"घरातले घरपण"
"घरातले घरपण"
"अगं सुनबाई, मी काय म्हणतो, मला एक कप चहा देतेस का?"
"आलात का भटकून..."
"अरे भटकून म्हणजे?असं काय बोलतेस, जरा वेळ शतपावली करायला गेलो तर म्हणे आलात का भटकून हे काय बोलणे झाले का!"
"दिवसभर तुमची शतपावली असते, एखाद्या गाडीवाल्याने धडक दिली म्हणजे? आलं घरबसल्या दुखणे..."
"म्हणजे तुला काय म्हणायचं सुनबाई की मी दिवसभर घरातच कोंबून बसायचं का, म्हणजे जराही जीवाला उसंत नको का? तुम्ही फिरायला जातात ते फिरणे असते आणि आम्ही फिरायला गेले ते भटकणे झाले, व्वा, तुला चहा द्यायचा नसेल तर नको देऊस पण उगाच नुसते उटणे नको घोळू..."
"मला काय करायचं, मी तुमच्या भल्यासाठी सांगितले..."
"माझ्या भल्याबऱ्याचा तू नको विचार करूस तुला चहा नसेल द्यायचा तर नको देऊ पण..."
"प्रश्न तो नाही घरात मला काही कमी काम असतात का, ऑफिसमधून दमुनभागून आल्यावर जरा विश्रांती घ्यायची म्हटलं तर काही ना काही धूपटणे असतेच."
"मी चहा दे म्हटले विश्रांती करायला नाही म्हटलो..."
"रोज सकाळी लवकर ऊठून घरातली कामे उरकावी लागतात. मुलांच्या शाळेची तयारी, डबा करून ऑफिसला पळावे लागते पुन्हा घरी आल्यावर जीवाची घालमेल..."
"घालमेल कसली ऑफिसात घेवून जायला गाडी येते सोडायला गाडी येते..."
"ऑफिसात कटकटी काही कमी असतात का..."
"मग सोडून द्या नौकरी घरी बसा..."
"घरी बसायला तुम्ही आहात ना, तुम्हाला काय काम असतंय... आता रिटायर झाला तेव्हा घरातली कामे करा. उगाच रिकामटेकडा टाईमपास करत बसायचा इथे तिथे..."
"हे बघ सुनबाई आता अती होतंय उगाच काहीबाही बोलू नकोस, जगात तुच एकटी संसार करत नाही किंवा नोकरीला नाही. खुप जण घर सांभाळून नोकरी करतात पण ते उगाच गाजावाजा करत नाही समजलं काय... तुझ्या सासुनेसुद्धा हालअपेष्टा सहण करून संसार केला बरं!"
"म्हणजे?"
"आहो मी काय म्हणते उगाच शुल्लक कारणाने तुम्ही भांडत बसणार आहात का? एक दिवस चहा नाही घेतला तर कुठे घशाला कोरड पडणार आहे, आता आपला संसार त्या़चा झालाय, तेव्हा उगाच त्यांच्यात आपली लुडबूड नको."
"म्हणजे आता आपला काहीच अधिकारच राहीला नाही का? संस्कार असल्याशिवाय संसार होत नाही काय..."
"पुरे आता, जमाना बदललाय आता ते जस वागतील त्याप्रमाणे आपल्याला वागावे लागेल तेव्हा आपली सेवा होईल ही अपेक्षा मुळातच चुकीची आहे..."
"म्हणजे? आपण जे काही केले ते गेले का वाया..."
"हो! असंच समजा..."
"नाही, वसुधा, वेदना होतात गं, मनावर पडलेले ओरखडे सहन होत नाही..."
"आता चहा नाही मिळाला याचा अर्थ काय तुम्ही रुसुन बसणार आहात जाऊ द्याना उगाच कशाला त्रागा करून घेताय... आता आपणच बदलायला हवं, आपल्या वेदना त्यांना नाही कळायच्या..."
"हो खरं आहे म्हतारपण म्हणजे अडगळीतल्या सामानासारखी अवस्था होते बघ, नका निट बोलू पण तिरस्कार ती करू नका, ज्या मुलाला आपण जीवापाड जपलं, वाढवलं शिकवलं, नोकरीला लावले, लग्न करून दिले एवढंच नाही तर घरसुद्धा घेवून दिले. तोच मुलगा आता बायकोच्या बाजुने उभा आहे. आईवडीलाच्या सुख-दुःखाशी त्या काही देणेघेणे राहिले नाही ठिक आहे जशी देवाची मर्जी..."
"बाबा! .."
"या आज कशी आठवण आली बापाची, काहीतरी काम असल्याशीवाय बापाची आठवण होणार नाही एरव्ही घरात असुनही बोलायला वेळ नसतो...."
"आहो काय तुम्हीपण उगाच बोलताय..."
"नाही म्हणजे, उद्या सिमाने आई बाबा तिचे भाऊ वहिनी आणि बहिण त्यांचा परिवार येतोय आपल्याकडे..."
"तुझ्याकडे म्हण... बरं मगं..."
"अं तेव्हा तुम्ही काही दिवस... घरामागच्या आऊटहाऊस... राहीला... तर......"
"का रे... आमचा काही वास येईल का काय त्यांना..."
"नाही म्हणजे उगाच मुलांच्या गोंगाटाचा त्रास तुम्हाला नको म्हणून शिवाय आई पण आजारी आहे तिचा खोकला सतत सुरूच रहातो तेव्हा..."
"असं होय... बरं बाबा काही हरकत नाही आमच्या दुखण्याची उगाच त्यांना लागण नको, आई बापा पेक्षा तुझे पाहूणे खुप महत्वाचे आहेत... चल वसुधा आपापला अंत घरामागच्या आऊट हाऊसमधेच..."
"मी नेतो ना आईला!"
"नको काही गरज नाही माझ्या बायकोचा भार उचलायला हा मी समर्थ आहे मला कुणाच्या आधाराची गरज नाही."
"नाही बाबा असा गैरसमज करून घेऊ नका खरंतर आम्ही काही दिवस बाहेर फिरायला चाललोय म्हणून म्हटले..."
"खुशाल जा काही म्हणणे नाही, मेलो तरी निरोप पाठवणार नाहीत मग तर झालं.... ये आता बाळ पाहुण्यांच्या स्वागताची तयारी कर जा.."
"आहो हे काय केलंत तुम्ही उगाच मन दुखवलं त्याचं... खुप दिवसांनी तो भेटला दोन शब्द चांगलं बोलायला काय हरकत होती..."
"वसुधा ज्या घरात आपलेपणा नाही ते घर नसतं इथे माणस असुनही घराला घरपण नाही आपला सुहास आपली कर्तव्य विसरून परक्यासारखा वागतोय तेव्हा खुप वाईट वाटतं..."
"जाऊ द्या उगाच मनला लाऊन घेवू नका ज्या दिवशी त्याला त्याची चुक कळेल त्या दिवशी तो निश्चीत माफी मागेल..."
"त्या दिवशी आपण जिवंत असायला हवं..."
"बाबा कसे आहात..... आलात का...."
"हो... आई कुठे गेली...?"
"ती गेली तिच्या घरी..."
"तिच्या घरी म्हणजे..."
"आजारपणाच ओघ घेऊन तुझी देवा घरी निघुन गेली..."
"काय नाही बाबा नाही हे खोटं आहे..."
"मरण्याआधी तुम्हा दोघांची नातवंडांची खुप आठवण काढत होती, सुनबाई रागऊ नका तिला समजुन घेत जा, तिची काळजी घ्या, मुलीसारखी वागवा, कामात मदत करत जा वैभवकडेही लक्ष द्या... राघव आणि सायलीला रोज बागेत फिरवून आणत जा, स्वतःचीपण काळजी घेत जा, दुसऱ्याची काळजी घेण्यातच ती स्वतःचं जगणं विसरून गेली..."
"बाबा तुम्ही आम्हाला कळवायला नको का..."
"कसं कळवणार तुम्ही तुमचा संपर्क नंबर दिला असता तर कळवले असते. पण तुम्हाला तुमच्या आनंदात व्यत्यय नको होता म्हणून घेतलेच चार उसणे खांदे आणि केला तिचा अंत्यसंस्कार आता त्या तुझ्या आईच्या अस्थी तुझ्या हातुन विसर्जन कर म्हणजे तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मलाही जाता येईल..."
"तुम्ही कुठे जाणार बाबा?"
"वृद्धाश्रमात..."
"काय?"
"हो ज्या घरात घरपण देणारी माणसं नाहीत त्या घरात राहून काय उपयोग... त्या पेक्षा ज्यांचं कोणी नाही त्यांना आपलं समजून त्याच्या सोबत राहील्याने थोडं दुःख तरी कमी होईल... घरात आपली माणसं असली की घर कधीच हरवत नाही माणुसकी आणि प्रेमाच्या प्रकाशात घरंच नाही तर घरातली माणसं देखील आनंदात राहतात..."
"नाही बाबा आम्ही तुम्हाला कुठेच जावू देणार नाही आम्ही चुकलो बाबा आम्हाला क्षमा करा.... आमच्या चुकीमुळे हलगर्जीपणामुळे आईला हरवून बसलो तेव्हा आता तुम्हाला नाही हरवणार आम्हाला तुमची गरज आहे..."
"हो बाबा खरंच माझंही चुकलं मला क्षमा करा मुलगी म्हणून.... आईंनी माझी काळजी घ्यायला सांगीतल्यावर काय तुम्ही आपल्या लेकीला सोडुन वृद्धश्रामात जाणार का... नाही बाबा आम्हाला तुमची गरज आहे तुमचा आधार हवा आहे आम्हाला... पद प्रतिष्ठेच्या मोहापायी आम्ही मान सन्मान विसरलो पण आता आमची चुक कळाली आम्हाला नका सोडुन जावू...."
"नाही रे, पोरांनो नाही सोडुन जाणार... इतके अधीर होवू नका चुकलेल्या वाटेवरून वेळेवर योग्य दिशेला आलात मला खुपच आनंद झाला भरकटलेल्या वादळात सापडलेली माझी लेकरं आज घरी परतल्याने घराला घरपण मिळाले.... चला या पोरांनो आपण सर्व मिळून एक नवीन घर करू, त्या घरात घरपण असेल प्रेम आणि आनंद असेल अशा घरात आपण सर्व मिळून एकत्र राहू या...."