Karuna Dhamne

Thriller

4.5  

Karuna Dhamne

Thriller

माणुसकी

माणुसकी

2 mins
420


मी व माझ्या मैत्रिणी आम्ही पाटणादेवी परिसर बघण्यासाठी गेलो सकाळी आठ वाजता निघालो. चाळीसगाव पाटणादेवी साधारण 18 किलोमीटर आहे त्या दिवशी माझा वाढदिवस तेथेच साजरा  करायचा होता, पाटणादेवी गावाला चामुंडा मातेचे मंदिर आहे तेथे देवीचे दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी निघालो. तेथे दाट जंगले आहेत तेथे आम्हाला मोर हरीण साप असे बहुतेक जनावरे बघायला मिळाले नंतर धबधबा बघण्यासाठी निघालो तेव्हा आम्हाला समजलेच नाही की एवढं पाणी कुठून येत असेल बरं आम्ही फारच मजा केली डब्बे आम्ही तिथेच खाल्ले बघता बघता चार वाजून गेले आम्हाला वेळच कळाला नाही. आमच्या सोबत जे लोक होते ते देखील निघून गेलेत आम्हाला वाटले की बस सहा वाजता आहे. तर आपण इतक्या लवकर बस स्टँड ला जाऊन काय करणार म्हणून आम्ही तिथेच थांबलो तेव्हा अचानक इतका जोरात पाऊस सुरू झाला पाऊस थांबेना बघता बघता वेळ पटापट निघून गेला. आमचे बस चालली गेली अंधार पडला आम्ही मैत्रिणी खूपच घाबरलो मी तर रडायलाच लागली घरी आई-वडील काळजी करत असतील काय करावे कळेना.

अचानक समोर आम्हाला एक झोपडी दिसली. तेथे एक आजी बसली होती आम्हाला पाहून आजी बाहेर आली झोपडीत आजी एकटीच राहत होती.आजीला कोणीच नातेवाईक किंवा मुले न होती. आजी ने आम्हाला झोपडीत बोलवले. आजी खूपच गरीब होती आजीने आम्हाला जेवायचे विचारले आम्ही सर्वांनी नाही म्हटले आम्हाला भूक नाही, परंतु आजीने ऐकलेच नाही आजीच्या डब्यात फक्त दोन मूठ तांदूळ होते आजीने दोन लिटर पाणी टाकून खिचडी बनवली त्या खिचडीसाठी तेल ही आजीच्या घरात नव्हते फक्त तिखट व मिठ टाकून खिचडी बनवली होती पण ती खिचडी खूप चविष्ट होती की आम्ही सर्वांनी पोटभर खाल्ली. आपण पण त्या खिचडीला मसाला टाकून बनवली तरी ती इतकी चविष्ट येत नाही. आजी आम्हाला गावाचे सरपंच श्री अनिल चौधरी काकांकडे घेवून गेलेल्या आमच्या आई वडिलांना फोन लावून दिला ,आमच्या सर्वांच्या आई-वडिलांची काळजी कमी झाली.आजी आम्हाला परत झोपडीत झोपायला घेऊन गेल्या. आजीच्या झोपडीत रात्रभर झोपलो, झोप इतकी छान लागली की जी घरात गादी टाकून पण झोप व्यवस्थित लागत नाही. आम्ही सकाळी आठ वाजता उठलो. आम्ही आजीकडून निघताना आम्हाला आजीला इतके प्रेम दाटून आले की आजीच्या ही डोळ्यात पाणी आले व आम्हालाही रडायला आले, आजी म्हणाल्या की तुम्ही केव्हाही पाटणादेवी या देवीला आल्या की माझ्याकडे या. आजीने आम्हाला सर्वांना मिठी मारली. जर आम्हाला भेटली नसती तर आम्ही जंगलात काय केले असते पाऊस इतका होता की समोरची व्यक्ती आम्हाला दिसत नव्हती असा माझा वाढदिवस मला पूर्ण आयुष्यभर लक्षात राहील. शिक्षण "डिग्री, पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठे होत नसतो तर कष्ट अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते.... धन्यवाद.



Rate this content
Log in

More marathi story from Karuna Dhamne

Similar marathi story from Thriller