मैत्री
मैत्री
अलक
दिनूने थरथरत्या हाताने आपल्या बालपणीच्या मित्राला पेपरवरील नंबर डायल करून फोन लावला. कानात प्राण आणून तो प्रतिसादाची वाट पाहत होता. हॅलो कोण? "दिनू अरे अम्या मी बोलतोय"....आणि काही मिनीटांत फोन कट झाला.
तासाभरानंतर दारावरची घंटी वाजली... दिनयनाथ आणि अमितराव आज कित्येक वर्षानी बालपणीच्या मैत्रीला आनंदाश्रूनी अभिषेक घालत होते.
