Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational


4.8  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational


कर्मवीरांगणी

कर्मवीरांगणी

7 mins 721 7 mins 721

जागतिक कन्या दिना निमीत्त अमिताभच्या 'कोन बनेगा करोडपती' ह्या कार्यक्रमाच्या कर्मवीर ह्या विशेष कार्यक्रमाच्या पाहुण्या दिपा मल्लिक व मानसी जोशी ह्या भारतासाठी, मुलींसाठी खूपच विषेश व प्रेरणादायी आहेत हे माहिती असलेल सत्य त्यांच्याच तोंडून एकतांना किती सहजतेने त्या आपल्यावर आलेल्या संकटावर मात केली हे सांगत होत्या... पण त्यांनी केलेला प्रवास खूपच अवघड होता, घरच्यांची साथ व त्यांची स्वतःची इच्छाच हे अवघड यश त्या आज मिळवु शकल्या. भारताच नाव जागतिक पातळीवर उंचावल ही.


त्यांनी जे त्यांचे अनुभव सांगितले ते सामान्यांनाही खूप बळ देतात व लाजवतात. समाजातल्या शरीराने धडधाकट असलेल्यांची मानसिकता कशी छोटी असते हे ही जाणवत राहत.


अपंग, अधु लोक हे घरच्यांवर बोजा होतो व ते बरेच वेळा समाजाने नाकारलेले असतात. त्यांचे ओंगाळवाने दर्शन रेल्वे, बस स्थानकात, सिग्नलवर भिक मागतानाच बघीतलेले दिसतात... काही वेळेस सांगितल्या जाते कि लहान बाळांना पळवून आणून त्यांचे हात पाय कापुन अपंग केले जाते भिक मागण्यासाठी... 

 जोपर्यंत जवळुन काही अनुभवले नाही तर ' असेही असत जगात' हा पहिले प्रश्न पडतो. व आपण किती लकी आहे याची जाणीव होते.


अपंगत्व व काही न समजणारे आजार कोणाला सांगुन का व कसे येईल हे सांगता येत नाही. ते जन्मजातच असेल असे नाही... ज्यांना जन्मजात असेल त्याचा स्विकार करणारे आई-बाबा, आजी-आजोबा, बहिण-भावंड मिळणे ही मोठे भाग्य समजले जाते... त्यांच्या आयुष्यात ते भरतील ते रंग आनंदाचे असतील... जसे की 'स्काय इज पिंक'.


असामान्य करणारे हे व्यक्तीमत्व असलेले सामान्यातले असामान्य लोक... ह्यांना अपंग न म्हणता दिंव्याग म्हणणच किती योग्य आहे जाणवत.


काहींनी तर ह्या असामान्यांला घेऊनच आपला व्यवसाय करायचा हा ध्यास घेतलेला... मग त्यासाठीच सगळी धडपड...


आधी सगळ्यांचाच विरोध असतो व जसे थोडे यश लोकांसमोर यायला लागले कि काहींची धडपड 'मोडता पाय मधे घालण्याचा तर काहींची मनापासुन मदत करण्याची इच्छा...त्यातुन सातत्याने आपले काम पुढे चालु ठेवायचे याचा ध्यास कधी सोडायचा नाही याची पक्की खुणगाठ मनात घट्ट बांधायची!!!


आजीने शिकवलेल्या भरतकामाला आपलेस करून स्वतःला सक्षम तर केलेच त्याच बरोबर हजारोंच्या संखेने आपल्या गावातल्या बायकांना सक्षम केलं ते ही पडदा संस्कृती जपुन... आज त्याची दखल जगभरातील फॅशनजगताने घेतले, सोबतच मान सन्मान, बक्षिसही मिळालेत.


जेव्हा आपण आजुबाजूला पाहतो तेंव्हा असंख्य प्रेरणादायी घटना आपल्याला दिसतात, त्याच बरोबर मनाला वाईट वाटणार्यापण... 


अर्धा पाण्याने भरलेला ग्लास पाहायचा कि अर्धा रीकामा ग्लास आहे म्हणुन बघायच.... ?


जरा मना विरूध्द काही घडल की आपलं मनाच संतुलन बिघडलच समजा... आकांडतांडव करण तर नेहमीच झालेले... आपल्या बरोबरच आपल्या सोबत असलेल्या सर्वांना त्रास देतो आपण नकळत.


आज आठवत आमची कमळाबाई, ती ही सामान्यातली सामान्य पण मुलांना शिकवण्याची जिद्द मनाशी धरून वाटेल ते कष्ट करणारी... 


कमळाबाई आदिवासी, नवरा सरकारी सायबाच्या घरी घरकाम करणारा... 

नवरा फक्त नावालाच, सगळ काम कमळाबाईच करायच्या... सायबाच्या मुलांना शिकताना बघुन तिलाही वाटल आपल्या मुलांनीही शिकाव. सायबाच्या बायकोला शाळेत मुलांना कस पाठवायच हे विचारल, तर त्या तिच्यावरच ओरडल्या आमची बरोबरी करायला निघालीस का? 

इथ काम करून दोन घास खायल मिळत तेच करं...त्या बरच काही बोलत होत्या. पण कमळा बाईला त्यातल काहीच कळल नाही... सायबाची बायको आपल्यावर चिडली एवढच कळल... बरेच दिवस त्या कमळाबाईशी नीट वागायच्या नाही व आपल्या मुलांनापण कमळाबाईच्या १मुलगा व ३ मुलींबरोबर खेळु देत नसे...

उलट कमळाबाईंना खूप काम सांगायच्या व मुलींनापण सोबत आणायला सांगायच्या घरकामाला सोबत करायला... काम नीट झाले नाही की मुलींना खूप ओरडायच्या व कधी कधी मारायच्या पण...छोट्या छोट्या मुली...

मग कमळाबाई सायबाच्या बायकोला वाटेल त्या बोलायच्या ... व १-२दिवस स्वताःही कामावर जायच्या नाही व मुलींनापण पाठवायच्या नाही. 

नवर्याला सांगायच्या तुच जा कामावर... तो जायचा पण त्याला कुठे कमळाबाईंसारख काम करता यायच. मग नुसतीच चिडाचीड व्हायची सायबाच्या बायकोची... 


कमळाबाईने तर ठरवल होतच आपल्या मुलांना शिकवायच... शाळेत घ्यालायच... कोणीच नीट माहिती सांगत नाही म्हटल्यावर... एक दोन वेळा स्वतः शाळेपाशी जाऊन आली... शाळेत जाणार्या मुलांन कडे खूप कौतुकाने पाहायची व स्वप्न पाहायची माझी मुलपण ह्या शाळेत एक दिवस जाणारा, छान शाळेचा गणवेश घालणार... आपली मुलपण सायब होणार... 


पण तीला पाहिजे तशी माहीती कोणी देत नव्हत. मग ती हिरमुसून जायची. व घरी परतायची. 


एकदा ती आपल्या मुलांना सोबत घेऊन शाळेत गेली... गेटवरच तीला अडवल गेल, त्याच वेळेस शाळेच्या मुख्याधिपिका बाई शाळेत प्रवेश करत होत्या, त्यांनीपण पहिले तीला हटकल... मग कमळाबाईंनी थोडा धीर धरत त्यांना मला माझ्या मुलांना शाळेत घ्यालायच म्हणुन सांगीतल... मोठी मुलगी तीची ६ वर्षाची होती मग तीच्या पाठच्या दोन व एक मुलगा... तसे सर्व छोटेच होते... बाईंनी तीला आता अॉक्टोबर महिना चालु आहे पुढच्या वर्षी शाळा सुरू व्हायच्या आधी जुन मधे ये... मोठ्या मुलीला विचारल, तुला शिकायच आहे का? ती पण हो म्हणाली...तीच्या मोठ्या डोळ्यात मोठी स्वप्न आहेत हे बाईंनी जाणला... शाळेचा खर्च आता कमळाबाईंना सांगुन काही उपयोग नाही... परत नंतर कधी तरी सांगु... बाई आपल्या खोलीत निघुन गेल्या...

कमळाबाईपण मुलांसोबत आनंदी मनाने घरी परतल्या...


मुलही खूश होती आईबरोबर सायबाच्या घरी न जाता शाळेच्या आवार पाहुन घरी परतली... 


कमळाबाईचा नवरा आजारी पडला, आजारच निदान डॉक्टरांना पटकन नाही करता आल. खोकलत खोकलत ४-५ दिवसातच शेवटच्या घटका मोजत झोपेच देवाघरी गेला... 

रडा रड, आजुबाजुची लोकं, पाड्यावरची लोकं जस समजल तसे हातची काम सोडुन क्रियाकर्मं करण्यास आली...त्यांच्याच आधाराने शेवटचे त्याचे कर्मं पार पाडले.

रीती रीवाजा प्रमाणे १३-१४ दिवस माणसांच्या गराड्यात कसे निघुन गेले हे कळले नाही. मुलांनापण काही नाही कळल नेमक देवाघरी गेले म्हणजे काय झाले...


कमळाबाई एकाकी पडली....

काय करावे काही कळेना... हातपाय गाळुन बसण्यात ही काही अर्थ नव्हता. नातेवाईक असे कोणी जवळपास नव्हतेच, प्रत्येकालाच उद्याची चिंता..पाड्यावर परत जायचे म्हटले तर मुलांना शाळेत टाकता येणार नाही... 

काय करावे काही कळत नव्हते. पण पाड्याची नाळपण एकदम तोडायची नव्हती तीला. तीने ती तोडलीपण नाही...


छोटे मोठे काम करून थोडे पैसे मिळवत होती रोजचे व जे पैसे मिळत त्यात पहिले मुलांचे पोट भरवत असे..उरेल ते स्वतः खात असे... आहे त्यात समाधान मानुन उद्या काय करायचं हे थोडक्यात ठरवुन मुलांना झोपवुन स्वतः ही शांत झोपी जात असे. खूप पुढचा विचार ती करत नव्हती... करायचा असतो हे ही तीला ठाऊक होत कि नाही कोणास ठाऊक?


बरेच दिवस तीला एकदा बंगल्यावर जाऊन यावे असे वाटे. काही काम करून पैसे मिळेल असे वाटे. परत सायबाची बायको काय म्हणेल, कशी वागेल आपल्याशी ती आता असा विचार करत बसे. आज जाऊ उद्या जाऊ करत मनात आलेला विचार धुडकाऊन लावत होती.


सायब ही बदलुन गेले... दुसरे सायब आले होते बंगल्यात राहायला. हे ही तीला माहित नव्हते.

नविन सायबा सोबत त्यांची बायको होती.. बंगल्यात फक्त दोघच होते..बरेच दिवस कमळाबाई बंगल्यावर गेलीच नव्हती... घर कस चालवायच, मुलांना कस सांभाळायच हा रोजचाच प्रश्न समोर असायचा... नाही म्हणायला झोपडी स्वतःची होती पण ओसाड जागेवर.. बरेच दिवसापासुन जसे जमेल तसे ती मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवत होती ते आता तीला नवरा गेल्यामुळे रोजच्या कमाई सोबत थोडी खर्च करावे लागत होते... आता ते ही संपत आले होते... मदत करायला तसे कोणी समोरही आले नव्हते... तीने आहे त्या परिस्थितीत मुलांना शिकवायच स्वप्न बाळगुन होती...


इकडे बंगल्यात आलेल्या बाईंनी, विचारपुस केली आधी बंगल्यावर घरकाम करायला कोण होते? तीच नाव काय, ती आता काय करते वैगरे.. 


तीने एका अॉफिस मधल्या काम करणार्या माणसाला कमळाबाईला बंगल्यावर या म्हणुन बोलवायला पाठवल...

कमळाबाई नविन सायबाच्या बायकोला भेटायला गेली, थोडी भितभीतच. कोणास ठाऊक ही सायबाची बायको कशी असेल.. आधीच्या सारखी नको, म्हणतच ती बंगल्यावर पोहचली...

एकमेकींना बघितल्या बघितल्या दोघींच एकमेकींशी आधीचे काही भावबंध होते अस वाटतं... कमळाबाईंना त्यांनी काम करायला बोलवले... खरंतर काम करण्यापेक्षा त्यांना सोबत हवी होती दुपारची... साहेब अॉफिसला गेल्यावर कोणीतरी सोबत असावे ह्यासाठी... कमळाबाईंना काम करायच होतच... पैसे किती मिळतील ह्याच्याशी तीला काही देणे घेणे नव्हते... पहिल्याच भेटीत त्या एकमेकिंना आवडल्या. १-२ दिवसातच दोघींची छान गट्टी जमली. कमळाबाई मोकळेपणाने बोलायच्या. कमळाबाईंनी आपल्याला मुलांना खूप शिकवायच आहे हे सांगीतले... सायबाचे अडनाव जोशी होते, ती त्यांना जोशी काकु म्हणायला लागली... 

जोशी काकुंना पण शिक्षणाची आवड होतीच.. त्यांनी कमळाबाईंना सोबत मुलांनांपण घेऊन येत जा म्हणुन सांगीतल... मुलं कमळाबाईं बरोबर आलीत... जोशी काकुंनी मुलांना खाऊ देत त्यांच्याशी गट्टी जमवली... मुल काळी-सावळीच पण छान नेट नेटकी होती... शाळा सुरू व्हायच्या आधीच ह्या मुलांना जोशी काकु गाणे, बाराखडी वैगरे शिकवायला लागल्या... त्यांना आपली शिक्षेकेची हौस भागवायला मिळत होती..

सगळ्यांचाच वेळ मजेत जात होत होता. जोशी काकुंना स्वतःची मुल नसल्यामुळे त्या कमळाबाईंच्या मुलांमधेच आपले मन कधीपासुन रमवु लागल्या हे त्यांनाही कळले नाही. 


जोशी साहेबांना आपल्या बायकोला आनंदी बघुन छान वाटले.. जोशीकाकुंचा अबोल स्वभाव हळुहळु बोलका झाला. साहेब संध्याकळी घरी आल्यावर काकु चहा सोबत घेत व दिवस भरात मुलांसोबत वेळ कसा गेला, काय काय केल हे सांगायच्या. साहेब ही आनंदाने त्यात सामिल व्हायचे. आताशा दोघांमधला संवाद वाढला होता.


जून महिना सुरू झाला तेंव्हा शाळेत मुलांचे नाव नोंदवायला कमळाबाईंबरोबर जोशी काकूपण गेल्या फीचे पैसे मीच भरणार म्हटल्या. आदिवासींसाठी फी माफ होती, पण शाळेचे काही निधी आकारणी होती ती प्रत्येकालाच द्यावी लागायची.. ती त्यांनी भरली.

शाळेत दोघींचे नाव नोंदवले, मोठीच पहिलीत व दुसरीच बालवाडीत, एक वर्षा नंतर तिसरीच नाव शाळेत नोंदवता येईल... कमळाबाई व दोन्ही मुली खुश होत्या, मोठ्या मुलीच नाव सुमन होत..दुसरीच सरू होत... दोघी शाळेत जायला मिळत म्हणुन खूप खुश होत्या.. 


मुलींच्या शाळेचा सर्व खर्च जोशी काकुंनी घेतला असल्यामुळे कमळाबाईंना खूप आधार वाटला, जोशी काकुंचे कसे आभार मानावे हे तीला काही कळत नव्हत... काकुंना ती आपला देवच मानत होती. त्यांची सगळी काम मनापासुन करायची व संध्याकाळी पाड्यावर जाऊन ताजी भाजी आणुन कॉलनीत विकायची. त्यातुन थोडा पैसा मिळायचा, सुमन मोठी होती तीला आईचे कष्ट व जोशी काकूंची मदत समजायची.. त्या लहान वयातपण ती आपला खारीचा वाटा करून आईला मदत करायची... सुमन हुशार होती, शिकवलेल पटकन शिकायची... जोशी काकूपण तीचा अभ्यास घ्यायच्या. बघता बघता सर्व मुले शाळेत जायला लागलीत... 

सुमनला चौथीची स्कॉलशिप मिळाली, त्यामुळे सर्वांना खुप आनंद झाला होता... १०वी झाल्यावर आपण डी. एड् करायच व लवकर नोकरीला लागुन आईला हातभार लावायचा व आपल पुढील शिक्षणही करायच हे तीच स्वप्न होत.. खेळातपण चांगली प्रगती होती तीची.

जोशी काकूंच्या शिकवणी मुळे तीच बोलण, राहणीमानही छान होत, आदिवासी आहे हे पटकन ओळखुही येत नसायच.

नुसतीच सुमन नाही तर कमळाबाईंची सर्वमुले हुशार व परिस्थितीची जाणिव असलेले होते. आईचे स्वप्न हे त्यांचेपण स्वप्न होते... 

सुमन घरात मोठी व सगळ्या बहिण भावांची आदर्श ताई होती.


जोशी काकू आजारी पडल्या तेंव्हा सुमननेच मुलीप्रमाणे त्यांची सर्व देखभाल केली... 


जोशी काकूंचे उपकार कधी विसरली नाही...तर त्या तिचे प्रेरणास्थान होत्या.... 


सुमन पाड्यावरच्या आदिवासींमधली पहिलीच शिक्षण घेतलेली मुलगी होती व आता शिक्षिका म्हणुन काम करत होती...आता प्रत्येकाची आदर्श ताई बनली होती, जोशी काकुंसारखच तीने पाड्यावरच्या व आजुबाजुच्या १००-२००मुलांमुलींना शिक्षणासाठी मदत केली असेल ४-५ वर्षात.

त्यांच्यातली कर्मवीरांगणीच म्हणायला हवे तीला!


Rate this content
Log in

More marathi story from अंजली (Anjali) बुटले (Butley)

Similar marathi story from Inspirational