अरविंद कुलकर्णी

Inspirational

2.0  

अरविंद कुलकर्णी

Inspirational

डाव मोडू नको

डाव मोडू नको

4 mins
1.3K


"हनुमंता"

 हा एक खेड्यातला तरुण मुलगा.आई बापाचा एकुलता एक. घरची परिस्थिती बेताची. हनुमंताचे वडील एकनाथ.गावात त्यांना सारे

 "नाथाबुवा" म्हणायचे.


 नाथाबुवांचे आयुष्य सारे कष्टात गेले. लोकांच्या शेतात मोल मजुरी करुन त्यांनी पांच एकर जमीन घेतली नदीकाठची.

 त्यांना गाई म्हशींचे ही वेड होते. त्यांच्या कडे दोन बैलं , एक गाय आणि एक म्हैस ही होती. त्यांच्या दुधावर घरखर्च भागायचा शिवाय हनुमंताच शिक्षण ही चालू होतं. तो अभ्यासात असा तसाच होता पण कसाबसा बारावी पर्यंत पोहोचला.


 नाथाबुवा आता थकले होते. शेतातले कष्ट करण्याचे बळ त्यांच्यात राहिले नव्हते.ते हनुमंताला म्हणाले "हन्या आता बास झालं तुझं शिक्शान.... आपल्या शेताकडे बघ. आपल्या पोटापुरत़ं देतीया काळीआई . आता माझ्याच्यान नाही होत शेतातले कष्ट.

पण........ पण हनुमंता च्या मित्रांनी त्याला आय .टी आय. करायचं खूळ डोक्यात घातलं होतं. तो काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी नगर ला जाऊन त्याने आय . टी. आय. ला प्रवेश घेतलाच. दोन वर्षांचा टर्नर फिटर चा कोर्स पूर्ण करुन हनुमंता पास झाला. गावाकडं आला. 

हनुमंताने पुण्या मुंबईच्या कारखान्यात नौकरी साठी अर्ज केले.काही दिवसांतच त्याला पुण्याच्या टेल्को कंपनीत नौकरी मिळाली.पगार ही चांगला होता. हनुमंताच्या आई वडिलांना ही खूप आनंद झाला. नाथाबुवा म्हणाले "बरं झालं लेकराला आपल्या सारखे काबाडकष्ट करावे लागणार नाहीत.आपण जे भोगलं ते लेकरांच्या वाट्याला येऊ नये यातच सारं आलं.

हनुमंत पुण्याला नौकरीवर रुजू झाला.काही दिवसातच लग्नाचे स्थळ सांगून आले.

आळसुंद्याच्या म्हादबा पाटलाची मुलगी अलका ! 

गोरीपान , शेलाटी तरतरीत नुकतीच बारावी पास झालेली.बागाईतदार बापाची लेक. पसंती आली , सुपारी फुटली लग्न ठरले.

अलका व हनुमंत रात्र रात्र मोबाईल वर एकमेकांना मॅसेज पाठवू लागले. आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न रंगवू लागले. 

खेड्यातून पुण्यासारख्या शहरात राहायला मिळणार म्हणून ती आनंदली होती. हनुमंतासारखा देखना हौशी जोडीदार मिळाल्याचे समाधान चेहेर्यावर दिसू लागले होते.


लग्न झाले . सत्यनारायणाची पुजा झाली. पंधरा दिवस झाले. हनुमंताची रजा संपली तो अलकाला घेऊन पुण्याला आला. राजाराणीचा संसार सुरु झाला. हनुमंत सुटीच्या दिवशी अलकाला घेऊन सिनेमाला जात असे. बाहेर हाॅटेल मधे जेवायला जायचे. दिवसभर भटकंती करुन रात्री उशिरा घरी यायचे. असे आनंदात दिवस चालले होते.लग्नाला जेमतेम तीन महिने च झाले होते. 

तोच...... तोच......

नियतीने डाव साधला.......


नाथाभाऊ शेतात काम करीत होते.पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू करायला गेले आणि.... आणि.....

जबरदस्त शाॅक लागला . सर्व शरीर काळे निळे पडले . एका क्षणात खेळ खल्लास... 

मांडलेला डाव एका झटक्यात मोडला गेला ... 

नाथाभाऊ गेले ... परत कधीच न येण्यासाठी .!


ही बातमी गांवभर पसरली . पर्यागाबाई हनुमंता ची आई उर बडवित शेतात धावली.सगळा हलकल्लोळ माजला.हनुमंत आणि अलकाला म्हादबा पाटील (अलकाचे वडील) जीप मधे घेऊन घटना स्थळी आले. पोलिस आले पंचनामा झाला. अंत्यविधी झाला.  

पंधरा दिवसांनी वडिलांचे क्रियाकर्म पार पाडून हनुमंत नौकरीवर रुजू झाला.अलका ला त्याने आपल्या आई जवळ ठेवले.


पर्यागाबाई दूर कुठेतरी शून्यात नजर लावून बसू लागली.नातेवाईक मंडळी येत होती चार गोष्टी समजावून सांगत होते व निघून जात होते.घरातले सर्व काम अलकाला करावे लागत होते.आल्या गेल्या ची उठबस , स्वयंपाक , चहापाणी.गुराढोरांचे चारापाणी. त्यांचे शेण काढणे हे ही तिलाच करावे लागत होते.


लाडात वाढलेली ,कामाची सवय नसणारी अलका. पुण्यासारख्या शहरात राहाण्यासाठी लालाईत झालेली अलका ...........

तिच्या नशिबी गुराढोरांंचे शेण काढायची वेळ आली या विचाराने तिचं डोकं सुन्न व्हायचं.

हनुमंत फोन करुन सारखी आई ची चौकशी करायचा पण अलकाला साधं तू कशी आहेस , जेवलीस का ? हे पण विचारत नसे.या सार्या प्रकाराने ती वैतागली होती. मग सगळा राग ती हनुमंताच्या आई वर काढू लागली. दोघींचे सकाळ संध्याकाळ खटके उडू लागले. लग्नाच्या सुट्टी मुळे व वडीलांच्या निधनामुळे हनुमंताला ही आता रजा मिळत नव्हती.तो आई ला व बायकोला फोन वरून समजावून सांगत असे पण त्याचा फोन आला की दोघींच्या भांडणाला सुरुवात होत असे वरुन पुन्हा सासू सासर्याचा उपदेश या प्रकारामुळे हनुमंत ही वैतागला होता.


ऐके दिवशी संध्याकाळी अलका अंगणात बसली होती.समोर आरसा ठेवून केस मोकळे सोडून विंचरीत होती. हे सासूबाईंनी पाहिले अन् तीची तळपायाची आग मस्तकात गेली.

"अगं ये सटवे सांजच्या पारी काय द्वाड वाणी केस ईचरीत बसलीस.लक्षुमी यायचा वखत झालाय देवापुढं दिवा लावायचा , तुळसीमातेला हाळद कुकू वाहायच्या वक्ताला आवदसे वाणी केस मोकळे सोडून बसलीस रंडके".......


 हे सासूचे बोलणं ऐकल आणि आलका ताडकन उठली "रंडकी कोण ग ये थेरडे तू का मी "? असे म्हणत म्हातारीच्या ताडकन दोन तोंडात दिल्या . म्हातारी कोलमडून पलीकडे पडली. ते पाहून अलकाने कांगावा करायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्या ने रडायला लागली बांगड्या फोडून टाकू लागली. शेजारी पाजारी रोजचीच भाडंण म्हणून कोणीही भांडणे सोडवायला आले नाही.


अलका ने आपल्या बापाला फोन लावला " बापू तुम्हाला जर मी ज्जीत्ती पायजे आसल तर आत्ताच्या आत्ता गाडी घेऊन या आणि मला घेऊन जा. मला सासूबाईंनी लई मारलय.....

तुमी जर नाही आलात तर मी हिरीत उडी टाकून जीव दीन......


एक तासातच म्हादबा पाटील माणसांनी भरून टेम्पो घेऊन आले व अलकाला तिच्या सामाना सगट माहेरी आळसुंद्याला घेऊन गेले..

 पुन्हा एक डाव मोडला गेला....


टिप -   या कथेतील पात्रे व ठिकाण काल्पनिक आहेत. जर कुठे साधर्म्य आढळले तर तो केवळ योगायोग समजावा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational