STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Tragedy

4  

शब्दसखी सुनिता

Tragedy

झुंज

झुंज

4 mins
164

  कमल आणि नितेश दोघेही परराज्यातुन आपल्या लहान मुलगा सोनूसोबत शहरात राहत होते. नितेश एका कंपनीत कामाला होता. त्याची बायकोही जवळपास घरकाम करायची. त्यांच्या गावाकडे रोजगार नसल्याने ते खुप वर्षांपासुन नितेश आपल्या गावाकडील लोकांसोबत इथेच काम करायचा. वर्ष कींवा दोन वर्षांतुन गावी जायचे. पण इथे नवरा बायको  आपल्या सोनुसोबत छान राहायचे. मुलासाठी दोघेही खुप कष्ट करायचे. त्याला खुप शिकवायच आणि मोठ करायच त्यांच स्वप्न होत.

सोनु दोन वर्षांचा झाला होता. त्यांच्या गावातील सगळे लोक जवळच मालकाने त्यांच्यासाठी घरांची व्यवस्था केली होती. तिथे राहत होते. त्यामुळे सगळ्यांच जीवन छान आणि मस्त दिवस जात होते. आपल्या लहान मुलांना सांभाळायला घरी कूणीतरी असे त्यामुळे  टेन्शन नसे. बरेचसे लोक आपल्या मोठ्या मुलांना गावी आजी आजोबांकडे सोडून आले होते. कमल आणि नितेशने काम करून पैसे साचवले होते. नितेशचा गावी एक लहान भाऊ आणि आईवडील राहत होते. नितेश मोठा असल्याने त्याच्यावर आईवडीलांचीही जबाबदारी होती. त्याचा लहान भाऊ खूपच आजारी पडला. त्याला हाॅस्पिटलमध्ये खुप पैसे खर्च येणार होता. नितेशला भाऊला  बघायला गावी जायच होत. पण त्याला काही सुट्टी मिळत नव्हती. तसही पुढच्या महीन्यात बरेचसे त्यांच्या गाववाले सुट्टीला जाणार होते एकत्रच मग नितेशही पुढच्या महीन्यात जाऊ ठरवतो. त्याचे आईवडील त्याच्या भाऊच सगळ करतात. नितेश आणी कमलाने साचवलेले पैसे गावी पाठवून दिले. तेव्हा नितेशचा भाऊ बरा झाला. त्याला भाउ बरा झाल्याच समाधान होत. कमलही कधीही पैशांवरुन भांडत नव्हती.

ती मनाने फार छान आणि समजदार होती. उलट ती नितेशला सपोर्ट करायची. नितेश तिला सोनुमुळे कामाला पाठवत नव्हता. पण ती जवळच पटकन् जाऊन यायची. त्यांच्या गावाकडची आजी एक दोन तास सोनुला सांभाळायची. अश्या रितीने ती काम करून पैसे साचवायची. नितेशने भावाला पैसे  पाठवून दिले.


        दोघेही काम करायला लागले पुन्हा जोमाने, आणि अचानक कोरोना विषाणूची साथ आली. थोड्याच दिवसांत कोरोना नावाचा विषानू सगळकडे पसरला. खुप रूग्ण वाढत होते. रोजच मृत्युमुखीही पडणार्‍यांची संख्याही 

वाढत होती आणी पाॅझीटीव्ह रूग्णही वाढत होते. त्याच्यावर योग्य ती लस व औषधोपचार नव्हते. त्यामुळे लोक खूप घाबरायचे. शेवटी रूग्णसंख्या वाढल्यामुळे सरकारने लाॅकडाउन जाहीर केला. कंपन्या बंद झाल्या. काम बंद 

पडल नितेशला काय कराव समजेना. त्यांना गावी जाण्यासाठी कुठलही साधन उपलब्ध नव्हत. रेल्वे, बस सगळ बंद झाल होत. काम बंद पडल तर पुढे खायच काय ? कस चालणार घर आणि हे काही त्यांच गाव

नव्हत. शहरात सर्व महाग होत. त्यामुळे त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न उभा होता.

काम नही म्हटल्यावर मालकाने त्यांना गावी जायला लावल, त्यांची व्यवस्था वाहतुकीची नाही होऊ शकली. मग सर्व परराज्यातील नितेशच्या गावच्या मजूरांनी पायीच जाण्याच  ठरवल. नेमक तेव्हाच कमल आणि नितेश चा मुलगा सोनु आजारी होता. त्याला कुठे दाखवणार ? त्यांच्याजवळ फारसे पैसेही नव्हते. आणि आपल्या बरोबरीचे लोक सोडून

गेल्यावर आपण एकटे पडू या विचाराने तो त्यांच्यासोबत पायी निघाला. खुप सारे मजूर त्यांच्या बायका मुलांसह पायीच निघाले होते. प्रवास तर खुप दुरचा होता. पण रोजच रस्ता तुडवीत होते. 


    बराच अंतर पार केल होत. लहान मुलामुळे नितेश आणि कमल प्रवासात मागे पडले. ते दोघेच ऊन्हातान्हात चालत होते. उन्हाळ्याचे दिवस होते, रखरखत उन्ह होत, घामाच्या धारा वाहत होत्या तरी यांचा प्रवास सूरू होता. नितेशने बाळाला कडेवर घेतल होत. दोघेही मिळून घेत होते आणि पुढील अंतर कापत होते.  जिल्हाबंदी झालेली असते तरी हे मजुर आपल्या गावी निघालेले असतात. रात्री प्रवास करताना मुलाची तब्येत खूपच खराब होते. ते लहान लेकरू उन्हामुळे त्याला त्रास झाला असेल ते कसतरी करायला लागल होत. हायवेला मध्येच हे होते. तिथे जवळपास दवाखानाही नव्हता. थोड्याफार गाड्या जात होत्या. त्यांनी मदतीसाठी त्यांना थांबवल. विनंती करत होते. सोनूची तब्येत अजूनच खराब झाली.

कमल रस्त्याच्या बाजुला एका झाडाखाली त्याला घेऊन बसलेली, ती खुप रडत होती. नितेशही गाड्या थांबवत होता. लोकांना विनंती करत होता, मदत मागत होता. पण तेव्हा माणसातील माणुसकीच मरून गेली होती.

कोरोनाच्या भितीने कुणी कुणाला मदत  करायला तयार होत नव्हत. त्यांना कोरोना  झालय तर आपल्यालाही होईल ही भिती वाटायची. आईच्या मांडीवर झोपलेल्या सोनुची हालत खुपच खराब झाली. त्याची हालचाल मंदावत होती. त्याला ते सहन झाल नाही. त्यातच त्याने आपल्या आईच्या मांडीवरच प्राण सोडला. दोघेही नवरा बायको खुप रडत होते. मध्यरात्र झाली होती. आपल्या छातीशी धरतात, ऊठवतात पण काहिच हालचाल नाही त्याचे प्राण गेले होते. कमलने तर आपल बाळ गेल्यावर हंबरडा फोडला पण त्या अंधार्‍या रात्री ती हाक कुणापर्यंत पोहचलीच नाही. 

काय कराव ? काही सुचत नव्हत. त्यांची लोक तर खुप निघून गेले होते. शेवटी त्याच्या मित्राने सांगितल की तु लवकर आलास तर पुढे जाण्याची व्यवस्था होत आहे तर जाता येईल. मग दोघांनी एकदा मनभरून आपल्या बाळाला पाहील आणि जड अंतःकरणाने काळजावर दगड ठेवत त्याला मातीत पुरल. कमलच्या डोळ्यांतीलअश्रुंचा पूर काही थांबत नव्हता. 


      आपल्या बाळाला पुरल्यानंतर दोघेही पुढील वाट धरतात. लोकांमधील माणुसकीच मरून गेली होती, त्यामुळे त्या मुलाची आयुष्याबरोबर चाललेली झुंज असली तरी, मात्र या दोघांना परिस्थितीशी झुंज द्यायला उभ राहाव लागल. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy