Ankit Navghare

Inspirational

3  

Ankit Navghare

Inspirational

गोष्ट एका भावाची

गोष्ट एका भावाची

3 mins
1.9K


एक मध्यमवर्गीय कुटुंब.

दुपारी २ वाजलेले. मोबाईल वाजतो. आई फोन उचलते.

आई :- हेलो 

शिक्षिका :- हेलो, सुयोग ची आई बोलताहेत ना.

सुयोगची आई :- हो. हो madam. असा अचानक फोन केला. सुयोगला काही झालंय का? 

शिक्षिका :- नाही, तो ठिक आहे हो. त्याची एका मुलीने तक्रार केलीय आमच्याकडे. 

सुयोगची आई ( काळजीत ):- क..काय.. कुणी? आमचा सुयोग कुणालाच त्रास देत नाही हो. नक्की काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्ही मुलीच्या पालकांचा नंबर द्याल का. म्हणजे नेमक काय झालं कळेल. 

शिक्षिका :- मी सांगतो तुम्ही लिहून घ्या. ९६७++... बरं ठेवते मी फोन . 

सुयोगची आई :- बरं madam.

आई फोन करुन स्नेहा आणि तिच्या आईला घरी बोलावून घेतात.

संध्याकाळी ७ वाजता दाराची बेल वाजते. थोड्या वेळाने आई दार उघडते. 

आई :- या ताई, ये गं स्नेहा.

स्नेहाची आई :- तो तुमचा सुयोग ( रागात) पाहा थोडं.

सुयोगची आई :- नक्की काय झालं सांगाल का? दुपारी शाळेतून कळले मला की ..

स्नेहा :- काकू सुयोग माझ्याकडे पाहत असतो मधल्या सुट्टीत. मला चांगलं नाही वाटत त्याच ते.

सुयोगची आई :- हो मग ....

स्नेहाची आई :- मग मग काय. काळजी वाटते हो माझ्या पोरीची आम्हाला. आजचा जमाना चांगला नाही. काही सांगता येत नाही.

सुयोगची आई :- तुम्ही समजताय तसे नाहिये ताई.

सुयोगची आई :- सुयोगला एक लहान बहिण होती. चार महिन्याआधी वारली ती एका अपघातामध्ये.

स्नेहाची आई :- ओह सॉरी... वाईट झालं.. पण...

सुयोगची आई :- महिन्याभरापासुन सुयोग सांगतोय मला स्नेहाबद्दल की ती त्याच्या बहिणीसारखी दिसते आणि खेळकर, थोडी नटखट आहे म्हणे.

स्नेहाची आई :- हो का.

सुयोगची आई :- या रक्षाबंधनला हिला मी राखीसाठी बोलावणार होतेच मी. तो तिला बहिण मानतो हो.

स्नेहा :- तो बोलला नाही मला कधी मला.

सुयोगची आई :- तसा थोडा अबोल आहे गं तो. त्याचा मुड असतो तरच सांगतो मनातले.

स्नेहाची आई :- सॉरी हं ताई. माझा गैरसमज झाला हो आमचा. तो बहिणीच्या नात्याने पाहत होता हिला. मी आपले काही वेगळच समजले.

सुयोगची आई :- तुमचे वाटणेही स्वाभाविक आहे म्हणा. शेवटी पोरांचा काय भरोसा. पोरंच ती.

स्नेहा :- काकू मी पण सॉरी ... 

सुयोगची आई :- ते सुयोगला बोलायचे तू. ओके तो असेल आत खोलीत. दोन्ही बाया स्वयंपाकघरात जातात अन् गप्पा करत बसतात. स्नेहा हळूच सुयोगच्या खोलीत जाते.

सुयोग :- (स्नेहाला पाहून) कशाला आली तू. तुझ्याशी नाही बोलायचं मला. जा जा...

स्नेहाची आई :- अगं बाई आत्ता काय झाले यांचे. आजकालची पोरं पण ना.

सुयोगची आई :- आत्ता हक्कानं भांडू द्या त्यांना. तुम्ही चहा प्या. थंड होईल हो तो.

स्नेहा :- सॉरी, सॉरी. तू बहिण मानतो मला माहित नव्हते रे. तुला मॅडमनी चापट मारली लागलं नाही ना तुला जास्त.

सुयोग :- नाही लागली. (जवळच टेबलवर त्याच्या बहिणीचा फ्रेम केलेला फोटो असतो) 

स्नेहा :- तुझ्या बहिणीचा फोटो आहे नं हा. काकुंनी सांगितले मला तिच्याबद्दल.

सुयोग :- हो. माझ्या दीदीचाच फोटो आहे हा. (त्याचा चेहरा गंभीर होतो.) रडत रडत... ती ...

स्नेहा (त्याच्या केसांवर हात फिरवत) : ती कुठेच नाही गेलीय परत आलीय... आधी शांत हो पाहू तू. आहे मी नेहमी तुझ्यासोबत.

सुयोग :- मग आजपासून आपण भाऊ - बहिण ओके.

स्नेहा :- ओह या ब्रो...

स्नेहा :- काकू हा तुमचा सुया..

सुयोग :- सुयोग नाव आहे माझं. सुया बिया नाही .

स्नेहा :- बहिण आहे मी काहीपण म्हणेन तुला.

(सुयोग तिचे केस जोराने ओढतो) 

स्नेहा :- आई गं...

सुयोगची आई :- "एक हजारों में मेरी बहना है." झाले असेल तर येता का नाश्ता रेडी झालाय.

सुयोग आणी स्नेहा एकाच स्वरात " हो ss" .." चलो ss"


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational