इच्छा
इच्छा
आदित्य देवधर याच्या नव्या ऑफिसाचे आज उद्घाटन होते देवधर कुटुंबीय सगेसोयरे मित्रमंडळी आणि कर्मचारी उपस्थित होते देवधर दाम्पत्यानं एकुलती एक कन्या होती इच्छा आज ती पाच वर्षाची झाली ह्या कारणाने आजचा शुभमूहुर्त ठरला होता तिच्या हातानेच शुभ काम ला सुरवात करणार होते. इच्छाने आपल्या इवल्याश्या हाताने फीत कापली आणि सगळ्यानी आत प्रवेश केला
"अरे आदित्य पूजा करणार ना तू मग सोवळं परिधान करून ये भटजी पोहोचतील आता"
"नाही काका मी नाही करणार पूजा इच्छा करणार पूजा "
"काय एव्हडी लहान मुलगी आणि ती सुद्धा मुलगी करणार अरे तू असताना"
"त्यात काय आहे काका आज तिचा वाढदिवस पण आहे आणि आम्ही दोघेहि असणार ना तिच्याबरोबर पण पूजा मात्र तीच करणार "
"अरे वेड्या मुली कधी पूजा करतात का ?"
"का नाही काका "
"अरे पण तू भटजींना सांगितलं ना "
"हो आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे"
"अरे आपल्याकडे मुली पूजा वैगेरे करत नाही ना आपल्या घराण्यात कोणी केलं "
"ही पूजा इच्छाच करणार ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तिच्या जन्मानंतरच मी एवढा यशस्वी झालो आहे माझ्यासाठी ती लकी आहे"
"बघ बाबा आम्ही मोठी माणस म्हूणन सांगतो "
"काका माझी इच्छा माझ्यासाठी सर्व आहे त्यामुळे सॉरी "
"काका मुलींना मुलापेक्षा कमी समजणं मला जमत नाही पुढे हा बिजीनेस ती सांभाळनार ना आम्ही देवी ना पुजतो मग मुलींना का नाही ज्या देवी साठी नवरात्र जागवली जाते तिच्याच मुलीवर अत्याचार होतो तेव्हा आपण फक्त गप्प बसतो काय ना काका मी असं नाही म्हणत कि पूर्ण स्वतत्र द्या संस्कार आणि शिस्त हि तेव्हडीच असली पाहिजे आणि तुम्ही म्हणता ना इच्छा लहान आहे पूजा करण्यासाठी तुम्हाला माहित आहे का आमची इच्छा गायत्री मंत्र पूर्ण म्हणते "
"ते बघा भटजी आले बाळा इच्छा ये लवकर"
" नमस्कार भटजी काका "
"आयुष्मान भव "
वाह काय गुणी मुलगी आहे नाही तर कोण पाय वैगेरे पडत "
"आहेच माझी मुलगी हुशार"
"ये बाळ बस पाटावर "
आणि भटजींनी पूजेला सुरवात केली...