गुलमोहर
गुलमोहर
चांदियाचे द्वार झाले बंद आणि पडले उजेड सोन्याचे!वसुधेस नमन करून लागली मी कामास.धावपळीचे जग रहाटगाडग्यात आता जीव जगायची सवय झालेली.इच्छा नसतांना मी शाळेत गेले.वर्गाचा नेहमीचा कित्ता गिरवला जेवणाची बेल वाजली तशी वर्गातील पाखरं डब्यातला दाणा टिपू लागली. मगं काय घाईत काहीतरी कोंबलेल तो डबा घेतला अन् मी जेवायला बसले.मी जिथे बसते ते माझे आवडते झाडं गुलमोहर.त्याचे वैशिष्ठ्य आहे एक ते सारी सृष्टी ग्रिष्माने होरपळून निघते तेव्हा त्या रखरखत्या उन्हात मनाला, निसर्गाला मोहमय करणारा,लाल चुटुक रंगाची शाल पांघरलेला फुलांचा माझा गुलमोहर आणि पळस.यांचा कळस अगदी अटके पार असतो.हे पहायला नयनांना डोळसपणा येतो.
असा हा ग्रीष्माचा राजा माझा सखा. मी दोन घास खाल्ले तोच माझे लक्ष गेले वरती कोवळ्या पानांवर त्याचे टोक धरत मी अल्हादपणे खाली उतर गेले भूतकाळाने केंव्हा पछाडले ते समजलेच नाही.मला ती आठवली अतिशय नाजूक फुलालां लाजवेल,दगडाला बोलायला लावेल,पक्षी तिच्याशी बोलतील, ब्रह्मांड हेवा करेलं अशी माझी माय,आई काशी!ती वारकरी संप्रदायाची मुलगी होती. कमालीची हुशार हं.त्या काळात ती शिकली आदर्श ही बनली आली वा-याला पोटाशी बांधत विजेसारखी चमकून गेली चमकून चमचमली जशी समशेरच!आईला पानां,फुलांचा भारी नाद.तिने जेथेही जावे तेथेही झाडं फुलेच बघावेतं.
आता तिचे वय झाले होते, आईने किती पिढ्या घडलेल्या याला साक्ष माझे डोळे.चाळीस वर्षे तिने शिक्षिकेची नोकरी केली.आता ती थकली शरीराने मनाने नाही हं. अनेक झाडे लावली तीही अजूनही उभी आहेत.मगं ती आता फक्त राहू,जगू लागली,आणि बाग फुलवू लागली.बघता बघता तिची बाग तिला बोलावू लागली.तिने केसर,आंबा,नारळ,बकुळी,औदुंबर,आवळा,रायवळ आंबा, सिताफळ,पेरू सदाफुली, कण्हेर,चाफा,अनंत,कृष्ण कमळ,कुंदा,मोगरा,गुलाब, शेवंती,वड,चिंच,पिंपळ,लिंबोणी,बेल,पारिजात,अडूळसा,साग वगैरे लावलेत आणि सोबत गुलमोहर ही लावला.आई इतकी काळजी घ्यायची या सगळ्याची की बाहेर फेरफटका मारायला गेली तर तेथून शेण, शेळीच्या लेंड्या आणायची, त्या बारीक कुटायची अन् तिच्या मुलांसारख्या पानांना जेवू घालायची.त्यांना सावली, पाणी तर नेहमीच काजळ घालतात तसे लक्ष द्यायची.खरंतर गुलमोहर मला आवडतो म्हणून तिने आणला जोपासला.काय आश्चर्य तो थोडा मोठा झाला.तिने मला बोलावले,मी आल्यावर आईने पुरणपोळी केली आणि आम्ही ती गुलमोहराखाली गोड करून करून खाल्ली.आईच्या आनंदाला पारावार नव्हता.खूपच आनंदी होती ती.
आता गुलमोहर वाढता वेग घेत आणि स्वर्गीय सुख देतं होता.तो आमच्या दोघांच्या घरांचा सदस्य झाला होता.त्याला पहिली शेंग आली तेव्हा आई त्याला धरून नाचली अगदी सान होवून. गुलमोहर अतिशय सुडोल डेरेदार फुलले तो छायाला घेवूनच.त्याला फूले आलीत.अन् इकडे आमचे मनसुबे तयारी धरू लागले.पांच वर्षाचा तो वृक्षराज जसा पन्नास वर्षाचा वाटतं होतो.आईच्या न् माझ्या कितीतरी हितगुजच्या कथा तिथे बोलल्या जायच्या.पण नियतीच्या चक्रात काय होते ते न जाणे ती न् मी विद्युल्लता सारखी चाचपली अन् जागेवर भर्भगळीत झाली.
सोसाट्याचा वारा आला आई आणि फक्त ७२ वर्षाची माझी सिंहीण आई डबल निमोनियाने १५ दिवस व्हेंटिलेटरवर तळमळ करत गेली. गेला माझा आधार तो आंधार करून गेला तसा माझा गुलमोहर जागेवर खुंटला.मला तिथे जावे वाटे ना याथला सुर नाराजीचा वाटे. गुलमोहर धरून मी रडत होती. एकदा त्याचे फुलं अंगावरून पडत माझे डोळे पुसत गेले. तिथे एक पक्षी होता तो ओरडत होता.मला नंतर लक्षात आले की तो आईचा मित्र होता. आई त्याला गुळ चपाती द्यायची मी पण दिली.थोडसं झोपावं पाठ टेकावी म्हटलं तर तेवढ्यात माझे बाबा आले.चल आक्का घरात भरल्या डोळ्यांनी मी आत गेले. बाबा सांगू लागले की; ते ऐकून मी सुन्न झाले. मी मन मोठे केले वापसी धरली.
पुनश्च मी गावी आले आणि आईरूपी गुलमोहराला भेटायला गेले.पण येथे गुलमोहर नव्हता. मी खूपच अकांडतांडव केला, बाबांशी भांडली.बाबा फक्त एकच शब्द बोलले की तो अतिक्रमणात येत होता. मी व त्या लोकांनी तो तोडला,संपवला एकदाचा.मी बाबांशी अबोला धरला चार दिवस जेवले नाही. माघारी परतली मला काहीच सुचेना,बाबांना दोष देत होती रोष करत होती आकस वाढवत होती. माझ्या मनाचा विषाद ऐकायला ना आई ना गुलमोहर.ती जागा भकास भयान वाटतं होती.आता तिथे एक भाडेकरू आला रहायला. मी पाचशे रूपयाचे रोप घेवून दिले पाच महिने झाडं राहिले पण अचानक जळून गेले.भगवंताची लीला पाठ सोडत नव्हती. अचानक सिंहासारखे बाबा माझे कर्करोगाने पछाडले सारे उपाय केले पण बाबांचे हाल पहाण्या व्यतिरिक्त हाती कांही उरलेले नव्हते शेवटी वाटतं होत की कर्करोगाने पछाडलेल्या लोकांना घरीच ठेवावे कारणं केलेले इलाज नाईलाज करून जातात माणसंही जातात,पैसा ही जातो. तिस-या पायरीवर गेलेले घरीच सारे करावे.असे वाटतं होते.आई गेली,सात महिन्यांनी गुलमोहर गेला,आठ महिन्यांनी बाबा गेले.शिक्षा कोणी कोणाला केली ते संभ्रमित राहिले.पण मनाचा हिय्या करून मी आतापर्यंत सात गुलमोहर माझ्या बदलींच्या शाळेत ते आजही उभे आहेत. आईची आठवण म्हणून तसेच मी नौकरी संपल्यावर त्याचं जागी डोळ्यांत तेल ओतून गुलमोहर लावणारच हेचं माझे वैभव असेन.थोडासा पर्यावरणाला हातभार.चला येते आता शाळा, परिसरात वृक्षारोपण करून हं!
