गोष्ट एका मुलाची
गोष्ट एका मुलाची
एक मध्यमवर्गीय कुटुंब. नुकतीच सकाळची झालेली
आई :- ( मुलीला ) अगं घर थोडं झाडुन घेतेस का. मला आज बरं वाटतं नाहीये .
मुलगी :- हो गं आई, तू आराम कर पाहू. मी करते ते. काळजी नको करु.
दोन चार तासांनंतर (शेजारचे काका काही कामासाठी घरी येतात. बाबासोबत ते हॉलमध्ये बोलत बसतात)
आई : (मुलाला) - हे चहाचे कप घेऊन जा.
मुलगा :- मी नाही जात.
मुलगी :- आई दे इकडे . मी घेऊन जाते .किती वेळपासुन बसलेत न ते दोघं . ( ती चहाचे कप आणी पाण्याचे ग्लास घेऊन जाते )
मुलगा:- अशीच काम करत जा. हाहा ( हसत हसत)
मुलगी :- एखादं काम तु केलं तर काय बिघडत .
अर्धाएक तासांनंतर काका आपल्या घरी निघुन जातात. भाऊ बहिणीची बाचाबाची चालूच असते.
बाबा :- काय चालू आहे तुमचं.
मुलगी :- हा पहा एक काम नाही करत.
बाबा :- घरचे कामाशी त्याला काय घेणंदेणं. बायकां
ची कामं त्याला का सांगता. बाहेरची कामं आहेत न त्याला. बस्स झाल ते.
काही वर्षांनंतर मुलगी लग्न करुन सासरी गेली. आई बाबा गावी असतात. मुलगा आपल्या बायकोसोबत एका शहरात राहतोय.
सकाळची वेळ:-
बायको :- आज मला बरं वाटतं नाहीये . ही कामवाली बाई पण आज उशीर येते म्हणे .जरा घर झाडुन घेतात का दुपारी पाहुणे येणार आहेत आपल्या घरी.
नवरा :- बायकांची काम नको सांगत जाऊ तू मला. परवाच्या दिवशी घरी मित्र आला तेव्हा मी चहाचा कप परत नेऊन ठेवला. तर तो म्हणाला की वहिनीने तर तुला ताटाखालचा मांजर बनवले.
बायको :- मी पण तुझ्याइतकी कमावते आणी बाकी काम पण करतेच की . मग तुम्ही थोडं केलं तर काय बिघडत.
नवरा :- जा चहा बनव माझ्यासाठी. शिल्लकची बडबड नको करू तू. सकाळी सकाळी मुड ऑफ केला.
शेवटी एकच प्रश्न मुलीला मुलासारखे बनवताना "मुलाला मुलीसारखे का बनवू नये." घरगुती काम करण्यात कसली लाज यावी. की फक्त मिश्यांना पिळ देणे हाच पुरुषार्थ ???