Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

शेतकऱ्याची दिवाळी

शेतकऱ्याची दिवाळी

1 min
228


त्या गरीब शेतकऱ्याच्या घरी

दिवाळीला दिवाही जळतं नाही

चटणी भाकरीशिवाय त्याच्या ताटात काहीच पडतं नाही

दुसऱ्याच्या घरची दिवाळी

तो दाराआडून पाहत असतो

 त्याच्या झोपडीच्या बंगल्यात

लेकरांसगे तो सुखात दिसतो


गरीबी तर त्याच्या 

पाचवीला पुजली असते

डोक्यावर कर्जाचे ओझे असते

देणघेण फेडण्यासाठी तो 

मायबाप सोडून  

दुरदेशी जात आसतो

नशिबीत्याच्या पोटासाठी

संघर्षाचा वणवा पेटला असतो


थंडी वारा पावसाची तो

पर्वा कधीच करत नाही

घाम कष्टाचा गाळताना 

जराही थकत नाही

बायको पोरासकट काम करून

एका भाकरीची चार तुकडे

सर्वमिळून खात असतो

आभाळाच्या छताखाली

एकमेकांना घास भरवतांना 

किती आनंदात दिसतो


सणवार दसरा दिवाळी तर

श्रीमंताच्या घरी दिसते

काबाडकष्ट करणाऱ्याला

जगण्याची विवंचना असते

एकिकडे फटाक्यांची 

आतषबाजी

फराळाचा घमघमाट

नव्या पोशाखात बागायतदार 

श्रीमंतीत दिसतो

एकिकडे गरीब दुबळा शेतकरी

कसाबसा मिळेल त्या जागेवर 

झोपडी थाटून

तिन दगडांच्या चुलीवर

त्याची भुक जाळत असतो


गोडधोड शीरापुरी 

त्याच्या पोटालाही लागत नाही

अवकाळी दुष्काळीमुळे

सुखासुखी जगणे त्याला 

माहीत नाही

हालअपेष्टा सहण करूनही

तो कोणाच्या उपकाराची ठेव 

ठेवतं नसतो

लेकरबाळांना कवेत घेवून

उघड्या रानात स्वाभीमानाने दिवस काढत असतो.


दुसऱ्याला मोठ करणारा

शेतकरी शेतमजूराच्या

फाटक्या कपड्याला कोण्या श्रीमंताच्या घरचा दोराही लागत नाही

गालावर ओघळणाऱ्या अश्रुंना 

पुसायला कोणाचे हात पुढे होत नाही

जगणे कसेही असले तरी 

त्याची चिंता करत नसतो

कोणी त्याच्या राजमहलचा

 बादशाह असेल

शेतकरी त्याच्या झोपडीच्या 

राजवाड्याचा राजा असतो



Rate this content
Log in