माझा छंद... मातीचा गोळा..
माझा छंद... मातीचा गोळा..


“अय्या... हिच काय करायच... नुसती बावळटासारखी मातीत लोळते. काय म्हणाव काही कळत नाही. सोसायटीच्या मूलांना आपल्यासारख करुनच मन भरेल यांच. तिची आई रसिका स्वतःला खुप हुशार समजते. म्हणंटल तर ती उलट आपल्यालाच ज्ञान पाजते. माझ्या मूलीला ज्यात मज्जा वाटते तिला मी तेच करू देते ... अरे पण किती घाण असते त्यात. तेच हात तोंडात, तेच पाय घरात, तसेच भरलेले नख...... छीssssss किती सगळा घाणेरडे पणा. माझी परी पण खुप हट्ट करते तिच्याशी खेळायचा पण मी तिच्या अगदी आसपासही भरकु देत नाही तिला. तिच्या धाकाने तीच खेळण होइस्तोर इथन हलत नाही. एक मैत्रीण नाही तिची. खेळते आपली एकटीच मातीत लोळुन”, सोसायटी ग्राउंड मधील बायका रोमा बद्दल बोलीत होत्या.
रोमा आपली मधमस्त होवुन एकटीच मातीमध्ये काडीने काही तरी खेळ करीत होती. हातात माती घेवुन मातीला वेगवेगळे आकार देत होती. कधी मातीत बसत होती तर कधी उठत होती. कधी लोळत होती तर कधी हाताने माती काढीत होती. तिच आपल खेळण सुरु होत. तिचा हा जगा निराळा रोजचा खेळ असायचा. दोन तास ती तेच करीत बसायची. तिचे पुर्ण कपडे, हात,पाय, तोंड मातीने भरुन असायच. ग्राउंडमधील सगळी मूल आपआपल्या मित्र मैत्रीणींन सोबत खेळ खेळण्यात व्यस्त असायची तेव्हा ती असे कारभार करायची. तिला बघुन ग्राउंडमध्ये खेळणारी मूल तिच्या सोबत माती खेळायला यायची पण त्यांच्या आई त्यांना रागवत घरी परत घेवुन जायच्या. पण रोमाला काही फरक पडत नसे.
रोमा जेव्हा १ वर्षाची होती तेव्हा असच गार्डन मध्ये खेळता खेळता माती पहिल्यांदा हाती घेतली आणि त्यात काडीने भलते सलते आकार बनवीत होती. मातीत खेळणे चांगल असत त्यानी आपल्या Motor skills विकसित होतात म्हनूण रसिकाही तिला मातीत खेळु द्यायची. खर तर ती आपले हात, पाय, कपड़े सगळ मातीने घाण करुन टाकायची पण तिला त्यात आनंद मिळायचा. ती खेळुन झाल की तिची आंघोळ घालुन द्यायची. रसिका बरेचदा तिला इतर मूलांन बरोबर खेळायचा आग्रह करायची पण तिला त्यात रस नव्हता. सगळी मुल छान खेळत असायची पण रोमाला ते नको वाटायच. म्हणून तिने ही तिला आग्रह करायचे सोडले होते.
सोसायटीतील इतर बायका परस्पर येवुन म्हणायच्या,” तुमच्या मूलीमुळे आमची मुल वाया जातील. असले घाणेरडे खेळ ती खेळते तिला जरा आवारा की. आमची मुल हट्ट करतात मातीत खेळायचा तिला बघुन. एवढ्या स्टैंडर्ड सोसायटीच्या लोकांची मुल अस करतील तर काय स्टेटस राहील आमच.”
यांना काय उत्तर द्याव तिला बरेचदा सुचायचे नाही, “ मी तिला हव ते करू देते. एवढ्या चिमुकल्या जिवावर प्रत्येक गोष्टीची जोर ज़बरदस्ती करणे मला पटत नाही. मूलांना तेच करू दयावे ज्यात त्यांची रुचि आहे. आपल्या इच्छा त्यांच्यावर थोपवण्यात मला तरी काही अर्थ वाटत नाही.” एवढ बोलुन ती गप्प बसायची.
बरेचदा बायका तिच्याशी भांडण ही करायच्या. काही लोकांनी तर चक्क माय - लेकीची तक्रार सोसायटीच्या सचिवाकडे केली होती. बर झाल ते काका खुप समजदार होते बाब थोडक्यात आटोपली.
तरीही रसिका रोमाला मातीत खेळुच द्यायची कारण तिने बघीतले होते तिच्या हातात कमालीची जादु आहे. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसच काही तरी झाल होत तिच्या बाबतीत. एका अप्रतिम कलेची जोपासना तिच्या हातुन होत होती. देवाची देणगी होती तिला. ज़र आता तिला तिचा छंद जोपासु दिला नाही तर तिच्या या कलात्मक देणगीला कुस लागेल म्हणून लोकांकडे दुर्लक्ष करुन तिला आपल्या मूलीच्या छंदाची जोपासना करणे गरजेचे वाटले.
खर तर हे काम आईचच असत तिची एक परखी नजर असते आपल्या मुलांवर त्यांच्या नसानसा जाणुण असते ती. त्यात रसिका एक शिक्षिका होती म्हणून मुलांना कस हाताळायच तिला माहिती होत. ती तिच्यावर दबाव टाकण्यापेक्षा तिला प्रेमाने समजुन सांगायची आणि तिच्या कलेला वेळोवेळी प्रोत्साहन देवुन वाव द्यायची.
ती ज़री एकटी ग्राउंड मध्ये खेळत असली तरी रसिकाची चौफेर नज़र तिच्यावर असायची. कोण काय म्हणतय, कोण कस वगताय तिला सगळ कळायच पण तीला वाद नको हवे होते. बोलुन वाद करण्यापेक्षा कृतीतन व्यक्त करणे कधीही योग्य असत हे यावर तिचा जास्ती विश्वास होता.
रोमा पाच वर्षाची असतांना आपल्या फ़्रॉक मध्ये काही तरी घेवुन आली. धावत आली आणि सोफ्यावर सगळ टाकुन लगेच हात, पाय धुवायला गेली. फ़्रॉक मातीने काळाकिट्ट झाला होता. हात माखुन गेले होते. नखात माती आत पर्यन्त शिरली होती. रसिका किचन मधन आली आणि तिने काय आणल म्हणून बघु लागली. बघते तर काय तिने टमाटर, भेंडी, वांगी, बटाटा, केळी, द्राक्ष, मिरची अश्या तिच्या परीचयाच्या सगळया भाज्या आणि फळे मातीला आकार देवुन बनविल्या होत्या.अगदी जसच्या तश्या दिसत होत्या. फक्त पाच वर्षाच्या मूलीने एवढे सुबक आकार बनविले यावर कोणाचा विश्वास बसेना.
समीर पाच दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. तो आल्यानंतर तिने रोमाने बनवीलेल्या मातीच्या वस्तु त्याच्यासमोर ठेवल्या.
“Wow... Amazing... कुठन घेतल्या तु एवढ्या छोट्या छोट्या वस्तु ते ही मातीच्या. रोमाला आणि तुझ्या शाळेतील मूलांना या सगळयांची ओळख शिकवायला किती फ़ायदेशीर आहे. खरच खुप छान आहे लहान मूलांना शिकवायला”.
“साहेब तुम्हाला वाटत काय तुमच्या मूलीला काही शिकवायची गरज आहे. ती उपजत कलाकार आहे. हे सगळ तिने तिच्या हाताने बनविले आहे”.
“What..? ख़रच No way.... जर तिने हे खरच बनविले असतील तर ती अलौकिक कलेची धनी आहे”.
“ह्म्म्म्म्म.. तुमच अगदी खर आहे. मला माहिती होत ईश्वरीय देणगी आहे तिला. म्हणून मी तिला कधीच रोक टोक केली नाही. अगदी वर्षभराची होती तेव्हा पासन ती मातीत हात घाण करायची पण मला नेहमी वाटायच ती कोणत्या तरी उत्कृष्ट कौशल्याने निपुण आहे.”
“ ये पण तु याबाबतीत काही बोलली नाहीस ग माझ्याशी”.
“मला तुम्हाला असच काही तरी सर्प्राइज़ द्यायच होत”.
“खरच तु एक छान आई आहेस आणि तेवढीच छान बायको ही”.
