एक मुलगा...
एक मुलगा...
मुलीच्या भावना, आईची माया,माझे बाबा ह्या विषयावर तर खूप लेख, कविता, चारोळ्या लिहिलेल्या पण अजून कधी एक मुलगा,मुलाचे मन,एका मुलाचे कर्तव्य हे विषय कधी सुचलेले नाही.मुलगा वंशाचा दिवा आहे, हे सगळयांना दिसते पण त्या घराचा उजेड दिव्यावरच अवलंबून असे,अर्थातच संपूर्ण घराची जबाबदारी त्या मुलावर असते.आता सध्याच्या युगात मुलगी ही प्रत्येक गोष्टीत पुढे चालली आहे आणि जायला पण पाहिजे आनंदाची गोष्ट आहे पण त्याचे टोमणे ब-याचदा मुलांना बसतात.सगळेच नाही पण १०० मधुन ५० टक्के मुल तरी शिकतात पुढे जातात नाव कमावतात पण त्यात 50 टक्यांमधील एका मुलाचे पण टोमणे खाताना माझ्या आयुष्यात तरी मला एखादी तरी अजून एक मुलगी नाही दिसली.म्हणतात मुलीला लहानपणापासून जबाबदारी हा शब्द माहित असतो. कारण मुलीला मुलगी, बहिण,आई,नातं,सुन अशे विविध कर्तव्य पार पाडायचे असतात ,म्हणून तिला कर्तव्यनिष्ठ म्हणतात.तसेच मुलाला पण लहानपणापासूनच जबाबदाऱ्या राहत आलेल्या आहेत. 'तुझ्या खेळणी फेकू नको तुझ्या लहान बहिणीसाठी ठेव' 'तुझ्या लहान बहिणीवर लक्ष ठेव' मुलाला पण लहानपणापासूनच प्रत्येक गोष्ट त्याच्या लहान बहिणी सोबत शेअर करावा लागते. सायकल, खाऊ, खेळणी त्यावेळेस घरातले बोलतात करतो तर काय त्याची ती जबाबदारी आहे.
जेव्हा मुुंल शाळेत जातात तेव्हा पण तो मुलगाा आपली बहीण ठीक आहे ना ! या हेतूने त्याचे सर्व लक्ष त्याच्या बहिणीच्या वर्गावरच असते.मुलगी जितकी आई वडीलांंची काळजी घेते, प्रेेम करते तितकाच मुलगा पण करतो. फक्त तो करण्यात आणि दिसण्यात फरक असतो. बाबांचा बर्थडे आहे म्हणून त्यांची मुुलगी त्यांना गिफ्ट आणते. तिचे बाबा आनंदाने सगळ्या घराला सांगतात माझ्या मुलीने मला वाढदिवसाची भेटवस्तू दिली , पण तिच भेटवस्तू घेण्यासाठी तिच्या भावाने तिला त्याची पॉकिटमनी दिलेली असते, ती कोणाच्या लक्षात नाही येत.
जो मुलगा कधी एक ग्लासभर पाणी आणून देत नाही तोच मुलगा त्याच्या बहिणीच्या लग्नात बहिणीच्या मनासारखे व्हावे म्हणून त्याची धावपळ सुरू राहते. जो मुलगा बहिणीशी भांंडतो, चिडवतो, तोच मुुुलगा त्याच्या बहिणीच्या लग्नात एका कोपऱ्यात उभा राहुुन शर्टच्या बाहीला डोळे पुसत असतो. मुुुुलीला संपूर्ण घर सांभाळायचे असते पण त्या मुलाला घर अशे घर अशे चालवायचे ही जबाबदारी त्याच्या डोक्यावर असते . काही मुलं रडून हसून मन मोकळं करू शकतात पण काही मुलं तेच दुःख आतल्या आत दाबून ठेवतात. जगासमोर तेे दाखवण्याचा प्रयत्न करतात मी मजेत आनंदी आहे .
शेवटी बोलण्याचा हेतू हाच की मुलाचे पण मन असते, त्याला पण जबाबदारी आणि कर्तव्याने घेरलेले असते. फक्त दिसण्यात फरक असतो. अशे ते फार आळशी बेजबाबदार असतात पण संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर असते.
