गोष्ट एका शाळेची
गोष्ट एका शाळेची


एक मध्यमवर्गीय कुटुंब
संध्याकाळची वेळ (६:००)
नववीतली मुलगी शाळेतून नुकतीच घरी आलेली असते. तिचा चेहरा थोडा हिरमुसलेला.
आई : काढ ते दप्तर. किती भारी आहे. फ्रेश हो आणि थोडं खाऊन घे तू.
मुलगी : हम्म. हो.
आई : काय झालं माझ्या चिऊचा आज मुड खराब आहे वाटते.
मुलगी : नाही. काही नाही.
आई : मग काय प्रथम सत्राचे पेपर तपासून मिळाले का तुमचे. कसे मिळाले मार्क्स?
(मुलगी एका एका विषयाचे मार्क्स सांगते.)
बाबा (Hall मधुन) : गणिताचे सांग आधी बाकी नंतर पाहु.
मुलगी : ते... ग... ग... गणितात मला ५०/७० पैकी.
बाबा : लाज वाटते काही. दिवसभर काम करतो तुझा बाप... तुझ्या शाळेची फी भरण्यासाठी. आणि पोरगी पाहा काय दिवे लावते. Engineering ला admission साठी गणितात चांगले मार्क्स पाहिजे. नववीचं गणित असं मग दहावीत काय दिवे लावणार.
आई : अहो इतका का रागावताय. करतेय न अभ्यास ती.
मुलगी (आईच्या कुशीत डोकं ठेवत, रडत रडतच) : अगं मला नाही समजत त्या सरचे गणित, कुणालाच नाही समजत. ते दोन-तीन गणित सोडवतात अन् बाकी तुम्हीच सोडवा म्हणते. आणि जर प्रोब्लेम आला तर सांगत पण नाही समाजावून. आणि सर्व सोडवून नाही नेले तर वर्गाबाहेर उभं करतात.
आई : अगं मग आपण पालक सभेला जाऊ तेव्हा सांगू की हे. ते तुमच्या शाळेचे अध्यक्ष म्हणाले ना की काही कुणा शिक्षकांची तक्रार आहे का म्हणून.
मुलगी : नाही. नाही. असं नाही करु. सरला माहित पडलं तर आम्हाला मार्क कमी देईल पुढच्या परीक्षेला. अध्यक्ष आमच्या सरचे दुरचे काका लागतात म्हणे. ते एकदा भाषणात म्हणाले होते की दरवर्षी आमच्या शाळेचा निकाल एकदम चांगला लागतो. दरवर्षी तर शिक्षकाची तक्रार करुच कसे शकता. तुमचे पोरंच अभ्यास करत नसतील. त्यांच्याकडे लक्ष द्या आधी.
आई : मग आत्ता काय करणार?
शेवटी एकच प्रश्न. न्याय मागावा तरी कुठे सामान्यांनी. शेवटी काय तर "तेरी भी चुप मेरी भी चुप..." अन्याय सहन करा फक्त गुपचुप.