Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

अरविंद कुलकर्णी

Inspirational

5.0  

अरविंद कुलकर्णी

Inspirational

माय नेम इज श्रावण

माय नेम इज श्रावण

3 mins
781


माय व्हिलेज इज अकोला 

माय होम इज बस स्टॅण्ड 

माय नेम इज श्रावण.......

दुसरीतील श्रावण गुरुजींना इंग्रजीतून फाडफाड बोलत होता.त्याचे हे इंग्रजी बोलणे गुरुजी कौतुकाने ऐकत होते. गुरुजींच्या चेहेर्यावर स्मितहास्य होते. निकम गुरुजींनी श्रावणला जवळ घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

श्रावण... होय हाच तो श्रावण आहे ज्याचा जन्म अकोल्याला झाला. बस स्टॅण्ड हेच त्याचे घर झाले.


श्रावणची आई शशिकला मनोरुग्ण होती .शशिकलाचा सांभाळ तिची आई करायची. गावात घरोघर फिरुन भिक्षा मागायची जो काही कोरकुटका मिळेल तो तिला खाऊ घालायची. आपण ही खायची. शशिकलाचा सांभाळ करायची. शशिकलाची आई काही दिवसांनी मरण पावली. उन वारा पाऊस सोसत शशिकला दिवसभर गावात भटकत असे, जे मिळेल ते खाऊन आपले पोट भरायची. ती मनोरुग्ण होती. तिला आपल्या देहाचे भान नसायचे. शरीरावर वस्त्र असले काय आणि नसले काय तीला त्याचे काहींच वाटायचे नाही. अशा अवस्थेत भटकत असताना काही वासनांध नराधमांनी तिचा गैरफायदा घेतला. ती कोणाकडे दाद मागणार होती ? कोणाकडे तक्रार करणार होती? याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एके दिवशी शशिकला भटकत भटकत शाळेपाशी आली. तिथे व्हरांड्यातच तिने अंग टाकून दिले. गडबडा लोळायला लागली, मोठमोठ्याने आरडाओरडा करु लागली. ते ऐकून शाळेतील शिक्षक व शिक्षिका बाहेर आले. शेजारीच अंगणवाडी होती तेथील अंगणवाडी सेविके ने शशिकलाची अवस्था पाहिली तिच्या पोटात दुखायला लागलेय हे तिने ओळखले व तीने सरकारी दवाखान्यात फोन करुन अॅंबुलन्स बोलविली. त्या अॅंबुलन्समधून तिला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. शशिकलावर उपचार सुरू झाले व काही वेळातच ती मोकळी झाली. शशिकला ने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

 

दवाखान्यात सिस्टर शशिकलाची व तिच्या बाळाची खूप काळजी घेत होत्या . बाळाला व तिला रोज न्हाऊ माखू घालणे, तिला जेवू घालणे, अंगावर स्वच्छ व चांगल्या साड्या तिला नेसविणे त्यामुळे शशिकला खूप स्वच्छ टापटीप व सुंदर दिसू लागली होती. बाळ ही गुटगुटीत दिसू लागले. पण शशिकला एका रात्री आपल्या बाळाला घेऊन दवाखान्यातून हळूच पळून गेली. ती आपल्या पहिल्या ठिकाणी अकोल्याच्या बसस्थानकात पुन्हा येवून राहिली. शशिकला जरी मनोरुग्ण होती, वेडसर होती तरी ती एक आई होती. आईची माया तिच्या हृदयात होती. तिला स्वत:च्या शरीराची शुद्ध नव्हती तरी ती आपल्या बाळाला क्षणभरही विसरत नव्हती. बाळाला छातीशी धरून स्तनपान करीत होती त्याला खेळवत होती. मधूनच मोठमोठ्याने बोलत होती, कधी मोठमोठ्याने रडत होती. दिवसभर गावभर फिरत होती. कोणी काही दिलं ते खात होती आणि रात्री स्टॅंडमधे येवून झोपत होती. असे दिवस जात होते.


आता बाळ मोठे झाले. बघताबघता ते सहा वर्षांचे झाले. बस स्टॅण्डच्या मागे एक लिंबाचे झाड होते त्या झाडाला पार बांधलेला होता. त्या पारावर हे बाळ खेळत राहायचे. त्या लिंबाच्या झाडापासूनच जि. प. शाळेचा रस्ता होता. तेथूनच एकदा निकम गुरुजी शाळेवर जात होते. त्यांनी त्या बाळाला तिथे खेळताना पाहिले. मग त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या बाळाला आपल्या घरी नेले. त्याला स्वच्छ आंघोळ घातली. शाळेचा गणवेश घालून पाटी पेन्सिल दप्तर दिले व पहिलीच्या वर्गात त्याचे नाव घातले. शाळेच्या दाखल्यावर त्याचे नाव ठेवले "श्रावण" ! 

     

आता श्रावण दुसरीच्या वर्गात गेला आहे. मराठी तर तो वाचतोच आहे पण इंग्रजी ही फडाफडा वाचतो आहे. आपले नाव, आपली ओळख तो इंग्रजीत न अडखळता सांगतो. 

माय नेम इज श्रावण ! 

माय व्हिलेज इज अकोला ! 

माय होम इज बस स्टॅण्ड ! 


Rate this content
Log in

More marathi story from अरविंद कुलकर्णी

Similar marathi story from Inspirational