Sunita madhukar patil

Inspirational

4.3  

Sunita madhukar patil

Inspirational

माणुसकी

माणुसकी

1 min
307


आजारपणाने खंगुण सापळा झालेल्या नवऱ्याला पाठीवर लादून आदिवासी पाड्यातील रुक्मि जंगलातील, काट्याकुट्याची वाट तुडवत होती. 

दवाखाना घरापासून आठ-नऊ कोस लांब, खराब रस्ते आणि अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे पाड्यातील लोकांना त्रास सहन करावा लागायचा. 

उपचाराअभावी रुक्मिचा नवरा दिवसेंदिवस खंगतच गेला. नाईलाजास्तव तिने त्याला स्वतःच्या पाठीवर लादून दवाखान्याचा रस्ता धरला.

तिला पदोपदी जाणवत होतं, कोणीतरी तीचा पाठलाग करतंय. ती सावधगिरीने पावलं टाकत होती आणि अचानक तो तिच्या समोर उभा ठाकला. मिश्यानां पीळ देत सावज हेरलेच्या अविर्भावात तो हसला. फाटक्या कपडयांनी उघडं अंग झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करत तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. 

तिच्या नजरेतल्या लाचारीने त्याच्या काळजात कळ उमटली, तो तिच्या पाठीवरचं ओझं आपल्या पाठीवर लादून चालू लागला. माणुसकीच्या दर्शनाने भारावलेल्या तिचा जीव भांड्यात पडला. 


© copyright_ All rights reserved.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational