Jyoti gosavi

Tragedy Others

2.5  

Jyoti gosavi

Tragedy Others

होऊ कशी उतराई

होऊ कशी उतराई

9 mins
1.0K


एका पाॅश चकाचक हॉस्पिटल च्या लेबर वार्डच्या दारात, एक कृश वयस्क स्री बाकावर बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर खानदानी तेज आहे. अंगावर तलम साडी,चार ठळक दागिने, श्रीमंतीचे तेज तिच्या अंगावर दिसून येत आहे. मोठ्या उत्सुकतेने ती वार्डाच्या दरवाज्याकडे बघत असते. आपला सगळा प्राण डोळ्यात एकवटून ती कोणाची तरी वाट बघते आहे .दरवाजा उघडला त्यातून एक फिकुटलेली ,नुकत्याच झालेल्या बाळंतपणाचे श्रम तिच्या चेहर्यावर दिसत असलेली, तरुणी उभी होती. ती थकलेली दिसत असली तरी तिच्या लावण्याचे तेच लपत नव्हते.

 तिच्या हातात दुपट्यात गुंडाळलेला, नुकताच जन्माला आलेला, एक जीव शांतपणे पडून होता. दोघींच्या चेहऱ्यावर देखील अतोनात दुःख होते. पुत्र जन्माचा आनंद वाटण्याऐवजी त्या दोघी दुःखी का दिसत होत्या? त्या दोघींचे एकमेकांशी काय नाते होते? तिने आपल्या हातातील  तो अश्राप जीव समोरच्या वयस्क स्त्रीच्या हातामध्ये सोपवला. डोळ्यातून अश्रू धारा लागलेल्या, म्हातारी च्या हातातील बाळ तत्परतेने तिच्या सोबत असणाऱ्या नोकरांनीने घेतले. एवढ्यात त्या वृद्ध स्रीने त्या तरुण स्त्रीचे वाकून पाय धरले. व आपल्या डोळ्यातील अश्रूंचा जलाभिषेक तिच्या पायावर केला. "अहो "असं काय करताय आई! असे म्हणून ती मुलगी पटकन मागे सरली आणि झटकन आत निघून गेली. ती वृद्धा एका पॉश गाडीतून बाळाला आपल्या घरी घेऊन गेली .

 वाचकहो असा काय प्रसंग घडला असावा ते आता आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहू या.

मंडळी सुरुवात थोडी नाथमाधव यांच्या स्टाइलने लिहीले, म्हटलं बघूया जमतंय का आपल्याला? पण आता कथा मात्र आपल्या पद्धतीने उघडून पाहूया

_________________

अमर आणि अंजली एकाच कॉलेजात शिकणारे म्हणजे, कॉलेजचे लाडक कपल.

यांच्यात अगदी पहिल्या वर्षापासूनच एकमेका वर लाईन मारायला सुरुवात झाली होती. दोघेपण एकमेकाला अनुरूप असेच होते. दिसायला प्रचंड देखणे, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे ,आपल्या श्रीमंती चा तोरा न मिरवणारे ,त्यामुळे दोघेही ही सर्वांचे आवडते होते .शेवटच्या वर्षात दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याचे व्यक्त केले. "अजूनही आपणाला एकमेकांची कंपनी आवडते म्हणजे तीन वर्षे आपण फक्त टाईमपास केला नाही "हे त्यांना पटले

अंजली "आर यू सिरीयस अबाउट दिस रिलेशन" त्याने विचारले अरे ! त्या शिवाय का मी  गेल्या तीन वर्षात तुझ्या बरोबर राहिले? तुझ्या किंवा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच आलं नाही म्हणजे आपण दोघे एकमेकावर प्रेम करतो हे सिद्ध होत नाही का?

अगं हो !पण माझ्या मनात लग्न संस्थेबाबत काही कल्पना आहेत. एकमेकांना पारखून घ्यावं जमलं तर लग्न करावं.

म्हणजे तुला काय लिव्ह इन रिलेशन म्हणायचे का ?

हो !काय हरकत आहे? त्याने विचारलं अंजली थोडीशी चलबिचल झाली खरी.

 आपले संस्कार, आपले आई-वडील, काय म्हणतील इत्यादी इत्यादी पण शेवटी दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं. दोघेही घरातील लाडावलेली श्रीमंतांची अपत्त्ये .

कोणत्या कामाची कधी सवयच नव्हती, शिवाय घरातून या गोष्टींना विरोध होता म्हणजे त्यांनी रीतसर लग्न करावे असे त्यांचे म्हणणे. घरच्या मंडळींना न जुमानता त्यांनी एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला व दोघे जण राहू लागले. अंजलीला एका कंपनीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून नोकरी लागली .पहिलेच पॅकेज वर्षाला वीस लाखांचे अमर मात्र पुढे पीजी करत होता दोघांचे मजेत चालले होते छोटे छोटे रुसवे-फुगवे सोडता एखाद्या नवीन जोडप्याचं व्यवस्थित चालाव तसं त्यांचं चालू होतं . आजूबाजूच्या लोकांच्या प्रश्नार्थक नजरा टाळण्यासाठी अंजली पहिल्याच दिवसापासून मंगळसूत्र घालत होती. त्याला पण अमरचा विरोध होता, पण तिने तेव्हा तेवढे मात्र जुमानले नाही. शेवटी मनातले संस्कार तिला टोकत होते, म्हणूनच तिने मंगळसूत्र गळ्यात घातलं .

निव्वळ अमरच्या प्रेमापोटी तिने "लिव्ह इन रिलेशन "मध्ये राहण्याचे मान्य केले. हळु हळू दोघांच्या घरचे त्यांच्या घरी येऊ लागले .यांच्या लग्नाला विरोध करण्याचं काही कारण नव्हतं या दोघांनी लवकरात लवकर लग्न करावं व आम्हाला देखील टेन्शन मधून मोकळा करावा अशीच आई-वडिलांची इच्छा होती. अंजली तर केव्हाची गुडघ्याला बाशिंग बांधून बसली होती ,पण अमरच विनाकारण चालढकल करीत होता .असं त्यांनी वर्षभर काढले .

एक दिवस रात्री, अंजलीने दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले व त्याच्या गालाला गाल घासत म्हणाली अमर आपण लग्न कधी करायचं ?

का ?लग्ना वाचुन आपलं काही अडलय का?

हो ! "माझ अडलेय ".

काय अडलंय? आपण चांगले मजेत राहतोय, जसे इतर नवरा-बायको एकमेकांवर प्रेम करतात त्यापेक्षा आपण जास्त प्रेम करतोय

 ते खरे आहे रे! पण आता जो माझ्या पोटात वाढतोय त्याला बापाचं नाव नको?

काय? काय? म्हणालीस तो उडालाच, एवढ्यात ? मध्येच हा विलन कशाला आणला?

 आपलं ठरलं होतं ना? तीन वर्षे तरी काही गडबड नको, खरे तर त्यांच्या लव्ह स्टोरीत कोणी व्हिलन नव्हताच. "ना कधी कॉलेजमध्ये त्यांच्या आड कोणी आले, ना कधी घरच्यांनी लग्नाला विरोध केला पण आता पोटच मुल त्याला व्हिलन वाटू लागलं.

 हे पहा! आपल्या येणाऱ्या बाळाला असं विलन म्हणू नकोस तो काय मी एकटीने आणलेला नाही

 आज ती जरा आवाज चढवून बोलली. त्याबरोबर अमरने नरमाईचे धोरण स्वीकारले

 अजून माझं पीजी पुर्ण करायचं आहे आणि चार-पाच वर्षे कुठे फिरण्याचे दिवस आहेत, मौजमजेचे दिवस आहेत कबुतराच्या जोडी प्रमाणे गुटुरगुम करायचे सोडून हे नसतं लचांड गळ्यात अडकवून घेऊ नकोस .

आपण लवकरात लवकर  अबोर्शन करू आणि यापुढे काळजी घेऊ.

आता मात्र तिचा पारा चढला हे पहा आपल्या बाळाला अस लोढण म्हटलेलं मला चालणार नाही, आणि अॅबार्शन करायचा विचार देखील मी करणार नाही .माझ्या बाळाला मी जन्म देणार आहे .संसार म्हणजे काय फक्त कबुतराच्या जोडीने गुटरगुम करणं नसतं जबाबदारी पण असते. संसाराच्या वेलीवर फूल उमलत असताना ते खुडून टाकणे मला जमणार नाही.

तुझ्या पी जी बाबत म्हणशील तर, घर काही तुझ्या पैशावर चालत नाही .साऱ्या गोष्टी योग्य वयात व्हायला पाहिजेत. त्यानंतर दोघांची या विषयावर बरीच वादावादी झाली त्यांना आता एक वर्षानंतर एकमेकांचे वैगुण्य दिसू लागले. आणि बरच काही ब्ला! ब्ला !ब्ला!

दुसऱ्या दिवशी दोघांनी पण अबोल्याने आपले काम उरकले ऑफिसला चालते झाले. मात्र कामावर डोक्यात तेच विचार रात्री घरी आल्यावर कालच्यापेक्षा थोडं डोकं शांत झालं होतं व दोघेही शांतपणे स्वतःची बाजू कशी योग्य आहे हे मांडू लागले

तुला दुसरी कोणी बायको म्हणून हवी आहे का? माझा कंटाळा आलाय का? तसं असेल तर मी तुला सोडून जाण्यास देखील तयार आहे. तुझ्या प्रेमापोटी मी तेदेखील करीन, पण मी अबोर्शन करणार नाही. दोघांना देखील आपलाच मुद्दा बरोबर वाटत होता. शेवटी अंजलीने दोघांच्या देखील आई-वडिलांना फोन करून बोलावून घेतलं. संध्याकाळी घरी आला तर घरात आई बाप आणि सासू सासरे यांना बघून तो मनातून हादरला, तिला एकटीला वळवणे सोपे होते पण आता एवढ्या लोकांना तोंड देणे त्याला अवघड जाणार होते.

 अरे पण तुला लग्न करायला काय अडचण आहे? आणि आमचे कुणाचीच आडकाठी नसताना हे काय नाटक आहे ?तुझा बालिश पण अजून गेला नाही? सर्वांनी त्याला फैलावर घेतले ,खरेतर त्याला देखील मनातून काही प्रॉब्लेम नव्हता, पण आपला उगाचच इतक्या लवकर त्याला बाप म्हणायचं नव्हतं चांगलं करावे हिंडावे, फिरावं मौज मजा करावी मग लग्न आणि मुलांचा बघू. अशी त्याची याबाबत धारणा होती. थोडक्यात त्याला मौजमजा पाहिजे होती, पण जबाबदारी नको होती. हे पाहा इतके दिवस तुमचं खूप ऐकलं आता मात्र तुमचं जबरदस्तीने लग्न लावून द्यावे लागेल त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला तुम्हाला आई बाप व्हायचे नसेल ,पण आम्हाला आजी-आजोबा व्हायची घाई झालेली आहे. शेवटी सगळ्यांनी बरेच काही सुनावल्यानंतर, त्याच्या मनात लग्नाचे विचार येऊ लागले. तुमचं बाळ आमच्याकडे द्या ,आम्ही म्हातारे मिळून त्याला सांभाळू व तुम्ही आपले पुन्हा लिव्ह इन रिलेशन मध्ये रहा

" नाहीतर त्यापेक्षा असं करू आपला मुलगा पंचवीस वर्षाचा झाला ना? की मग त्याच्याबरोबर आपल देखील लग्न लावुया" तिने उपरोधाने म्हटले म्हटले.

"आयडिया वाईट नाही! तो म्हणाला आणि तिच्या ऐवजी त्याच्या आईने त्याला एक धपाटा लावला.

आता वाजत गाजत लग्न नको त्यापेक्षा रजिस्टर मॅरेज करू या! त्याने आपला विचार मांडला. दोन्हीकडे पैशाला काही कमी नव्हते, त्यांना अगदी थाटामाटात बार उडवून द्यायचा होता पण शेवटी मुलगा लग्न करतोय ना! मग रजिस्टर तर रजिस्टर नंतर रिसेप्शन थाटामाटात करू त्यांनी मनाची समजूत घातली. पण रजिस्टर लग्नासाठी आधी तीस दिवस नोटीस द्यावी लागते, तिला इतका वेळ द्यायचा नव्हता, बाबा! आपण घरातच भटजी बोलावून घरगुती लग्न लावून घेऊ या तिने सुचवले, सगळ्यांनीच या गोष्टीला दुजोरा दिला उद्या परवा एवढ्यात लग्न करून घेऊ असे सर्वांनी ठरवले .

नाही !नाही! उद्या परवा नको, त्यापेक्षा पुढच्या आठवड्यामध्ये चालेल पण का ?

