांना एका जागी उभं करून तलावाच्या पाण्याने त्यांना अंघोळ घालण्यात आली. आधीच सूर्यप्रकाशामुळे ते जळू-भाजू लागले होते. त्यात होमाच्या रक्षेचे जणू अंगार त्यांच्यावर बरसू लागले. असाह्य वेदनेने ते ओरडू लागले. हलाहल लागल्यासारखे त्यांचे शरीर जळू लागले आणि शेवटी एक एक करून ते नष्ट झाले. 

हे सगळे पाहून झाल्यावर वसुंधरा अनंत ला घेऊन आपल्या कक्षात आली. ती एका भिंतीपाशी येऊन उभी राहिली. त्यावर लावलेल्या एका तासविरी ला स्पर्श केल्यावर ती तसबीर बाजूला सरकली आणि एक कप्पा दिसू लागला. त्यातील एक बाटली तिने त्याच्या हाती दिली. त्यात अमृताचा जल-बिंदू असलेले पाणी होते. " अगदीच जीव जायला लागला, की याचा वापर कर." एक बाणांनी भरलेला भाता बाहेर आला. " हे साधे बाण नाहीयेत. कोणत्याही अमानवी शक्तीवर हे चालतील. ही तळवारही तशीच आहे." तिने एक रत्नजडीत तलवार ही त्याला दिली. 

" आणि देवी तुम्ही ?" 

" आज आणि उद्या हा दुष्ट अध्याय संपवावा लागेल अनंत. ते एवढ्याने शक्य नाही." आपली थैलिही तिने त्याला दिली. " यात असलेली हळद महालाच्या प्रत्येक उंबरठ्यावर टाक." 

दोघेही घाई-घाईने यवराजांच्या कक्षात आले. अनंत च्या खांद्यावर आयुधे पाहून महाराणी चकित झाल्या. वसुंधरेने थोडीशी हळद युवराज आणि महाराणींना लावली. 

" वसुंधरे..!"

" महाराणी, काहीही होणार नाही. अधर्माचे आयुष्य काही काळापूर्ती." काही दास महादेवाची एक पिंड घेऊन कक्षात आले. " या समोरून हलू नका. दोघांनीही!" 

अनंतास काहीच सांगण्याची गरज नव्हती. 

आपल्या घोड्यावर मांड टाकून वसुंधरा निःशस्त्र महालाच्या बाहेर पडली. अनंतने एक नजर महालावर टाकली आणि कुलदेवीची स्मरण केले. जमा झालेले सैन्य , एका अज्ञात शत्रूशी पहिल्यांदा लढण्यास सज्ज झाले. 

महालात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. रात्री झोप कोणालाही येणार नव्हती. अनंतला जर अजिबातच नाही.  कोणावरही विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. सरळ गाठ मृत्यूशी होती. वसुंधरा महालातून गेल्यामुळे आणि विरसेन बाधित असल्यामुळे महाराजही हातात शस्त्र घेऊन उभे होते. विरसेनच्या कक्षाबाहेर सैन्य काही अंतरावर बाहेर उभे होते. आतून काहीच हालचाल होत नव्हती. सर्वत्र जहरी तणाव होता. 

एक टांगा येऊन महालाच्या बाहेर उभा राहिला. त्यातून युवराज खाली उतरले पहाताच सैनिकांच्या माना खाली गेल्या. सैनिकांकडे एक कटाक्ष टाकून युवराज महालातल्या मुख्य प्रवेशदारातून आत आले. तर कोणाशीही काहीही बोलले नाहीत. बागेतल्या दारापाशी येऊन ते थांबले. मागे चार शिपाई उभे होते. त्यांच्याही माना खालीच होत्या. त्यापैकी एकाची नजर जमिनीवर फिरत होती. मशाली फडफडत होत्या.    सहज लक्ष गेलं त्याचं. युवराजांची सावली पडत नव्हती. शिपायाने नजरेने दुसऱ्याला खुणावले. त्या चौघांनाही दरदरून घाम फुटला. हे युवराजांच्या लक्षात आले. ते क्षणभर थांबले. त्यांनी मागे वाळूनही पाहिले नाही. शिपाई जागच्या जागी खिळले. त्यांची वाचा बसली. त्यांना हलताही येईना. ते गोठले. 

बागेत होम सुरू होता. युवराजांना तो पार करून जाणे शक्यच नव्हते. होमाच्या पवित्र अस्तित्वाने त्यांचे पाय तिथेच थबकले. इथे मशाली कमी होत्या. देवडीतल्या मशाली त्यांनी मायेने विजवल्या. आणि तिथेच थांबले. इथून पुढे अवघड होते. समोरून एक शिपाई चालत आला. तो देवडीत गेला. अंधारात काहितरी घडले. तो शिपाई पुन्हा बाहेर आला. पण त्याचा चेहरा पूर्ण झाकलेला होता. कोणत्याही इंद्रियाला धुराचा स्पर्श होणार नाही, याची पूर्ण खात्री करून तो चालू लागला. एक सुरक्षित अंतर त्याने ठेवले. 

शेवटी तो होमाच्या वलयाच्या बाहेर आला. बरेच दिवस सुरू असलेला होम, आता थोडासा कमी झाला होता. त्याची शक्ती क्षिण होत आली होती. तेच फावले. पुढे गेल्यावर त्या शिपायाचे प्रेत एका ठिकाणी लपवून युवराज महालाच्या अंतःपुराच्या दारात उभे राहिले.  उंबऱ्यातून एक पाऊल पूढे टाकताच. त्यांची पाऊले भाजली. वसुंधरेने ही व्यवसाथ आधीच करून ठेवली होती. कदाचित तिला कपट होईल याची जाणीव होती. युवराज खाली वाकले. रात्र असल्यामुळे या बोळीत मशाली आणि वर्दळ कमी होती. यवराज खाली वाकले. उंबऱ्याकडे बघून त्यांनी एक फुंकर घातली. हळद उडू लागली. असंख्य पाऊले पडली होती तिच्यावर. एक पाऊल टाकता येईल एवढी जागा तयार झाली. यवराज आत आले खरे. पण जमिनीवर एकही पाऊल त्यांनी टाकले नाही. ते जळू शकत होते. ते पुढे सरकू लागले. विरसेनच्या कक्षाबाहेर ते उभे राहिले. जवळ एक कारंजा त्यांना दिसला. कारंजात पाणी खळखळत होते. मायेने ते पाणी त्यांनी जमिनीवर घेतले, आणि विरसेनच्या कक्षाबाहेर असलेली हळद धुवून निघाली. सगळीकडे पाणीच पाणी झाले.  

"उठ, तू मोकळा आहेस. बाहेर ये, पण पाय जमिनीवर टेकवु नकोस ,नाहीतर जळून राख होईल तुझी." 


इकडे यवराज शांत झोपलेले होते. महाराणी ही बाजूला होत्याच. महाल जास्तीत जास्त दिसेल अश्या ठिकाणी अनंत उभा होता. तो एक पट्टीचा धनुर्धर होता. तिथून तो बरोबर वेध घेऊ शकत होता. कोणाचाही आवाज सहज जाऊ शकेल अशीच ती जागा होती. 

विरसेन उठले. निर्विकार चेहरा. न भय, न चिंता, न मृत्यूची भिती. त्यांच्यातील मूळ विरसेन  'त्याच्या ' आधीन होते. त्यांनी आपली तलवार घेतली आणि ते ही अधांतरी चालू लागले. कक्षाच्या बाहेर आले. आणि एका वारात त्यांनी युवराजांचे शिर धडावेगळे केले. जमिनीवर पडलेले शीर उचलून ते चालु लागले , ते थेट मूळ यवराजांच्या कक्षाबाहेर आले. दारात उभे राहून त्यांनी ते शिर हवेत धरले आणि हसू लागले. ते मायावी आणि राक्षसी हास्य फक्त महाराणींना ऐकू आलं. त्या बाहेर येऊन पाहू लागल्या. विरसेन त्यांना दिसला. ते दृश्य पाहून महाराणी उंबर्यावर जागीच कोसळल्या. विरसेनने त्यांना ओलांडले. पाण्याच्या एक फवाऱ्याने हळद धुतली गेली. दारातून आत जाणार एवढ्यात मागून सपसप करीत एक बाण त्यांच्या पाठीत घुसला. ते थांबले. त्यांच्या मागे थोड्या अंतरावर प्रत्यनचा ओढत अनंत उभा होता. त्याच्या जागेवरून अनंतने सगळे पाहिले होते आणि तो वर आला. 

"तू...तू रोखणार मला...!" 

"हो...!" 

" कोण आहेस कोण तू...? एक साधारण शिपाई, एक सैनिक? एक मनुष्य, कमजोर, परावलंबी, निर्बल...?" आणि ते हसू लागले. " काहीही असलो, तरी तुम्हाला मध्ये नाही जाऊ देणार." अनंतने धनुष्य खांद्याला लावला, आणि तलवार उपसली. 

शांत असलेले विरसेन आता कात टाकू लागले. त्यांच्या असलेला तो पूर्ण जागा होऊ लागला. एक एक अवयव पेटावे तसे काळे-निळे पडू लागले. डोळे आत जाऊ लागले. त्यांनी एक कटाक्ष अनंत वर टाकला. अनंत एखादा झटका लागल्यासारखा धाडकन बाजूच्या खांबावर फेकला गेला. तरीही तलवार सुटली नाही. युवराजांच्या कक्षापासून लांब होत आता विरसेन ने आनंतकडे मोर्चा वळवला. जाताना आजूबाजूचे तबक, फुलदाण्या, भिंतीला टांगलेले भाले, ढाली त्यांनि अनंतला मारून फेकले. त्यातील बरेचशे हत्यारं अनंतने टाळले. जमिनीवर पडलेला भाता आणि धनुष्य उचलून अनंतने पुन्हा बाण सोडण्यास सुरवात केली. विरसेनच्या हातात, पायात आणि खांद्यावर तीन बाण लागले. पण त्याने काहीही फरक पडला नाही. विरसेन जवळजवळ येऊ लागले. त्यांचे रूप जास्तच विक्राळ होऊ लागले. महालातून येणारे आवाज आता खाली जाऊ लागले. महाराज आणि काही सैनिक खालून वर येऊ लागले. समोर येताच विरसेनचे ते विक्राळ स्वरूप पाहून महाराज अवाक झाले. त्यांचे मागे उभे असलेले सैनिक विरसेनच्या अंगावर जाऊ लागले. 

" थांबा!" बऱ्याचशा जखमा झालेला अनंत एकदम ओरडला. महाराज आणि सैनिक थांबले. "महाराज, विरसेंनांना आता स्पर्श करता येणार नाही. जर कोणी स्पर्श केला तर तोही प्रेत-मानव होईल आणि यांनाच बळ मिळेल." एका शिपाई ताबडतोब जाऊन काही चांगले धनुर्धर घेऊन आला. विरसेन वर बाणांचा वर्षाव होऊ लागला. बरेचशे बाण लागल्याने त्यांचे शरीर जड होऊन त्यांचा वेग कमी होऊ लागला. पण ते थांबत नव्हते. त्यांच्यात आणि युवराजांच्या कक्षात आता अंतर वाढले हे कळल्यावर अत्यंत सावधपणे काही शिपायांनी महारांनीना आत नेले. एक मोठी लोखंडी फळी आणून कक्षास सुरक्षित करण्यात आले. विरसेंनांना अंतराने वेढा पडला. 

"बस कर, तुझा हा पाशवी खेळ आता बंद कर. विरसेनला सोड आणि इथून निघून जा." महाराजांनी आज्ञा केली. 

तसे विरसेन च्या आत असलेला तो जोरजोरात हसू लागला. 

" राजन, मूर्ख आहात तुम्ही. तुम्हाला काय वाटलं, वसुंधरा, हा अनंत मिळून तुम्ही माझ्या अफाट शक्तीला आव्हान देऊ शकाल ?" 

"हो, एकदा तू विरसेनला सोड, आणि बघ त्याचे सामर्थ्य." महाराज पुन्हा गडगडले. 

" राजन!" विरसेन जोरात ओरडले. " किती अंधारात आहात तुम्ही. तुम्हाला काय वाटलं? का आम्ही युवराजांच्या मागे लागलो ? का त्यांचा रुपी इथे बसवला ? तुमचा महाल, एवढा सुरक्षित, इतकी बलशाली, शूर सेना तुमची, हा अनंत ! यांच्या निगराणीतुन युवराजांना वनातून पळवले कसे ?"

" काय म्हणायचं आहे, स्पष्ट बोल." महाराज रागावू लागले. 

