घंटी वाजवणारी आत्मा.
घंटी वाजवणारी आत्मा.
राहुल हा सरकारी सामाजिक डॉक्टर होता. तो तसा शहरात राहयचा पण सरकारी म्हटल्यावर त्याला खेड्या वरील सरकारी दवाखान्यात नोकरी होती. दुपारी तो दवाखान्यात बसला होता एक बाई आली तिच्या हाताला लागले होते त्याने तिला पट्टी करून दिली.जाता जाता ती बोलली साहेबजी परत भेटणार आपण.ती काय बोलली त्याला कळालेच नाही रात्र झाली तो घरी निघाला. तो दररोज लवकर येत असे पण आज जरा उशीरच झाला म्हणजे अकरा-साडेअकरा होऊन गेले होते.लाईटीचे काम चालू होते म्हणून साऱ्या गावाची लाईट गेलेली होती. तो चालत चालत घरी आला घरी येऊन त्याने हात पाय धुवुन शेगडी वर त्याने खिचडी टाकली. जेवता जेवता त्याला हसूू आले त्याला अण्णा काकांची बातमी आठवली अण्णा काका म्हणजे त्याच्या घराजवळून थोड दुरवर त्यांचे घर होते . ते दररोज रात्री बसायला यायचे गावातल्या सगळ्या बातम्या सांगायचे
कोणाची जमीन विकली, सासु सुनेचं भांडण झाले,याची बायको भुुत झाली, त्याची गाय चोरीला गेली, घंटी वाजवणारी आत्मा, रात्रीचा पैंजणांचा आवाज, तमाशातील भुते पण तो शेवटी डॉक्टर होता त्याला भूत प्रेतांवर विश्वास नव्हता.
जेवण करून बसला बाहेर बघितले तर त्याला घंटीचा आवाज जाणवत होता, पण गावात सप्ताह बसला असेल त्याला वाटले. तो गावात नवीन असल्यामुळे तो कोणाला ओळखत नव्हता खिडकीतून आवाज आला डॉक्टर साहेब जी राहुल बोलला कोण तुम्ही ? तिकडून आवाज आला म्या शांता तमाशावाली आज आमचा शेजारच्या गावात तमाशा होता पण रस्ता चुकल्यामुळेे थोडा उशीर झाला. आमची गाडी ते खराब झाली थोडी मदत करा कोमल मधुर आवाजात ती बोलते राहुल ला दया आली त्याने घराला कुलूप लावले व तिच्या मागे चालायला लागला. घंटीचा आवाज वाढत चालला होता त्याने विचारलेे घंटी का वाजत आहे.ती बोलली आमच्या ड्रायवरला मी घंटी वाजवायला लावली आहे रस्ता चुुकू नाही म्हणून अंधार होता त्यामुळे त्याला फक्त सफेद साडी दिसत होती त्यानेे विचारले तुम्ही सफेद साडी का घातली आहे. ती बोलली आज आमचा दिवस हाय. अचानक लख्ख प्रकाश पडला व त्याने जेे बघितलं ते दातखिळी बसणारेे दृश्य होते. ते माणसं नाहीतर भुते होती उलट्या बाहुल्या पाय पण उलटे ,विचित्र चेहरेे होते , हाडांची गळ्यात माळ होती सकाळी बघितलेले तारखेला काळा रंगाचा गोल म्हणजे आज अमावस्या होती त्याने धीर धरून विचारलेे तुम्ही कोण ते बोलले आम्ही भूत आजचा दिवस आमचा तो बोलला मला कशाला आणले आहे मग इथे मग ती हडळ म्हणजे तमाशावाली तू फक्त एक काम करायचे त्याने शेजारी बघीतले तिथे एक लाकडांचा गठ्ठा होता त्यावर सफेद रंंगाचे कापड आथरलेले होते व त्यावर हाडे होती. ती बोलली तू फक्त त्याच्यावर बसून घंंटी वाजवायची आहे. आम्हांला नाचायला. तो तिथे जाऊन बसला व घंंटा वाजवत होता ते भुतं वाकडेतिकडेेे कल्ला करून नाचत होते.एकच वाक्य सगळ्यांच्या तोंडी आजचा दिवस आमचा डॉक्टर साहेब कामाचा. तो पण त्यात गुंग झाला आणि उभा राहुन जोरात घंटी वाजवायला लागला. सकाळ झाली सगळे नदीच्या त्या काठी बघत होते अण्णाकाका पण गेले तर तिथे एक चिता जळाली होती शेजारी डॉक्टर राहुलच्या चपला होत्या अण्णा काका शेजारच्या माणसाला सांगत होते मी तरी त्याला घंटी वाली आत्मेबद्दल सांगितले होते,की कोणी रात्री घंटी वाजवायला लावली तर वाजवु नको पण त्यालाा विश्वास कुठे पण शेजारच्या माणसाचेे अण्णाकाकांकडे लक्षच नव्हते.

