गाव विकायला काढले
गाव विकायला काढले
किती दिले निवेदन
वाचून त्यांनी फाडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
नाही रस्ते नाही लाईट
नाही चालायला वाट
आश्वासनांचा वाहतोय
नुसता कोरडा पाट
चपला झिजवून झिजवून
हजारदा हात जोडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
पायी चालले जात नाही
एसटीसुध्दा येत नाही
रोज पायपीट करून शहराकडे जायचं
गावालगतच्या नदीतून
ओलं होवून यायचं
ईथेतर हत्या अत्याचार
अन्याला न्याय नसतो
ईथे तिथे गुन्हेगार मोकाट दिसतो
भूलथापा देवून यांनी
एक मत घेवून नाडले
विकास शुन्य माझ गाव
विकायला काढले
पायाला फोड येतो
दवा मिळत नाही
आजारी देहावर
ईलाज होत नाही
पेपरमध्ये छापून आल्यावर
मदतीचे नुसतेच
फर्मान सोडले
विकास शुन्य माझे गाव
विकायला काढले
बेरोजगारांची भटकंती असते
महागाईला लगाम नसते
शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही
समस्यांची व्यथा कोणीच ढुंकून पहात नाही
अरे खुर्चीवर बसुन बसुन
हे स्वतःच ईतके वाढले की
विकास शुन्य माझं गावं
विकायला काढले
अवकाळी पाऊस येतो
पोटाला भाकर मिळत नाही
जे पिकतं ते हाती लागतं नाही
खोटेनाटे पंचनामे करून
हे सरकारी चॉकलेट चघळायला देतात
नमिळणाऱ्या निधीची वाट पहायला लावतात
अरै कर्जाच्या ओझ्याने
जमीनीत गाडले
विकास शुन्य माझे गावं
विकायला काढले
काय झाडी काय डोंगर
काय हॉटेलमध्ये राहून
काहीच ओक्के होत नाही
खोक्के खाक्के देवून घेवून
सत्ता कायम ऱ्हात नाही
मत घेतात तसे जनतेचही
भल केले पाहिजे
गाडीचा काच खाली करून
निदात लांबून तरी पाहिले पाहीजे
पण नाही...
गल्लीबोळात चौका चौकात
ज्यानेत्याने आपले आपले
झेंडे गाडले
विकास शुन्य माझे गावं
विकायला काढले
