एक गोष्ट Fees ची
एक गोष्ट Fees ची


एक मध्यमवर्गीय कुटुंब
वेळ:- सकाळी १० - १०:३०
घरातील वडिल माणसाचा मोबाईल वाजतो .
सेव्ह नसलेल्या नंबर वरुन फोन येत असतो.
वडिल :- हेलो ,
तिकडुन :- हेलो .
वडिल :- माफ करा मी आपल्याला ओळखले नाही .
तिकडुन :- मी तुमच्या मुलीच्या शाळेतील शिक्षक बोलतोय .
वडिल :- हा. बोला सर .
तिकडुन :- साहेब , तुम्ही शाळेची Fees भरलेली नाही .
शाळा चालु होऊन एक महिना झाला. Online क्लासेस होत आहेतच. आणी पुढच्या आठवड्यात unit test आहे .
त्याची नोटिस पाठवलीय आम्हि सर्वांना. विचारुन घ्या तुमच्या मुलीला .
वडिल :- हो सर पोरीनं सांगीतले होते मला तसे. मी लवकरच देतो fees. सध्या lockdown चालु आहे म्हणु़न थोडा उशीर होईल . समजुन घ्या थोडा तरी शक्य तितक्या लवकर भरायचा प्रयत्न करतो मी.
तिकडुन :- हो पण किती उशीर. लवकर जमा करा नाहीतर ज्यादा fees लागलं उशीर केल्याने....
...आम्हि काय समजुन घेऊ पोरगी तुमची शिकवायची तुम्हाला आहे. पैसे कसे भरायचे तुम्हाला कळायला हवं . कर्ज काढा नाही तर घर गह
ाण ठेवा.... तुमचं तुम्ही पाहा. कारण नका देऊ म्हणजे झाल. पोट आम्हाला पण आहे चार पैसे आम्हाला पण मिळु द्या जगण्यासाठी ..नमस्कार . ठेवतो फोन .
आई : अहो ... काय झाल काय म्हणाले ते ?
वडिल :- तिच्या Fees बद्दल बोलत होते .
आई :- अहो ... आपण bank मध्ये जाऊन पाहुया का?
वडिल :- नाही नाही. राहु दे. Home लोन चे हफ्ते चुकते नाही झाले अजुनही. आधी जुना हिशेब पुरा करा मग पाहु पुढचे bank manager म्हणाला मागच्या वेळी .
आई : हिच्या मामाला विचारुन पाहते . थोडे पैसे देईल तो .
वडिल : - दुसरे कुणाला आपल्यासाठी कशाला त्रास द्यावा .
राहु दे . मी पाहतो काहीतरी .
मुलगी :- पप्पा teacher म्हणे की लवकर Fees भरली नाही तर मला काढुन टाकेल school मधुन . पप्पा मला शिकायचंय . मला शिकायचंय ......( रडायला लागते )
शेवटी एकच प्रश्न - एक दोन महिने पैसे उशीरा भरले तर काही बिघडत का. नाहि आहे बापाजवळ पैसे परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा कधी. थोडं समजुतदारपणा घ्या हो शिक्षणसम्राटांनो .