STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

कांदे पोहे

कांदे पोहे

3 mins
581

बिंदास अशी सोनालीला पहायला आज नवरा मुलगा येणार होता सकाळ पासून घरात नुसती गडबड चालू होती सोनालीच्या आईने सोनाली ला हाक दिली 

'काय ग आई "

"अगं साडी वैगरे नेसून पाहिलंस ना आयता वेळेला खोळंबा नको "

"अगं हो पहिली मी तू टेन्शन घेऊ नकोस बरं बाबा कुठे आहे सकाळ पासून दिसले नाही "?

'बाबा ते खोलीत आपल्या मित्राशी काय बोलणी करायची ह्यावर मीटिंग चालू आहे "

"बोलणी आई एव्हडी काय बोलायचं त्यात" 

"अगं घेण्याचं देण्याचं बोलायला नको "

'आई दे जर खूप काही मागायला गेले ना तर मी नाही होणार लग्न "

"अगं पहिली पसंद तरी कर मुलाला.. मग बघू आणि आटोप लवकर नाही तर बाबा तुला माहित आहे ना उगीचच रागावतील "

"ओक तयार होते मी "

"अहो झाल का तुमचं बोलून" 

"हो "

अशोक सोनालीचे बाबा सोनालीला जीवापाड जपणारे आपले फुल जपणाऱ्या मुलाच्या हातात द्यावे हाच द्याचा प्रथम उद्देश 

"अहो लक्ष्मीकांत भावोजी चला तुम्हाला चहा देते इथे बसून तुमची मीटिंग नाही संपणार ''

"अहो तसं काही नाही हो वाहिनी मुलीची काळजी प्रत्येक बापाला असते. आता बघा ना माझी सई सुद्धा लग्नाची झाली "

"ते हि बरोबर पण चला सगळे आटोपले कि पाहुण्या मंडळी ची चिंता नाही "

वेळे आधी सगळे तयार झाले सोयरीक सोनालीच्या आत्याने आणलेली ती पण हज़र होती. आई ने काहीतरी बाहेरच खायला मागुया असं ठरवलेलं पण आत्याने कांदे पोह्याचा कार्यक्रम म्हणजे कांदे पोहे हवे अशी अट घातली. आई ने उगीच दुधात मिठाचा खडा नको म्हुणुन होकार दर्शवली 

आत्या सोनालीला कसे चहा व पोहे घेऊन जायचे हे सर्व सांगत होती 

तेलात मोहरीसंग काडिपत्याचा वास पोह्यात एव्हडा मिसळा होता कि घर भर सुंगध दरवळ होता 

स्वप्नील महेश याचा एकुलता एक मुलगा पाहुणे मंडळी घरी पोहोचली ओळख वैगरे झाली आत्याच्या सांगण्यानुसार सोनालीने कांद्या पोह्यच्या प्लेट आणि चहा घेऊन आली हे सगळं तिला विचित्र वाटत होत आणि काही विचित्र करण्यापेक्षा आपण बोलेल बरं असं म्हूणन ती बोलू लागली 

"नमस्कार मी सोनाली आज आपण एका महत्वाच्या गोष्टी साठी आपण जमलो आहोत. मुळात कांदे पोहे हा काही खायच्या कार्यक्रम नाही, दोन जीवाच्या मिलनाचा क्षण असतो. एक चुकीचा निर्णय सार आयुष्य पिजून काढत मला हे नाही आवडत पण आत्याच्या मनासाठी मी हे सर्व गेलं. मुळात कांदे पोहे हा पूर्वी पासून चालत आलेला आहे त्यात मुलगी गप्प बसते व दुसरे तिचे भवित्यव ठरवतात. न पटणारा निर्णय सुद्धा तिला मग आयुष्य भर कुरडत राहतो, मला तशी मुलगी बनायचं नाही. स्वत: बदल सांगायच तर मी स्वत्रंत्र विचाराची मुलगी आहे.. लग्नानंतर मी नोकरी करणार, तसेच घर हि सांभाळेन. माझ्या परीने जे करता येईल ते मी घरा साठी करेन जे माझे आई वडील देतील तेच माझे असतील उगाच हे पाहिजे ते पाहिजे असा दबाव नसावा. काय आहे ना वस्तू थोड्या दिवसाच्या असतात नाती आयुष्यभरासाठी असतात. माझे बोलून झाले आहे निर्णय तुमचा "

सगळे अवाक होऊन एकामेकाकडे पाहत होते एवढ्यात टाळयांच्या आवाज येतो स्वप्नील उभा राहतो. 

"वाह केवढा हा स्पष्टवक्ते, पणा सगळ्या मुलींनी असा स्पष्टवक्ते पणा ठेवायला हवा आमच्या प्रश्नांची सगळी उत्तर तिने दिले आणि काही विचाऱ्याचं बाकी नाही मला मुलगी पसंद आहे "

"माफ करा महेश राव पोरीने "

"अहो काय वाईट बोली ती स्पष्टवक्तेपणाची सून मला पसंद पडली. एवढ्या वर्षात पाहिलेल्या कांदे पोहे च्या कार्यक्रमाची खरीच तू नवी ओळख करून दिलीस चला तयारी ला लागा "

एकमेकांना मिठाई वाटत कांदे पोह्यचा कार्यक्रमाला गोडवा निर्माण झाला 



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi story from Inspirational