Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Meena Kilawat

Inspirational Others

2.8  

Meena Kilawat

Inspirational Others

जनसेवा हीच ईश्वरसेवा

जनसेवा हीच ईश्वरसेवा

2 mins
51K


जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणणे सोपे असले तरी,सेवा करणे ही सर्वांसाठी साधारण कार्य नाही ,हे अतुलनिय कार्याचा मनापासुन विचार करायला हवा पण,सर्वांसाठी नाही. कित्येक जण आपले व आपल्या परिवाराचे पालन,पोषण कसे करायचे या विवंचनेत असतात.मानव जन्माला आला की,जगण्यासाठी कमवतो आणि पोटाचा अग्नी शमवतो,या शारीरिक क्रिया चालू असल्या तरी मनाने कुठेतरी दैवी शक्तीच्या अधीन जावून प्रार्थना करत असतो. भाव शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निसर्गाला काही अंशी देव मानू लागतो.काही चमत्कारावर विश्वास ठेवत असतात,परंतु शिक्षणामुळे विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव प्रगतीशिल झाला त्याला समजायला लागले आहे,काय खरं व काय खोटं , मानव कसा निर्माण झाला. ही सृष्टी,पशु पक्षी चराचर जीव जंतु ईथे असलेलं चैतन्य हे अद्भुत शक्ती याला सर्व नतमस्तक होतांना दिसतात.

 विज्ञानाने मनुष्याच्या पंखात कितीही बळ आणले तरी एक अनामिक भिती ह्रदयात कुठेतरी लपून बसलेली असते. आपल्या आत्मवृंदाना काही झाले तर लगेच देवाचा धावा करत असता आणि वेगवेगळ्या रूपात त्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतात.भारतीय संस्कृतीमध्ये तर ईश्वराला खुप मोठे स्थान आहे. महत्त्व आहे. आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी पुजा-आर्चना,उपास-दान धर्म,नामस्मरण अशा विविध प्रकाराने ईश्वराची भक्ती करत असतात.या श्रध्देमुळे त्यांना समाधान व शांती लाभत असते. अनेक सामाजिक विचारवंत,सुधारकांनी जनसेवा करुन साक्षात ईश्वर मिळवला, उदाहरण द्यायचं म्हंटल तर आपण महात्मा गांधी,लोकमान्य टिळक,ज्योतबा फुले,बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई अश्या अनेक समाज सुधारकांच्या अविरत प्रयत्नांमुळे समाजात जनजागृतिचे कार्याला सुरवात झालेली आहे.काही अंशी समाज जागरुकतेच्या दिशेने जनसागर पाऊले टाकत आहे. या सर्वांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार करुन मानवास सक्षम केले आहे, या प्रभावी अस्त्रांचा उपयोग समाजात सखोल पणे रुजला आहे.आणि समाज हा मोठ्या प्रमानात हा जागृत झाला आहे.हळुहळु ईश्वर कश्यात आहे हे ही बाकी राहिलेल्यांना माहिती होईलच पन खरी सेवा जाणने गरजेचे आहे. भुकेल्याची भूक ओळखावी , गरजवंताची गरज ओळखावी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी जी मदत करता येईल ती करायची.यातच खरी ईश्वर सेवा आहे.बाकी ज्यांची त्यांची ईच्छा असते.कुणाच्याही श्रद्धेला कमी लेखण्याचा उद्देश नाही.शेवटी प्रत्येकाची निष्ठा ही असतेच.संत तुकाराम,एकनाथ,ज्योतिबा फुले, लक्ष्मीबाई, राजाराम मोहनराय,मदर तेरेसा, सिंधूताई सपकाळ अशी अनेक महान विभूतींनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दुर्बल घटकांसाठी वाहिले आणि त्यांनी खरी ईश्वर सेवा केली.ईश्वराच्या नावावर ही सेवा करतात,किंवा समाजसेवा करुन किंवा राजनिती करुनही आपण सेवा करु शकतो.

  


Rate this content
Log in

More marathi story from Meena Kilawat

Similar marathi story from Inspirational