शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

कर्तव्य

कर्तव्य

2 mins
224


    सरिता पेशाने शासकीय रूग्णालयमध्ये नंर्स होती. तिचे मिस्टर समीरही हाॅस्पिटलमध्येच कामाला होता. दोघांचेही छान दिवस चालले होते. त्यांना दिड वर्षांची मुलगी होती.दोघेही आपल्या मुलीला सांभाळून नोकरीकरत होते. दोघांचेही आईवडील गावी असत.ते दोघेही शहरात आपल्या जाॅबसाठी राहतहोते. त्यांची दिड वर्षांची मुलगी श्रुती खुपगोड होती. सरीता ड्युटीवर असली तर ती समीरकडेही राहायची. दोघेही आपल्यामुलीसोबत खुप आनंदी राहायचे. सरिताहाॅस्पीटलमध्ये दररोज रूग्णसेवेच कामकरून घरी दमुन यायची तेव्हा लहानग्याश्रुतीला पाहून तिचा सगळा कामाचा थकवाचदुर व्हायचा. तिच्या इवल्या इवल्या हातांनीती स्पर्श करायची. खुप छान वाटायच. मातृत्वाच सुख काय असत हे सरिता अनुभवत होती. समीरलाही मुलगीच आवडत होती. पहीली त्याला मुलगीच झाली म्हणून तो तिचे खुप लाड करायचा.श्रुतीचा पहीला वाढदिवस छान साजराकरण्यात आला. खुप छान चालल होत.    


अशातच कोरोनाची साथ आली. सरिताआणि समीर दोघेही अत्यावश्यक सेवेतीलकर्मचारी होते. लाॅकडाऊन जाहीर करण्यातयेण्याच्या बातम्या कानी पडू लागल्या.कोरोनाचे रूग्ण खुपच वाढत होते. सरीतालाआणि समीरला श्रुतीला कुणाकडे ठेवायचइतक्या छोट्या मुलीला त्यांना प्रश्नपडला. कोरोनामुळे वाटणारी भितीही होतीच.दोघांनाही कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी ड्युटीलागली. तिथेच थांबाव लागणार होत. दोघेहीवेगवेगळीकडे राहणार होते. मग दोघांनीहीएक दिवस श्रुतीला तिच्या आजी बाबांकडेसोडून आले. सरीताला कळत होत की मुलीलाजर जवळ ठेवल तिला संसर्ग होण्याचीभीती होती. आपल्या बाळाच्या काळजी पोटीतिने आई बाबांकडे नेल आणि ती झोपेतअसताना तिला आईकडे सोडून सरिताआणि समीर आपापल्या कामावर रूजु झाले.          


दोघांनीही दुसर्‍या दिवशी पासुनकोविड वार्डमध्ये आपली सेवा द्यायलासुरूवात केली. दोघेही एकमेकांपासुन दुर होते. त्यात रूग्णसेवेच काम करतानाकाही बातम्या येत होत्या. पण ते पती आणीपत्नी खंबीर होते. दोघेही एकमेकांनाआधार द्यायचे, ड्युटी संपल्यावर काॅल करायचे. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूननिर्भिडपणे कोरोना रूग्णांची सेवा करतहोते. त्यांना ड्युटीचे तास वाढवण्यातआले होते. हाॅस्पिटलमध्ये बर्‍याचश्या नर्सला कोरोना झाल्यामुळे जास्त ताणपडत होता. स्टाफ कमी कमी होत होता.ज्यांना कोरोना झालाय त्याही मैत्रिणींनाधीर देत होती. तिला आपल्या मुलीचीकाळजी नव्हती. ती सुरक्षित आईकडे होती.पण तिला भेटता येत नाही, जवळ घेऊशकत नाही. कस राहत असेल श्रुती एकआई म्हणून खुप काळजी वाटायची. तेव्हासमीरही तिला म्हणायचा... " हे दिवस लवकरजातील आपल बाळ मग आपल्याकडेअसेल.., " तिला समीरच्या शब्दांनी धीरयायचा. आई आणि बाबांना श्रुतीमुळेलाॅकडाउन मध्ये नातीसोबत छान वेळजाऊ लागला. ती छान खेळायची. सरीताआणि समीर वेळ भेटला की श्रुतीला व्हीडीओकाॅलवर बघायचे. तिच्याशी बोलायचे. तिहीआपले बोबडे बोल त्यांना काहितरी बोलायचीदोघांनाही आवाज ऐकून छान वाटायच.पुन्हा काम करायला श्रुतीमुळे एनर्जीमिळायची. रोज ड्युटी संपल्यावर श्रुतीलाबघायच, काॅल करायच. रूटीन झाल होत.           


सरीताला एक आई म्हणून वाईट वाटायच. श्रुतीच्या आठवणीने रडायचीही पण एकीकडे एक नर्स म्हणून ती कोविड पेशंटची सेवा करायची. सगळी फॅमिली तिच्यासोबत होती. तिला सपोर्ट करायचे. तिला काॅल करायचे. तिच कौतुक वाटायच सर्वांना आणि अभिमानही होता. समीरचाही सपोर्ट होताच. म्हणून ती कोविड पेशंटसाठी चांगली आणि निर्भिडपणे सेवा देत होती. कर्तव्यापुढे वात्सल्यावर पाणी सोडत आणि काळजावर दगड ठेवत सरिताने आपल्या दीड वर्षांच्या मुलीला आईकडे सोडून ती कोरोनाच्या रूग्णालयात रूग्णसेवा करित आहे. सरिता आणि समीरने आपल बाळ तर त्यांना प्रिय आहेच पण दोघेही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याने त्यांनी आधी कर्तव्याला प्राधान्य दिल. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy