Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

जीवन एक संघर्ष सामना covid-19

जीवन एक संघर्ष सामना covid-19

2 mins
276


तारीख 29 सप्टेंबर वार मंगळवार सकाळी रोजच्याप्रमाणे दिनक्रम, त्यामध्ये अंघोळ त्यानंतर "हरिविजय" अध्याय घेणे.

त्याच्या आधी हॉस्पिटलचा दिनक्रम सुरू होतो.

सकाळी 5 40 ला नर्स येऊन इंजेक्शन देऊन जाते. सहा वाजता पीसी(personal care taker) येतो तो चादर , ड्रेस, बेडशीट इत्यादी वस्तू देऊन जातो.

मग सकाळची चहा बिस्किटे येतात (फक्त डायबेटिसच्या पेशंटला) त्याच्यानंतर नऊ वाजेपर्यंत इंजेक्शन इन्शुलीन, आणि नाष्टा हे असं डे टु डे ठरलेलं रुटीन आहे.

हरिविजय चा एक अध्याय घेतला .

आज परत छातीचा सिटीस्कॅन केला. ब्लड चेकिंग ला घेऊन गेले.

आज दिवसभरात जेवण म्हणून गेलेच नाही. अन्नावरची वासना ऊडाल्यासारखं झालंय .सकाळी दूध प्रोटीन घेतले, संध्याकाळी एक कप कॉफी करून घेतली. आणि दोन ढोकळे चार वाजताच्या नाश्त्यामध्ये आले होते तेच रात्री खाल्ले. बरोबर ठरल्याप्रमाणे पाच वाजता थंडीताप भरून आला. तरी मी तिथल्या स्टाफला आधी सांगून आले होते . बघा माझ्याकडे लक्ष ठेवा एक चक्कर माझ्याकडे मारा. आत्तापर्यंत मला अल्टरनेट डे ताप आलेला आहे आणि आज त्याचा दिवस आहे.

दोघी देखील हो हो म्हणाल्या पण कोणी फिरकले नाही. त्याची सुरुवात कशी होते आधी थंड वाटायला लागतं म्हणून पंखा बंद केला ,नंतर ब्लांकेट घेऊन झोपले. रेखा नावाची एक डॉक्टर बीपी आणि पल्स ऑक्सी घेऊन गेली .तिचे सर्वांचे रुटीन चेकअप होते मी तिला म्हणाले मला खूप थंड वाटतंय ताप देखील खूप आलाय प्लिज आधी मला एखादे इंजेक्शन(paracetamol) लावा .

"मेरे पीछे सिस्टर आ रही है" असं उत्तर देऊन ती तिथून सटकली.

तिचं टिक्का लावण्याचं काम पूर्ण केलं आणि निघून गेली. त्यानंतर दोन तास कोणीही नाही. मी सगळे फोन सायलेंट करून ठेवले होते .मला फोन उचलायची पण ताकत नव्हती.

एक फोन थोडासा बारीक आवाजात वाजत चालू होता तो दीपक चा फोन होता. मग मी त्यांना सांगितले आता मला कोणी फोन करू नका मला ताप थंडी वाजून आली आहे. माझ्यात बोलायची पण ताकत नाही. मग त्यांनी मुलाला सांगितले, मग मुलाने तिकडे स्टाफ कडे कुणालातरी फोन केला तेव्हा ती स्टाफ माझ्याकडे आली आणि मला इंजेक्शन पॅरासिट्रामल लावून गेली. त्या तापाने शरीर पूर्ण पिळवटून निघाला असं वाटतं.

पाच ते सात या दरम्यान भरपूर फोन वाजत होते पण मी एकही फोन उचलला नाही. त्यानंतर एकदा भेटायला गेट वरती मुलगा आला होता मी त्याला देखील परत पाठवले. बाबा रे माझ्या हातात सलाईन आहे आणि दरवाजा पर्यंत पर्यंत येऊन भेटण्याची मला ताकद नाही.

रात्री मग थोडे बरे वाटले मुलगा काहीतरी खायला घेऊन आला होता. त्याच्याशी पण जास्त वेळ बोलले नाही त्याला म्हटले तुझ्याशी उभे राहून बोलताना मला जागच्या जागी हलल्या सारखे वाटते.

रात्री रात्रभर झोप लागली नाही सारखी  जागी होत होते

रात्रभर रात्रभर अंग दुखत होते कंबर मान खांदे रात्रभर दुखत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy