STORYMIRROR

vaishali Deo

Inspirational

3  

vaishali Deo

Inspirational

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज

2 mins
193

सखाराम गावाकडचा एक शेतकरी होता. पिढ्यांन पिढ्या त्यांचे कुटुंब गावाकडेच शेती करत होते. आता वडिलांची जबाबदारी सखाराम वर आलेली होती आणि तो ती व्यवस्थितपणे पार पाडत होता. घरी मोठे कुटुंब, त्याचे आई-वडील, बायको, दोन मुलं एक लहान भाऊ आणि बहीण. तो सगळ्यात मोठा होता बहीण आणि भाऊ लहान असल्यामुळे त्यांचे लग्न व्हायचे होते. शेती करून जे काही अन्नधान्य तो पिकवायचा त्यात त्यांचा चरितार्थ चालत असे. नाही म्हणायला घरी काही गाई म्हशी होत्या, त्यामुळे घरचेच दूध तूप निघत असे. खातेपिते आणि व्यवस्थित कुटुंब होते.

ज्या जमिनीत तो अन्नधान्य पिकवायचा त्याला तो दुसरी आईच म्हणायचा. त्यातून अन्न नाही तर सोने उगवते, असे त्याचे म्हणणे होते.

  काळ पुढे पुढे निघत होता. त्याची मुले मोठी होत होती.

  सखाराम चे खेडे समुद्रा काठी होते. कधी कधी भरपूर पाऊस पडायचा. त्यामुळे नुकसान होत होते. पण तो सांभाळून घ्यायचा पण यावर्षी एक दिवस प्रचंड अवकाळी पाऊस आला. झाडे उन्मळून पडली. शेतीत जे काही त्यांनी पेरलं होतं ते सारं वाया गेले. घराचे छत पण उडून गेले. घरी साठवलेले धान्य सुद्धा पाण्यामध्ये भिजून गेले . अतिशय वाईट परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली.जणू परमेश्वर त्यांची परीक्षा घेत होता.

  एकंदर गावामध्ये सगळ्यांचेच नुकसान झाले होते. सखारामच्या घरी तर सगळे होत्याचे नव्हते झाले होते.

  पण हार मानणार तो सखाराम कसला? पाऊस पडून गेल्यानंतर त्याने एकंदर आपल्या घराची आणि शेतीची पाहणी केली. व मनोमन काहीतरी ठरवले. त्याने स्वतःच्या नुकसानीचा आढावा घेऊन सरकारला विनवणी केली व सरकारी कर्मचाऱ्यांना येऊन नुकसानीची पाहणी करण्यास सांगितले. हे करताना त्याला भरपूर त्रास होत होता कारण सरकारी कर्मचारी त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसारच चक्र हलवत होते. पण आपल्या भारत देशातील शेतकरी हे खूप कष्टाळू आहेत. तसेच त्यांना आपल्या माती बद्दल व देशाबद्दल खूप प्रेम आहे. त्यामुळे सखाराम या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या कामाला लागला. त्याने सगळ्या कुटुंबाची मदत घेण्याचे ठरवले.

  आपल्या नोकरांच्या मदतीने त्याने आपले संपूर्ण घर सावरले.

  काही सरकारी अधिकारी पाहणी करण्याकरता आले पाहणी करून ते निघून गेले. त्यानंतर त्यांच्याकडून काहीही मदत मिळेना. सखाराम समजून चुकला. त्याने आपल्या मातीची शपथ घेतली की, मी यातून पुन्हा वर येऊन दाखवीन. त्याने आपले बैल आणि आपली मुले यांच्या मदतीने परत जमीन नांगरली व पुढचे पीक घेण्याकरता तयारी केली. त्याच्या कुटुंबाने सुद्धा त्याची खूप साथ दिली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची खते विकत आणली. त्याच्या बायको आणि आईने त्यांच्याजवळ जे काही थोडेफार सोने होते ते गहाण टाकले, आणि त्यातून पैसा मिळवला. आणि हिमतीने नवीन पीक घेण्याकरता सुरुवात केली. हळूहळू त्याचे नाव गावामध्ये पसरू लागले. सगळे गावकरी सुद्धा त्याला मदत करू लागले इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून स्व कष्टावर पिक घेण्याचे ठरवले. एकंदरीत त्यांच्या गावामध्ये सखाराम मुळे खूप उत्साह संचारला होता. इतर गावांमध्ये सुद्धा नुकसान झाले होते, पण ते सरकारी मदतीसाठी थांबून ,त्यांनी मदत केली नाही म्हणून रडत बसले होते. पण तेच सखाराम आणि त्याच्या गावातील शेतकरी यांनी कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता आपल्या हिमतीवर पुढील प्रवास चालू ठेवला व त्यात त्यांना यश मिळाले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational