भावना......
भावना......
1 min
79
माणसांमध्ये सुख दुःख राग तिरस्कार क्रोध प्रेम अशा विविध भावना असतात. प्रत्येक भावनेची परिभाषा वेगळी शब्द वेगळे दृष्टिकोन वेगळा असतो.भावना समजवायला आणि समजून घ्यायला कठीण पण असते आणि सोपे पण!
आपली भावना शब्दांमध्ये प्रकट करायचे कला तशी अवघड असते.भावनेने मन कधी आनंदात असते, तर कधी दुखावले जाते. आपल्या विषयी दुसऱ्याच्या मनात काय भावना आहे , हे आपल्या वागण्यावर अवलंबून असते. आपल्या जवळच्या व्यक्तीला रागातुन अपशब्द बोलले गेले तर पुढच्याच्या भावनांना ठेच पोचते. कधी कधी रागामागे पण काळजी असते. आपली भावना बोलून दाखवण्यासाठी खूप हिम्मत लागते.कोणी ती भावना बोलून व्यक्त करते तर कोणी ती मानातील मनात दाबून ठेवते.........
