कलेने बनवले आत्मनिर्भर...
कलेने बनवले आत्मनिर्भर...


शहरात वाढलेली, उच्चशिक्षित रेवती नवऱ्याची बदली झाल्यावर खेडेगावात रहायला गेली. नवरा ऑफिसला गेल्यावर तिला घर खायला उठे. काय करावं कळत नव्हतं.
याच विचारात असताना एक दिवस घरकामाला येणाऱ्या स्मिताने तिला विचारलं, मॅडम तुम्ही माझ्या मुलाचा रोज थोडावेळ अभ्यास घ्याल का? आणि स्मिताच्या मुलासोबत आणखी चार मुले तिच्याकडे अभ्यासाला येऊ लागली.
महिना संपल्यानंतर स्मिताने तिला फी म्हणून शेतातील ताजी भाजी, बांबूनीं बनवलेल्या छान टोपल्या दिल्या, बाकीच्या बायकांनी ही असंच हातानी विणलेल्या, भरतकाम केलेल्या वस्तू दिल्या, तिला जाणवलं की ह्या बायका शेतातील, घरातील काम करून फावल्या वेळात आपल्या कला जोपासत आहेत, तिला भारी कौतुक वाटलं.
तिने नवऱ्याच्या मदतीने या बायकांनी बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शने भरवून त्यांना ग्राहक वर्ग मिळवून दिला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले.