STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy Others

3  

Jyoti gosavi

Tragedy Others

माझा बिट्टया

माझा बिट्टया

1 min
367

कधी बरं मला भेटला! मला आठवत नाही पण रोज सकाळी जाताना मी आठवणीने त्याला दूध भात आणि चपाती कालवून ड्युटीवर घाईघाईत जाताना सुद्धा घालत असे. मग त्याच हळू हळू बिट्ट्या असं नामकरण केलं.

आमच्या बिल्डिंगच्या समोर राहायचा माझा आवाज जरी ऐकला तरी आमच्या खिडकीकडे बघायचा. तो एरिया त्याला स्वतःचा वाटायचा तिथे त्याने आपलं बस्तान बसवलं होतं. इतर कुत्र्यांना फिरकूदेखील द्यायचा नाही. उलट कधीकधी त्याचा रागदेखील यायचा कारण तो इतरांना खाऊ द्यायचा नाही. पण तेवढाच आमच्या सर्व फॅमिलीचा त्याच्यावर जीव होता. असा तो हडकुळाच होता व नंतर दोन-तीन दिवस दिसलाच नाही आणि दिसला तो एकदमच हडकुळा झालेला तरी पण थोडं खात होता. त्याच्यावर इलाज पण चालू होते


त्याच्या शेवटच्या दिवशी जसं काही त्याला कळलं होतं की आज तो मला शेवटचे भेटणार होता. कधी नाही ते मला तो गेटच्या बाहेर बसस्टॉपपर्यंत सोडायला आला. मला भिती वाटत होती की बाहेरचे कुत्रे त्याच्यावर अटॅक करतील म्हणून मी त्याला उचलून गेटच्या आत ठेवला. तो पुन्हा उडी मारून बाहेर आला आणि आमच्याबरोबर अर्धा तास थांबला. आमच्या ब्रुनोला फिरायला बाहेर काढला होता. त्याच्याबरोबर अर्धा तास फिरला. मी कामावर गेले आणि त्याच दिवशी मी कामावरून येताना त्याला एकदम तीव्र कन्वलरजन्स आलेली पाहिली तीच त्याची माझी शेवटची भेट.


खिडकीतून खाली बघताना मला तुझी कायम आठवण येईल. मिस् यु बाळा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy