vinit Dhanawade

Horror Crime

4.0  

vinit Dhanawade

Horror Crime

" खूनी कोण ? " (भाग पहिला )

" खूनी कोण ? " (भाग पहिला )

23 mins
3.5K


          

         फोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ६ वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी, ते सुद्धा रविवारी, कोणी फोन केला.असा विचार करत तिने फोन उचलला. 

" Hello !! ",

"Hello… अभी…" तिने महेशचा आवाज ओळखला. " अरे महेश, अभी झोपला आहे अजून… ",

"उठवं ना त्याला जरा …. urgent … ",

"हो… हो , थांब." तिने अभीला जागं केलं. 


     अभिषेक डोळे चोळत चोळत फोन जवळ आला. एक मोठी जांभई दिली आणि फोन कानाला लावला. 

" Hello, बोल रे…. काय तुंम्ही, झोपायला सुद्धा देत नाहीत.",

"urgent होता म्हणून लावला ना call…",

"मग मोबाईल वर लावायचा ना, इथे घरच्या फोनवर कशाला लावलास. मम्मी-पप्पा पण जागे झाले असतील आता… ",

"अरे माणसा…. मोबाईल चेक कर जरा… बंद आहे म्हणून लावला इथे." ,

"हो का… बघतो नंतर. काय काम होतं urgent ",

"हा…. लवकर पोहोचं, पोलिस स्टेशनमध्ये …. एक वेगळीच केस आली आहे." ,

"OK… ठीक आहे, येतो पटकन." अभिषेकने फोन ठेवला आणि आंघोळीसाठी गेला. 


        २० मिनिटात inspector अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला. महेश नुकताच पोहोचला होता. 

"काय रे, सुट्टीच्या दिवशी तरी झोपायला द्या माणसाला… "अभी, डॉक्टर महेशला बोलला. 

" काय करणार यार…. मला तर ५.३० ला call आलेला सरांचा…. त्यामुळे तू माझ्यापेक्षा अर्धा तास जास्त झोपलास… तक्रार मी केली पाहिजे मग." अभी हसायला लागला त्यावर. 

"अरे, पण सर कुठे आहेत… फसवलं नाही ना त्यांनी आपल्याला." ,

"येतील रे." दोघे सरांची वाट बघू लागले. पोलिस स्टेशन मध्ये हळूहळू बाकीचे कर्मचारी येऊ लागलेले. ७ वाजता त्यांचे मोठे सर आले, तसे दोघे उभे राहिले. 


         "हम्म… " सरांनी त्यांच्याकडे पाहिलं." चला… माझ्या केबिनमध्ये बसू… ","एस सर… " दोघे त्यांच्या मागून आत गेले. inspector अभिषेक आणि forensic expert असलेला त्याचा मित्र डॉक्टर महेश, यांची जोडी तशी फ़ेमसच होती. कितीतरी कठीण केसेस त्यांनी मिळून सोडवल्या होत्या. फक्त मुंबईच नाही तर बाहेरच्या केसेस सुद्धा त्यांच्याकडे येत होत्या. तशीच एक केस आता आलेली होती. 

" अभी आणि महेश, तुम्हाला जरा त्रास दिला…. सुट्टीच्या दिवशी, तेही एवढ्या लवकर बोलावलं… झोपमोड झाली असेल ना… ",

"असं काही नाही सर… बोला तुम्ही, कोणती केस आहे… "महेश बोलला. 

" तुम्हा दोघांना नाशिकला निघायचे आहे. ",

"कधी ?",

"आत्ता, लगेच…. ",

"कोणती केस आहे, एवढी urgent… " ,

"गेल्या आठवड्यात म्हणजेच ७ दिवसात ८ खून झाले आहेत नाशिकला. तिथेच जायचे आहे तुम्हाला.… ",

"पण ती तर तिकडची केस आहे ना… मग आम्ही ?",

"तुम्हा दोघांचं खूप नावं झालं आहे सध्या…. शिवाय तिथल्या स्थानिक पोलिसांना ,खून कोणी केला,याचा तपास करण्यात अपयश आले आहे. मिडीयाचा दबाव वाढत आहे. त्या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून हि केस मुंबई पोलिसांकडे आली आहे. त्यात मला कमिशनर सरांनी तुमची नावं सुचवली.…. म्हणून, तिथे तुम्हाला inspector म्हात्रे मदत करतील. तिथे तेच केस handle करत आहेत. तर, तुम्ही आजच निघा…. and best of luck. ","thanks sir" म्हणत दोघे बाहेर आले आणि निघायची तयारी करण्यासाठी घरी गेले.


        तयारी करून दोघे निघाले. नाशिकला पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. दोघांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केलेली होती. थोडावेळ आराम करून दोघांनी कामाला सुरुवात केली. दोघांनी तिथल्या पोलिस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. तसे दोघे पोहोचले. बघतो तर काय !! inspector म्हात्रे जागेवर नाहीत. 

" हे म्हात्रे कूठे गेले ? " महेशने एका हवालदाराला विचारलं. 

" ते ना… म्हात्रे सर आत्ताच घरी गेले.",

"घरी ? आम्ही येणार ते माहित नाही का त्यांना… ",

"नाही सर… कोणालाच माहिती नाही, शिवाय ते २ दिवस घरी गेलेच नव्हते म्हणून आम्हीच त्यांना आराम करण्यासाठी घरी जायला सांगितले.",

"ठीक आहे… उद्या येतील ना ते… ",

"हो सर… ",

"नक्की ना… नाहीतर त्यांना फोन करून सांगा… आम्ही येतो उद्या सकाळी. " अभी बोलला आणि दोघेही हॉटेलवर आले. 


       सकाळी पुन्हा ते पोलिस स्टेशनला आले, तेव्हा मात्र inspector म्हात्रे हजर होते. " Welcome sir " म्हणत inspector म्हात्रे पुढे आले. 

"sorry सर, काल जरा लवकर गेलेलो घरी… आणि मला सांगितलंही नाही कि तुम्ही येणार ते." ,

"हा… राहू दे… असं काही नाही, कळलं मला, तुम्ही २ दिवस घरी गेला नव्हता म्हणून…किती काम असते ते माहित आहे मला. त्यामुळे आता तुम्ही tension घेऊ नका… आता आम्ही आलो आहोत ना, तुमचं स्ट्रेस कमी होईल. " अभी बोलला तसे तिघेही हसले. 

" चला, मग कामाला लागू आपण… " महेश बोलला. तिघेही एका टेबलवर जाऊन बसले. 

" तुम्ही, तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा आधी." महेश बोलला. 

" ते सांगतो मी, पण आधी एक प्रश्न आहे… विचारू का… " inspector म्हात्रेनी विचारलं. 

" हा विचारा… " ,

"तुम्हा दोघांचे खूप नावं ऐकलं आहे मी… त्यात तुमच्या विषयी सुद्धा ऐकलं आहे. " म्हात्रे ,महेशकडे पाहत म्हणाले. "तर तुम्ही forensic expert आहात ना… तरी तुम्ही या तपासात अभिषेक सरांबरोबर असतात ना… म्हणजे मला बोलायचे आहे कि इतर डॉक्टर फक्त त्याचं काम करत असतात. ते कधी तपासात भाग घेत नाहीत. मग तुम्ही ? " महेश हसला त्यावर. 

"त्याचं काय आहे ना… मला डॉक्टर व्हायचे नव्हते. मी तुमच्याच ड्रेसमध्ये दिसलो असतो. फक्त माझी उंची कमी पडली ना जरा… नाहीतर मी पण असाच ड्रेस घातला असता, उंचीमुळे निवड झाली नाही माझी. आणि हा अभी, माझाच मित्र… तो बोलला, तू forensic expert होऊ शकतोस. त्याचं ऐकून डॉक्टर झालो आणि पोलिस department जॉईन केलं.… एक बर आहे… हा घेऊन जातो मला प्रत्येक केसला म्हणून… नाहीतर मला कोणी विचारलं असतं." अभी हसायला लागला.


"Thanks sir…. चला, मग सुरु करू का… ",

"हो.",

"एकंदर ८ खून झाले.",

"हो, ते माहित आहे, पण एक प्रश्न आहे." अभी बोलला.

" कोणता प्रश्न सर ?",

"तुम्ही एकटेच कसे या केसेसला handle करत आहात… म्हणजे अजून कोणीतरी हवं ना सोबत तुमच्या, किती धावपळ झाली असेल तुमची" अभी बोलला. 

" हो ना सर, आमची टीम आहे सोबत, तरीसुद्धा इतक्या झटपट झालं ना सगळं… काही सुचत नव्हतं. पहिल्या दिवशी दोन खून झाले…. त्यांचा तपास सुरु केला तर दुसऱ्या दिवशी अजून एक खून झाला. त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा…. कूठे लक्ष देऊ तेच कळत नव्हतं. माझी टीम तरी काय करणार ना… त्यात ते media वाले… त्यांना वाटते आम्ही काहीच काम करत नाही… ",

"हो… media तसंच समजते… " महेश मधेच बोलला. 

" ठीक आहे. आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा… बाकीच आम्ही बघतो." अभी बोलला. 

" असं करूया… तुम्ही सगळी माहिती… जेवढी तुम्ही जमवली आहेत तेवढी…. ती आता मला द्या…. महेश, तू postmortem आणि बाकीचे रिपोर्ट चेक कर… " ,

" ठीक आहे, मी निघतो मग." महेश म्हणाला. 

" पाटील… महेश सरांना आपल्या forensic expert team कडे घेऊन जा. " म्हात्रे म्हणाले. महेश त्या हवालदारासोबत निघून गेला. 

"OK, आता तुम्ही आणि तुमची टीम मला लागेल. कोण कोण आहे तुमच्या टीम मध्ये… ", 

" मी , दोन sub-inspector आणि सहा हवालदार आहेत, अजून पाहिजे तर तशी व्यवस्था करू शकतो मी. ",

" चालेल ठीक आहे… ते sub-inspector कूठे आहेत… एकही दिसत नाही. " अभी आजूबाजूला पाहत म्हणाला. 

" एक sub-inspector…सावंत, ते परवा झालेल्या खूनाच्या स्पॉट वर आहेत. आणि दुसरे , sub-inspector कदम, ते आज सुट्टीवर आहेत… ते सुद्धा खूप दिवस धावपळ करत आहेत. म्हणून मीच सुट्टी दिली त्यांना… ",

"ठीक आहे… उद्या बोलावून घ्या त्यांना. मी आज सगळ्या केसेसची study करतो. महेश ते रिपोर्ट घेऊन येईल. तुम्ही उद्याची तयारी करा, उद्या सकाळी आपण पहिल्या स्पॉटवर जाऊ… ",

" OK सर… " आणि सगळे पेपर्स, फोटो घेऊन अभी हॉटेलवर आला. 


          थोड्यावेळाने महेश , बाकीचे रिपोर्ट घेऊन रूमवर आला. दोघे ते पेपर्स , माहिती वाचू लागले. बरेच फोटो काढले होते. त्यावरून एक नजर टाकली. खूप वेळाने महेश बोलला. 

" या सगळ्यांमध्ये एक नातं होतं, माहिती आहे का तुला ? ",

" नाही, म्हात्रे तसं काही बोलला नाही.… विसरला असेल, may be… ",

" असेल किंवा त्याला माहित नसेल… ",

"सांग काय ते… ? ",

" हे आठ जण, नातेवाईक होते…",

"म्हणजे… ",

" एक संपूर्ण कुटुंब आहे ते… ",

" सविस्तर सांग जरा महेश… " ,

" हे सगळे रिपोर्ट्स बघ… आणि म्हात्रेने सुद्धा ती माहिती जमवली असेल बघ. त्यांच्या नावावरून सुद्धा कळेल तुला… पवार कुटुंब आहे ते… ",

" हो, बरोबर बोलतोस तू… " अभी ते पेपर्स बघत म्हणाला. " अजून काही माहिती मिळाली का तुला… त्या postmortem रिपोर्ट्स वरून… ",

"नाही रे… अजून पूर्ण वाचले नाहीत मी… वाचून सांगतो तुला… " महेश म्हणाला. 

" तरी काय अंदाज आहे… " ,

" अंदाज म्हणजे…एकाच कुटुंबाचे आहेत सगळे… असेल काहीतरी… कोणाला बदला वगैरे घेयाचा असेल… नाहीतर कोण कशाला मारेल ना… ",

" हम्म… " अभी विचार करत म्हणाला. " ठीक आहे मग, उद्या सकाळी पहिल्या ठिकाणी जाऊ… तिथे अजून काही माहिती मिळू शकते. तू पण बघ जरा, त्या रिपोर्ट्समध्ये काय मिळते का… " महेश त्याच्या रूममध्ये निघून गेला. अभी रात्री उशिरापर्यंत ते केस पेपर्स वाचत होता. 


       सकाळी ठरल्याप्रमाणे, महेश आणि अभी पोलिस स्टेशनमध्ये आले. अभीने सांगितल्याप्रमाणे, सगळी टीम तयार होती. सगळे हजर होते, फक्त sub-inspector कदम सोडून. अभीच्या लक्षात आलं ते. अभीने सगळ्यांवर एक नजर टाकली. " म्हात्रे… आता पहिल्या स्पॉट वर जाऊ… चला. " तसे सगळे निघाले. दोन गाड्यांमध्ये बसले सगळे. गाडी सुरु करणार इतक्यात sub-inspector कदम धावत धावत आले. " Sorry… Sorry sir, उशीर झाला." अभीने त्यांच्याकडे एकदा पाहिलं. " लवकर आलात तुम्ही… चला, बसा पटकन गाडीत." अभी जरा रागातच बोलला. कदम गाडीत बसले आणि दोन्ही गाड्या निघाल्या पहिल्या खुनाच्या जागी. 


       ती जागा सील केलेली होती. एका मोठ्या सोसायटीमध्ये ती रूम होती. अभी सगळीकडे बघत होता. " अभी, मी बाहेर चौकशी करतो… शेजारी, watchman कडे… " महेश म्हणाला. अभीने होकारार्थी मान हलवली. आणि म्हात्रेला हाक मारली," म्हात्रे… या पुढे… " तसे inspector म्हात्रे पुढे आले.

" एस सर ? ",

"काय काय सापडलं इथे तुम्हाला… ",

" हा सर… २ मृतदेह… Mr. and Ms. पवार, दोघांचा कोणत्यातरी धारदार हत्याराने खून झाला.",

"कोणतं हत्यार ? ",

" sorry सर, सापडलं नाही ते… " ,

"हम्म…. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल… पुढे सांगा. ",

" फिंगर प्रिंट्स मिळाले… ",

"मिळाले ? ",

" हा म्हणजे… ५ जणांचे फिंगर प्रिंट्स आहेत. त्यातले २ या दोघांचे आहेत, पवारांचे… उरलेल्या ३ पैकी एक आरोपीचा असू शकतो.",

" किती वाजता झालं हे सगळं… ",

"साधारण रात्री १० ते १०.३० दरम्यान…",

"आणि तुम्हाला कसं कळलं ? " ,

" सोसायटीच्या सेक्रेटरीने फोन केला होता.",

" बोलवा जरा त्याला. " एका हवालदाराला सेक्रेटरीला बोलवायला पाठवले. 


         अभी त्या रुमच्या बाल्कनीत आला. पाचवा मजला…. खाली वाकून पाहिलं त्याने. महेश होता खाली watchman बरोबर बोलत. आजूबाजूला नजर फिरवली. हम्म्म… उंची तर आहे या बाल्कनीपर्यंत. शिवाय इथपर्यंत चढून येणं सोप्पं नाही. अभी विचार करत होता. थोड्यावेळाने सेक्रेटरी आला.

" नमस्कार सर… " , त्याने बाहेरूनच नमस्कार केला.

" या आत या. " अभीने बाल्कनीत बोलावून घेतलं त्यांना. " मी शेजाऱ्यांशी चौकशी केली… ते म्हणतात कि कोणताच आवाज झाला नाही… या रूम काय sound proof आहेत का… ",

"तसं काही नाही. तरीदेखील त्यांना कसलाच आवाज आला नाही, का ते मलाही कळत नाही… ",

"ठीक आहे… बरं, तुम्हाला कसं कळलं हे… ",

"कचरा गोळा करणारा रघु आहे ना… त्याला कळलं पहिलं हे, त्यानंतर त्याने मला येऊन सांगितलं हे… ",

"हम्म्म… तुम्ही जाऊ नका… बाहेरच थांबा, आणि त्या रघुला बोलावून घ्या… " रघु आला थोड्यावेळाने. तोपर्यंत महेश आलेला वर. 

" हा रघु… काय झालं ते सांग… न घाबरता… ",

" हा सर.… त्या दिवशी मी कचरा गोळा करत करत इकडे आलो. यांचा कचऱ्याचा डब्बा आधीच बाहेर ठेवलेला असतो.… दोघेच जण… कचरा कमीच असतो. त्यादिवशी डब्बा दिसला नाही बाहेर म्हणून दारावरची बेल वाजवली मी.… तीन-चारदा वाजवली…. दरवाजा वाजवला तर उघडाच होता.… तेव्हा जरा विचित्र वाटलं…. सेक्रेटरी साहेबाना सांगितलं लगेच… तेव्हा आत गेलो आम्ही तर या दोघांना…. " रघु थांबला बोलता बोलता. 

" ह्म्म्म… कळलं पुढे काय ते. तू जा बाहेर… " रघु बाहेर गेला आणि अभी, महेश बोलू लागले. 


" काय माहिती मिळाली तुला महेश… " अभीने विचारलं. 

" शेजारी बोलतात, आवाज आला नाही… ते जरा बघावं लागेल… पुन्हा सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत… त्यातून कोण कोण इथे आलेलं ते कळेल… " महेशने माहिती पुरवली. तेवढ्यात खालून फोन आला. " हा, येतो खाली… " अभी म्हणाला आणि महेशला घेऊन खाली निघाला. " खुनाच्या दिवशी, रात्री… ज्यांची duty होती, त्यांना बोलावलं होतं मी. तो आला आहे खाली." अभीने महेशला सांगितलं. 

"सलाम साहेब. " ,

" हा, ठीक आहे.,…. त्यादिवशी रात्री कोण आलेलं, आहे का लक्षात… ",

"हो साहेब… आम्ही ते लिहून ठेवतो ना…. कोण आलेलं , कोणाकडे आलेलं… ",

" जरा बघून सांगता का मला.",

"हो साहेब… " त्याने ते रजिस्टर उघडलं. 

" रात्री १० नंतर कोण आलेलं पवारांकडे… ",

"१० नंतर पवारांकडे काय… या सोसायटी मध्येच entry नाही कोणाला… " अभी महेशकडे बघू लागला. 

" हा पण, ९ वाजता एक जण आलेला, पवारांकडे…. " अभी चमकला. 

"कोण… नावं वगैरे… " ,

" मंदार देशपांडे … तोच आलेला ९ वाजता… ",

"त्याला बघितलंसं का नीट तू… ओळखशील त्याला… ",

"हो साहेब… चांगलाच लक्षात राहिला तो… ",

" तो कसा ",

" त्याने गेट समोरच गाडी पार्क केलेली ना साहेब… म्हणून जरा आवाज चढला होता… ",

" का… गाडी आत पार्क करू शकत नाही का… ",

" आहे ना साहेब, पण गेट समोर कोणी गाडी लावते का सांगा मला… मग मला बाकीच्या लोकांचा ओरडा मिळाला असता… म्हणून ओरडलो त्याला… ",

"मग पुढे… ",

" पुढे काय… गाडी मागे घेऊन गेला कूठेतरी आणि आला परत. ",

" OK… थेट वरती पवारांकडे गेला का…",

"हो…. आणि १०.१५ ला निघून गेला.",

" छान माहिती दिलीत तुम्ही… आता, एक काम करा…. त्याचं वर्णन सांगा, त्याचं चित्र काढता येईल मग… आणि त्या गाडीचे सुद्धा वर्णन सांगा. " 

"सांगतो… पण ती गाडी तर तिथे बाहेरच उभी आहे , रस्त्यावर… " ,

"काय ?", अभीला आच्शर्य वाटलं. तसे ते सगळे गाडीजवळ आले. 

" ही कार आहे का ",

"हो साहेब हीच… ",

"ठीक आहे… तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये जा, त्याचं स्केच बनवा… आणि म्हात्रे, या गाडीची तपासणी करा… फिंगर प्रिंट्स वगैरे मिळतील ते बघा… आणि गाडी कोणच्या नावावर आहे ते चेक करा." म्हात्रे लगेच कामाला लागले. 


         आणखी माहिती गोळा करून महेश, अभी हॉटेलच्या रूम वर आले. तोपर्यंत "मंदार देशपांडे" चे स्केच तयार झालेलं होतं. CCTV चे video म्हात्रे घेऊन येणार होता. महेश पुन्हा postmortem चे रिपोर्ट्स वाचत बसला होता. 

" शेजाऱ्यांना आवाज कसा गेला नाही ते कळलं मला." महेश म्हणाला. 

" ते जागेच नसतील त्यांना मारलं तेव्हा… ",

"म्हणजे ? ",

"postmortem मध्ये आहे…. आठही dead body मध्ये, गुंगीचे औषध होतं, त्यामुळे आरोपीने त्यांना आधी बेशुद्ध केलं , त्यानंतर खून केला… " महेश म्हणाला. 

" पण एक गोष्ट… गाडी ठेवून कसा जाऊ शकतो तो… ",

" may be…. घाईघाईत गाडी टाकून पळून गेला असेल तो… " ,

"असेलही… पण याला शोधायचं कूठे आता… " अभी स्केच बघत म्हणाला. इतक्यात म्हात्रे आले. 

" good evening sir….",

"या , या म्हात्रे… बसा. " म्हात्रे शेजारी बसले. 

"सर, ते video भेटले आहेत, चालू करू का… ",

" हो, करूया… पण आधी सांगा… ती गाडी, गेला आठवडाभर तिथेच होती…. तुम्हाला एकदाही वाटलं नाही कि ती कोणाची आहे ते चेक करू… ",

"सर वेळच नाही मिळाला आम्हाला… कारण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरा खून झालेला ना… मग कदमांना इथे ठेऊन, मी नवीन स्पॉट वर गेलेलो.",

"ठीक आहे. तो video चालू करा." ते तिघेही तो video काळजीपूर्वक बघू लागले. 

"pause करा म्हात्रे जरा… " महेशने स्केच समोर धरलं. "चेहरा एकदम clear दिसतो… स्केचशी मिळता-जुळता… उंची साधारण ६ फुट किंवा जरा जास्त… अंगाने धडधाकट… दणकट शरीरयष्टी, साधारण पोशाख आणि हातात एक ब्रीफकेस… अगदी बरोबर वर्णन केलं. " अभीने सगळं ऐकून घेतलं. " म्हात्रे…चालू करा video, बघू किती वाजता तो बाहेर गेला ते." तेही बरोबर होतं watchman च. रात्री १०.१५ वाजता तो सोसायटी बाहेर गेला.


video संपला. " म्हात्रे… गाडीबद्दल काय माहिती ? ",

" हो सर… गाडी rent वर घेतलेली… त्यांचा पत्ता मिळाला आम्हाला…. गाडी,"मंदार देशपांडे" यांच्या नावावर घेतली होती. गाडी rent वर घेताना दिलेला पत्ता आणि फोन नंबर खोटा आहे. तेही कळलं आम्हाला. गाडीत काही फिंगर प्रिंट्स मिळाले. त्यातला एक , पवारांच्या घरी मिळालेल्या फिंगर प्रिंट्स बरोबर जुळतात. ",

"म्हणजे ते त्या आरोपीचे असतील.",सगळेच थोडावेळ शांत बसले. 

" OK. माझ्या डोक्यात काही आलं आहे." अभी म्हणाला.

" बोल", महेश. 

" म्हात्रे… त्या सावंत आणि कदम, दोघांना आता बोलावून घ्या, लगेच. ","एस सर" म्हात्रे त्यांना call लावायला निघून गेले. " मला वाटते ना महेश… तो आरोपी, हा त्यांच्या ओळखीचा असणार." अभी म्हणाला. "असं का ?",

" बघ ना, तो सोसायटीमध्ये ९ वाजता आला. आणि १०.१५ ला बाहेर गेला. सव्वा तास…. कोणी अनोळखी व्यक्ती सव्वा तास कोणाच्या घरात बसून राहू शकत नाही ना. शिवाय, त्याला खूनच करायचा होता तर ते ५ मिनिटांचे काम… जास्तीत जास्त १० मिनिटे पकडू… सव्वा तास कशाला बसून राहील त्यांच्याकडे." अभी म्हणाला." point आहे तुझ्या बोलण्यात." तोपर्यंत सावंत आणि कदम आले. 


" हा कदम, तुम्ही एक काम करा… उरलेल्या ६ खुनाच्या ठिकाणी… त्या खुनाच्या वेळेत कोण कोण आलेले… त्यांचे eyewitness असतील तर, त्या व्यक्तीला कोणी पाहिलं असेल तर त्याचे स्केच तयार करा. इकडे कार सापडली तसं काही मिळते का ते बघा…. CCTV video असतील तर तेही गोळा करा.… कळलं ना तुम्हाला, काय काय करायचे ते." कदमांनी मान डोलावली.

" सावंत… तुम्ही, या सगळ्या कुटुंबाची माहिती काढा. त्यांचे शेवटचे call कोणाला गेलेले… कोणाचे call आलेले… त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का अजून ते चेक करा…. असतील तर त्यांचेही फिंगर प्रिंट्स गोळा करा, पुढे उपयोगी पडतील. जमल तर फोटोसुद्धा काढून ठेवा.… जेवढी माहिती गोळा करता येईल तुम्हा दोघांना, तेवढी मिळवा.… आताच निघा दोघेही… हो आणि उद्या…. आपण दुसऱ्या खुनाच्या ठिकाणी भेटूया, सकाळी, ठीक १० वाजता." अभी कदमांकडे बघत बोलला. " तुम्ही कदम, वेळेत या जरा… निघा आता सगळ्यांनी… चांगला आराम करा, Fresh mind ने या उद्या. " सगळे आपापल्या घरी निघून गेले. महेश त्याच्या रूम मध्ये गेला. अभी ते पेपर्स वाचत बसला. 


दुसऱ्या दिवशी, सकाळीच अभी आणि महेश, म्हात्रेला घेऊन दुसऱ्या स्पॉटवर पोहोचले. म्हात्रेनी माहिती सांगायला सुरुवात केली. 

" सुरेश पवार… हा त्या दोघांचा मुलगा…. ",

"OK , OK…. आई-वडिलांनंतर मुलाला मारलं.… पुढे.",

"सकाळी साधारण ११.३० वाजता मला या खुनाची माहिती मिळाली. तसा लगेच पोहोचलो मी. खून साधारण सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान झाला.… या हॉटेलच्या मालकाने मला call केलेला." ,

" आणि फिंगर प्रिंट्स वगैरे… " ,

" हो सर, मिळाले आहेत.",

"मग ते काल सापडलेल्या sample बरोबर match होतात का ते बघा. " अभी आजूबाजूला बघू लागला. 

" म्हात्रे… ते कदम आले नाहीत का" अभीने विचारलं… 

" आहेत ना सर… तो तर सकाळी ९ वाजताच हजर झालेला इथे. खाली security सोबत आहे तो.",

"ठीक आहे.…. महेश, तू बघ जरा इथे काय मिळते ते, मी खाली जाऊन येतो." 


अभी खाली security guard जवळ आला. " त्या दिवशी कोण होतं इथे…", अभीने विचारलं. 

" हा सर, मी होतो… सकाळची duty होती माझी.",

"खून झालेल्या दिवशी …. सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान कोण कोण आलेलं ते सांगू शकता का तुम्ही… " 

" ते नाही सांगू शकत सर… कारण हे हॉटेल आहे ना… सकाळपासून लोकं येत असतात. एकच चेहरा सांगू शकत नाही असा… " … तेही बरोबर आहे याचं… एवढ्या लोकांचे चेहरे तो तरी कसा लक्षात ठेवणार… अभी मनातल्या मनात बोलला. 

" आमच्या CCTV मध्ये कोणी आलं असेल तर ते कळेल तुम्हाला सर आणि reception वर त्यांची entry असेल, तिथे नावं द्यावं लागते. ",

" तुमचं काय एवढंच काम आहे का… गेट उघडा आणि बंद करा… " अभी जरा नाराजीच्या स्वरात बोलला. "नाही सर, इकडे येणाऱ्या गाड्यांची पार्किंग करून घेतो ना आम्ही. " तेच तर पाहिजे होतं ना अभीला. 

" हा, मग… अशी एखादी गाडी… जी ८.३० ते ९.३० च्या सुमारास आलेली. तिचा नंबर वगैरे." 

" हा लिस्ट बघून सांगतो." watchman लिस्ट बघू लागला. " हा सर, ४ गाड्या आलेल्या… ह्या बघा… त्यांचे नंबर आणि कोण गाडी घेऊन आलेलं त्यांची नावं " अभीने ते नंबर आणि नावं चेक केली. त्यात एक नावं होतं,"मंदार देशपांडे" … 

" कदम… हा गाडीचा नंबर नीट लिहून घ्या आणि कोणाच्या नावावर आहे ते लगेच चेक करा… " 

" हो सर… " कदमांनी नंबर लिहून घेतला आणि तडक निघाले. 


अभी आता हॉटेलच्या reception वर आला. " हा म्हात्रे… जरा manager ला बोलवा, मी इकडेच आहे reception वर. त्याला घेऊन या इथे." म्हात्रे निघून गेले." हा तर… तुम्ही होतात इथे, त्यादिवशी… नावं काय तुमचं… " अभीने reception वर असेलेल्या मुलीला विचारलं. 

" माझं नावं संयुक्ता… मीच होते त्या दिवशी इथे",

" छान… त्या दिवशी कोणी 'मंदार देशपांडे' नावाचा व्यक्ती आलेला… अशी नोंद असेल ना… ",

" हो आहे सर… " ,

" good… त्याचा चेहरा लक्षात आहे का तुमच्या…",

"हो ना… चांगलाच लक्षात राहिला… ",

"आणि तो कसा काय ? म्हणजे इतकी लोकं येतात इथे… त्याचाच चेहरा कसा आठवतो तुला… " ,

"भांडण… , मी सकाळी ८.३० ला येते इथे. त्या दिवशी सुद्धा वेळेत आली आणि तोच पहिला आलेला… त्या पवार सरांकडे आलेला, एवढ्या सकाळी-सकाळी …. झोपेची वेळ… त्यात हा माणूस मागे लागलेला… त्यांना फोन लावून द्या… urgent भेटायचे आहे… सारखं सारखं तेच… मी त्यांना बोलले कि ते झोपले आहेत, काही मेसेज असेल तर मला सांगा, मी नंतर सांगते. तरी तेच… शेवटी manager सरांनी त्याची समजूत काढली.",

" OK OK, तुम्ही थोड्यावेळाने पोलिस स्टेशनला या… स्केच काढू आपण त्याचं… " manager आले.

" काही प्रश्न नाही विचारत. फक्त त्यादिवशी काय झालं ते सांगा. यांनी बरीच माहिती सांगितली आहे…. मंदार देशपांडे च काय झालं ते सांगा.",

"त्यांना पवार सरांना भेटायचे होते… त्यामुळे हीच आणि त्याच भांडण झालं होतं. पवार सर, आमच्या हॉटेलमध्ये वरचेवर येत असतात राहायला.",

"त्याचं घर आहे ना… मग इथे… " ,

" त्यांच्या मीटिंग असल्या कि ते एक दिवस आधी इथे येऊन राहतात. आमच्या हॉटेलच्या conference room मधेच त्यांच्या मीटिंग चालू असतात. साधारण ५-६ वर्ष झाली असतील. त्यांना ओळखतो मी. त्यामुळे त्यांच्या सवयी माहिती आहेत इथल्या सगळ्यांना.…सकाळी ९.३० ला जागे होतात ते… आणि हा मनुष्य, ८.३० ला आला होता. "


"मग पुढे… ",

"मला वाटलं काही urgent काम असेल म्हणून मी पवार सरांना फोन लावला… ते सुद्धा वैतागले होते. पण काही बिझनेसचे काम असेल म्हणून त्यांनी त्याला रुममध्ये पाठवायला सांगितलं.",

"हम्म… मग तो किती वाजता गेला ?",

" सकाळी ९.२० ची वेळ आहे सर, या लिस्ट मध्ये." अभी विचार करू लागला. 

"CCTV चालू आहेत ना… त्यांचे video ,लवकरात लवकर पाठवून द्या… म्हात्रे, ते video घेऊन पोलिस स्टेशनला या…. " अभी आता वर, रूमवर आला. महेश तिथेच तपासणी करत होता.

" काय रे… महेश, काय सापडलं का ",

"तसं काही नाही… फिंगर प्रिंट्स तर घेतले आहेत आधीच, बाकी काही सामानाची उलटा-पालट केलेली नाही…. चोरीचं प्रकरण नाही… यावेळीही त्याने गुंगीचे औषध असलेलं काही देऊन त्याला मारलं. " अभी पुन्हा विचार करू लागला. 


थोडयावेळाने सगळेच निघाले. तिसऱ्या खूनाच्या ठिकाणी… अर्ध्या तासाने पोहोचले तिथे. पुन्हा एक सोसायटी, लहानशी होती. दोनच इमारती, त्यातल्या एका इमारतीत, सुरेश पवारचे काका राहायचे. त्यांनाही तसंच मारलं होतं. त्या इमारतीत आत जाणार, तर कदम पुढे आले आणि म्हणाले,

" सर, watchman सांगत होता कि एक बाईक, ज्या दिवशी खून झाला तेव्हा पासून उभी आहे बाहेर… ",

"कूठे ? ", सगळेच बाहेर आले. watchman होता सोबत. गेटपासून थोडयाच अंतरावर 'ती' बाईक उभी होती. अभी निरखून बघत होता. 

" कोणी आलंच नाही इतके दिवस…. बाईक घेऊन जायला. ",

" नही साहब … " ,

" तो इतने दिन इधर है ये बाईक, किसिने complaint नही की… " अभी रागातच बोलला. तेव्हा watchman थोडा घाबरला. 

" इधर इतना पार्किंग होता है… मुझे लगा, कोई भूल गया होगा " अभी अजून रागातच होता. 

" कदम… जप्त करा गाडी…. कोणाची आहे ते बघा. " आणि सगळे पुन्हा सोसायटी मध्ये आले. कदमांनी गाडी जप्त करून एका हवालदाराला माहिती गोळा करण्यासाठी पाठवलं. म्हात्रे त्या हॉटेलवर थांबलेले म्हणून कदमांनी माहिती सांगायला सुरुवात केली. 

" सकाळी call आलेला पोलिस स्टेशनला…. १० वाजता ",

" सकाळी १० वाजता… ",

"हो… खून साधारण सकाळी ७ ते ८ दरम्यान झालेला… ",

"हम्म… यांच्या मिसेस… त्या कूठे आहेत ? ",

" त्या २ वर्षापूर्वी वारल्या.",

"ठीक आहे… काही सापडलं का इथे ? ",

"तसं काही विशेष नाही… फिंगर प्रिंट्स सापडले. आणि हो… watchman जवळ काही माहिती आहे.… महत्त्वाची… " महेशला काही मिळते का ते बघायला सांगून अभी खाली आला. तोपर्यंत सोसायटीचा सेक्रेटरी खाली आलेला. watchman समोरच उभा होता. 

" तुमच्या सोसायटीमध्ये …. कोणीही बाहेरचा व्यक्ती, कधीही येऊ शकतो का… ",

"तसं नाही सर… ",सेक्रेटरी म्हणाला. 

" मग, खून काय सोसायटी मधल्या लोकांपैकी कोणी केला आहे का… " अभी बोलला तसा सेक्रेटरी गप्प झाला. 

"नही साहब… वो सर नेही बताया था ।" watchman मधेच बोलला. 

" क्या बताया था ? ",

" पवारांनी मला , आदल्या रात्रीच सांगितलं होतं कि उदया सकाळी, कोणीतरी भेटायला येणार आहे. तो आला कि लगेच त्याला माझ्याकडे पाठवा.", सेक्रेटरी म्हणाला. 

" हा साहब… वो आया था… ये देखो, उसका नाम लिखा है इस register book मै " अभीने नावं पाहिलं… पुन्हा, "मंदार देशपांडे"… येण्याची वेळ सकाळी ६.३०, जाण्याची वेळ सकाळी ७.४५… 

" तुम्ही पाहिलंत का त्याला ? ", अभीने सेक्रेटरीला विचारलं. 

" नाही , पण याने बघितलं त्याला…. शिवाय CCTV कॅमेरे आहेत ना, त्यात सुद्धा दिसेल तो… " अभीने watchman कडे पाहिलं.

" हा साहब, याद है मुझे… और वो, दुधवाले को भी याद होगा। " अभीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह… 

" क्यू… उसे क्यू ? ",

"वो जल्दी मै था ना… तो दुधवाले को टकरा गया था… सारा दुध गिर गया था। ",

" OK, कदम… या watchman आणि त्या दूधवाल्याला घेऊन त्याच स्केच बनवा. "


महेश तोपर्यंत खाली आलेला. " अभी…. वरती तसचं आहे सगळं, बाकीच्या घरी सापडलं तसं… फक्त दोन कप मिळाले आहेत, चहाचे… ते घेतले आहेत मी, testing साठी.","चालेल. " त्याने घड्याळात बघितले. संध्याकाळचे ५ वाजत होते. महेश पण दमला होता. अभीने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला. 

"कदम… तुम्ही सगळी माहिती गोळा करून माझ्या हॉटेलच्या रूमवर पाठवा. आणि हो… म्हात्रे आणि सावंतांना तेच सांगा. video, कागदपत्र… जे काही असेल ते सगळं मला रूमवर पाठवा. आज मीटिंग नको." अभी म्हणाला.

" काय झालं सर… तब्येत ठीक आहे ना… " कदमांनी विचारलं. 

" हा… जरा डोकं जड झालं आहे. जाऊन झोपतो आता. उद्या सकाळी नवीन स्पॉट वर भेटू. म्हात्रेना इन्फोर्म करा." असं म्हणत अभी आणि महेश हॉटेलच्या रूमवर आले. थोडयावेळाने म्हात्रे आणि सावंत video आणि इतर काही घेऊन आले. ते तसंच ठेवून अभी आज लवकर झोपला. 


        दुसऱ्या दिवशी, सकाळी लवकर जाग आली त्याला. तसाच उठून ते पेपर्स, ते स्केचेस बघू लागला. थोडयावेळाने तयारी करून पुढच्या खूनाच्या ठिकाणी पोहोचला. महेश आधीच आलेला. सोबत बाकीची टीम होती. अभिषेक निरीक्षण करू लागला. बंगला… हम्म, चारही बाजूंना भिंती… साधारण ४ फुट तरी उंच असेल… त्याच्यावरून कोणालाही जाणे शक्य आहे… आजूबाजूला इतर बंगलेच… पण हा जरा मोठा, दुमजली… दोन गेट, एक मागच्या बाजूला…watchman ला बोलावून घेतलं. शेजारच्या बंगल्यातील लोकांना बोलावून घेतलं. चौकशी सुरु झाली. महेशने आधीच माहिती काढली होती. तीच तो अभीला सांगू लागला. 

" यशवंत पवार… आणि त्यांची मिसेस, हे यांचे तिसरे भाऊ,… म्हणजे पहिला खून झालेला ते , त्यानंतर काल आपण गेलेलो ते आणि हे… तीन भाऊ… ",

"हम्म … अजून काही माहिती. ",

"हे दोन्ही खून… रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास झाले. सगळं बाकीच्या खुनासारखं आहे, चोरीचा कोणताच प्रयन्त नाही. किंवा झटपटीची चिन्ह नाहीत, सगळं कसं जागच्या जागी आहे." अभी आजूबाजूला बघू लागला. दरवाज्याजवळ कॅमेरा होता. त्यातला video काढून घेयाला सांगून अभी शेजाऱ्याकडे वळला. 

" त्यादिवशी… तुम्हाला काही वेगळं दिसलं का इथे …. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी ",

"हो… त्यांच्याकडे जे गृहस्थ आले होते, त्यांनी आमच्या घरासमोर गाडी पार्क केली होती.",

"मग ",

"मग मी आलेलो बाहेर… त्यांना सांगायला, तर ते ऐकतचं नव्हते.…. मी इकडेच गाडी लावणार म्हणून…. कितीवेळ चालू होतं आमचं दोघांचे… शेवटी तो watchman आला म्हणून… नाहीतर चांगलंचं भांडण झालं असता.",

" तुम्ही त्याचं स्केच बनवू शकता का ? ",

"हो…", आता watchman कडे वळला अभी. 

" तुम्ही इकडेच असता का दिवसभर…. आणि एकटेच आहत का security साठी." ,

" नाही सर… सकाळचा वेगळा duty असतो. मी संध्याकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ असा duty वर असतो. ",

"त्यादिवशी तुम्हीच होतात ना… जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा.",

"हो सर… ते सर रात्री ८ वाजता आलेले आणि गाडी पार्किंग वरून भांडण झालं. ",

"मग नंतर गाडी कुठे पार्क केली. ",

"हि काय… आतमध्ये… पवार सरांनी सांगितलं होतं मला कि हे सर येणार आहेत ते, म्हणून त्यांना गाडी आत पार्क करायला सांगितली मी",

"गाडी इथेच कशी मग ? आणि किती वाजता गेले ते ",

"१०.४५ झाले असतील. ते बाहेर आले आणि बोलले कि मी जरा बाहेर जाऊन येतो.… गाडी राहू दे इथेच… ते गेले ते आलेच नाही परत… मग रात्री १२ वाजले तरी घरातल्या लाईट चालू होत्या म्हणून मी बघायला गेलो तर… " watchman थांबला बोलता बोलता. 

" तुम्ही त्याचं वर्णन करू शकता ना… ते पोलिस स्टेशनला येऊन सांगा.… आणि त्याचे काही नाव वगैरे सांगितलं का…. ",

"नाही सर. ",

" चालेल. कदम यां सगळ्यांचे statement लिहून घ्या." गाडी जप्त केली गेली. video घेतला आणि बंगला सील करून सगळे पोलिस स्टेशनला आले. स्केच बनवायचे काम सुरु होतं. सावंतानी तोपर्यंत त्यांचे मोबाईल चेक करून अजून माहिती काढली होती. हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली. 


        अभी आणि महेशला , नाशिकमध्ये येऊन आता ५ दिवस झालेले. खूनीची माहिती अद्याप नव्हती. अभी, महेश जवळच एका हॉटेलमध्ये राहत होते. आणि आज अभी सकाळपासून ते ती सगळी कागदपत्र, video पुन्हा पुन्हा बघत होता. महेश आला, 

" काय रे… असा का बसला आहेस डोक्याला हात लावून. " महेशने आल्या आल्या विचारलं. 

"बरं झालं आलास ते, बसं … सांगतो काय झालं ते. ", महेश बसला बेडवर. 

" आतापर्यंत आपण मर्डर स्पॉट बघितले.… चार ठिकाणी सहा खून , ते कसे झाले ते तुला माहित आहे." अभीने महेशला विचारलं. 

" हो म्हणजे… आरोपीने त्यांना आधी गुंगीचे औषध दिलं . नंतर त्यांना आरामात मारलं.… कशाने मारलं ते हत्यार सापडलं नाही… ",

"हा… आणि हि स्केच… चार ठिकाणी, ३ वेगवेगळी स्केचस… शिवाय ते conform हि आहे, CCTV च्या video मधून… म्हणजेच जे eyewitness होते, त्यांनी जसं वर्णन केलं, तसंच त्या video मध्ये दिसलं.… ती व्यक्तिरेखा… ",

"त्याबद्दल काय… ",

"हे बघ… ", अभीने सगळी कागदपत्र आणि स्केचेस वेगवेगळी करून समोर ठेवली. " केस पहिली, दोन खून… त्या वेळेला आलेली व्यक्ती. तीच वर्णन आणि दुसरी केस, त्यांच्या मुलगा, त्या ठिकाणचं वर्णन सेम आहे. तिसरी केस, दुसरा भाऊ… तिथे शेवटची व्यक्ती आलेली तीच वर्णन वेगळं आहे.…. आणि आता तिसरी केस, तिसरा भाऊ… तिथे जो माणूस आलेला शेवटचा… त्याचं वर्णन वेगळं आहे.… तीन वेगवेगळ्या व्यक्ती… नाव एकचं,… "मंदार देशपांडे". 


" हा मग… अभी,… आजकाल किती प्रकार आहेत, चेहरा लपवायचे.… मेकअप वगैरे… त्यात काय एवढं… एकचं माणूस असेल ना तो. ",

" तरीही वेगळं आहे त्यात काही. ",

" काय वेगळं ? ",

" पहिलं वर्णन घे… दाढीधारी चेहरा, रंग गोरा, उंची ६ फुट किंवा जास्त, घारे डोळे,मजबूत शरीरयष्टी… दुसरं वर्णन, पुन्हा दाढीधारी चेहरा, रंग सावळा , काळे डोळे,उंची साधारण ५ फुट, बारीक शरीरयष्टीचा…. आणि कालच वर्णन , तिसरं… पुन्हा दाढीधारी चेहरा, रंग काळा, निळे रंगाचे डोळे,उंची साधारण साडे ५ फुट, मध्यम शरीरयष्टीचा… शिवाय एक वेगळी गोष्ट, डोक्यावर केस नाही. बाकी दोन्ही वेळेस केस होते डोक्यावर… पहिल्यांदा ग्रे शेड असलेले केस,नंतर काळे केस आणि शेवटी टक्कल.…. तू जर म्हणतोस तो एकच व्यक्ती आहे, तर त्याची उंची कमी-जास्त कशी होऊ शकते…चेहरा, शरीरयष्टी ठीक आहे… मेकअप करू शकतो. पण उंची कशी काय adjust करणार… video मध्ये सुद्धा अगदी तसाच दिसतो ना ती अगदी. " अभी म्हणाला. महेश त्यावर विचार करू लागला.

" आणखी एक गोष्ट… ",

"कोणती ? " ,

" अजून आपल्याला दोन खुनांचा तपास करायचा आहे.… पण इतर ठिकाणीही काही गोष्टी खटकल्या मला.",

"काय नक्की ? " , महेशने विचारलं. 

" स्वतःचा बचाव… तो त्याने केलाच नाही… एकदाही.…. "मंदार देशपांडे" नाव ना त्याचं… ते खरं का माहित नाही मला… पण आतापर्यंत सहा खून झालेल्या ठिकाणी, मेलेल्या व्यक्तींचे मोबाईल चेक केले… चार स्पॉट… चार वेगवेगळे मोबाईल नंबर…. शेवटचा call त्यांचाच… त्याच्याच नावावर ते नंबर register आहेत… ",

" हो, मग त्यावरून काय कळते ? ",

" तेच तर… त्याला जर खून करायचे आहेत, ते पण आठ खून… तर मग असे पुरावे का सोडतो आहे मागे.…. " महेश विचारात पडला. " म्हणजे बघ… हे call चे सांगितलं तुला… प्रत्येक ठिकाणी गाडी भेटली, rent वर घेतलेली. त्यावर त्याचचं नावं ,"मंदार देशपांडे"…. एकही गाडी तो घेऊन गेला नाही…. मुद्दाम ठेवून दिली त्याने… त्यानंतर फिगर प्रिंट्स, ते सुद्धा चारही ठिकाणी आहेत, सगळीकडे एकाचेच आहेत.… असा कोणताच प्रयन्त नाही कि बोटांचे ठसे दिसू नयेत.… त्यानंतर CCTV कॅमेरे… ते नमूद केलसं का, प्रत्येक वेळेस तो कॅमेरासमोर, कमीत कमी १.३० ते २ मिनिटापर्यंत आहेच… चेहरा स्पष्ट दिसतो अगदी.… शेवटी राहिले ते eyewitness… ", 

" त्याचं काय ? ", खूप वेळाने महेश बोलला. 

" आता मला सांग… तुला खून करायचा असेल तर तू गुपचूप, कोणालाही न दिसता, असा करशील ना…. मग हा, "मंदार देशपांडे"… एवढे eyewitness कशाला गोळा करतो आहे." ,

"म्हणजे clear सांग मला. ",

" पहिले दोन खून… तिथे watchman बरोबर भांडण… मुद्दाम गेट समोर गाडी पार्क करून भांडण, दुसरा स्पॉट… त्या हॉटेलच्या receptionist बरोबर भांडण…manager सोबत वाद, तिसरा स्पॉट, तिथे त्या दूधवाल्याबरोबर भांडण… तो दूधवाला सांगत होता कि तो मुद्दाम त्याला येऊन धडकला. आणि कालचा स्पॉट… शेजाऱ्याच्या बंगल्यासमोर उगाचच गाडी पार्क केलेली… त्यावरून त्यांच्याबरोबर वाद… आपला चेहरा लक्षात राहावा असंच काहीतरी केलं त्याने प्रत्येकवेळेला…. म्हणजे कळलं का तुला महेश ? ", अभिने महेशला विचारलं 

"हो कळलं, त्याला लपून असं काही करायचे नव्हते… कालच्या बंगल्यात सुद्धा दोन गेट होते. शिवाय बंगल्याच्या भिंती फक्त चार फुट उंचीच्या… तो त्या दुसऱ्या गेटने जाऊ शकत होता किंवा भिंतीवरून उडी मारून जाऊ शकत होता… तरीही तो त्या गेटने, watchman समोरून गेला." महेश म्हणाला. 

" म्हणजेच त्याला सगळ्यांदेखत हे करायचे होते… पोलिसांना गुंत्यात टाकायचा प्रयत्न असेल त्याचा. शिवाय तो इतका वेळ थांबायचं त्यांच्या घरी म्हणजे तो कोणी ओळखीचा असेल … " अभी म्हणाला. 

"पण सावंतानी काढलेल्या माहिती नुसार, देशपांडे नावाचा कोणीही नातेवाईक नाही त्यांचा… मग हा कोण आहे ? " महेश बोलला. 

" तेच तर…. त्याचंच नाव, प्रत्येक register list मध्ये, मोबाईल नंबर त्याचं नावावर, गाड्या त्याचं नावावर, फिगर प्रिंट्स मिळाले.… सगळ्यासमोर मुद्दाम येतो…. " मंदार देशपांडे"…… कोण आहे…कोण आहे हा मंदार देशपांडे ? "Rate this content
Log in