Chaitali Ganu

Tragedy

5.0  

Chaitali Ganu

Tragedy

काळकुपी

काळकुपी

3 mins
1.4K


( रंगमंचावर एक नीट नेटकी खोली दिसतेय. खोलीतल्या प्रत्येक वस्तूवर एक एक गाठोडं दिसतंय. तितक्यात बेल वाजते. 30शी च्या वयाचा बारीक, दाढीच खुंट वाढलेला, लांब केसांचा, खांद्यावर पंचा आणि घरातले कपडे घातलेला एक सावळासा माणूस दरवाजा उघडून एक बॉक्स घेतो आणि टेबल वर ठेवतो.)


   मॅडम नाही पण पार्सल आलं. काय आहे आत? ( डोकं खाजवतो एक मिनिट स्वतःशीच विचार करतो आणि जोर जोरात हसायला लागतो ) च्यामारी मी इतका म्हातारा झालोय की विसराळू ? दोन्ही सारखच म्हणा ( पुन्हा हसायला लागतो. हसू अनावर होऊन खुर्चीवर बसतो. तितक्यात शिट्टी वाजते) आलो ग बाई आलो ...तुला बंद करायचंय हे माझ्या चांगलच लक्षात आहे. ( हातातला पंचा फिरवत आत जातो शिट्टी बंद करून बाहेर येतो आणि टेबलावरच्या बॉक्स ला पाहतो) हं बघुयात आज काय गिफ्ट आलंय? नाही तस प्रत्येक दिवशी वेगळं असत. तसा करारच आहे ना आमचा. आठवड्याला एक गिफ्ट पण ते पुन्हा नीट पॅक करून जसच्या तस ठेवायचं. मला रॅप करायचा कंटाळा येतो म्हणून मग मी ही अशी गाठोड्यांमध्ये ठेवतो. इतके बॉक्स आणायचे कुठून ? गाठोडी बरी पडतात बांधून ठेवायला. नाही माझ्या बोलण्यावरून मला वेडा समजू नका. I am a writer. फिल्म्स, सिरियल्स, नाटकं, ना माझ्या स्क्रिप्ट शिवाय मोशन मिळत नाही आणि मला धौती योग चुरणा शिवाय....( स्वतःच्याच जोक वर प्रचंड खुश होत) नाही चूर्ण पोटाच बुच काढत पण विचारांचं नाही....आणि मग मेंदूचं कॉन्स्टिपेशन मात्र जैसे थे, ते ना शेक्सपिअरने कमी होत ना लिओ नार्दो दा मुळे.... काय संबंध दोघांचा ? आता मला खरच वेड लागलंय यावर तुम्ही शिक्का मोर्तब केलंच असेल पण....पण त्या आधी माय लॉर्ड माझ्या मेंदूची शाश्वतता आणि विचारांची अनिश्चितता पडताळून बघायलाच हवी....बीकॉझ आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड....तर माझ्यातल्या लेखकानुसार...माझ्यातल्या? मग मी कोण आहे? लेखक, माणूस की माणूस लेखक? Confusing question....अण्णा सरे....एक एक पुछ... ठिके विचारतो... पण मुद्दा काय आहे नेमका? आणि हा सगळा पसारा? ही गाठोडी? काय आहे हे सगळं? There u r my boy.... I m telling u... U will kill this world one day....भरकटला पुन्हा... लेखक हा भरकटत राहण्यासाठी च जन्माला येतो...


    शब्दांच्या वाळवंटात विचाररूपी मृगजळ त्याला भुलवायला आलं नाही तर मेंदूचा अपमान होईल....पुन्हा out of the thought.... त्यासाठी एखाद पद्मश्री मिळत का हो ? विचारायला हवं....कोणाला ? हा ही एक प्रश्नच आहे....तुम्ही कधी काळकुपी नावाची कन्सेप्ट ऐकली आहेत का ? शुक शुक excuse me I am talking to u... To me ? Yeah you...No sir actually I am ठिके राहुदेत कळली तुझी मजल... तुला कुपीच कळलं नसेल...नाही ? नाही हो पण माझा प्रश्न असा आहे की, जगात सगळ्यात पहिला प्रश्न कोणाला पडला ?आणि त्याने तो विचारला कोणाला आणि काय ?एकच प्रश्न पडलाय अस म्हटला होता...sub questions हे questions चा च पार्ट असतात. तर काळकुपी म्हणजे.... तर या ठिकाणी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अध्यक्ष ह्यांनी मुद्याचा मुद्दा गाठल्याबद्दल प्रचंड टाळ्यांच्या गजरात मेंदूला लागलेल्या कॉन्स्टिपेशनच्या बुचाची लाल फित कापून त्याची समाप्ती करावी....निघालं का बुच ? ड्रेनेक्स वापरा, सगळं जळून साफ होईल....जळून, जळवुन की जवळून ? पुन्हा प्रश्न....

  

   तर काळकुपी म्हणजे ? त्याआधी ही गाठोडी सोडुयात म्हणजे संदर्भासहीत स्पष्टीकरण मिळेल....गाठोड्यांवरून आठवलं...माझा हुद्दा सांगितला पण इतका वेळ माझी फक्त बडबड ऐकणारयांना माझं नाव काय हे ऐकण्याची उत्सुकता असेलच की, मी अनुज चित्रे आडनावातला चित्रकार आणि शब्दांचा शिल्पकार...वाह इथे पण कलाकारी!! तर 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात माझ्या स्मरणिका आणि बायको दोघांच्याही कपाळाची पाटी कोरी झाली....मग मी दरवर्षी तिला ह्या काळकुपित भेटायला यायला लागलो... झालं असं की, माझ्याच नाटकातल्या पात्राचा मी माझ्या लेखणीने खून केला म्हणून शब्दांच्या कोर्टाने मला ही सूनावलेली शिक्षा......

   ‎दररोज सगळं विसरून आठवण्याची...आणि आणि आता सहाच्या ठोक्याला माझी पाटी पुन्हा कोरी होईल तीच अक्षर पुन्हा गिरवण्यासाठी...पुन्हा त्याच काळकुपित बंद करून घेण्यासाठी....



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy