STORYMIRROR

Rutuja kulkarni

Tragedy

3  

Rutuja kulkarni

Tragedy

हक्काची मिठी

हक्काची मिठी

2 mins
284

आज ही त्याच्या साठी त्याला आवडणारी ती लाल गुलाबाची फुले आणि त्याला तिचा आवडणारा तो आकाशी रंगाचा चुडीदार घालून बसली होती ती त्याच्या अगदी जवळ कदाचित आज तरी, हवी असलेली ती हक्काची मिठी तो देईल या आशेने.

      पण तो तर अजूनही मग्न होता त्या समोरच्या भिंतीवर असलेले चित्र पहाण्यात ,ती शेजारी बसली आहे हे ही बहुदा त्याला लक्षात आलेच नाही. ती मात्र उगाचच हलकेच पायातील पैंजण वाजवत होती, 'हम आपके है कौन', मधील 'माधुरी' सारखी खोकत होती, पण सारे कसे व्यर्थ.

ती : "

तुला आठवतेय ना रे, याच दिवशी तु मला तुझ्या प्रेमाची कबुली दिली होतीस आणि मी हो म्हटल्यावरं मला ती प्रेमाची मिठी ही दिली होतीस आणि मी ही विरघळून गेली होते तुझ्या मिठी मधे संपूर्ण दिवस. मग आपण दोघे चालत चालत आपल्याच धुंदीत असताना अचानक ती गाडी समोर आली आणि तु मला तुझ्या मिठीत घेऊन रस्त्याच्या त्या कडेला झेप घेतली, मी तर वाचले पण तु तर डोक्याला मार लागल्यापासून ते आज एक वर्ष झाले तरी ही ईथेच या दवाखान्यात आहेस. मला आठवतेय तुझी ती मिठी ईतकी घट्ट होती की तुला दवाखान्यात दाखल करेपर्यंत मी तुझ्या चं मिठीत विसावली होती. ती आपली पहिली आणि शेवटची मिठी ठरली. डॉक्टर काहीही म्हणू दे मला माहिती आहे तु कधीतरी नक्की उठशील आणि मला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेशील तुझ्यां. घेशील ना? ",

   ती त्याच्या कडे पहात हे सर्व बोलत होती पण तो मात्र अजूनही गुंग आहे भिंतीवर चे ते निर्जीव चित्र पहाण्यामधे. तिला ही हे माहित आहे, की तिचे हे बोलणे त्याच्या पर्यंत पोहचणार नाही, पण तरीही ती रोज त्याच्या साठी ती लाल गुलाबाची फुले घेऊन येत असते, तासनतास गप्पा मारत असते एकटीच. कधीतरी तो उठून तिला पुन्हा तिची हक्काची, प्रेमाची मिठी देईल या आशेवर...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy