अलक (लघुकथा )
अलक (लघुकथा )
तिने अनंत यातना सहन करून भारतातील मुलींकरिता शिक्षण नावाचे एक छोटेसे रोपटे लावले होते. हळूहळू त्या रोपट्याचा एक डौलदार वृक्ष तयार झाला.
आणि आज कित्येक वर्षानंतरही इथल्या लेकीबाळी त्या झाडाची फळं चाखत आहेत, त्या शिक्षणाच्या झाडाच्या सावलीत राहत आहेत, आणि आज मुलीं अभिमानाने वावरत आहेत.
सावित्रीमाईला त्रिवार वंदन 🙏
आम्रपाली घाडगे (आमु )
