The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

एक गोष्ट सोशल मीडियाची

एक गोष्ट सोशल मीडियाची

2 mins
60एक मध्यमवर्गीय कुटुंब 

 सकाळी ७;३० वाजलेले

२-४ वेळा मोबाईल वाजतो ...

स्नेहाची आई :- अगं ऊठ .. किती वेळपासुन मोबाईल

वाजतोय तुझा . 

स्नेहा ( अर्ध्या झोपीतच ) :- हम्म्. बोलं शुभदा ..

शुभदा :- ऊठली पण का ईतक्या लवकर .

स्नेहा:- हो ... नाही म्हणजे झोपेतच आहे ...मी .

      बोल काय म्हणत ..

शुभदा :- अगं तु काल Insta वर फोटो टाकलेत ना .

स्नेहा :( पटकन ऊठुन बसत ) - क...काय झालं त्याचे ??? 

शुभदा : काहि विशेष झाले नाही . मी तुला कितीदा सांगीतलय कि Filter , editing करुन upload करत जा फोटो . तुझा रंग ऊठुन दिसत नाही चारचौघात . आमच्या सारखी गोरी नाहिये तु . 

स्नेहा :- बरं next time पासुन filter चे लक्षात ठेवील .

शुभदा :- आणी ते Background ला एखाद्या शहरातल्या घरासारखे भिंती दिसु दे . तुझे घरचे खुर्ची , जुना सोफा , TV, वाळत टाकलेले कपडे नाही पाहायचा तिथं कुणालाचं. 

स्नेहा :- बरं ...

शुभदा :- आपण friendship Day ला फोटो काढलेत ना .

स्नेहा :- कुठे ? कोणते ? 

शुभदा :- अगं तु आपल्या GRP सोबत काढलेत ते फोटो .

स्नेहा :- ह... आठवले . त्याचे काय ? 

शुभदा :- शुभम सोबतच्या सेल्फित इतकी comfortable नाहि दिसत आहे तु . त्याने गळ्यात हात टाकलाय आणी तु हात चेहरा कसा akward केलाय , जसे काही करणारच होता तो तुझ्यासोबत .

स्नेहा :- मला नाही आवडत कुणी मुलाने गळ्यात हात टाकलेले .

     I don't feel safe Yaar .

शुभदा :- ये ..कोणत्या जगात जगतेय तु . हे नाही आवडत.. ते नाही आवडत. लोक काय म्हणेल काय काय ???

आम्ही सगळ्या मुली shorts घालुन आलो आणी तु

आपली सलवार मध्येच .थोडी update राहत जा .

शुभदा :- मी पहा pose मध्ये फोटे टाकते . माझ्या

फोटोंवर रांग लागते " Looking gorgeous "

" Hot.." आणी बरंच काही .काही तरी शिकत जा माझ्याकडुन .

स्नेहा :- हो..पाहु ..चल. call ठेवते मी . clg मध्ये भेटु. बाय .

स्नेहाची आई :-( स्वयंपाकघरातुन ) नाश्ता झालाय फ्रेश हो. लवकर . ऊठ..

थोड्या वेळेनंतर ...

स्नेहा नाश्ता करून झाल्यावर ..

स्नेहा :- आई .. खुप छान झाला आजचा नाश्ता .

आई :- ( हसत ) रोज वाईट होतो का मग ? 

स्नेहा आईला दोन क्षण पाहते आणी घट्ट बिलगते तिला.

       ती एक मिठी सांगुन जाते . रंग-रूप , खोटा दिखावा, कुठली fashion काय काय . त्यापेक्षा नको हे सारे . सांगावा ओरडुन जगाला -- नाही टाकायचा फोटो

माझा मला ....नाही ...नको likes नको comments या दुनियेपेक्षा मला आहे तसे

accept करणारी आईची एक मिठी . फक्त हवी आहे नेहमीसाठी जवळ .


Rate this content
Log in