मायेचा आधार
मायेचा आधार
चेतन आणि शैलेश शहरात जाॅब करत होते. पण लाॅकडाउन पडल्यामुळे दोघेही घरी आपल्या गावी गेले. शैलेश आणि चैतनच घरी ऑनलाईन वर्क सूरू होत. गावात कोरोना विषयी फारशी माहीती नव्हती लोकांमध्ये जनजागृतीही तेव्हा झालेली नव्हती. कोरोना म्हटल्यावर ते लोक खुप घाबरायचे. बाहेरून येणार्या लोकांशी व्यवस्थित वागत नव्हते. बर्याचश्या माणुसकी हरवल्याच्या घटना त्यांनी गावातच बघीतल्या होत्या. पण हे दोघेही मित्र फोन वर आपल्या मित्रांना वगैरे कोरोनाबाबत असलेली माहीती सांगत होते. या दोघांच्या घरचेही काळजी घेत होते. गावात आजुबाजुला बरचशी घरे होती. सगळी कडे लाॅकडाऊन म्हटल्यावर कुणी घराच्या बाहेर फिरत नव्हते. नाहीतर गावात पारावर इकडे तिकडे चौकात मुले आणि माणसे बसलेली दिसायची. पण आता चित्रच कोरोना मुळे बदलल होत. लोकांमध्ये भितीच वातावरण होत. अत्यावश्यक सेवा सुरू होती. पण मदत मिळायलाही उशीर व्हायचा. गावात जवळपास हाॅस्पिटल नव्हते. अशी गावी सगळी परिस्थिती होती.
शैलेश आणि चेतनच ऑफिसच काम सुरू असायच. ते दोघेही बिझी असायचे. पण घरच्यांन कडून इकडच तिकडच बातम्या त्यांच्या कानावर पडायच्या. असच एक दिवस शैलेश सकाळी त्याच्या कामाची तयारी करत होता. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याला नाश्ता करायचा होता. आईने त्याला वाढल उशीर व्हायला नको म्हणुन. तो त्याच ऑनलाईन काम झाल. संध्याकाळी काॅफी घेत असताना चेतनचा फोन आला. तो बोलत होता. त्याला त्याच्याकडून अस समजल की त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह आल्या. त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु घरी वयस्कर आजी एकट्याच पाठीमागे राहील्या. त्या घरात एकट्याच होत्या. आपल्या परिवाराला अस अचानक सर्वच सुना, मुले, नातवडांना सर्वांना कोरोना झाल्याने त्या घाबरल्या होत्या. कोरोनामुळे कुणीही त्यांना विचारायला देखील आले नाही. त्यांचे वाईट हाल झाले. त्या या कठीण प्रसंगाने खचुन गेल्या. स्वयंपाकच नाही केला. त्या दोन दिवस उपाशीच होत्या. त्यांना स्वतःसाठी जेवण बनवताच आल नाही. त्यामुळे त्यांना दोन दिवस अन्न व पाण्याविना जगाव लागल. कोरोनाच्या भितीने आजीच्या घरा शेजारील लोकदेखील मदतीला आले नाही. ही अशी बातमी शैलेशला समजली. तो आणि चेतन याने लगेच माहीत झाल्यावर लगेच तिथे धाव घेतली. त्यांनी त्यांना पाणी दिल व आधी खाऊ पिऊ घातल.
दोघा मित्रांनी मिळून त्यांना हाॅस्पिटलमध्ये नेल. त्यांना खुप अशक्तपणा आलेला त्यांना जाणवत होता. त्यांनी त्यांना स्वतःच्याच गाडीमध्ये हाॅस्पिटलमध्ये नेल. तिथे सगळ सविस्तर माहीती दिली. आजींची कोरोना चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली. त्यांच्यावर ट्रिटमेंट करण्यात आली. त्यांना फार काही झालेल नव्हत. दोन दिवस त्यांनी अन्न न घेतल्यामुळे अशक्तपणा आला होता. डाॅक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले. त्यांना व्यवस्थित खाणंपिणं द्या सांगितलं. योग्य तो आहारव फळे द्या सांगितल. शैलेश आणि चेतनने त्यांना त्यांच्या घरी सोडल. त्यांची प्रकृती बरी झाली होती. शैलेश आणि चेतनने दररोज त्यांना दोन्ही वेळेस कुटुंबिय हाॅस्पिटलमध्ये होते ते घरी येईपर्यंत त्यांना दररोज दोन टाईम वेळेवर जेवण, फळे आणि त्यांना दिलेले मेडीसीन यांमुळे आजी दहा दिवसांत बर्या झाल्या. चेतन आणि शैलेश आपल ऑनलाईन काम तर करत होते, पण आजीला मदतही त्यांनी स्वतःच्या पैशातुन केली. कुणीही गावातील लोक फिरकत नव्हते त्या घरी पण या दोघांनी सर्वांसमोर आपल एक माणुसकीच उदाहरण ठेवल. त्यांच्या घरचेही त्यांना सपोर्ट करत होते.
कोरोनाच्या काळात नाती तुटत असताना तसेच माणुसकी हरवल्याच्या घटनाही घडत असताना शेलैश आणि चेतन या दोन मित्र त्या गावातील आजीची तिचे कुटुंबीय कोरोनावर हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्या आजीची आपुलकीने, काळजी घेतली. माणुसकीचा धर्म निभावत त्यांनी आजीला मायेचा आधार दिला.