" राजन, ज्या वृत्ती विरुद्ध तुम्ही , वसुंधरा , अनंत आणि ही तुमची सेना लढत आहात ना, तिचा जन्म तुमच्यात महालात झाला आहे."

"काय? " महाराज अचंबित झाले.

" हो, हा विरसेन, तुमचा सख्खा भाऊ ! तोच तुमच्या वंशाला समाप्त करण्यास आम्हाला प्रवृत्त करत आलाय."

" खोटं आहे हे. साफ खोटं ! तू वितुष्टता निर्माण करतो आहेस. खबरदार..!" महाराजांनी एक शिपायाकडून तलवार हिसकावून घेतली. तो राक्षसी हसू लागला. " महाराज, तुम्ही विसरलात, या ...याच महालाच्या खाली मी युवराजांवर अमानवी विद्येचा प्रयोग करत होतो. जर तो प्रयोग फसला नसता, तर आज विरसेनच्या, म्हणजे माझ्या जागी चित्रसेंन असते. जन्मभर ते खाली ,त्या तळघरात खितपत पडले असते, आणि त्यांच्या रूपात असलेल्या त्या काळाने एक एक करून सगळे नगर अधर्माच्या अधिपत्याखाली घेतले असते." महाराज, अनंत आणि सगळे सैनिक हे ऐकत होते. 

" तुम्ही संपले असता, आणि मी या राज्याचा अघोषित राजा, सम्राट झालो असतो. आजन्म...!" 

" नाही, विरसेन...तू..?"

" राजन, सत्ता काहीही करण्यास भाग पाडते. वसुंधरेच्या दिव्य दृष्टीने दिसले नसते, तर कोणाला त्या अमानवी युवराजांचा संशय सुद्धा आला नसता. पण...!" ते एकदम थांबले. " आमचा सगळा प्रयत्न तिने फसवला. खऱ्या युवराजांना ती सोडवून घेऊन आली, आणि मला काहीच नाही करता आले. आणि म्हणून, मी विरसेनलाच आपले बाहुले केले. एक एक करून राजपरिवाराचा नाश करूनच मगध वर अधर्माचे सत्ता स्थापन होणार असेल, तर तेही उत्तम !"

" नाही, आम्ही असे पर्यंत हे शक्य नाही." तो पर्यंत विरसेन पुढे सरकले. त्यांच्यात असलेली ती दुष्ट शक्ती पूर्ण जागृत झाली. अनंत ने शिपायांना इशारा केला. खिळे असलेले एक जाडसर दोरखंड विरसेन वर टाकले गेले. त्यातले खिळे त्यांच्या हातापायात रुतले आणि त्यांना हलता येईना. हालचाल बंद झाल्याने ते जास्त चवताळले. जोर-जोरात ओरडू लागले. स्वतःला सोडवू लागले. पण काही अंतरावरून शिपायांनी त्यांच्या पायांत भाले अडकवले. अनंतने वसुंधरेने दिलेले तीन बाण एका मागून एक त्यांच्यावर चालवले, आणि त्यांची गती मंदावली. ते जमिनीवर कोसळले. 

त्यांना फरफटत पायऱ्यांवरून घेऊन जाताना अजून जास्त सैन्य बळ लागले. महालाच्या आवारात मोठी खळबळ उडाली. विरसेनची अशी गती पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. 

" अरे मूर्खांनो, तुम्हाला अजून समजत नाहीये." पूर्ण अडकलेले विरसेन फरफट होत असताना बोलू लागले. " माझे जे व्हायचे ते होईल, पण तुमचाही अंत निश्चित आहेच. मला संपवून तुम्ही राजपरिवाराचे अंताची सुरवात करता आहात. ती तेव्हाही होती, ती आजही आहे." आवाराच्या मध्यावर त्यांना बांधले गेले. महाराज समोर आले. " विरसेन, तुमच्यात इतके कपट असेल, असे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. राजघराण्याचे पवित्र रक्त असून तुम्ही छळ केलात."

" त्याच कपट करण्याने एक दिवस मी मगध चा राजा झालो असतो."

" नाही, ते आम्ही होऊ देणार नाहीच!" 

" राजन, तुम्ही विसरलात, तुमच्या या राजघराण्याला शाप आहे, आणि तुमच्या लोकांच्या मनातील वाईट प्रवृत्ती, त्या शापाची शक्ती वाढवत आहे. विरसेन चा बळी घेऊन तुम्ही जिंकलात असे समजू नका ! ही सुरवात आहे, अंत इथून आपले काम सुरू करेल, नायनाट होईल तुमचा." महाराज मागे सरकले. त्यांचे डोळे भरून आले. विरसेन त्यांचा भाऊ होता. तो शूर होता, वीर होता. एक चांगला सेनापती होता. 

" विरसेन, तुम्ही पाठचे भाऊ होता आमचे. लाडके. अर्धे ऐश्वर्य, अर्धे राज्य तुमचे होते. तुम्ही चुकलात. घात केलात तुम्ही. तुमच्या प्रवृत्तीमुळे तुम्ही दुष्ट शक्तींना आपलेसे केलेत आणि ...!" महाराज खूपच भावूक झाले. सैनिकांना ही वाईट वाटले. 

" अनंत...!" महाराजांनी इशार्यांनी आज्ञा केली. होमाच्या अग्नीत आत्ता पर्यंत तापवलेला बाण अनंतने मोठ्या कष्टाने आपल्या आवडत्या विरावर सोडला. त्याचेही डोळे भरून आले. तो बाण विरसेनच्या छातीत अर्धा गेला. तिथून दाह निघू लागला. विरसेन जोरात ओरडू लागले. कळवळू लागले. दुसरा बाण ही तसाच त्यांच्या गळ्यात घुसला. त्यांचे शरीर जळू लागले. जखमांमधून काळा धूर आकाशात उडू लागला. हळू-हळू त्यांच्या शरीराची राख खाली पडू लागली. काही वेळात फक्त राख जमिनीवर पसरली. भरल्या डोळ्याने त्या वीराला नमन मात्र सगळ्यांनी केले. ते त्याच्या विरतेला होते. पहात व्हायला वेळ होती.


मती मलित झाल्याने विरसेनच्या अंत झाला. महाराजांनी ही बातमी अत्यंत खेदाने महाराणींना सांगितली. विरसेनच्या मृत्यू मुळे महालात देव-धर्म सूतकात गेले. अख्खे नगर शोक करू लागले. त्याचा मृत्यू आणि मृत्यूचे कारणही भयभीत करणारे होते. 

"कोणावर ठेवावा विश्वास ? क्षणांत विरसेन ने होत्याचे नव्हते केले!" महाराज ही बातमी द्यायला आणि सावध करण्यास युवराजांच्या कक्षात आले. 

"सत्तेचा लोभ आला की नाती-नीती सगळं काही मातीमोल ठरतं." महाराणी आता जरा जास्तच घाबरल्या. "तुम्ही युवराजांना क्षणभरही एकटे सोडू नका." एवढे सांगून महाराज जाऊ लागले. जाताना त्यांनी शांत झोपलेल्या युवराजांकडे एक नजर टाकली. महाल असुरक्षित झाला होता. वसुंधरेने केलेली तयारी विस्कळीत झाली होती. खाली येता येता महाराजांना अनंत दिसला. रात्रभर लढून त्याचे शिपाई ही थकले होते. त्यांना देखील नगरात आपल्या परिवाराची चिंता लागून होती. अनंत चे परिश्रम आणि त्याचे बळ महाराजांना ठाऊक होते. अथक लढत राहिला होता. त्यांना त्याच्यात विरसेन दिसू लागला. पण पुन्हा त्यांनी स्वतःच्या भावनांना आवर घातला. विश्वास ठेवावा का कुणावर ? प्रश्न राजपरिवाराचा नव्हता. प्रश्न होता तो राज्याचा. त्यांना असेही वाटू लागले, की मगध आपल्या हातून हळूहळू निसटत जातंय. त्या अधर्मी शक्तीपूढे आपण कमी पडतोय.  पण लढावे तर लागणार होते. राज्य सोडून नगरजन आणि आपण निघून जावे का ? निदान लोकांचे, लहान मुलांचे प्राण तरी वाचतील ! पुढचा शोक टळेल. राज्य पुन्हा उभे राहिल, पण लोक अधर्मा कडे वळले, तर पुन्हा धर्म राज्य शक्य नाही होणार. अश्या अनेक विचारांनी ग्रस्त महाराज पूर्वेकडे पाहू लागले. वसुंधरेचा काहीच पत्ता नव्हता. अश्यात ती हवी होती. अनंतला मदत झाली असती.दिव्यदृष्टीने वसुंधरेस कळले विरसेन ची गत कळली. पण वाईट वाटण्याव्यतिरिक्त तिला काहीच करता आले. तिच्या गुरूंनी तिला सगळं काही सांगितले. 

" वसुंधरा, जे झालं, त्यात प्रारब्धाने आपली भूमिका बजावली. वृत्ती फक्त निमित्त मात्र. हे असेच सुरू राहील, पुढे याचा प्रभाव वाढेल. तू, मगध, अनंत, महाराज, सगळं-सगळं संपेल. प्रत्येक पिढीत, युगात कोणीतरी येऊन आपले कर्तव्ये पूर्ण करून जाईन. वसुंधरेने ध्यान लावले. गुरूंनी तिला तिच्यातील विशेष शक्ती आणि ज्ञान दिले. सगळी शास्त्रे शिकवली. " तुझा त्याग मगध कधीही न विसरावे हीच सदिच्छा." वसुंधरेने डोळे पाणावले. ती तिची आणि तिच्या गुरुची शेवटची भेट होती. सगळे आत्मज्ञान तिला दिल्यावर त्या अज्ञातवासात जाणार होत्या. " तुला लवकरच इथे यावे लागेल. इथे येऊन असंख्य गरजूंची मदत तुला करायची आहे. तू आज लढते आहेस, तशी असंख्य युद्धे कळत-नकळतपणे जे लढतायेत, त्यांचा आधार आता तू आहेस. हे बघ, काही वेळाने ग्रहण लागेल. हे ग्रहण म्हणजे दुष्ट शक्तीना एक कुंभासारखे आहे. सूर्याचे तेज असून सुद्धा ते नकारात्मक असेल. त्या तेजात ते दिवसाही ही प्रबळ असतील. ग्रहण काळातच त्यांना नष्ट केले पाहिजे. ते कसे करायचे, हे तुला माहीत आहे. पण सावध रहा. त्याची माया, कपट, शक्ती, ही ग्राहणात प्रचंड वाढली असेल. कारण तो दिवस ही त्यांचा आणि रात्रही त्यांची असेल. आपली शक्ती जपून वापर, बळ जपून वापर. " गुरूंनी डोळे झाकले. वसुंधरेने त्यांना नमस्कार केला आणि ती निघाली. 

आज ग्रहण...! कित्येक वर्षाने हा योग आला. राजपुरोहित आज खूप असमर्थ होते. विरसेन च्या सुतकातुन अजून सुटका नव्हती झाली. देवास स्पर्श करणे वर्ज होते. होमात समिधा टाकणे सुद्धा अशक्य होते. कारण भूमी सुतकी होती. "महाराज, होम आणि इतर सामग्री आपण नगरातील मुख्य चौकात हलवला असता. पण त्याने महाल आणि युवराज जास्त असुरक्षित होतील. ग्रहण योग सुरू झाले आहेत."

" गुरुदेव, तुम्ही नगरातील मुख्य चौकात होमाच्या तयारीला लागा. राजमहालापेक्षा राज्य जास्त महत्वाचे आहे." आज्ञेनुसार महालाच्या बाहेर असलेली सगळी सामग्री हलली. नगराच्या मुख्य चौकात पहिली बैलगाडी दाखल झाली. बैलं पुढे जाईनात. वाहकाला काहीच कळले नाही. त्याला बैलांना मारण्यास परवानगी नव्हती. प्रत्येक गाडीवानाला सक्त ताकीद होती. काहीही झाले तरी गाडीच्या खाली उतरायचे नाही. पहिला थांबल्याने सगळेच थांबले. अचानक महालातून इतक्या भरलेल्या गाड्या यायला लागल्याने नगरजन मदतीस यायला सुरुवात झाली होती. हळूहळू झाडाच्या फांद्या वाकू लागल्या. झाडांवर होणारी हालचाल नियमित नव्हती. सगळे सावध होऊन बघू लागले. अचानक कुठून तरी शेकडो कावळे आणि गिधाडं आली. बैलांना, गाडीवानांना अत्यंत क्रूर पणे टोचू लागली. त्यांच्या पंखांनाही धार असल्यासारखे वाटत होते. ज्यांच्या कडे हत्यारं होती, ते ती वापरू लागलीत. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. काही बैल सैरभैर होऊन धावू लागले. नगरातील घरांत, वाड्यात, घुसू लागले. त्यांना उघड्या अंगावर जखम होऊ लागल्या. काही घायाळ होऊन जीव सोडू लागली. एकच हलकल्लोळ मजला. समिधेनी, सामग्रीने भरलेल्या गाड्या भरकटू लागल्या. समिधा मातीमोल होऊ लागली. काही वेळात ३ मेलेले बैल, अनेक अर्धी जखमी माणसं, पसरलेली समिधा आणि होमाची सामग्री, असं सगळं त्या चौकात दिसू लागलं. ज्या घरची माणसं जखमी पडली होती, ते घरात आकांत करत ओरडू लागले. मदतीला यायला सुद्धा कोणाला झाले नाही. ते कावळे आणि गिधाडं प्रत्येक घराबाहेर आ वासून सावज शोधत होते. प्रत्येकाच्या चोचीत तोडलेल्या लाचक्यांचे तुकडे होतेच त्यातुन रक्त बाहेर निथळत होतं. त्यांची नजर जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेल्या बैलांवर होती. प्रत्येक बैलांवर गिधाडे घिरट्या घालत होती. थोड्या वेळाने , एकाच वेळेस, एखादा इशारा मिळावा तशी ती गिधाडे बैलांवर तुटून पडली. सहा बैल अत्यंत क्रूरतेने मारले गेले. 

हा एक जळजळीत संदेश होता. ग्रहणाचा दिवस यांचा होता, हे नगरजनांना कळण्यासाठी सहा बैलांना आपला जीव गमवावा लागला.

राजपुरोहित आपल्या लव्याजम्या सह चौकात येत होते. दुरूनच त्यांना काही जखमी माणसं आणि शिपाई येताना दिसू लागले. ते ताबडतोब सावध झाले. शिपायांनी तलवारी उपसल्या आणि पुढे सरसावले. पण खरी परिस्थिती काही वेगळी होती. त्यांना सगळी स्थिती समजली आणि त्यांनी घोडे वळवले. रक्ताला चटावलेली गिधाडं या जखमी लोकांच्या मागे हळूहळू ,लपत छपत येत होती. आणि अचानक त्यांचा एक थवा आक्रमक होऊन उडू लागला. जमेल त्या जागी ते सगळे धावू लागले.

" घोडे सोडा, त्यांना त्यांचं धावू द्या." राजपुरोहितांनी आज्ञा केली. घोडे मोकळे झाले आणि जीव वाचवत इकडून तिकडून पळू लागले. राजपुरोहित आणि त्यांची माणसं जमेल तिथे लपली. जी सापडली ती सावज बनली. एका घरात राजपुरोहित जाऊन लपले. त्या घरात आधीच काही माणसं भयभीत होऊन लपली होती. घराबाहेर त्या क्रूर पाखरांची घेराबंदी होती. घोडे नगरभर धावत होते. काही वेळात पावभर नगर त्या पाखरांची काबीज केलं. माणसं मारू लागली. जखमींची स्थिती त्यापेक्षाही भयाण होती. मदतीस जाता येत नव्हते. त्याने नगरवासीयांना आपल्याच घरात कैद केले. बाहेर मृत्यूचे थैमान सुरू झाले. राजपुरोहितांनी आकाशाकडे पाहिले. अजून तर ग्रहणाचे वेध सुदधा नव्हते लागले, आणि ही गत होती. काही घोडे महालाच्या दिशेने पळत होते. 

राजपुरोहित काळजीत पडले. महालात जर हे शिरले तर सगळंच संपेल. देवाचा धावा करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. 

सुसाट वेगाने ते घोडे रस्त्यावर धावत होते. आडव्या येणाऱ्या मानव जनावरांची गत दयनीय होत होती. महाल दृष्टीत आला.  माणसांपेक्षा मुकी जनावरं घातक वाटत होती. अचानक काही सैनिक हातात पेटत्या मशाली घेऊन रस्त्याला उभे राहिले. त्यांच्या हातातील मशाली पाहून घोड्यांनी आपली वाट बदलली. ते आता वेगळ्या मार्गाने पळू लागले. पण लवकरच ते गिधाडांच्या तावडीत सापडले आणि त्यांचे ही लचके तोडले गेले. 

होम होणार होता त्या चौकात आता शांतात पसरली. घराघरावर ती विक्राळ श्वापदे बसली होती. राजपुरोहित थोड्याच अंतरावर धावा करीत बसले होते. 

"पाहिलंत का , राजपुरोहित. किती किरकोळ आहात तुम्ही ! माझी पाखरं नुसती अंगावर आली, तर तुमचं बाहेर निघणं बंद झालं. ही पाखरं तुमच्या सारखी पळपूटी नाहीयेत....!" आणि तो राक्षसी हसू लागला. घरातून , खिडकीतून प्रत्येकाने बघण्याचा प्रयत्न केला. कोणाला काहीच दिसले नाही. 

" काय वाटलं तुम्हाला राजपुरोहित, तुम्ही होम-यज्ञ कराल, आणि मी काहीच करणार नाही. मूर्ख आहात तुम्ही ! तुम्हाला कळत नाहीये, अंदाज नाहीये माझ्या अफाट शक्तीचा. या नागरीच्या एक-एक माणसाला, स्त्रीला, बालकाला मी अधर्माचे आधीन आणेन. पिसाळतील ही माणसं. ग्रासतील षडरिपुनी, तुमचा देव, धर्म, माणुसकी, सगळं सगळं संपेल." 

" ते कधीही शक्य होणार नाही...!" राजपुरोहित मधूनच ओरडले. " जास्त काळ तू तुझी दुष्ट माया नाही चालवू शकत. मूर्खां, तू जो कोणी आहेस, नीट ऐक. तुझी सत्ता प्रेतावर चालू शकते, देवावर नाही. आमची जी गत होईल, ती होईल. राज्यही मिळेल तुला, पण लक्षात ठेव, या सुष्टीचा निर्माता भगवंत आहे. तो तुझा नायनाट करेल म्हणजे करेल."

ज्या घरात राजपुरोहित लपलेले होते, त्याच्या बाहेर काही मोठी गिधाडं जाऊन बसली. घरातील लोक घाबरले. त्यात एक लहान मुलगा ही होता. 

" राजपुरोहित, बाहेर या. नाहीतर त्या घरातील सगळ्या लोकांच्या मृत्यूस तुम्ही कारणीभूत ठराल." ती गिधाडं जोरजोरात दारं-खिडक्या वाजवू लागली. पिसाळली होती. त्या घरातील मुख्य दोन माणसं कोयता आणि कुऱ्हाड घेऊन जाऊ लागली. " थांबा, आता त्याने काहीच नाही होणार."

" नाही गुरुदेव, राज्याला, राजाला तुमची गरज आहे. तुम्ही बाहेर जाऊ नका...आम्ही बघतो काय करायचं..!" 

" तुमच्या कडून शक्य नाही होणार. उगाच जीव धोक्यात नका घालू. या उलट मागच्या दाराने जर महालात जाऊन त्यांना सावध करता आलं तर प्रयत्न करा. आणि सैन्यास मदत करा." एवढे बोलून त्यांनी सगळ्यांना आतल्या खोलीत जायला सांगितले. बाहेर येऊन त्यांनी दारास कडी घातली.

आपला राजदंड घेऊन ते रस्त्यावर आले. गिधाडं घात लावून बसली होती. एकाने हल्ला चढवला. पण त्यांच्या हातातल्या राजदंडाने त्यांनी त्या गिधाडांला फटकवले. ते गिधाड जमिनीवर पडलेले बघून इतर सावध झाले. 

"हजारो वर्षांची तप साधना , अनेक होम, रोजची देवपूजा करून समर्थ झालेला राजदंड आहे. इतके नाही, पण आहे यात सामर्थ्य." 

राजपुरोहित एकअंगी तो राजदंड फिरवू लागले. ती पाखरं मूर्च्छित होऊन जमिनीवर पसरू लागली. ज्यांनी ज्यांनी हे द्वंद्व पाहिले. त्यांना रागही आला, आणि दुःख ही झाले. आपण धडधाकट असून हतबल आहोत, आणि हा म्हातारा मात्र जीवाची परवा न करता आपल्यासाठी लढतोय. काही काळ काढल्यावर ते थकले. त्यांना घाम येऊ लागला. त्यांचा वेग मंदावला. एका गिधाडांच्या पंखाचा फटका बसला आणि ते जमिनीवर कोसळले. " मानव, मूर्ख मानव, कमजोर, थकलेला मानव. दयनीय...!" त्याने एक राक्षसी हास्य केले. काही गिधाडांनी त्यांना पूर्ण झाकले. राजपुरोहितांनी शेवटची दृष्टी सूर्याकडे टाकली आणि स्वतःला त्या गिधाडांच्या हवाली केले. मगध ने आपला राजपुरोहित गमावला...!

वसुंधरा नगराच्या वेशीपाशी आली. यावेळी तिच्या डोळ्यात आधीपेक्षा जास्त तेज आणि सामर्थ्य होते. वेशीवर ती पायउतार झाली. आत जे काही होते, त्यावर तिचा विश्वास बसेना. संपूर्ण नगर जळून राख झाले होते. एकही सजीव प्राणी तिला दिसला नाही. माती देखील काळसर झाली होती. तिला काहीच कळत नव्हते. आपण चुकूच्या ठिकाणी आलो, असे तिला वाटले. तिने डोळे मिटले. दिव्य-दृष्टीत तिला पूर्वरत नगर दिसले. ती सावध झाली. डोळे उघडले आणि तिला पुन्हा तेच बेचिराख नगर दिसले. दुसऱ्यांदा डोळे बंद केले तेव्हा तिला रस्त्यावर पडलेले राजपुरोहित दिसले. तिचे हृदय कळवळले. मनोमन तिने त्यांना वंदन केले. आपण नव्हतो तेव्हा नगरात खूप काही घडून गेल्याने तिला खूप वाईट वाटले. तिने सूर्याकडे पहिले. ग्रहण थोडयाच वेळात सुरू होणार होते. पण तिचे आता नगरात जाणे अवघड होते. मायेने एक इंद्रजाल निर्माण करून ठेवले होते. नगराच्या वेशीबाहेरून सामान्य डोळ्यांना नगर बेचिराख, मलूल आणि एखाद्या जुनाट खंडरासारखे भासत होते. आणि हा प्रकार बाहेरून येणाऱ्या व्यक्तीने आत आल्यावर सुद्धा दिसत होता. अशी तर वसुंधरा नगरात जाऊ शकणार नव्हती. तिने वायूदूतास बोलावले. पण त्याला देखील काही करता आले नाही. 

तो माणूस महालात पोहोचला. त्याने सगळा वृतांत महाराजांना आणि आनंतास सांगितला. महाराज राजपुरोहितांच्या मृत्यूने हळहळले. त्यांना आपल्या निकटवरतीयांच्या मृत्यूने पार हतबल आणि क्षीण करून सोडले होते. तरी ते लढण्यास सज्ज होते. एक दास महाराजांकडे पळत आला. खूप दिवसांपासून राजाश्रयात असलेल्या त्या वृद्धाने महाराजांना बोलावले होते. महाराज आणि अनंत तातडीने गेले. 

"महाराज, ग्रहण लागत आले आहे. खूप वर्षांपासून जे मी प्राणपणाने सांभाळले, ते आता बाहेर काढायची वेळ आली आहे. पण... त्यासाठी मला माझा जीव गमवावा लागेल."

महाराज आणि अनंत अचंबित झाले. 

" असे काय आहे, ज्यामुळे तुम्हाला जीव गमवावा लागेल?" 

" माझे म्हणणे नीट ऐका. मला मूर्च्छित करा. आणि माझ्या पोटात असलेली एक वस्तू बाहेर काढा. ती वस्तू अनंतने आपल्या गळ्यात घालायची आहे. त्या वस्तूत या दुष्ट शक्तीशी लढायचे अपरिमित बळ आहे." हे मोठे धर्मसंकट होते. समोरची व्यक्ती सांगते, म्हणून सरळ त्याची हत्या करायची ! " नाही, हे कदापि शक्य नाही. कोणाची हत्या करणे, आणि ते ही एक वृद्धाची, शक्य नाही." महाराजांनी स्पष्ट नकार दिला. 

" महाराज, भावनेच्या भरात वाहू नका, हा नगराच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कदाचित ती वस्तूच नगराला वाचवू शकेल. हट्ट करू नये." 

" पण बाबा, ही वास्तू तुम्हाला मिळाली कशी ? कोणी दिली?"

" ती वस्तू माझ्या वडिलांच्या पोटात होती. त्यांनी मला जायच्या आधी तिचे महत्व सांगितले. हजारो वर्षांपासून ती या भूतलावर फिरते आहे. आणि हजारो वर्षांपासून एकही दिवस असा गेला नाही, की तिला मनुष्यस्पर्श झाला नाहीये. तिला कार्यान्वित करण्यास मनुष्याच्या आतील चांगली किंवा वाईट उर्जाचं लागते. आणि ती उर्जाचं त्याच बळ वाढवते." 

" मग बाबा, तुम्ही ती का नाही वापरली? " अनंतने प्रश्न केला तोही योग्य होता. " अनंत, मला ती वापरण्याचा कारण कधी आलेच नाही. त्याला निमित्तही लागते. तुझ्याकडे निमित्त आहे. फक्त एक, ती वस्तू तुझ्यातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही चेतना प्रेरित करत राहील. ते धारण केल्यावर चित्त अत्यंत स्थिर ठेवावे लागेल. त्याचे तेज पचवण्याचे धाडस सुद्धा लागेल. महाराज , तुम्ही ते धारण करू शकणार नाही, कारण तुम्ही प्रजापालक आहात. तुम्हास संसार सोडून या कामी येणे, संसार आणि नीतीला धरून नाही. अनंत, वेळ कमी आहे. कामाला लागा. वृद्ध आपल्या शय्येवर झोपला.अत्यंत जड अंतःकरणाने अनंतने त्यांना आपल्या अंगठीतले द्रव्य पाजले. ते मूर्च्छित झाले. मूर्च्छित अवस्थेतच त्यांनी आपला देह सोडला आणि त्यांचा आत्मा बाहेर आला. " अनंत, आता तुला माझ्या हत्येचे पातक लागणार नाही. माझे शरीर आता फक्त माती उरलेले आहे. तू आता जास्त वेळ न घालवता ती वस्तू काढ. महाराज आणि अनंतने त्या आत्म्यास वंदन केले. आपल्या कट्यारीने अनंतने त्या वृद्धाचे पोट कापले. त्यात एक कंठा निघाला. भद्राने शूर्प च्या गळ्यातून काढलेला कंठा. अनंतने तो गंगाजलने धुवून आपल्या गळ्यात धारण केला. 


आता थोडाथोडा अंधार होऊ लागला होता. थोडासा वारा सुटला. सुसाट वेगाने एक घोडा महालाच्या बाहेर पडला. दिव्य शक्तीने कृपित झालेला अनंत महालाच्या बाहेर पडला. थोड्या अंतरावर घात लावून बसलेली कावळे, गिधाडं त्याला समोर दिसू लागली. त्याने तलवार उपसली. दहा-बारा गिधाडांनि त्याच्यावर हल्ला केला. पण या वेळी त्यांचा अंदाज चुकला. काही वरातच ती सगळी जमिनीवर अक्षरशः तुकडे तुकडे होऊन पडली. घोड्याच्या टाचेखाली त्यांना चिरडून अनंत पुढे सरकू लागला. आणि सरळ वेशीपाशी आला. वसुंधरेच्या समोर असेलेल्या मायावी विवरात त्यांने नगराच्या बाजूने प्रवेश केला. त्या कंठयाच्या प्रभावामुळे त्याला वसुंधरा ही स्पष्ट दिसली. आणि तिलाही तो दिसला. त्याने तिच्या घोड्याची लगाम हातात धरली आणि तिला आत आणले. वसुंधरेला अजूनही इंद्रजालच दिसत होता. कदाचित 'तो' तिला , 'त्याने' कल्पना केलेल्या नगराची झाकी दाखवत होता. अत्यंत सावधपणे दोघे चालत होते. कारण दोघांना वेग-वेगळे नगर दिसत होते.रस्ते सारखे, पण दृश्य वेग-वेगळे. 

दोघे चालत असताना अचानक अनंत चा घोडा अडखळला. त्याच्या पायात एक अत्यंत भयानक काटेरी वेल येऊन वेटोळे घालू लागली. अनंतने ती वेल पहिली.घोड्याच्या पायाला खोलवर जखमा होऊ लागल्या. तो उधळू लागला. अनंतने त्याला काबूत ठेवायचा खूप प्रयत्न केला, पण त्यात तो घोड्याखाली पडला.त्याने तलवारीने ती वेल कापायचे प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. त्या वेलीने घोड्याला आपल्या विळख्यात घेतले. घोड्याने तडफडत जीव सोडला. ती वेल अनंतला आपल्या पाशात घ्यायला निघाली, पण कंठयामुळे ती मागे सरकली आणि पुन्हा जमिनीत लुप्त झाली. या सगळ्यात वसुंधरा मात्र वाट चुकली. आता ती सरळ त्या इंद्रजलात येऊन फसली. सोसाट्याचा वारा सुटला. ती आणि तिचा घोडा सैरभेर होऊ लागले.

" कळले ना तुला, शक्ती कशाला म्हणतात...! जे तुझ्याकडे आहे, ते पुरेसे नाहीये. जा, पुन्हा तुझ्या त्या गुरुकडे जा आणि विचार तिला ! शक्ती कशाला म्हणतात..." 

वसुंधरेने बारकाईने ऐकले. त्यातून एका स्त्रीचा आवाज तिला आला. आणि तिला अपेक्षित धक्का बसला. ती येईल हे तिला माहीत होते. पण ती इतकी बलशाली होऊन येईल, हे तिला माहीत नव्हते. वसुंधरेच्या नजरेसमोरून अनंत केव्हाच निघून गेला होता. " वेशीबाहेर थांबली असतीस, तर कदाचित वाचली असतीस. पण तू स्वतःहून माझ्या वलयात चालत आलीस. स्वतःची सुटका करता आली तर बघ ! महाल, राजपरिवार आणि युवराजाला वाचवता आलं तर !" असे म्हणून तिने त्या वादळात वसुंधरेला वर उडवायला सुरवात केली. 

आनंतच्या आजूबाजूच्या वस्तू अचानक त्याच्यावर धावा बोलून आल्या. झाडांच्या फांद्या, दगडं, घरांची कौल, फळ्या. तो पळू लागला. पण पळता-पळता त्याने तो कंठा गळ्यात जास्त घट्ट बांधला. आपल्या तलवारीने तो वाटेत येणाऱ्या वस्तूंचा फडशाच पाडत होता. अचानक त्याला एक दगडाची ठेच लागली, आणि तो पडला. कंठा जमिनीला त्याने टेकू नाही दिला. पण त्याला डोक्याला आणि कोपराला खूप मार लागला. रक्त येऊ लागले. 

" बालक आहेस तू ! त्यालाही तोच आवाज आला. आणि ती ..उगाच या राज्यासाठी जीव धोक्यात घालायला निघाले. काहीही साध्य नाही होणार. तुमचे नाव काढणारे ही कोणी उरणार नाही. जमिनीवर पडलेल्या आनंतवर एक मोठी शिळा येऊन पडायला लागली. पण अचानक ती थांबली. अगदी डोक्यावर. क्षणभर उशीर झाला असता, तर आनंतचाही जीव गेला असता. वसुंधरा ही खाली आली. अगदी अलगद. तिलाही कळले नाही. ती जमिनीवर येताच ते इंद्रजाल नाहीसे होताना दिसले. तिला अनंतही दिसला. अचानक सगळे शांत कसे झाले ? दोघांनाही आश्चार्य वाटले. 

" शुर्पा, तुझा अंत आजच आहे. हे विधिलिखित आहे." एक वेगळा दैवी आवाज दोघांना ऐकू आला. अनंत आणि वसुंधरेला एक कळले, की कोणीतरी आले आहे. 

काही वेळाने त्याने शंख थांबवला. सगळीकडे मेलेल्या गिधाडांचा आणि त्या माश्यांचा खच पडला होता. नगरातील लोक बाहेर येण्यास उत्सुक होते. पण घाबरत होते. प्रत्येक अंगणात या काळ्या रांगोळ्या होत्याच. त्या नादाने शुर्पा ही थोडी वरमली. एव्हाना तिच्याही लक्षात आलेच की तिच्या समोर तीच व्यक्ती उभी आहे, जीने एकेकाळी तिची काळी नगरी समाप्त केली होती. 

चंद्राने सूर्यास पूर्ण झाकले. महालावरही सावली पडली. आणि जशी सावली पडली तशी एक कान किटवणारी किंकाळी ऐकू येऊ लागली. ती किंकाळी इतकी भयानक होती , की ऐकणाऱ्याचे कान बंद केले तरी ऐकू येत होती. महाराणी आणि युवराज सुद्धा या आवाजाने प्रचंड भयभीत झाले. सगळीकडे पळा-पळ होऊन माणसं एकमेकांना धडकू लागली. महाराज, अनंत आणि वसुंधरा या आवाजाचा माग काढत तीन वेगळ्या दिशेने धावले. 

त्या अंधाराला सुद्धा एक कळा आली होती. कदाचित जिथे जिथे अंधार होत होता, तिथे तो आवाज पसरत चालला होता. शेकडो जण वेदनेने करहत असल्याची नांदी होता तो आवाज. त्या वेदना पसरत जात होत्या. 

यवराज आणि महाराणी आपल्याच कक्षात होते. बाहेर १२ शिपाई हत्यारं घेऊन उभे होते. अचानक एक एका शिपायावर वार होऊ लागले. कोणाचे गळे, तर कोणाचे हात, तर कोणाचे पाय, खांदे निखळून जमिनीवर पडू लागले. बाहेर आवाज आणि शिपायांची आरडा-ओरड ऐकून महाराणी बाहेर आल्या. त्यांना जोरात कोणीतरी धक्का दिला. 

बसलेले यवराज अचानक हवेत उचलले गेले आणि त्यांचे मस्तक छतावर आदळले. महाराणी किंचाळत मध्ये आल्या. वर लोंबकळत असेलेल्या यवराजांना बघून त्यांना सुचलेच नाही. युवराज अत्यंत भयभीत झाले होते. कुणीतरी त्यांना हवेत उचलून धरले आणि हवेतच ते कक्षाच्या बाहेर पडले. वेगाने ते एक मोठ्या खिडकीतून बाहेर फेकले गेले आणि पटांगणात आदळले. खाली पडून ते मूर्च्छित झाले. धावत महाराणी खाली येऊ लागल्या. 

अनंत वसुंधरा आणि महाराज त्या आवाजाचा माग सोडत पटांगणात आले. तलवारी उपसल्या. एक शिपाई युवराजांना उचलायला धावला. अचानक ते उठले, शिपायाची मान धरली आणि ती मुरगळली. शिपाई जागीच गतप्राण झाला. ते बघून इतर शिपाई जागेवर थांबले. सगळे ते दृश्य बघून थक्क झाले. 

" या, अजून कोणाला यायचं आहे पुढे." अत्यंत भेसूर आवाजात युवराज बोलू लागले." अजून कळलं नाही तुम्हाला. शेकडो वर्षे झाली, आम्ही सांगतो, हे राज्य आमचं आहे. द्या..द्या...! नाही ऐकलं. शेवटी तुम्हाला मारून हे घ्यावं लागेल." आणि ते आकाशाकडे बघून जोरात ओरडू लागले. ओरडतात त्यांच्या तोंडातून त्या माश्या बाहेर पडू लागल्या. जो सापडेल त्याचवर हल्ला चढवत राहिल्या. शिपाई, घोडे, दास-दासी पळू लागले. क्षणात चेहरे भेसूर आणि रक्तबंबाळ होऊन माणसं जमिनीवर ताडफडू लागली. महाराज, महाराणी , वसुंधरा आणि अनंतला मात्र काहीही झाले नाही. शंख मध्येच राहिले. हत्यारांनी माश्यांना मारायच्या नादात समोरचा माणूस अमानुषपणे कापला जात होता. माश्या थांबल्या. 

" तुमचा अंत याही पेक्षा भयानक होणार आहे." युवराज बोलू लागले. "कोणी कल्पना ही केली नसेल असा !" 

