गणितज्ञ रामानुजन
गणितज्ञ रामानुजन


पहिला भारतिय गणितज्ञ म्हणून श्रीनिवासा अय़ंगार रामानुजन याना ओळखले जाते. "शून्याचे मुल्य" याची ओळख करुन देणारे ते पहिले गणितज्ञ होते. युरोपीय गणितज्ञाचे सिद्धांत आपल्या शालेय पुस्तकात असल्यामुळे लहानपणापासून आपण त्यांना ओळखतो, मात्र श्रीनिवासा रामानुजन यांच्याविषयी वरवर देखील माहिती अनेकांना नाही. २२डिसेंबर १८८७ मध्ये तामिळनाडूतील इरोडा जिल्ह्यात जन्मलेल्या़ श्रीनिवासा रामानुजन यांचा परिवार कपड्याच्या दुकानात नोकरी करत होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते दहावी पर्यंत शिकू शकले. त्यांना गणितात प्रंचड रुची होती.
दहावी झाल्यानंतर त्यांनाही उदरनिर्वाहासाठी मोलमजूरी करावी लागली.फावल्या वेळेचा उपयोग ते गणिताचा छंद जोपासण्यासाठी करायला लागले. इतर
मुलांनी फेकून दिलेले पाठकोरे असलेल्या कागदावर त्यांची आकडेमोड चालत होती.त्यांचे गणित उच्च दर्ज्याचे असल्यामुळे त्यांच्या आकडेमोडीने अनेक सिद्धांताला जन्म दिला. असे फाटक्या कागदावरील सिद्धांत तेंव्हा मद्रास युनिव्हर्सिटीचे चीफ अंकाऊन्टंट एस.एन.अय्यर यांचे हाती लागले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम श्रीनिवासाची क्लर्कपदी नियुक्ती करुन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. नैसर्गिक बुद्धिमत्ता लाभलेल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या या गणितज्ञाला केवळ शिक्षण कमी म्हणून क्लर्कपदी नेमण्यात आले. तरीही मोलमजूरीपेक्षा हे काम बरे होते. गणिती सिद्धांत समजवून घेण्यासाठी मद्रास युनिव्हर्सिटीची टीम कार्य करीत होती. त्या अभियंत्यांनी श्रीनिवासा रामानुजन यांचे सर्व हस्तलिखित जागतीक किर्तिचे गणितज्ञ प्रो.जी.एच.हार्डी यांनी रामानुजनच्या सिद्धांतांचा अभ्यास करुन त्यांना मोठा "गणितज्ञ " म्हणून गौरविले.
या गणितज्ञ्नाला भेटण्यास लंडनवरून भारतात आले. अनेक दिवस उपासमारित काढलेल्या. अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या श्रीनिवासा रामानुजनला तेंव्हापासून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. इंग्लंडला गेल्यामुळे त्यांच्या शोधकार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. ते प्रथम भारतीय व्यक्तिमत्व
होते, ज्यांना कँम्ब्रिज विद्यापीठाचे फिलॉसॉफिकल व रॉयल सोसायटी फॉर इंग्लंडच्या प्रमुखपदी नेमण्याचा सन्मान मिळाला होता. परंतू तिथल्या हवामानाने त्यांना सतत आजारपण दिले, त्यामुळे ते भारतात परतले. परंतू केवळ वयाच्या ३३ व्या वर्षी तामिळनाडू येथील कुंभकोनम् येथे २० एप्रिल १९२० रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. प्रचंड बुद्धिमत्ताच्या या गणितज्ञाचे अकाली निधन झाले. श्रीनिवासा रामानुजनला त्यांच्या क्षमतेनुसार वातावरण मिळाले असते तर काय झाले असते. पण
नियतीच्या मनात काय असते हे कुणीही जाणू शकत नाही. या अश्या दुर्दैवाची कल्पनाही करवत नाही. सुरवातीचे १६/१७ वर्ष शिकण्यात गेलीत. त्यानंतर
८/१० वर्ष पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षात गेली. मिळालेल्या ६/७ वर्षात गणिताचा प्रवास केला. जगाला गणिताची वेगळी ओळख करून दिली. त्यावेळी त्यांना प्रत्येक पावलागणिक संघर्ष करावा लागला. गणिताच्या आवडीसाठी लागणारा वेळ वरुन त्यांचा उदरनिर्वाहासाठीची तडजोड त्या सर्वात त्यांना किती अस्वस्थ करणाऱ्या घडामोडी, दैनंदिन अनेक अडचणी किती प्रतिकूल परिस्थितीतही छंद जोपासने म्हणजे महा शिखर गाठून सुर्याला हाती झेलणेच आहे. त्या
परिस्थीतीतून त्या दिव्य पुरुषाच्या मनातल्या वेदनांना काही ठावच नसेल, कदाचीत ह्रदयातिल घुसळण सतत चालूच असणारे एक वादळ, त्यामुळे निर्माण होणारे ते विष घेवून आपली वाटचाल सुरु ठेवून जगाला अंतर्भूत करुन रामानुजनने लवकर शांती घेण्यास योग्य ठिकाणी निघून गेलेत. परंतू विध्यार्थ्याना सातत्यपूर्ण कार्याची, आव्हाने पेलण्याची आणि चिकाटीशिवाय काहीच मिळत नसते, हे रामानुजनने दाखवून दिले कितीही कष्ट असले तरी ध्येय न सोडण्याची प्रेरणा पण
त्यांनी दिली. कार्यक्षमतेवर विश्वास ठेवायचा, प्रतिभा आपच येईल. प्रवास हा असुरक्षित रस्त्यावर हेलकावे खावच लागतात. खाचखळग्यात पडाव लागत असते, तेंव्हाच यशस्विता आपला अमूल्य वेळ देवून सक्षम करत असते.