कवितेस पत्र {२१ मार्च}
कवितेस पत्र {२१ मार्च}
प्रिय कविता मुलगी असशील तर अनेक शुभ आशीर्वाद .शब्दांची कविता असशील तर तूच अंजली भरून मला शब्द दे.जेणेकरून मला तुझा वाढदिवस चांगल्या शब्दात सजवता येईल.
कविता जगात सगळे दिवस साजरा करतात!पण तुझा दिवस कधी ऐकला नव्हता ग! आज काव्यप्रेमीच्यां वाढदिवसानिमित्त तुझा वाढ दिवस होतोय हे गृहीत धरुन तुला नमस्कार करते.तसे पाहता तुझी सुरवात महदंबेच्या धवळ्यांनी झाली असे म्हणायला काही हरकत नाही.
कविता तूझा प्रारंभ हर्षाने होतो व अखेर हे काहीतरी सांगून शहाणपणेतच होतो.मी तुझ्या क्षेत्रात गेल्या बावीस वर्षांपासून आहे तरी तू मला रोज नवी वाटते.तू कधी संपतच नाही,जगातील सर्वात सुंदर प्रतीकृती आहेस.मला नेहमीच साथ देते.अग,मी कधी तुझ्या व शब्दांच्या प्रेमात पडले ते कळलेच नाही.
एखादा पुरुष जसा स्त्री कडे पाहतो तशीच मी तुझ्याकडे पाहते.जीवन प्रवासाच्या खूणेत असते,चित्रकलेत तू मौन असते पण कविता तू,शब्द देवून माझा एकाकीपण दूर करत असते.तू माझ्या आत्म्याचे संगीत आहेस.अगं तुला लिहिणे म्हणजे नवा शोध लावणे.संपूर्ण मानवतेला कवेत घेणारी अचाट शक्ती तूजकडे आहे.बघ ना!कुठेही असूदे तुझे संमेलन तो कवी हमखास त्याचे घोडे दामटीतो.
काव्या तू साक्षर निरक्षर,लहान,थोर,बाल आणखी कोण सांगू!तू सगळ्यांना आवडते.पण तुला समजताना त्यांना कवितेचे इंद्रिय असाव लागत बर.कविता तू आतातर सर्वत्र व्यापलेली आहे.जळी-स्थळी-काष्टी -पाषाणी हजरच असते.तू सुखदुःख ,जगण मरण,गुणाकार भागाकार,आयुष्या सारख्या जटील काव्याच्या मिश्रणाला समजणारी आहेस.
तू कोणावरही भाळते.काही तुला तन्मयतेने रचतात,गातात,वन्समोर म्हणतात. हे काव्या तुला लाख सलाम ग चंद्र, चांदण्या,सूर्य,रत्नाकर,सरीता,खग, नभ....याचां तर तू आत्माच आहे.तू कुठेही उगम पावते.
भाषेचा जन्म झाला तोच मुळी कवितेतून.कविता तू स्री वाचक आहेस म्हणून तू तिच्याच ओठातून पहिल्यांदा गायली गेलीस,तीही तालातच.काव्व्या तुझे अवतार,रुपेही बरेच आहेत.श्लोक,ओव्या,ऋचा, पोवाडे,लावणी,गवळण,अंगाई,लोकगीते,गझल,भावगीते बाई बाई...किती ग तुझे अवतार!तुला लिहितांना छंद,मात्रा,वृत्त,शुध्दलेखन,यमक..काय काय नियम,बंधने पाळावे लागतात बाई...!तरीही तू लय सोडत नाही.
११में १८७८ रोजी पुण्यात हिराबागेत त्यावेळच्या ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते.तेच खरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !आताचे संमेलन बघ बाई नको वाटतात ग!पण काय करणार ?.कविता, खरं सांगू ?माझा एकाकीपणा गेला तो फक्त तुझ्यामुळेच. जीवनातल्या हारजीतला सामोरे गेले ते फक्त तू...जर तू नसतीस तर काय झाले असते?
पण आता कविते थोड वाईट वाटत ग!कारण कोणीही येते उठसूठ तुला हाताळतो,बस् कळना वळ...कुठे एखादा यमक जुळला त्याला वाटते माझ्या दोन पिढ्यातरी कविता करत असतीलच... काही अर्थ नसतो पण कोण बोलणार,जो बोलतो त्याचीच कविता धारेवर धरली जाते.अग तुझा नुस्ता शब्दाचा बाजार मांडून विपर्यास करत आहेत.काही मात्र तुझी मनोभावे पूजा करत आहे.काय काय बोलू बाई...असो
कविता कविता तुझा बाजार मांडला,
कुणीही,कसाही शब्द कुठेही सांडला.
सांभाळ ग स्वतःला "जिथे तुझी खरी पूजा,सन्मान, इज्ज़त असेल तेथेच जा"तुला काही सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय..परत एकदा शुभेच्छा देते व इथेच संपवते.कुठे काही चुकल्यास क्षमापात्र राहते.भेटू पुन्हा नव्या वळवळणावर .