त्या दिवशी रसिकाला चैनीची झोप आली.
हळु हळु रोमा मातीच्या छान छान वस्तु बनवु लागली. गणपती उत्सवात तिने मातीची एवढी सुरेख गणेश मूर्ति बनविली की पुर्ण सोसायटी तिचे कौतुक करायला आवर्जुन आली. जे लोक दोघी माय लेकीला नको ते बोलायचे.त्यांना मूर्खात काढायचे. आता त्यांचीच तोंड तिच कौतुक करुन थकत नव्हती.
रसिकाला खुप समाधानी होती. तिने विचार केल्याप्रमाणे कृतीतन लोकांच्या तोंडावर झाकण लागली होती. तिने रोमावर दाखवीलेला विश्वास रंगात आला होता.
समीर आणि रसिकाने तिला Art School मध्ये टाकायचे ठरवीले. एका नामवंत शाळेत तिला अड्मिशन मिळाली. तिच्या कलेला एका अनुभवी मर्गदर्शकाची साथ मिळाली. तिने खुप मेहनत घेतली. तिच्या हातुन घडलेल्या कलाकृतीं मध्ये कमालीची finishing आणि सुबकता असायची. तिची कारागीरी बघुन तिचे गुरुही दंग व्हायचे.
तिला आवर्जुन निरनिराळया स्पर्धेत भाग घ्यायला लावायचे. ती त्यांच्या कसोटीवर नेहमी खरी उतरायची. प्रत्येक स्पर्धेत पहिला नंबर मारुन आणयची. तिचा हा क्रम निरंतर सुरु होता. ती एखाद बक्षिस जिंकून आली की चुपचाप कोणाला न सांगता रसिकाच्या कपाटात जाऊन ठेवुन द्यायची. तिला अनपेक्षितपणे surprise मिळायचे आणि तिचे डोळे पाणवायचे.
तिने आर्ट्स मध्येच पी०एच॰डी॰ केली. तिच्या विद्यापीठाचा पदवीदान सभारंभ होता. तिला विद्यावाचस्पती ची पदवी मिळणार होती. त्याच बरोबर रोमाला “Best student”, “Best Finisher”, “Student Of The year” असे वेगवेगळे awards ही मिळणार होते. हॉल कचाकच भरलेला होता.
तिच्या कुलगुरुंनी तिला मंचावर आमंत्रित केले. रोमा गेली आणि त्यांच्या कानात काही तरी कुजबुजली. त्यांनी माइक तिच्या हाती दिला.....
आई या चार ओळी तुझ्यासाठी...
आई.....
माझ्या मातीच्या आकाराची,
खरी घडवन तु.....
माझ्या निरागस सावलीची
खरी राखण तु......
माझ्या कलेतील ईश्वरीय,
शक्तिचा वास तु.....
माझ्या कौशल्या वरील अतुल्य,
भक्तिची साज तु.......
तुझ्यावीणा मी काहीच नाही,
माझ्या प्रत्येक वाहवाही ची,
खरी हकदार तु.......
माझ्या स्वरुपात उभी,
माझ्यातली मी च तु......
आई....
तुझ्यावीणा मी काहीच नाही...
माझी आद्य गुरू तु.....
माझ्या आत्मयाच स्वरूप तु.....
संपूर्ण हॉल टाळयांच्या कडकडाटीने गाजु लागला..... उभे होवुन सगळे रसिकाला अभिवादन करू लागले. रसिका ढसाढसा रडु लागली. रोमा धावत आली. तिला मिठित घेतल आणि मंचावर घेवुन गेली.
आई.....
लहानपणी तु जर माझा स्वप्नांना पंख दिले नसते तर आज मी ईथे नसतेच. माझ्या यशाच श्रेय फक्त तुला आणि तुलाच जात...
आपली पदवी आणि अवार्ड्स तिने आपल्या आईच्या हाती दिले....
रसिकाला अश्रु आवरेना..... हा क्षण तिच्या आयुष्यातिल अमुल्य क्षण होता..... तिच स्वप्न पूर्ण झाल होत.
〰️〰️〰️〰️
आवडली तर like आणि comment नक्की करा....
काळजी घ्या आणि वाचत राहा..