" अरे नराधमा, सारखाच तू कोणाच्या न कोणाच्या शरीराचा आणि मानसिकतेचा वापर करत आला आहेस. कधीतरी मूळ रूपात ये ! नाहीच येऊ शकत ! मृत्यूचे भय आहे तुला." युवराज क्षणभर थांबले. वसुंधरेचे हे आव्हान त्यांना आवडले नाही. त्यांनी सूर्याकडे पाहिले. युवराज पुन्हा मूर्च्छित होऊन खाली पडले. आणि एक काळी गडद सावली तयार होऊ लागली. ती सावली साधारण माणसापेक्षा उंच होती. हळूहळू ती आकार घेऊ लागली. अत्यंत भेसूर, जळलेली काया, रक्ताने माखलेले हातपाय, मोठी नखे, पिंजरलेले केस. त्याच्या डोळ्यातून लाल ज्वाला बाहेर पडत होत्या. अंगावरचा अंगरखा पार जळलेला होता. तो युवराजांच्या शरीरातून बाहेर आला होता. त्याला पाहून सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला. चेहऱ्यावर कोणीतरी लोखंडी सळीने डाग दिल्यासारखे घाण फोड आले होते. त्यातून रक्तस्त्राव होत होता. त्याला पाहून तर महाराज सुद्धा क्षणभर विचलित झाले. 

" असाच तुझ्या पूर्वजांनी मला शेकडो वर्षापूर्वी जाळला ना ! तसाच राहिलो मी. अर्धमेला." त्याचे ते रूप घृणास्पद होते. अंगातून उर्ग दर्प येत होता. कोणीच त्याच्या जवळ जाण्यास धजत नव्हते. 

"तसाच मला माझ्या दूतांनी रात्री उचलून नेले. शेकडो वर्षे मला माझ्या बहिणीने जिवंत ठेवले. एक एक श्वास राखुन ठेवला होता. एक एक क्षण मी मरण यातना भोगल्या ! तुमच्या मुळे." त्याने महाराजांच्या दिशेने एक-एक पाऊल टाकायला सुरवात केली. अंतर कमी होते.

"त्याच यातनांचा प्रतिशोध आता मी घेईन." त्याने हात वर केला तसे युवराज तडफडू लागले. मूर्च्छित अवस्थेत त्यांना ते असाह्य झाले. " हे निष्पाप शरीर आता तुमच्या कर्माची फळे भोगेलं. जेव्हा तीळ-तीळ करून मी याचे प्राण घेईन, पण अनंत काळा साठी याचे शरीर धारण करून या नगरीवर असुरी राज्य करिन. जो पर्यंत याच्या शरीराला याचे वंशज अग्निसंस्कार देत नाही, तो पर्यंत याचा आत्मा मृत्यू आणि मोक्ष यातच गुंतून राहील." तो महाराजांच्या अत्यंत जवळ आला." घाबरू नको राजन, तुला आणि याच्या आईला मी याचे हाल पहाण्यास जिवंत ठेवेन." 

"त्या आधी मी तुझा नायनाट करेल." आवेशात महाराजांनी तलवारीचा एक वार त्याच्या अंगावर केला. पण त्याचे वनाही युवराजांच्या अंगावर झाले. ते जोरात ओरडले. त्यांची किंकाळी ऐकून महाराणी बाहेर त्यांच्याजवळ धावत आल्या. 

" कर, अजून वार कर, तुझा एक एक वार त्याला मृत्यू पर्यंत ओढत नेतील." आणि तो राक्षसी हसू लागला. कोणाला काहीच करता येईना. अनंतही हतबल होता. वसुधारेच्या मनात मात्र काहीतरी वेगळे सुरू होते. तिने डोळे मिटले, आणि क्षणभर ध्यान लावले. आणि डोळे उघडून शांत उभी राहिली. तिला त्याच्याशी सामना करावाच लागणार होता. कारण हीच वेळ होती. ती क्षणभरही वाया घालवू इच्छित नव्हती. एक एक हत्यार फेकत ती त्याच्या मागे उभी राहिली. तिथे हत्यारं कामाची नव्हती. सूर्य अजून चंद्राच्या सावलीत होता. शूर्प मूळ रूपात होता. त्याच्या मागून तिने त्याला स्पर्श केला. तो मागे वळला. ती एक एक पाऊल मागे सरकू लागली. 

" ते साधारण मानव आहेत. तू त्यांच्यावर सत्ता गाजवू शकतोस. माझ्यावर नाही.!"

" तू...तू वाचवत आलीस त्यांना आजपर्यंत. इतक्या कष्टाने जमावलेलं ते प्रेताचे सैन्य तू संपवलेस. शेकडो वर्षे माझी बहिण त्या शापित आत्म्यांना गोळा करीत राहिली. आणि तू त्यांना क्षणात मारलं. तुझा सुद्धा अंत असाच दयनीय असेल. इतका, की पुन्हा अधर्माच्या विरोधात कोणी उभं नाही राहणार !" तो अत्यंत जवळ आला. वसुंधरेने इशारा केला. अनंतने कट्यार फेकली. काही कळायच्या आत वसुंधरेने ती झेलली आणि त्याच्या छातीत खुपसली. त्याचा अंगरखा फक्त फाटला. कट्यार रुतून बसली. चवताळून त्याने तिची मान पकडायचा प्रयत्न केला, पण ती सापडली नाही. त्याच्या पाशातून निघून तिने पुन्हा रुतलेली कट्यार काढायचा प्रयत्न केला. कट्यार निघाली, पण तिची मान त्याच्या हातात सापडली. त्याने ती करकचून दाबायचा प्रयत्न केला. वसुंधरा जीवावर उदार झाली. कट्यार तिने पुन्हा त्याच्या छातीत टाकली. युवराजांच्या छातीतून रक्त यायला लागले. महाराणी ओरडू लागल्या. आपला नेम चुकल्याचे वसुंधरेला समजले. तिने कट्यार पुन्हा बाहेर काढली. पण येताना कट्यारीने त्याचा अंगरखा मात्र फाडला. त्याची ती रक्तवाहिन्यांच्या जंजाळातील छाती दिसू लागली. वसुंधरेचा ही श्वास आता कोंडू लागला. नलिका पूर्ण दाबल्या गेल्या. डोक्यात झिणझिण्या येऊ लागल्या आणि डोळे पांढरे होऊ लागले. त्यात तिने पूर्ण बळ लावले, देवाचे आणि गुरुचे स्मरण केले आणि एक शेवटचा वार केला. जळालेल्या चामडीतून स्पष्ट दिसणाऱ्या रक्तवाहिन्या क्षणात दोरे तुटावे तश्या ताड-ताड तुटल्या आणि ती कट्यार त्याच्या हृदयात रुतली. ती सोडून , पुन्हा वसुंधरेने दुप्पट जोराने त्याला लाथ मारली. कट्यार काढण्याच्या नादात त्याने वसुंधरेस मोकळे केले. प्राणांतिक आक्रोश करत तो मागे सरकू लागला. जमिनीवर पडताच वसुंधरा त्याच्यावर तुटून पडली. कट्यार तिने गोल फिरवली. आणि संपूर्ण जोर लावून तिने पुन्हा बाहेर काढली. हृदय गोळा होऊन कट्यारीला धरून बाहेरच आले. त्याच्या आक्रोशाची आसमंत थरारला. त्याला काय, तिथे असलेल्या कोणालाच वाटले नाही की असे काही होईल. तो तडफडु लागला. वसुंधरेने ते हृदय आणि कट्यार दोन्ही त्या तलावात फेकले. तसे याची हालचाल बंद झाली. तो अजस्त्र देह जमिनीवर पडून राहिला. हृदय त्याचे, तलावातल्या हळदीच्या पाण्यात जळू लागले. पूर्ण तळाशी गेले. शूर्प संपला. कायमचाच. ज्या हृदयात छळ, कपट, लोभ, भय आणि क्रूरता होते, ते जळाले. शुर्पाने त्याच्याच जोरावर इतके वर्ष त्यात अर्धमेला जिवंत ठेवले होते. 

त्याचा तो अजस्त्र आणि घृणास्पद देह बघून सगळेच हेलावले. वसुंधरा श्वास थांबल्याने अस्वस्थ झाली. जखमी युवराजही हळूहळू शुद्धीवर येवू लागले. 


शत्रूबल अर्ध्यावर आले. सगळ्यासाठीच मृत्यू दारावर येऊन परत फिरला. तो चक्क काळ्या विद्येने पोसलेला एक नराधम होता. वसुंधरा काही काळ तशीच जमिनीवर पडून राहिली. आठवत होती, शेवटची शांत झोप तिने केव्हा घेतली होती. तिने वाहून घेतले, ते जग म्हणजे पावलो-पावली मृत्यूशीच गाठ. आज शूर्पने गळा दाबला, तेव्हा तिला जाणवले, की मृत्यू ची कूस किती भयानक असते. आपल्या मागे आपलं रडणारे नाही कोणी. कारण सगळीच नाती मानलेली, रक्षणापूर्ती. पण ती आनंदी होती. महाराज आणि महाराणींनी युवराजांना जवळ घेतले, तेव्हा तिचेही डोळे भरून आले. स्वतः मध्ये वेगळे सामर्थ्य असले, की ते पेलताना चुकवावी लागणारी किंमत कधी-कधी भावनांच्या स्वरूपात असते, कधी नात्यांच्या स्वरूपात. तिने एकदा अनंत कडे पाहिले आणि नंतर त्याच्या गळ्यातील कंठयाकडे. स्वतःशीच ती हसली. किती सहज, त्याने आपला पूर्ण जन्म त्यागात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. संसार करून सुद्धा हे त्याला करता आलं असतं. पण प्राणपणाला लावून, आपल्या अन्नदात्याची सुरक्षा करणे हे त्याने मान्य केले. किती ते प्रेम शास्त्रावर. आज पाहिल्यांदा वसुंधरेच्या मनात एक पालवी फुटली. पण तिचा जन्म नव्हता या साठी. तिच्या कपाळी फक्त शत्रूचेच रक्त लागू शकत होते. 

दिव्य-दृष्टीने भद्राने शूर्प चा विनाश पहिला. मनोमन त्याने भगवंताचे आभार मानले. त्याला इच्छा असूनही महालाकडे जाता नव्हते येत. कारण त्याला मिळालेला हा जन्म फक्त एक दिवसाचा होता. तो ही शेकडो वर्षांपूर्वी पाहिलेलं नगर पाहून भरवला. बालपण, तारुण्य, लग्न, युद्ध, शुर्पा आणि तिचा मृत्यू, आणि सरते शेवटी स्वतःचा मृत्यू. त्याच्याही चौथ्या पिढीतील अनंत आज चांगलाच लढवय्या बनला होता. तो कंठा त्याच्या गळ्यात भद्राने पाहिला होता. शुर्पाच्या गळ्यातून तो कंठा त्याने एका पागेतल्या विश्वासू नोकरकडे दिला. नंतर त्याचे काय झाले हे त्याला नाही कळले ! भद्रा, अनंत, वसुंधरा , मगध साठी साक्षात देवदूत बनून आले. तेच मगध...जे पृथ्वीच्या मध्यावर होतं. जे स्वर्गाच्या थेट खाली होतं. ते पाप-पुण्य, नीती-अनीती, धर्म आणि अधर्म यांच्या बरोबर मधोमध अडकून पडलं होतं. 

शूर्प संपला. त्याची शक्ती संपली. पण अजून एक आव्हान होते. त्याच्या मृत्यूने पिसाळलेले, चिडलेले. कारण, आता शूर्प कायमचा गेला होता...! जपून ठेवायला त्याचा देह सुद्धा नव्हता शिल्लक नव्हता. 

ग्रहणाच्या अंधारात सुद्धा धर्म तग धरून होता. शूर्प आता पुन्हा जिवंत होणार नव्हताच. नगरातील सर्वांसाठीच हा मोठा दिलासा होता. ग्रहण अजून नव्हते सुटले. उलट आता त्याचा प्रभाव वाढीव होणार होता. 

वसुंधरा जमिनीवर बसून होती. महाराजांनी युवराज आणि महाराणींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. सेनेवरचाही थोडासा ताण निवळला. ग्रहण असल्यामुळे कोणालाच काही खाता-पिता येत नव्हते. पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. नगरात सुद्धा कोणी घराबाहेर नव्हतं पडत. 

एक घनघोर अजूनही सावट शोधत होते. 

महाराज काही शिपायांना घेऊन महालाच्या बाहेर जाऊ लागले. कित्येक दिवस झाले, ते प्रजेत गेलेच नव्हते. त्यांना आज मात्र चैन पडणार नव्हते.  महालादेखील खूप कळा आली होती. 

भद्रा एकटा नगरात फिरत होता. त्याला लोक खिडकीतून बघत होते. त्यास कोणीही ओळखत नव्हते. एका घरातून त्याला अचानक एक स्त्रीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. एका मोठ्या घरातून तो आवाज येत होता. तो लगोलग तिकडे चालू लागला. त्या घराच्या पायऱ्या चढून तो दारापाशी आला आणि दार आत लोटले. घरात पूर्ण अंधार होता. भद्रा मध्ये आला तसे दार आपोआप बंद झाले. लहान मुलगा रडण्याचा आवाज येतंच होता. धोका ओळखून भद्रा ने तलवार उपसली. आणि पुढे सरकू लागला. अचानक आवाज बंद झाला. भद्रा फसला. एका अंधारात. 

" माझ्या भावाला मारून तुम्ही मोठी चूक केलीत. आता या माया तिमिरात तुझा आत्मा तडफडत राहील. न मृत्यु, न मोक्ष...! " त्याला एक चवताळलेल्या स्त्रीचा आवाज आला. 

" मूर्ख आहेस तू, देवांनी रचलेल्या विधीला तू अशी आव्हान नाही देऊ शकत." न घाबरता भद्रानेही उत्तर दिले." तू देव नाहीस."

" खरंय तुझं, देव नाहीये मी ! मी तर दानवापेक्षा भयानक आहे." 

" शुर्पा, अजूनही वेळ नाही गेली. निघून जा परत नरकात, तिथेच तुला गती मिळेल. तुझा आत्मा मृत्यूलोकांत फक्त यातना भोगेलं. त्याला सुख नाहीये, चैन नाहीये. "

" ते माणसाला पण नाहीये..." ती राक्षसी हसू लागली. 

" चल, या अंधारात, तुझा वेळ जावा, म्हणून मी तुला माझ्या आणि शूर्पच्या जन्माची कहाणी सांगते. तसाही हा तुझा शेवटचा संवाद, या नंतर तुला इथेच खितपत रहायच आहे. कारण ही जागा मुळात भूतलावर नाहीये. देवांनाही माहीत नाही, ही जागा कुठाय! भद्रा, तू मायातिमिरात आहेस. इथे श्वास, सहवास, दिवस, रात्र, सूर्य, चंद्र , काहीच नसतं. काळ आणि वेळ ही नसतो. असो, ऐक मी जन्माला कशी आले. कारण हे मला फक्त एकदाच आठवते. ग्रहणाच्या दिवशी. प्रत्येक युगात देव आणि दानव, धर्म-अधर्म, सद-दु: यात युद्ध असते. त्या त्या युद्धात कामी आलेल्या आत्म्यांना जाळून प्रवृत्तीच्या देवतेने बनवलेले आहे आम्हाला. आमचा अंत शक्यच नाही भद्रा...! कारण आम्हाला मानवाच्या आतील अमानवीयता पोसते. तिचा अंत होणार नाही, तसा आमचाही अंत होणार नाही. आम्ही सूक्ष्म आहोत. आणि आम्ही मनावर ताबा मिळवतो. मानवा कडून आमचा पराभव शक्यच नाही." 

" शुर्पा, तुझा अंत मला करायचाच नाहीये. तू तर स्वतःहून नाहीशी होशील." 

शुर्पा जोरजोरात हसत नाहीशी झाली. भद्रा अजिबात विचलित झाला नाही. पण त्याने हत्यारही सोडले नाही. ते एक मायावी अवकाश होते, ज्याला अंत, सुरवात काहीच नव्हते. त्रागा करून काहिच होणार नव्हते. 

चालत महाराज एक एक गल्ली पार करू लागले. कोणीतरी आपल्या मागावर असल्याचा भास त्यांना झाला. ते एकदम थांबले. अचानक जमिनीतून हात बाहेर आले, आणि त्यांनी काही शिपायांना अत्यंत निर्घृणपणे आत ओढले. आक्रोश करत शिपाई जमिनीत अक्षरशः धसत चालले होते. त्या ठिकाणी फक्त एक खड्डा उरत होता. हे कळताच शिपाई आणि महाराज एकीकडेच धावू लागले. पण एक एक शिपाई कमी होत होता. धावता-धावता एक वडाचे झाड लागले. महाराज त्याखाली उभे असता, त्या परंब्यांनी त्यांना अचानक विळखा घातला. त्यांचे हात ओढले गेले. पायावर ही विळखा पडला. विळखा परंब्यांचा होता खरा, पण तो जिवंत वाटू लागला. शिपाई पाहून घाबरू लागले. ते एक पार असल्याने शिपाई तर सुरक्षित होते. काहींनी तलवारीने त्या पारंब्या कापायला सुरवात केली. पण काही उपयोग झाला नाही. महाराज जमिनीपासून काही अंतरावर वर ओढले गेले. त्यांची तलवार गळून पडली. चिलखत अक्षरशः तुटून पडले. कपडे फाटले. श्वास घेण्यापूरती नाक आणि तोंड उघडे ठेवून, त्या परंब्यांनी महाराजांना पूर्ण आपल्या विळख्यात घेतले. एक शिपाई खाली उतरून महालाच्या दिशेने पळू लागला. पण तो जमिनीत गाडला गेला. 

" प्रेतांचे हात आहेत ते...!" वडातून आवाज येऊ लागला. " ग्रहण म्हणजे त्यांच्यासाठी कुंभस्नान...!" 

" कोण आहेस तू...? समोर ये !" विळख्यात असून महाराजांनी त्याला आव्हान दिले. घाबरू नका, इतक्या लवकर कोणाचाच मृत्यू नाहीये. तुमच्या समोर हे शिपाई, तुमचा परिवार, रक्षक, सगळे हळूहळू मरतील, आणि तुम्च्या समोर मरतील. तो पर्यंत तुम्ही असेच रहाल." काही फांद्या खाली आल्या. दोन-चार शिपायांना गळ्याला फास लागला. त्यांचे तडफडून प्राण गेले. प्रसंगवधान राखून काही शिपाई खाली बसून लढू लागले. फांद्या छाटू लागले. फांद्यां तुटत होत्या. पण शिपाई थकत होते. प्रत्येकजण जीव वाचविण्यास लढत होता. काही थकून बेशुद्ध झाले. त्यांना फांद्यांनी गळफास लावून त्यांची हत्या केली. महाराज स्वतःला सोडवायचा प्रयत्न करू लागले. पण त्यांना हालणे सुद्धा शक्य नव्हते. शेवटी फक्त दोन शिपाई उरले. "हे दोघे रहातील. कोणीतरी हवं, काय घडलंय ते सांगायला. पण खाली नका उतरू. त्या पैकी एक शिपायाच्या लक्षात आले. वडाचा पार ओढ्याला लागून होता. आणि ओढ्याचे पाणी काळे होते. झाडाची काही मुळं ओढ्यात उतरली होती. आणि म्हणून, वड बाधित होता. 

"महाराज, हे झाड बाधित आहे. " त्याने महाराजांना सांगितले. " झाड नाही, सगळी जमीन बाधित आहे." महाराजांनी खिन्न मनाने सांगितले." महाराजांना एकदम भद्राची आठवण झाली. भद्राला तर काय घडते आहे, काहीच नव्हते समजत.

वसुंधरेने लक्ष सारखेच सूर्याकडे जात होते. हे ग्रहण खूपच जड होते. वेध, पूर्वार्ध आणि मोक्ष, आणि त्या नंतर येणारी भयानक रात्र ! फार जिकरीचे होते सगळे. साधारण मनुष्याची काहीच गत नव्हती. प्रजा तर बाहेर ही निघत नव्हती. तारा नावाच्या 

एका म्हाताऱ्या दासिस अचानक चक्कर आली. तिला सावरायला काही दास आणि दासी धावले. तिला पाणी पाजले. काहीं क्षण ती डोळे मिटून राहिली. आणि अचानक तिने डोळे उघडले. त्यात बुबुळ नव्हते. काही कळायच्या आत तिने , तिला धरलेल्या दासीचा गळा आवळला. बाकीचे दास पळू लागले, पण तिने त्यांचीही तीच गत केली. खालून एक शिपायाने हे पहिले. त्याने बाकीच्यांना आवाज दिला. ते धावत गेले. कसला गोंधळ आहे हे पहाण्यास अनंतही धावला. बाधित ताराने तो पर्यंत बरेच जीव घेतले होते. शिपाई पायऱ्या चालून वर येत होते. काहीच हालचाल दिसत नव्हती. त्यांना समोर समान अंतरावर दास-दासी आणि शिपायांची प्रेतेच दिसली. काहींचे डोळे फोडले होते. काहींच्या चेहऱ्यावर करकचून चावा घेतला होता. शिपाई पुढे सरकू लागले. अनंत अजून मागेच होता. एका शिपायाच्या गालावर वरून काहीतरी पडले. रक्त होते ते. त्याने घाबरून वर पाहिले. मोठा आक्रोश करत तारा छतावरून खाली आली. तिचा सगळं चेहरा, हाताची नखं बळी घेऊन रक्ताने माखली होती. शिपायांनी उपसून ठेवलेल्या तलवारी तसाच हवेत राहिल्या. अत्यंत दयनीय पणे ताराने कोणाची छाती फोडली, तर कोणाचे आतडे बाहेर काढले. सगळे गतप्राण झाल्यावर ती एका गुप्त दरवाजाकडे जाऊ लागली. अनंतने तिला मागून जाताना पाहिले.तो धावत तिच्या मागे जाऊ लागला. त्या दरवाज्याच्या आत महाराणी आणि युवराज बंद होते. अनंत एकदम एका प्रेतात अडकून पडला. त्याच्या समोर पाण्याचे एक भांडे पालथे पडले होते. तारा ग्रहणात बाधित झालेलं पाणी प्यायली, आणि ती ही आता बाधित झाली होती. अनंत हतबल झाला. ताकीद देऊन सुद्धा तारा पाणी प्यायली.

धडपडत अनंत उठला. तो दगडी दरवाजा कसा उघडायाचा हे ताराला माहीत होते. शेजारच्या भिंतीवर टांगलेल्या भाल्यास तीन माणशी बळ लागे, तेव्हा दरवाजा उघडत होता. ताराने ते दार उघडले, आणि आत प्रवेश केला. अनंत पोहोचेपर्यंत दार मधून बंद झाले. त्याने खूप बळ लावून दार उघडले. आत महाराणी आणि युवराजांच्या समोर अक्राळ-विक्राळ तारा उभी होती. तिने महाराणींना मूर्च्छित केले, यवराजांना जोरात अनंतच्या अंगावर फेकले. महाराणींना चक्क एखाद्या लहान मुलांला उचलतात तसं उचलून ती एक भिंतीजवळ गेली. आणि क्षणात भिंत फोडून आत गडप झाली. युवराज मात्र अनंत जवळ सुरक्षित राहिले. क्रूर हास्याचा आवाज येऊ लागला. 

नगरातील लोकांनी महाराजांना वडाच्या विळख्यात पाहिले, आणि अनंतने महाराणींना भिंतीत गडप होताना. 

शुर्पाचा हा डाव अत्यंत क्रूर होता. तिच्या सर्व शक्ती कार्यान्वित झाल्या होत्या. भद्रा, महाराज आणि महाराणी तिच्या विळख्यात होते. नगर नको त्या वेळेस पोरके झाले. ग्राहणाचे उत्तरार्ध अत्यंत भयावह होते. 

मगध च्या शत्रूंच्या छवि त्या धुरात दिसू लागल्या. आज पर्यंत मारले गेलेले सगळे शत्रू सैन्य, त्यांचे सेनापती, गुप्तहेर, सगळेच मगध वर प्रतिशोधासाठी टपून बसले होते. संख्या महत्वाची नव्हती. ते सगळे आता एका जीवघेण्या शापित आत्म्यांच्या रूपात होते. त्यांना वसुंधरेने काळ्या विद्येने आपल्या तालमीत बांधून ठेवले होते. त्यांचा पराभव करणे शक्य तर होते. पण मानवाच्या आटोक्यात नव्हते. काहीतरी दैवी अनुभूती गरजेची होती. भद्राचा काहीच पत्ता नव्हता. 

"देवी, हा धूर कशासाठी ?"

अनंतला काहीच दिसत नव्हते. 

"या धुरात मगधचे सगळेच शौर्य पणाला लागेल, इतकी शत्रूसंख्या मला दिसते आहे. हे सगळे शेकडोवर्षांपासून मगध करून पराभूत झालेले शापित श्वापदे आहेत, ज्यांना शुर्पाने काळ्या विद्येने आपल्या विरोधात उभे केले आहे."

" यांना काहीही करून पराभूत करावेच लागेल वसुंधरा!" 