सध्या मला एक प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे मी त्याचा अभ्यास करतोय, गुरुवारी मला बंगलोरला जाऊन सर्व कागदपत्रे द्यायची आहेत. सध्या माझा वेळ अत्यंत महत्वाचा आहे त्यातच मध्ये हा प्रॉब्लेम उद्भवला, त्यामुळे माझी चिडचिड झाली मला लग्न एन्जॉय करता येणार नाही. त्यापेक्षा मी बंगलोरला जाऊन आलो कि मग मी मोकळाच आहे पंधरा दिवस तरी देऊ शकेन, बाहेर फिरायला वगैरे जाता येईल त्याने जीव तोडून सांगितले मी गुरुवारी जाणार आणि रविवारी परत येणार ,हा गेलो आणि हा आलो! मग आल्यावर मी कोणत्याही दिवशी लग्नाला तयार आहे. शेवटी बाईसाहेबांना दुखावून कसे चालेल? सर्वांच्या मनावरचा ताण निवळला आणि त्याला बंगलोरला जाण्याची परवानगी मिळाली तो पर्यंत या सगळ्यांनी फिरून कपडा खरेदी दागदागिने वगैरे गोष्टी ठरवायच्या आणि रविवारी तो आला मंगळवारी लग्न. ठरले! आता तो पण सर्वांच्या प्लॅनिंग मध्ये सामील झाला काय खरेदी कराल ते मला व्हाट्सअप करून दाखवा, व्हिडिओ कॉल करा माझी चाॅईस विचारात घ्या.  अरे तुझी चॉईस आम्ही विचारत घेतली ना ,आता काय नाही आम्हीच सर्व ठरवणार! सर्वांना टाटा बाय- बाय करून तो बंगलोरला चालता झाला.

चार दिवस दोघे रोज एकमेकांना फोन करत होते, त्यांनी फोनवर भरपूर गप्पा मारल्या जसे काय पुन्हा एकदा नव्याने त्यांना एकमेकांची ओळख होत होती.

 राणी! तुला येताना काय आणू?

 अरे बाबा! फक्त तू ये, इथे मी सर्व घेतले आहे. फक्त रामदास स्वामीसारखे अक्षदा टाकताना पळ काढू नकोस म्हणजे मिळवले. तरीपण इतलं सिल्क खूप प्रसिद्ध आहे. मी येताना तुझ्यासाठी दोन बेंगलोरी सिल्कच्या साड्या आणि खड्यांचे सेट घेऊन ठेवले आहेत. अरे बाबा एरवी मी पॅंट-शर्ट वापरते .

आता तू आणल्या साड्या तर ठीक आहे. पण मी कधी वापरणार. त्याचा प्रोजेक्ट सक्सेस झाला. सर्वांनी ॲप्रिसिएशन केला. खरेदी आटपली आणि खुशीतच त्याने पुण्यासाठी फ्लाईट पकडले. आता तो देखील सगळे विसरून लग्नाच्या माहोलमध्ये शिरला होता. एअरपोर्ट वरती सगळेजण त्याला रिसिव्ह करायला गेले पण???? पण! पुण्याला फ्लाईट पोहोचलीच नाही. बेंगलोर सोडले आणि दहा मिनिटातच त्याचे प्लेन क्रॅश झाले विमानातील कोणीही वाचले नाही इकडे बातमी कळली आणि एकच हाहाकार झाला. कोणी कोणाची समजूत घालायची? त्याचे बाबा तर धक्क्याने बेशुद्ध पडले. एकुलता एक मुलगा होता आता कोणासाठी जगायचं? आणि कशाला जगायचं? सगळ्यांवरच दुःखाचा डोंगर कोसळला.

 अंजली ची अवस्था बघवत नव्हती पहिले वडिलांना आणि पाठोपाठ अंजलीला दवाखान्यात ॲडमिट करावं लागले. कोणीच कोणाशी बोलायच्या मनस्थितीत नव्हते .ह्या अपघातात मृतदेह पण हाती लागला नाही सगळ्यांचे अर्धवट जळालेले अवशेष वास मारत असल्यामुळे सर्व मृतदेहांनां एकत्रच दहन केले व त्याचे मुठ भर राख घरी आणून त्यावर पुढील संस्कार केले.

सगळ्यात प्रथम भानावर आली तिची आई, पोरीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं काहीतरी करायला हवं होतं.

 अंजली पाशी हा विषय कसा काढावा तेच तीला कळेना. शेवटी त्याने धीर एकवटून हा विषय काढलाच

 हे बघ अंजली! झालं ते खूप वाईट झालं पण आता पुढे काय करायचं ते ठरवलं पाहिजे. 

आता पुढे काय करायचं? आई येणारा दिवस ढकलायचा. अंजली अजून आपल्या दुःखात होती 

अगं! तुझ्या पोटात वाढतय त्या बाळाचं काय करायचं?

 काय करायचं म्हणजे काय? मी त्याला जन्म देणार आहे .

अगं वेडी की काय तू अंजली? हे पाहा! नाहीतरी तुझ्या नशिबाने तुमचं लग्न झालेल नाही. तेव्हा आत्ताच गर्भपात करून मोकळी हो. एखादे वर्ष जाऊदे आपण सरळ तुला एखादा एन् आर आय शोधूया म्हणजे इथल्या कोणालाच काही उत्तरे द्यायला नको आणि काहीच नको इथल्या आठवणी पण नको 

असं पण आता आम्ही इतरांना, तुला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलं म्हणून सांगतो आहोत .त्या माऊलीचा सरळ सरळ हिशोब होता शेवटी तिला आपली मुलगी सुखी असण्याशी मतलब होता आणि अंजली तयारच नव्हती. शेवटी आईबापांनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर आई बापाच्या प्रेमापोटी व स्वतःच्या भविष्याचा विचार करून, ती गर्भपात करून घ्यायला तयार झाली. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि उद्या ती हॉस्पिटल ला ऍडमिट होणार तर आजच अमरचे आई-वडील तिच्या घरी हजर झाले आणि सुनेकडे नातवंडाची भीक मागू लागले .आमचा एकुलता एक मुलगा तर गेलाच पण त्याचा अंश तुझ्या पोटात वाढतोय तो तू आम्हाला दे आणि मग तू कुठेही जा.

 बायो !आम्ही स्वतः चांगला मुलगा बघून तुझे कन्यादान करू, पण आमचे नातवंड तेवढे जन्माला घाल.

 ते तिच्या हातापाया पडू लागले पहिल्यांदा तिला सासु सासर्याच्या स्वार्थीपणाचा राग आला.

 माझा विचार न करता ते फक्त आपल्या म्हातारपणाचा आणि आपल्या वंशाच्या दिव्याचा विचार करताहेत पण नंतर त्यांची अगतिकता तिच्या लक्षात आली एकुलता एक मुलगा तर गेलाच किमान नातवंडात तरी ते जीव रमवतील . एकुलता एक मुलगा गेल्यानंतर त्यांना तरी आशेला दुसरी जागा कुठे होती? एकीकडे आईबापांचा मुल पाड म्हणून तगादा तर दुसरीकडे सासू-सासऱ्यांचा मूल जन्माला घाल म्हणून आग्रह ती दोन्हीच्या कैचीत सापडली शेवटी दोन्ही मायबाप होते आणि आपल्या लेकराच्या प्रेमापोटीच असे वागत होते. त्यात तिची मनस्थिती द्विधा झाले 

खरेतर अमर देखील मुल पाडच म्हणाला होता पण आता ती परिस्थिती वेगळी होती

कधी न भांडणाऱ्या  त्या उच्चवर्गीय कुटुंबात त्यामुळे भांडण लागले शेवटी चौघांना एकत्र बसवून अंजलीने एक निर्णय घेतला की मूल जन्माला घालायचं पण त्याचा मातृत्व मात्र तिने स्वतःकडे घ्यायचं नाही. त्यांचं नातवंड त्यांच्या हाती द्यायचं .

थोडासा आई-वडिलांचा विरोधातच तो निर्णय होता त्या दिवसापासून ती अज्ञातस्थळी गेली नंतर एका पॉश हॉस्पिटलमध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून मातृत्वाचा गळा उठून तिने तो एक दिवसाचा जीव सासूच्या हवाली केला तेव्हा तो पहिल्या पानावरचा प्रसंग घडलेला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी अंजली अमेरिकेला निघून गेली पुन्हा कधीही भारतात न येण्यासाठी व तिची सासू मनात म्हणत होती होऊ कशी उतराई सुनबाई होऊ कशी उतराई


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy