Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

नवे स्वप्न

नवे स्वप्न

5 mins
190


'थांब निशा! मला तुझ्याशी बोलायचं आहे'.

  'पण मला नाही ना बोलायच तुमच्याशी',

'तू उगाचं नको टाळूस मला प्लिज,अस का वागतेस तू'!.

  'नाही सांगता येणार, आणि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न घेवून तुम्ही माझ्या मागे मागे येवू नका'.

'का नको,?का नको सांग ना मला,आपण बसुन बोलूया का!,हे बघं तुझ्या काय अडचणी असतील त्या मी समजू शकतो पण मला काय म्हणायचं ते तू ही एकून तर घे? 

  'मला माहित आहे तुम्हाला काय म्हणायचं ते,तेव्हा आता पुन्हा नको'.

'का नको ते तर सांगशील'.?

 'नाही'.

'हे बघ निशा,आयुष्याच्या आभाळात सुख दुःखाचे चांदणे कधी पाहिलेस का तू?'आपत्तीच्या उल्कापातात समृद्धीच्या चादरात,अनुभवांची पौर्णिमा आणि अमावस्या एकदा बघं,भावनांच्या एक एक पाकळ्या मोकळ्या होतील आणि तुझ्या जगण्याचा संदर्भच बदलून टाकतील'.

  'हं....शृंगारीक भाषा बोलायला खूप सोप आहे सर पण प्रत्यक्ष कृतीत कोणी आणत नाही.तस बघायला गेल तर मलाही वाटतं या माणसांच्या गर्दीत स्वतःला हरवून घ्यावं,देहभान विसरून आभाळात भरारी घ्यावी,आसमंतात पसरलेला आनंद लपेटून  घ्यावा,पण त्याच क्षणी जबाबदारीचा डोंगर डोळ्यासमोर दिसायला लागतो.वेदणांची झळ आठवते,नकळत मिळालेल्या जखमा आठवायला लागतात,मग वाहू लागतो अश्रुंचा महापुर'.

  .'त्याच वेदणांची तिव्रता कमी करण्यासाठीच तर मला तुझ्याशी बोलायचं आहे!,नुस्तच अंधारात राहुन उजेडाची अपेक्षा केल्याने मार्ग थोडीच सापडणार आहे.तुझ्या व्यथा कळल्याशिवाय तुझ दुःख कमी होणार नाही,एकदा सांगुनतर बघं!अंग दोघांच दुःख सारख असेलना तर ते दोघांनी वाटून कमी करायचं असतं,व्यथाना मोकळं केल्याशिवाय नकळत मनही हलके होते.तुझ्या जबादारीच ओझ मालाही उचलू दे'

  'सहानुभूतीची फुंकर मारायला तर सर्वच पुढे येतात पण वेदना,यातना, अडचणीत,कोणीच मदतीचा हात देत नाही. दुसऱ्यांच्या अडचणी पाहून चार पावले मागे होतात जबाबदारी घेण्याच नाटकं....'.

 'सर्वच काही सारखे नसतात निशा,कधी कधी माणसांच्या गर्दीत समजून घेणारा कोणीतरी एकजण असतोचं,कधी कधी वेदना न बोलताही कळतात तू सांगत नसलीस तरी मला तुझ मन वाचता येतं.पण तू बोलशील तर तुझ्या वेदना अधीक स्पष्ट होतील.!कस आहे ना निशा,अडचणी धरून ठेवायच्या नसतात त्या सोडवायच्या असतात आणि त्या सोडवण्यासाठी मी हात पुढे करत असताना तू मागे मागे सरकतेस? अगं आघाताच्या जखमा दाखवल्याशिवाय जाणिवेचा मलम लावणार तरी कसा! मी तुला आपलेपणा देण्याचा प्रयत्न करतोय आणि तू दुर पळतेय तुझ्या वेदनांची तिव्रता मलाही कळूदे,तुझ्या नैराश्याचे कारण काय मलाही सांग'

  'काय सांगायच सर,अपघात भाऊ गेला आणि आजारपणमुळे वर्षभरात वडिल गेले, एका वर्षात घरातले दोन कर्ते पुरूष गेल्याने आईच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला ती हा आघात सहण करू शकली नाही.सारखी सारखी आजारी राहून भ्रमिष्ट झाली.घरातले कमवणारेच गेल्यावर आर्थिक विवंचना आली,कुणाकडूनही मदत मिळाली नव्हती माझ्या कुटुंबातील माणसे आमच्यापासुन दुरावलीत, शेवटी पोटातील भुकं शमवण्यासाठी मला नौकरीशिवय पर्याय नव्हता.आईच्या आजारपणावर खर्च कसा करायचा, दैनंदिनी गरजा कशा भागवायच्या अशी अनेक यक्ष प्रश्न आ वासुन समोर उभी होती,खूप प्रश्न खूप अडचणी अवतीभवती घोळत होते. पण मार्ग सापडत नव्हता,म्हणून मी ठरवलं स्वतःला सिद्ध करायच असेल तर आधी शिकलं पाहिजे,तेव्हा सर्व अडचणी सांभाळून नौकरी करता करता मी पदवीधर झाले,एमबीए केले आणि आज बँकेत ही चार आकडी वेतनश्रेणी घेवून अडचणींचा मार्ग काही अंशी मोकळा केला, नौकरीमुळे परिस्थिती सुधारली पण आईची जबाबदारी माझ्यावरच आहे ना,माझ्याशिवाय तिच कोणीच नाही, लग्नाची मागणी घालायल पाहून यायचे, बघून जायचे पण होकार कोणाकडूनही मिळायचा नाही कारण आईची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही.अस बरेच दीवस चालले मग मी ठरवले बस आता जगायचं ते फक्त आईसाठीच'.

 'आणि मग आई गेल्यानंतर!तेव्हा काय करशील,जगायचं सोडून देशील?आज तुझ्या आईला तुझा आधार आहे तुला आधाराची गरज पडल्यावर मग तू कुणाचा आधार घेशील, आधाराशिवाय माणसाच आयुष्य अपुर्ण असतं निशा,जोडी असल्याशिवाय आयुष्याला गोडी येत नाही'.

'मग माझ लग्न झाल्यावर तिच काय!'

मि आहेना'!

'म्हणजे'?

'म्हणजे....?हं,तू माझ्याकडे आपल म्हणून कधी पाहिलंच नाहीस म्हणून तुला असा प्रश्न पडला,जरा माझ्या मनाता डोकावून पाहिले असते तर तुला माझ्याही भावना कळाल्या असत्या पण तू तुझ्या जबाबदारीच ओझ खाली उतरवयाला तयारच नाही म्हटल्यावर त्याला मी तरी काय करणार, स्वतःभोवती आखून ठेवलेल्या चौकटीतून तू जेव्हा बाहेर पडशील ना तेव्हा तुला आपलेपणाची जाणीव झालाशिवाय राहणार नाही'.

'मला विचार करावा लागेल',

'जरून कर पण नकार देवू नकोस मलाही तुझ्या आधाराची गरज आहे.कारण श्रावणाच्या अनेक सरी माझ्याही आयुष्यात येवून गेल्यात पण माझ्या मुक्या तृष्णेला बोलताच आले नाही खर सांगू,तूला कुणाचा आधार नाही किंवा कुणाची साथ नसतानाही तू तुझी पावले चुकवली नाही किंबहुना कुठलाही चुकीचा विचार मनात येवू दिला नाही.अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तू परिस्थितीवर मात करत आज स्वतःच्या हिंमतीने स्वतःच्या पायावर स्थिरस्थावर झालीस म्हणून मला आयुष्यभरासाठी तुझा आधार हवा आहे' 

  'खरं सांगू का,तुम्ही दिसायला एव्हढे छान असताना माझ्या पेक्षाही तुम्हाला छान मुलगी मिळू शकेल मग मीच का?'

' कारण जो दुःखात राहून आयुष्याला निट पारखून जगू शकतो तो दुसऱ्याच्या आयुष्याला निट सांभाळू शकतो म्हणून तुझ्याशिवाय दुसरा कोणीच माझ्या आयुष्याचा सुत्रधार होवू शकतं नाही.एखाद्याला जर जगण्याचा आनंद हवा असेल ना तर त्याने सुखाची व्याख्या शोधली पाहिजे आणि मला मिळाली आहे सुखाची व्याख्या.कारण माझेही आईवडील एकाच वेळी अपघातात गेलेत आणि मी एकटाच झालो त्यानंतर काही दिवस काकांकडे राहीलो पण त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच घर सोडले,कट कारस्थान करून त्यांनी माझ्या वडिलांचं घरही बळकावून घेतले,मग मी होस्टेलला राहू लागलो होस्टेलवर राहूनच माझे शिक्षण पुर्ण केले पदवीधर झालो त्यानंतर स्पर्धापरीक्षा देत गेलो आणि नशिबाने साथ दिली म्हणून आज मी बँकेत झोनल ऑफिसर म्हणून सन्मानाची नौकरी मिळाली आणि मानाने जगू लागलो आता ज्यांनी मला त्रास दिला,ज्यांनी छळ केला ते प्रेम देण्याचा प्रयत्न करताय,ज्यांनी दुर केले ते जवळ येवू पहाताय ज्यांनी नकारले ते स्विकारायच म्हणताय पण मला अशा मतलबी स्वार्थी नात्यात अडकायचं नाही जो मला समजून घेईल त्याच्याशीच माझं आयुष्य जोडायचं आहे आणि मला तुझ्याशिवाय कोणीच योग्य वाटतं नाही.तू आणि मी एक होण यात जगा वेगळ काहीच नाही मला फक्त तुझा होकार हवा आहे राहिला तुझ्या आईचा प्रश्न तर आपण दोघे मिळून तिचा सांभाळ करू मलाही आईच प्रेम मिळेल आणि तुझ्या आधाराच बळ,निशा तू प्रेमाची शाल दिलीस ना तर मी चांदणेही लपेटून घेईन, माझ्या आयुष्याच्या कोरड्या मातीवर तू वर्षाराणी होवून बरसं, आयुष्याच्या वाटेवरती तुझ्या पावलांशिवाय माझे पावले पुढे पडणार नाहीत.तुझ्या प्रत्येक सुख दुःखात माझा सहभाग असेल.अगं नुसते घर असुन चालत नाही घराला घरपण देणारी तुझ्यासारखी पाठराखी असलीना तर लक्ष्मीच्या पावलांनी घर आणखीन उजळून निघते.संसार एकट्याने नाही होत त्याला दुसराही हात लागतो.विचार कर,"दे माझ्या हातात तुझा हात

सातजन्माची असेल तुला माझी साथ,बघ ना आपण दोघ एकच ऑफिसमध्ये नौकरीला, तुझ आणि माझी आपल दोघांचही आयुष्य अधांतरीत,तेव्हा या नजरानजरीच्या खेळाने तुला आणि मला ऐकाच वळणावर आणून सोडले तुला मला एकमेकांच्या आधाराची गरज असल्याच नियतीला माहित असाव म्हणूनच

कदाचित नियतीने हे असं घडवून आणले,निशा अगं आयुष्याच्या वाटेवर नवे स्वप्न बघायला तुझा खांद मिळाला ना तर तुझ्या माझ्या भोवती नैराश्य कधीच फिरकणार नाही.'

 'हं तुम्ही खर बोलतायं नियतीला जे करायच असतं ते घडूनच येते मलाही तुमचं म्हणणं पटतयं लग्नगाठी या वरूनच बांधून येतात तेव्हा मी कितीही नकार दिला तरी नियतीने ठरवलेल कधीचं चुकणार नाही.शिवाय तुमच्यासारखा जोडीदार लाभल्यावर आणखीन काय हवं राहीन मी तुमच्या सोबत आईला घेवून चालेल ना!'

'हो चालेल,तुझ्याशिवाय माझ जगणं नाही.आणि तुझ्या शिवाय मी नाही.चल उद्याच आपण छोटेखानीत देवळात जावून लग्न करू आणि नव्या आयुष्यात नवे स्वप्न पाहू काय'.

'हो!'


Rate this content
Log in