लढाई कोरोनाशी
लढाई कोरोनाशी


पप्पू सिंग क्या करने का?
वो जो खाना बाट रहे
उनके लाइन में खडा राहिने का क्या?
बिट्टू सिंग ने पूछा
अरे हम कोई भिखारी है क्या? जो खाना बाटने की लाइन में खडा रहे
पप्पू सिंग.
क्या करे यार दो दिन से इस्टो मे घासलेट नही है तो हम खाना कैसे पकाये
वरील संभाषण परप्रांतातून आलेल्या आणि लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरचे आहे. गेल्या पंधरा दिवसापासून ते मुंबईत अडकून पडले आहेत एमपीएससी मार्केटच्या आसपास कित्तेक ट्रक टेम्पो असे उभे आहेत. साधारणपणे ट्रकबरोबर जाणारे ड्रायव्हर क्लीनर आपली शिधासामुग्री बरोबर ठेवतात स्टोव्ह आणि रॉकेल ठेवतात आणि आपले जेवन आपण बनवून खातात. पण साधारण पंधरा वीस दिवसात ते आपल्या मूळ गावी पोहोचतात .पण आता त्यांच्याजवळील रॉकेल संपले मार्केटच्या जवळच असल्याने डाळ तांदळाला तोटा नव्हता पण रॉकेल मात्र कोणाकडे आणि कसे मिळणार?
गेल्या दोन दिवसापासून ते उपाशी होते .साधा चहादेखील मिळालेला नव्हता कधीतरी दोन चार दिवसानंतर सरकारचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि जेवणाची पाकिटे वाटण्यासाठी आली परंतु लोकांना लंगरमध्ये जेऊ घालणारे हे लोक त्यांना रांगेमध्ये उभे राहण्याची लाज वाटू लागले कोणाकडून काही घेण्याची लाज वाटू लागले पण शेवटी पोटाची भूक माणसाकडून सारेकाही करविते
चलो यार वाहेगुरू का प्रसाद समज के हम लोग लेते है. हो-नाही करत करत शेवटी त्यांच्यात एकमत झाले आणि जेवणाची पाकिटे मिळवण्यासाठी असलेल्या झुंबडमध्ये ते 4-5 सरदारजीदेखील सामील झाले.
अशा रीतीने आजच्या दिवसाच्या सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला होता.