काहीही ब बोलता वसुंधरा विचार करू लागली. तिने काही शिपायांना बोलावले. " त्या ओढ्याच्या बाधित पाण्यातून नगरातील जमीन, वृक्ष , पशु-पक्षी मुक्त झालेले आहेत. काहीही करा, पण भद्राचा काहीतरी ठाव-ठिकाणा शोधा." सगळे शिपाई एकसारखे महालाबाहेर पडले. नगरातील लोक अजूनही दारं-खिडक्या उघडण्यास तयार नव्हतेच. शिपाई मगध चे असूनही त्यांच्या मनात भीती होतीच. अगदी शिपायांच्या घरचे देखील त्यांना दाद नव्हते देत, इतकी भीती नगरात आजून होती. अनंत, महाराज आणि वसुंधराही बाहेर होते. महाराणी आणि युवराज त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात सुखरूप बसून होते. भद्राला कोणी पाहिले , असे कोणीही समोर यायला तयार होईना. अचानक अनंताची नजर खाली जमिनीवर गेली. वायूची पाऊले त्याला दिसली. तो वायूला नखशिखांत ओळखत होता. 

"महाराज..जर वायूची पाऊले इथे आहेत, तर भद्रा ही इथेच असला पाहिजे.!" वसुंधरेने एक शिपायास आज्ञा करून जवळील मंदिरातुन बरीचशी तुळस मागवली. ती प्रत्येक घरासमोर, वृक्षासमोर फेकली. सगळे प्रतीक्षा करू लागले. एका घरासमोरील तुळस काळी पडू लागली. सगळे सावध झाले. घराचे दार उघडले गेले. आतील अंधार पाहून सगळ्यांना धडकी भरली. शिपायांपैकी कुणीही आत जाण्यास धजवले नाही. अनंत आत जाण्यास निघाला. 

" थांब...!" वसुंधरेने त्याला थांबवले. " हे मायातिमिर आहे." अनंत थांबला. "यात फक्त प्रवेश आहे. बाहेर येणे तितकेसे सोपे नाही. काळ्या विद्येतील सगळ्यात भयानक शिक्षा. ज्यातुन सुरक्षित सुटका फार कमी लोकांची झालीय." 

" म्हणजे? भद्राची सुटका शक्य नाही ? " 

" आहे." वसुंधरेने आनंतच्या कपाळावर आपला अंगठा ठेवला. डोळे बंद केले. आनंतच्या आतून त्याचा एक सूक्ष्म प्रतिआत्मा बाहेर पडू लागला. " हा तुझा प्रतिआत्मा. तुझ्या मागील सात पिढ्यांचे शौर्य तुझ्या या आत्म्यांला मिळेल. कारण तू ज्याची सुटका करणार आहेस , तो तुझ्या सगळ्या पर्वजांपैकी सगळ्यात मोठा महारथी आणि पराक्रमी आहे." एका समोर एक, असे दोन अनंत तयार झाले. " एक लक्षात असू देत. काहीही झाले, कोणीही बोलावले, कोणीही कितीही केविलवाणा आवाज दिला, तरीही त्यावर दया दाखवू नकोस, आणि शस्त्रही खाली ठेऊ नकोस." अनंत त्या तिमिरात जाऊ लागला. 

आत एखाद्या अंधाऱ्या गुहेसारखे होते. खूप गारठा होता. समोरचे काहीच दिसत नव्हते. अनंतने मध्ये चार पाऊलं टाकताच दार बंद झाले. तो धाडसी होता. भय माहीत नव्हते. एक एक पाऊल खूप सावध टाकावे लागणार होते. जमीन भुसभुशीत होती, पण हवा नसल्यामुळे समोरच्या वस्तूचा, भिंतीचा, दाराचा अंदाजही येत नव्हता. समोर कोणी आल्यास त्याचा सामना फक्त शब्दभेदाने अथवा सूक्ष्म अंदाजाने करावयाचा होता. अनंतास ती कला येत होती, पण आजपर्यंत कधी त्याने ती अवलंबली नव्हती. त्यास एकदम काहीतरी भर्रकन समोरून गेल्याचा भास झाला. तलवार सावध झाली. कोणीतरी त्याला पाहून त्याचा अंदाज घेत होते. बाहेर डोळे मिटून , ध्यान धरून बसलेल्या अनंताच्या चेहऱ्यावरून वसुंधरा आणि महाराजांना मध्ये काय सुरू आहे, याचा अंदाज येत होता. त्याला काही त्रास झाल्यास उत्तरे देण्यास वसुंधरा समर्थ होती. 

"काहीतरी आहे तिथे. फिरते आहे. काय असेल." 

" काहीही असू शकेल, वार नकोस करू. भद्रा सुध्दा तिथेच आहे." 

अनंत पुढे सरकू लागला.

" अनंत...इकडे आहे मी." अनंतला एकदम भद्राचा आवाज येऊ लागला. पण तो आवाज चारी बाजुंनी घुमत होता. त्याचे प्रतिध्वनी उमटत होते. अनंत एका जागी स्थिर झाला. त्याने काहीच हालचाल केली नाही. आवाज नेमका कोणत्या दिशेने येत होता, हे कळत नव्हते. तिथे भिंती नव्हत्या. अनंत चालत होता, ते सुद्धा एक माया विवर होते. यात एक गोष्ट खरी होती. आपण भद्राला वाचवायला आलो आहे, हे त्याला कळले तर त्याचा परिणाम होऊ शकतो का ? हा विचार करत अनंतने भद्राच्या नावाने आरोळी मारली. भद्राने आवाज ओळखला. पण त्यालाही तो प्रतिध्वनी सारखाच येत होता. शेवटी भद्राने आपला शंख बाहेर काढला. तो दिव्य शंख होता. त्याच्या नादाने माया तिमिराचे विवर फाटू लागले. अनंत त्या आवाजाच्या दिशेने सरकू लागला. निश्चित अंतर दोघांना माहीत नव्हते. अंधार आणि ध्वनी, या दोन्ही वेगळ्या गोष्टी होत्या. त्याने उपयोग फारसा झाला नाही. बाहेर वसुंधरेला काहीतरी सुचले. अनंतच्या गळ्यातला ताईत तिला आठवला. तिने फक्त प्रयोग करावा म्हणून ताईतास स्पर्श केला. कोण्या अज्ञात व्यक्तीच्या स्पर्शाने ताईत सावध होऊन लुकलुकू लागला. आत आनंतच्या गळ्यात ही एक दिव्य निळा प्रकाश झळकू लागला. पण आता जो पर्यंत भद्रास हा प्रकाश दिसत नाही. तो पर्यंत वसुंधरेला ताईत सोडता येईना. अनंत चालत होता, भद्रा त्याला शंखनादाने दिशा देत होता, आणि अनंत दिसावा, म्हणून वसुंधरा ताईताला स्पर्श करून होती. असा बराच काळ गेला. काहीच हाती लागत नव्हते. शेवटी एक क्षण असा आला ,की सगळे थकले. 

" अनंत, तू अजूनही परत जाऊ शकतोस. तू परत जा. तसेही शुर्पाचा अंत झाला, की हे मायातिमिर नष्ट होईल." भद्रा त्याला सांगू लागला. 

" तुम्ही असल्याशिवाय ती संपणार नाही. तिचे बळ आम्हाला पेलवणारे नाही." 

" अरे, मग किती वेळ असाच या अंधारात भटकशील. या अंधाराला अंत नाहीये."

"काहिही झाले तरी मी तुम्हाला घेतल्या शिवाय नाही जाणार मी." सांगून उपयोग नव्हता. भद्राची सुटका करणे भागच होते. बऱ्याच वेळाने भद्रास अनंतच्या गळ्यातला कंठा दिसू लागला. त्याने त्याला आवाज तर दिला, पण तिथे मानवी आवाज प्रतिध्वनीच्या स्वरूपात होत असे. अनंत त्याच्या खूप जवळ आला. भद्राने त्या कंठयाला स्पर्श केला. स्पर्श करताच कंठा उजळला. दोघांना एकमेकांचे चेहरे दिसले. ते विवर तुटू लागले. विजा कडाडल्या सारख्या ते फाटू लागले. बहुतेक आजपर्यंत या मायातिमिरात , कोणाला वाचवण्यासाठी कोणीच आले नव्हते. आज अनंत आल्याने या तिमिराला मोडावे लागले. अचानक एक लक्ख प्रकाश पडला. भद्रा आणि अनंत ने एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवले होते. जमीन हादरून दोघे खाली जाऊ लागले. 

महाराज आणि इतर सैनिक चिंतेत होते. वसुंधरेस कळत होते. अचानक जमिनीत हालचाल होऊ लागली. आणि बघता बघता दोन मातीने माखलेले हात वर आले. शिपायांनी अनंतचे हात ओळखले. चार शिपायांनी ओढून त्यांना वर काढले. कल्पनेत नसूनही अनंतने भद्राची सुटका केली. वसुंधरेने ताईत सोडला. अनंतचा तो अंशात्मा पुन्हा त्याच्यात सामावला. 

वेळ हातातून जात होता. मावळत चाललेला सूर्य ग्रहण अधिकच प्रबळ करीत जात होता. सगळे महालात परतले. पण आत कुणीही गेले नाही. सूर्य मावळत असल्याने काही ज्ञानी लोकांच्या सल्ल्याने सगळ्यांना गाईचे दूध दिले गेले. काळ प्रत्येकाला एक पुसटशी अनुभूती देऊन गेला होता. मृत्यू प्रत्येकाचे दार ठोठावून गेला होता. काळी विद्या, गूढता, शौर्य, कपट, भय, सुटका, सगळ्यातून मगध राजपरिवार, नगरजन, सैन्य, गेले होते. अगदी पशु, पक्षी, जमीन, वृक्ष सुद्धा यातून सुटले नव्हते. 

अंताला गती लाभत होती. शुर्पा सूक्ष्म स्वरूपात आपला होता पराभव बघत होती. समोरा-समोरचे युद्ध तीला झेपणारे नव्हते. आता जरी ती जिंकली असती, तरी तिच्या हाती एक उजाड, विस्कटलेले, कोणीही रहात नसलेले नगर लागले असते. 

बागेतल्या अंगणात सगळे शांतपणे विचारात मग्न होते. कळत नव्हते, किती शिपाई मारले गेले, किती जखमी झाले, आणि किती बेपत्ता. कित्येक वीर मगध वाचवण्यासाठी धराशाही झाले होते. हे असे पहिलेच युद्ध असावे, जे शस्त्रहीन होते, पण रक्तपात ही खूप झाला होता. जखमी शिपायांच्या इलाज सुरू होता. 

अचानक मध्यावर उभा असलेला वायू खुर वाजवू लागला. खिंखळू लागला. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. आणि कोणाला कळायच्या आतच एक मोठे काळे वादळ महालाच्या मुख्य दारातून आत आले. घोंघावत त्या वादळाने मोठं-मोठाली वृक्ष हलवली. वाटेत येणाऱ्या माणसांना सुद्धा ते वादळ आपल्या कवेत घेऊन निर्घृणपणे भिंती वर, झाडांवर आदळू लागले. सगळे इतके वेगाने होत होते, की सापडलेल्या पैकी कोणालाही जीव वाचवायला वेळ मिळाला नाही. वसुंधरा, महाराज, अनंत, भद्रा, सगळेच अचंबित झाले. धूळ-धूर याने आसमंत भरून गेला. कोणास काहीच दिसत नव्हते. अचानक ते वादळ शमले. कुठे गेले काही समजले नाही. अंधार पडू लागला होता. काही सैनिक वाळलेल्या फांद्या, लाकडं गोळा करून मशाली तयार करू लागले. महाराजांचे लक्ष महालाकडे गेले. 

एका स्त्रीची काळी सावली खिडक्यांमधून सैरा-वैरा धावत होती. त्याने वसुंधरा आणि इतर लोकांना ती दाखवली. 

पिंजरलेले केस तिच्यात भरलेला राग दाखवत होते. तिचा उद्देश आता फक्त मगध चा एक-एक माणूस संपवणे, इतकाच होते. तिच्या भावाला मारून, तिचे सगळे डाव उधळून तिला अधिक क्रूर व पाशवी केले होते. अनंत आणि काही सैनिक वर जाऊ लागले. भद्राही दुसऱ्या मार्गाने वर जाऊ लागला. सर्वत्र अंधार होता. मशालींचाच काय तो उजेड. 

अनंत पायऱ्या चढू लागला. अचानक ती रडू लागली. हळूहळू तिचा आवाज इतका वाढू लागला, की सैनिकांच्या कानातून, नाकातून आणि डोळ्यातून रक्त येऊ लागले. तो आवाज खूप किळसवाणा होता. सैनिक ताडफडू लागले. दुसऱ्या बाजूने आत शिरलेल्या भद्रालाही तो आवाज येऊ लागला. पण तो हसण्याचा होता. त्याच्या समोरून ती काळी सावली वेड्यासारखी धावत होती. पण त्याला तिचा माग सापडत नव्हता. तलवार उपसली होती, पण सावलीवर कशी चालवावी. अचानक त्याच्या गळ्याला फास बसला. तो फास धारदार केसांचा होता. भद्राला तो कापता ही येत नव्हता. तलवार सोडून त्याने हाताने तो फास मोकळा केला आणि मागे पाहिले. मागे कोणीही नव्हते. फक्त अंधार! 

आनंतच्या मागचे एक एक शिपाई खाली पडत होते. शेवटीं त्या पायऱ्या संपल्या. ४-५ सैनिक उरले होते. सगळे वर आले. आणि वर असलेल्या प्रत्येक खोलीत पाहू लागले. पहिल्या खोलीत एक सैनिक शिरला. अंधारा त कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरून तो ओरडू लागला आणि अंधारातच तलवार चालवू लागला. हाती काहीच नाही आले. अचानक कुठूनतरी एक टोकदार शस्त्र आले, आणि सरळ त्याच्या कंठात घुसले. दुसऱ्या खोलीत दुसऱ्या सैनिकाची गत त्यापेक्षा भयानक झाली. कोणीतरी त्याचे मनगट पकडले, त्याचीच तलवार त्याच्या मानेवर फिरली. बाहेर उभ्या असलेल्या तीन सैनिकांच्या समोर याचे शीर उधळत बाहेर आले, आणि नंतर त्याचे शिरावेगळे धड काही पाऊले चालत समोर येऊन पडले. सैनिक प्रचंड घाबरले. एका सैनिकाने काहीही विचार न करता सरळ उघड्या खिडकीतून खाली उडी घेतली. मृत्यूच्या भयाने मती खुंटते आणि माणूस जीव वाचवण्याच्या भरात जीव गमावून बसतो. खाली त्याचा देह जमिनीवर आदळला आणि त्याच्या डोक्याची शकले-शकले झाली. वर काय घडते आहे हे खाली दिसायला मार्ग नव्हता. वर गेलेली एक एक मशाल केव्हाच विझली होती. महाराज आणि वसुंधरा खाली उभे होते. महाराणी आणि युवराज मंदिरात सुखरूप होते. पण इतर कोण कितपत सुरक्षित होतं, हे नव्हतं सांगतां येत. अनंतने हातात मशाल धरून ठेवली होती. सोबत तलवार होतीच. त्याला पाठीमागे कोणाची तरी चाहूल लागली. त्याने वळून पहाताच त्याच्या मागचा उरलेला शेवटचा शिपाई, त्याची मान मुरगळ्याने तडफडत जीव सोडून गेला. 

भद्राने त्या सावलीवर बाण चालवायला सुरवात केली. जिथे बाण सावलीत रुतत होता, तिथे ती सावली भिंतीवर थांबत होती, पण त्यातून एक दुसरी सावली तयार होऊन भिंतीवर पळत होती. दोघे आता एकटेच उरले होते. त्या मजल्यावरच्या दारे खिडक्या जोरजोराने आदळू लागल्या. भद्रा आणि अनंत काही अंतरावर एकमेकांना दिसले. आणि अचानक त्यांच्या मध्ये ती आली. तिचे केस हवेत उडत होते. हातापायाची नखे एखाद्या श्वापदासारखी रक्ताने माखलेली. डोळ्यात अंगार. ती विरुद्ध असूनही दोघांकडे बघत होती. शस्त्र चालणार नव्हते. ती हसू लागली. कदाचित दोघांच्या हतबलतेवर ती हसत असावी. तिला मारता येत नव्हते. कारण ती सावली होती. 

महालात खालच्या बाजूला अचानक गोंधळ उडाला. एक एक शिपायांची प्रेतं पडू लागली. कोणाचे डोळे गेलेले, तर कुणाची मान सरळ उलटी केलेली. कोणाचे गळे कापलेले तर कोणाच्या छातीत धारदार शस्त्राने वार झालेला. तो प्रकार पाहून एकतर लक्षात येत होते. शुर्पा महालात आली होती. तिची शक्ती वाढीस लागली होती. वसुंधरा पुढे जाऊ लागली. महाराजांनी तिला थांबवले. 

वरती भद्राने एक शक्कल लढवली. त्या सावलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. स्पर्श होत नव्हता. अनंतनेही तसेच केले. त्याचाही स्पर्श झाला नाही. ती फक्त शुर्पाची सावली होती. ती मरणार नव्हतीच. ते दोघे दोन पाऊले मागे सरकले. ती सावली सारखीच हसत होती. सावलीच ती ! हे खाली वसुंधरेला कळवायला हवे होते. दोघांचे एकमत झाले. अनंतने हातात मशाल धरून ठेवली होती. भद्राने त्या सावलीवर तलवार चालवली. खालून वसुंधरेने हे पहिले. 

" महाराज, वर जी आहे, ती फक्त तिची सावली आहे. खरी शुर्पा तर खाली आहे. ".  अजून काही दास-दासी जीव गमावून बसल्या. वरची सगळी दारं बंद झालीत. भद्रा आणि अनंत वर अडकून पडले. 

खाली असलेली शुर्पा बाहेर आली. शेकडो वर्षे वय असलेली म्हातारी , पांढऱ्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे, डोळ्यांच्या जागी फक्त खोक होते. पांढरे पिंजरलेले केस. अत्यंत भयावह ते तिचे खरे रूप समोर आल्यावर क्षणभर वसुंधरा ही घाबरली. तिने पुन्हा जोरजोरात रडायला सुरवात केली. ते रडणे पहिल्या पेक्षा जास्त भयानक होते. सगळ्यांना कानठळ्या बसू लागल्या. पण या वेळेस ते रडणं ऐकून एक एक शिपाई वेडा-पिसा होऊ लागला. हळूहळू त्यांच्याही कानातून रक्तस्त्राव होऊ लागला. महाराज सुद्धा कानावर हात ठेवून होते. या वेळी भद्राला मात्र तिचे रडणे ऐकू आले. त्याने खिडकीतून शंख खाली फेकला. तो शंख फुटला आणि शुर्पाचा आवाज बंद झाला. तिचे रुदन आता तिच्यावरच उलटू लागले. ती रडायची थांबली. 

" शुर्पा, शेकडो वर्षा पासून तू आम्हाला त्रास देत आलीयस. तुझ्या काळ्या विद्येने मगधच्या प्रत्येक सजीवांचे जगणे दूषवार करून सोडलंय." महाराज पहिल्यांदा तिच्याशी बोलत होते. " पण आता तुझा अंत करणे गरजेचे झाले आहे." महाराजांनी इशारा करताच काही धीट शिपाई तिच्याकडे धावले. पण मध्येच तिने त्यांना उचलून फेकावे तसे दूर फेकले.  दुसरे शिपाई पुढे सरकले नाही. वसुंधरेने एक शिपायांस बोलावले. काहीतरी ऐकून शिपाई निघून गेला. वसुंधरेने एक बाण बाहेर काढला आणि शुर्पावर सोडला. त्याने काहीच फरक पडला नाही. ग्रहण टळले होते. रात्र झाली होती. मूळ रूपात येऊन देखील तिला मारणे अवघड आहे, हे वसुंधरेच्या लक्षात आले. महालात एकदम आग लागली.   अनंत आणि भद्राला अडकून ठेवलेले दारही एकदम जळाले. ते खाली आले. भद्रा समोर दिसताच शूर्पच्या रागाचा पारा चढला. 

" तू...तू माझ्या स्वप्नांचा धूर केलास. मगध वर राज्य करण्याची माझी ईर्ष्या , तुझ्यामुळे धुळीस मिळाली." ती भद्रावर धावून गेली. भद्राने आपली तलवार उपसली, आणि तिच्या केसांवर वार केला. तलवारीचा स्पर्श होताच ती दूर फेकली गेली. 

" जन्म आणि मृत्यू हे निसर्ग चक्र आहे शुर्पा. यातून सुटका नाही होत कोणाचीच. तसा प्रयत्न करणे म्हणजे पाप. पण याहून जास्त पापं तू करून चुकलीयस. असंख्य लोकांचे प्राण तू घेतलें फक्त अधर्म वाढवण्यासाठी. अधर्म कितीही बलवान असला, तरी धर्माचा रक्षणकर्ता परमेश्वर आहे." भद्राने तिला बजावले. जमिनीवर पडलेली शुर्पा उठली, तिने आकाशाकडे पाहिले आणि मोठा आ केला. तिच्या तोंडातून विषारी काटे बाहेर पडू लागले. ते काटे ज्याला टोचले, त्याच्या शरीराचा दाह होऊ लागला. धावाधाव झाली. वसुंधरेने महाराजांना आपली ढाल दिली. भद्राने एक बाण काढून तो सोडला, तो सरळ शूर्पच्या तोंडात गेला. ते काटे आतल्या आत अडकले. शुर्पा जागीच ताडफडू लागली. 

भद्राने वसुंधरेने पेटवलेली ती आठ खड्यांची आग पून्हा पेटवली. शुर्पाच्या डोळ्यातुन काट्यांच्या दाहा मुळे रक्त वाहू लागले. ती तशीच ताडफडू लागली. भद्रा महाराजांकडे आला. " महाराज, मगध आणि आपल्या परिवारास दिलेले वचन, मी आणि माझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या जीवापाड निभावू. जे संकट मला माझ्या सोबत न्यावे लागेल. आज्ञा असावी." शेजारी उभ्या असलेल्या अनंतच्या डोक्यावर त्याने हात ठेवला. अनंताचे डोळे भरून आले. " पूर्वजांचे पराक्रम डोळ्याने पहाणे पुण्य असतं." अनंत त्याला म्हणाला. " आणि पुढच्या पिढीचे शौर्य बघणे, हे भाग्याचे असतं." अनंतने त्याला वाकून नमस्कार केला. भद्राने आपली तलवार अनंतच्या हाती दिली. आणि त्याच्या गळ्यातील कंठा काढून घेतला. "मानव म्हणुन जग, मानवतेचा उद्धार कर." तो कंठा घेऊन भद्रा वसुंधरेकडे आला. " देवी, तूझा त्याग खूप मोठा आहे." तो कंठा त्याने वसुंधरेला दिला. त्याचा रंग बदलला. तो पिवळा झाला. भद्राने ताडफडत्या शुर्पाकडे पाहिले. आणि वर आकाशाकडे पाहिले. तो चालत जाऊ गेला. त्याचे एक एक पाऊल शुर्पासाठी मृत्यू चालत आल्यासारखे होते. जवळ येऊन त्याने तिला उचलले आणि त्या विशाल अग्निकुंडाकडे चालू लागला. शुर्पा त्रागा करू लागली, ओरडू लागली, स्वतःला सोडवण्यासाठी ती झटपटू लागली. त्या अग्निकुंडात पाऊल टाकताच तिच्या शरीराने पेट घेतला. भद्रा बरोबर मधोमध उभा राहिला. वसुंधरा आणि अनंतने अप-आपल्या भात्यातून बाण काढले, ते पेटवले आणि त्या कुंडावर सोडले. त्या कुंडातून लाल ज्वाला बाहेर आल्या. शुर्पा कायमची नाहीशी झाली. भद्रा तिच्या त्या पापी आत्म्याला जन्म आणि मृत्यच्या ही पुढे सरळ भोग भोगण्यास घेऊन गेला. भरल्या डोळ्यांनी त्याला मगध नी निरोप दिला. 

खूप दिवसांनी एक प्रसन्न सकाळ मगधवासीयांना पाहिली. शिपायांनी शुर्पाचा पाहिलेलं अंत प्रत्येकाला सांगितला. महाराणी, युवराज नगरात उत्सवाची आमंत्रणे देण्यासाठी फिरत होते. आपले युवराज बघून नागर्जनांना खूप उत्साह आणि आनंद झाला. भय संपले होते. महाराज , अनंत आणि वसुंधरा मंदिरात होते. 

" वसुंधरा, आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे. मगध, इथली जनता....!"

" महाराज, माझ्या गुरूने तिचे सर्व ज्ञान मला दिले, ते लोकमंगल व्हावे म्हणून. मला महाल, सुख, ऐश्वर्य हे नाही भोगता येणार. मला त्याच ठिकाणी जावे लागेल, जिथे माझ्या गुरूंचा वास आहे. त्यांचे स्थान आहे." 

" पण तुला शोधायचे तरी कसे ?" ती अनंतकडे चालत आली. " ज्या वेळेस माझी गरज लागेल, मला कळवा. माझे स्थान मी एकदा येऊन सांगून जाईन. पण मला मोहात, मायेत अडकवून ठेवू नका. माझा जन्म यासाठी नाही." तिचा घोडा तयार होता. महाराजांना प्रणाम करून ती बाहेर येऊ लागली. अनंतचे डोळे भरून आले. क्षणभर वसुंधरा थांबली, पण तिने मागे वळून पाहिले नाही. 


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror